हक्कसोडपत्र आणि बक्षीसपत्र व त्यातील फरक
n हक्कसोडपत्र:
फक्त एकत्र
कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वारसाधिकार प्राप्त झाल्यानंतर, त्याच
एकत्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या लाभात स्वत:चा त्या मिळकतीवरील हक्क, विनामोबदला
सोडता येतो. असा हक्क नोंदणीकृत हक्कसोडपत्राच्या दस्ताने सोडता येतो.
s हक्कसोडपत्रासाठी पूर्तता:
१. एकत्र कुटुंबाची मिळकत
२. त्या मिळकतीत मिळणारा हिस्सा
या दोन महत्वाच्या बाबींची एकाचवेळी पूर्तता होणे आवश्यक असते.
∙ हक्कसोडपत्र करणारी व्यक्ती अल्पवयीन किंवा
मानसिकदृष्ट्या अक्षम आणि दिवाळखोर नसावी. ती तर्कशुद्ध निर्णय घेण्यास आणि करार
करण्यास सक्षम असावी.
∙ नोंदणीकृत
हक्कसोडपत्र करून दिल्यावर, मूळ हक्कदाराचा (हक्कसोडपत्र लिहून देणार) संबंधित
मिळकतीमधील मालकी हक्क, ज्याच्या लाभात त्याने हक्कसोडपत्र करून दिले आहे (हक्कसोडपत्र
लिहून घेणार) त्याच्याकडे हस्तांतरीत होतो.
∙ हक्कसोडपत्रावर एकदा स्वाक्षरी
केल्यावर हक्कसोडपत्र करणारी व्यक्ती पुन्हा विचार बदलू शकत नाही. म्हणून
स्वाक्षरी करण्यापूर्वी मालमत्तेवरील हक्क सोडायचे आहेत याची खात्री करावी.
∙ हक्कसोडपत्रावर स्वाक्षरी करून, मालकी हक्क
सोडून दिल्यावर, भविष्यात संबंधित मालमत्तेमधील नुकसानभरपाई मिळविण्याचा
अधिकारही सोडून देण्यात येतो.
∙ हक्कसोडपत्रावर स्वाक्षरी
करण्यापूर्वी, हक्कसोडपत्र करणार्या व्यक्तीला हक्कसोडपत्राच्या दस्तातील
सर्व अटी समजल्या आहेत याची खात्री करावी, कारण
मालमत्तेतील हक्क सोडून देण्याचे काही अनपेक्षित परिणामही होऊ शकतात.
∙ हक्कसोडपत्राच्या लाभार्थीने हे
सुनिश्चित केले पाहिजे की हक्कसोडपत्र करणार्याकडे मालमत्तेची कायदेशीर मालकी
आहे आणि ती हस्तांतरीत करण्याचा त्याला कायदेशीर अधिकार आहे.
∙ हक्कसोडपत्राच्या लाभार्थीला
मिळणारी मालमत्ता ही सर्व कर्जे आणि दायित्वांपासून मुक्त असावी. अशा मालमत्तेवर
कोणतीही थकबाकी कर्जे किंवा शासनाचा कोणताही निर्बंध नसावा.
∙ हक्कसोडपत्र हे कधीही रद्द न
होणारे, अपरिवर्तनीय आहे याची खात्री करावी.
s हक्कसोडपत्रावर
स्वाक्षरी केल्यानंतर, हक्कसोडपत्र करणार्याचा मालमत्तेची मालकी सोडण्याचा विचार
बदलला तरी ती मालमत्ता परत केली जात नाही.
हक्कसोडपत्रामागे परस्परांबद्दल प्रेम,
जिव्हाळा आणि आपुलकी अभिप्रेत असते त्यामुळे
याबाबत कोणतीही भरपाई किंवा मोबदला घेतला जात नाही.
भरपाई किंवा मोबदला घेतला असता त्यासाठी
मुद्रांक शुल्क देय होऊ शकते. परंतु असा व्यवहार एकत्र कुटुंबातील सदस्यांमधील
असल्यामुळे सवलतीच्या दराने मुद्रांक शुल्क आकारले जाऊ शकते.
हक्कसोडपत्र हे लेखी असावे आणि
नोंदणी कायदा १९०८, कलम १७ अंन्वये त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी
करणे अनिवार्य आहे. हक्कसोडपत्र अनोंदणीकृत असल्यास त्याची नोंद अधिकार
अभिलेखात होणार नाही आणि ते न्यायालयात पुरावा म्हणुन ग्राह्य ठरणार नाही.
हक्कसोडपत्रान्वये मालकी हक्कांचे
हस्तांतरण होते. हस्तांतरणास प्रतिबंध असलेल्या मालमत्तेचे हक्कसोडपत्र
करतांना सक्षम अधिकार्याची परवानगी घेणे अभिप्रेत आहे.
∙ संबंधित मालमत्तेच्या नोंदणीकृत आणि कायदेशीर कागदपत्रांन्वये
मालमत्तेचे अचूक वर्णन
∙ एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण.
∙ दोन निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा
याबाबतचा तपशील व स्वाक्षरी, ओळख पुरावे, पॅन कार्ड आणि
आधार कार्ड
∙ आवश्यक असल्यास,
इतर तपशील
∙ दोन्ही पक्षांचे ओळख पुरावे, (पॅन कार्ड आणि
आधार कार्ड)
हक्कसोडपत्र स्वत:च्या हिश्शाच्या
कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात करीत आहे आणि स्वत:च्या हिश्शाच्या
कोणत्या मिळकतींबाबत हक्क सोडलेला नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोडपत्रात
असावा. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण येणार नाही.
∙ हक्कसोडपत्रामागे परस्परांबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि
आपुलकी अभिप्रेत असते त्यामुळे
साधारणपणे, एकदा हक्कसोडपत्राचा नोंदणीकृत दस्त केल्यानंतर ते सर्वसाधारणपणे रद्द
करता येत नाही. हक्क सोडलेल्या मिळकतीत पुन्हा हक्क, हिस्सा मागण्याबाबत
कोणतीही कायदेशीर तरतुद नाही.
तथापि, हक्कसोडपत्र करणार्याला,
∙ जर त्याची फसवणूक करून हक्कसोडपत्र करून घेतले गेले.
या बाबी दिवाणी न्यायालयात पुराव्यासह
सिध्द करता आल्या तर, फक्त दिवाणी न्यायालयाकडूनच हक्कसोडपत्र
रद्द करता येईल.
∙ हक्कसोडपत्र हे सहसा रक्त संबंधी नातेवाईकात केले जाते.
हक्कसोडपत्र रद्द करावयाचे असल्यास रक्तातील नात्याच्या व्यक्तीच्या विरोधात
फसवणुकीचा गुन्हा सिद्ध करावा लागतो आणि त्याच्याविरूध्द फसवणुकीची तक्रार
नोंदवावी लागते.
∙ एवढे करूनही अशा दाव्याचा निकाल केव्हा आणि कोणाच्या
बाजूने लागेल ह्याची शाश्वती नसते.
∙ हक्कसोडपत्र जरी दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केलेले असले
तरी ते दुय्यम निबंधकाकडे रद्द करता येत नाही. त्यासाठी दिवाणी न्यायालयातच
दाद मागावी लागते.
(१) वैध कराराच्या आवश्यकतांचे पालन करण्यात कुसूर झाल्यास हक्कसोडपत्र
रद्द केले जाऊ शकते.
(२) हक्कसोडपत्र वैध होण्यासाठी:
(ए) ते लेखी असावे
(बी) सर्व संबंधित
पक्षकारांनी स्वाक्षरी केलेले असावे
(सी) सक्षम
प्राधिकाऱ्याकडे ते नोंदणीकृत केलेले असावे. हक्कसोडपत्र नोंदणीकृत असल्याशिवाय
ते प्रभावी (effective) ठरणार नाही.
(डी) मालमत्तेच्या वैध मालकाने ते अंमलात आणलेले असावे.
जीवंत व्यक्तीला वारस नसतो.
त्याचप्रमाणे, जो व्यक्ती त्याच्या नातेवाईकाच्या मृत्युनंतर भविष्यात
वारस/ उत्तराधिकारी म्हणून पात्र ठरण्याची शक्यता आहे, त्याला मालमत्तेचा वारसा प्राप्त होईपर्यंत मालमत्ता हस्तांतरणाचा
कोणताही अधिकार नाही. भविष्यात उत्तराधिकारी होणार्या वारसाने केलेले हस्तांतरण
अप्रभावी आहे, हक्कसोडपत्राव्दारे सुध्दा.
(संदर्भ: मा. सर्वोच्च
न्यायालय, दिवाणी अपील क्रमांक ५२१-५२२/२०२३ (२०१७ च्या एसएलपी(सी) क्रमांक
१४९४८-१४९४९ मधून उद्भवणारे-एलुमलाई उमलाई वेंकटेशन विरुद्ध एम. कमला आणि इतर,
दिनांक २५.१.२०२३)
∙ मालमत्तेचे सुलभ हस्तांतरण: हक्कसोडपत्र एका कायदेशीर वारसाकडून किंवा सह-धारकाकडून
दुसऱ्या वारस किंवा सहधारकाचे मालमत्तेचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुलभ करते, विक्री दस्ताची
आवश्यकता दूर करते.
∙ कायदेशीर संरक्षण प्रदान केले जाते: हक्कसोडपत्र, मालकी हस्तांतरणाची स्पष्ट नोंद स्थापित करून
सहभागी असलेल्या सर्व पक्षकारांचे कायदेशीररित्या संरक्षण करते.
∙ जलद प्रक्रिया:
तात्काळ गरजेसाठी मालमत्तेच्या मालकीचे हस्तांतरण होणे आवश्यक असताना हक्कसोडपत्राची
प्रक्रिया जलद असून वेळेची बचत करते.
∙ हक्कसोडपत्राची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर ग्राम महसूल
अधिकारी यांनी हक्कसोडपत्राचा दस्त हा नोंदणीकृत असल्याची खात्री करावी. अनोंदणीकृत हक्कसोडपत्राची
नोंद करु नये.
∙ सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजवावी.
एखाद्या मिळकतीवरील हक्क सोडणे म्हणजे
त्या मिळकती संबंधातील स्वत:चे आणि भविष्यात जे हक्क सोडणार्या व्यक्तीचे
वारस ठरतील त्यांचेही त्या मिळकतीवरील हक्क संपुष्टात आणणे. त्यामुळे एखाद्या मिळकतीवरील त्याचा हक्क
एखाद्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने सोडला असेल आणि हक्क सोडलेला असा सदस्य मयत
झाल्यानंतर त्याच्या वारसांची नावे पुन्हा, त्याने हक्क सोडलेल्या मिळकतीवर
दाखल करणे योग्य होणार नाही.
b|b
प्रत्येक
व्यक्ती ही स्वतः व स्वतःच्या कुटुंबाला, वारसांना जास्तीत जास्त आर्थिक
स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असते. त्याकरिता जास्तीत जास्त मिळकती
(मालमत्ता) कशी मिळतील यासाठी प्रयत्न करीत असते.
मानवाने
त्याच्या गरजेनुसार सामाजिक व पर्यावरणाचे नियंत्रण करण्याकरिता जमीन मिळकत व
हस्तांतराबाबत विविध प्रकारांचे नियम व कायदे केले.
∙
स्वेच्छेने हस्तांतरण:
भेटवस्तू
किंवा बक्षीस देणाऱ्याची इच्छा पूर्णपणे स्वेच्छेने असते आणि त्यावर कोणताही दबाव
नसतो.
भेटवस्तू
देताना देणगीदार कोणताही मोबदला मागत नाही किंवा घेत नाही.
हस्तांतरित
होणारी मालमत्ता ही विद्यमान असावी लागते, म्हणजेच भविष्यात निर्माण होणारी
मालमत्ता भेट म्हणून देता येत नाही.
भेट/बक्षीस
दिलेली मालमत्ता जंगम किंवा स्थावर असू शकते.
भेट/बक्षीस
च्या लाभार्थीने स्वत: किंवा त्याच्या वतीने कोणीतरी त्या भेटवस्तूचा स्वीकार
करणे आवश्यक असते.
∙ नोंदणी अनिवार्य: नोंदणी
अधिनियम १९०८, कलम १७ अन्वये, जेव्हा मालमत्तेचे मूल्य रुपये १००
किंवा त्याहून अधिक असते तेव्हा त्याच्या हस्तांतरणाच्या दस्तऐवजाची नोंदणी करणे कायद्याने
सक्तीचे आहे.
महाराष्ट्र
शासनाने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात बक्षीसपत्राच्या अनुच्छेद- ३४ मध्ये
सुधारणा करून, जवळच्या नात्यामध्ये म्हणजे, पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात, मयत मुलाची पत्नी यांनी जर निवासी
आणि कृषी मालमत्ता ही बक्षीस दिली असेल, तर अशा बक्षीसपत्रास मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) सवलत दिली
आहे.
∙ एकमेव हयात वारस म्हणून वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता
त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाते, अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.
∙ बक्षीसपत्र
करून देणारी व्यक्ती ही बक्षीसपत्र करून देण्यासाठी सक्षम व सज्ञान असावी. ती
वेडी, दिवाळखोर अथवा एखाद्या न्यायालयाने तिला करार करण्यासाठी अपात्र घोषित
केलेले नसावे.
∙ बक्षीसपत्र फक्त नातेवाइकांच्याच
लाभात करावे असे बंधन नाही. बक्षीसपत्र हे कोणतीही त्रयस्थ व्यक्ती, संस्था,
मंडळ इत्यादींच्या लाभातही करता येते.
∙ बक्षीस पत्र करून देणाऱ्याचे (दाता) नाव, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
∙ दोन निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वाक्षरी.
होय,
बक्षीस पत्र हे विना-मोबदलाच असावे. म्हणजेच मिळकतीमधील हक्क हस्तांतरीत
केल्याच्या बदल्यात दाताला लाभार्थीकडून कोणताही मोबदला मिळत नाही.
काही
अटींना अधीन राहून म्हणजेच सशर्त (Conditional) बक्षीसपत्र देखील करता येते. सशर्त भेट स्वरूप आणि उद्देशानुसार भिन्न असू शकतात.
बक्षीसपत्रात नमूद केलेल्या अटींचे
पालन करण्यात अयशस्वी झाल्यास भेट रद्द करण्याचा अधिकार दाता राखून ठेवू शकतो.
तथापि, दाता आणि लाभार्थी या
दोघांनीही बक्षीसपत्रातील अटी व शर्तींना त्यांची ऐच्छिक संमती दिली पाहिजे.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की,
भेटवस्तूशी संलग्न अटी बेकायदेशीर, अनैतिक किंवा सार्वजनिक धोरणाच्या विरुद्ध नसाव्यात.
तथापि, लाभार्थीने,
∙ जर
दात्याची फसवणूक करून बक्षीसपत्र करून घेतले असेल,
∙ दात्याला बक्षीसपत्र करून देण्यास भाग पाडले गेले असेल,
∙ बक्षीसपत्राच्या दस्तऐवजात त्याच्या हेतूचा चुकीचा अर्थ
लावला गेला असेल,
या बाबी दिवाणी न्यायालयात पुराव्यासह
सिध्द करता आल्या तर, दिवाणी न्यायालयाकडून बक्षीसपत्र रद्द करता येईल.
∙ ज्याप्रमाणे एखादा करार रद्द करता
येतो त्या कारणांनी बक्षीसपत्र रद्द करता येऊ शकेल.
s सशर्त (Conditional) बक्षीसपत्रातील अटींची पूर्तता
झाली नाही तर बक्षीसपत्र रद्द करता येईल.
(संदर्भ: एस. सरोजिनी अम्मा विरुद्ध वेलायधून पिल्लई, दिवाणी अपील क्र . १०७८५/१८).
[संदर्भ:
आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, कलम २३(१)]
(संदर्भ: सुदेश
चिकारा विरुद्ध रामती देवी (मा. सर्वोच्च न्यायालय-२०२२),
n हक्कसोडपत्र आणि बक्षीसपत्र यातील फरक:
|
हक्कसोडपत्र |
बक्षीसपत्र |
|
हक्कसोडपत्र त्याच एकत्र
कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभातच करता येते. त्रयस्त व्यक्तीच्या
लाभात करता येत नाही. |
बक्षीसपत्र करतांना लाभार्थी हा
कायदेशीर वारस आहे किंवा नाही हे पाहण्याची आवश्यकता नसते. बक्षीसपत्र कोणाच्याही
त्रयस्त व्यक्तीच्या लाभात करता येते. सर्वसाधारणपणे जवळच्या
नात्यामध्ये प्रेमापोटी, आपुलकीपोटी बक्षीसपत्र केले जाते.
बक्षीसपत्राबाबतच्या कायदेशीर तरतुदी मालमत्ता हस्तांतरण कायदा, कलम १२२ ते
१२६ मध्ये नमूद आहेत. |
|
हक्कसोडपत्र करतांना
सर्वसाधारणपणे मोबदला घेतला जात नाही. |
बक्षीसपत्र करतांना मोबदला घेतला
जात नाही. |
|
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त
नोंदणी करणे अनिवार्य आहे. |
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त
नोंदणी करणे अनिवार्य आहे |
|
रुपये ५००/- च्या स्टँपपेपरवर
हक्कसोडपत्राचा लेख करता येतो. |
बक्षीसपत्रासाठी मुद्रांक शुल्कात
रक्त संबंधी नातेवाईकांसाठी काही सवलत मिळते. अन्य व्यक्तींच्या लाभात
केलेल्या बक्षीसपत्रावर बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क लागू आहे. |
|
हक्कसोडपत्राचा नोंदणीकृत दस्त
केल्यानंतर ते रद्द करणे कठीण असते. |
सामान्यत: बक्षीसपत्राचा
नोंदणीकृत दस्त केल्यानंतर ते रद्द करणे कठीण असते. |
|
लाभार्थी व्यक्तीबद्दल नैसर्गिक
प्रेम आणि आपुलकी हाच एकमेव विचार हक्कसोडपत्र करतांना केला जातो. |
लाभार्थी व्यक्तीबद्दल नैसर्गिक
प्रेम आणि आपुलकी असेलच असे नाही. मालमत्तेतील मालकी हक्कांचे ऐच्छिक हस्तांतरण
केले जाते. |
|
जेव्हा कायदेशीर वारस किंवा
सह-धारक, त्यांच्या मालमत्तेतील स्वत:चा हिस्सा सोडून देऊ इच्छितो तेव्हा केले जाते. |
जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या
व्यक्तीला मालमत्ता भेट देऊ इच्छित असेल तेव्हा केले जाते. |
|
लाभार्थीला मालमत्तेवर पूर्ण
अधिकार आणि मालकी प्राप्त होते. |
लाभार्थीला मालमत्तेवर पूर्ण
अधिकार आणि मालकी प्राप्त होते. |
|
हक्कसोडपत्रासाठी गाव नमुना
सात-बारा अथवा मिळकत पत्रीकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्याची आवश्यकता
नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील लाभधारक सदस्य असल्याचे सिध्द करण्याइतपत
पुरावा असावा. |
बक्षीसपत्रासाठी गाव नमुना
सात-बारा अथवा मिळकत पत्रीकेवर नाव दाखल असणे आवश्यक असते. |
|
हक्कसोडपत्रावर लाभार्थीची स्वाक्षरी
आवश्यक नसते. |
बक्षीसपत्रावर लाभार्थीची स्वाक्षरी
आवश्यक असते. |
b|b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हक्कसोडपत्र आणि बक्षीसपत्र व त्यातील फरक. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !