हक्क नोंदणीबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देश
हक्क नोंदणीच्या कार्यवाहीबाबत महसूल विभागात बराच संभ्रम आढळतो. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी नलिनी ओमकार पाटील वि. गिरधर काशिनाथ पाटील आणि इतर या प्रकरणात अभिलेखातील हक्क नोंदणीच्या कार्यवाहीबाबत कलमनिहाय स्पष्टीकरण दिले आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
(टिप: सदर निकालाच्या दिनांकास‘ तलाठी’ हेच पदनाम प्रचलीत होते, ‘ग्राम महसूल अधिकार’ हे पदनाम सन २०२४ मध्ये अस्तित्वात आले.)
w प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी:
∙ प्रकरण: नलिनी ओमकार पाटील वि. गिरधर काशिनाथ पाटील आणि इतर
∙ न्यायालय: मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद
खंडपीठ
∙ निर्णय
दिनांक: २७ जुलै २००१
∙ याचिका
क्रमांक: १३४०/२०००
∙ न्यायमूर्ती: मा. न्यायमूर्ती श्री. . आर.एम.एस. खांडेपारकर
w वादाची वस्तुस्थिती:
∙ नलिनी पाटील यांचे पती ओंकार पांडुरंग पाटील यांनी दिनांक ५
फेब्रुवारी १९७९ रोजी राजोरे गावातील ४६ आर जमीन रुपये ९,०००/- मोबदला देऊन खरेदी केली होती.
∙ सदर जमीन ओंकार पाटील यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी
केलेली असल्याने ती त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता असल्याचा नलिनी पाटील यांचा
दावा होता.
∙ सदर जमिनीची फेरफार नोंद क्रमांक १०८६ अन्वये ओंकार पाटील
यांच्या नावाने नोंद झाली होती.
पुढे ओंकार पाटील यांनी सदर जमिनीचे अकृषिक (NA) रूपांतर करून तिचे ९ भूखंडांमध्ये विभाजन केले होते.
∙ ओंकार पाटील यांचे पुतणे म्हणजेच गिरधर काशिनाथ पाटील व इतर यांनी ओंकार पाटील यांच्या नावाने तलाठ्याकडे अर्ज सादर करून त्यांच्या नावाऐवजी गिरधर यांचे नाव लावण्याची मागणी केली.
∙ विशेष म्हणजे, संबंधित अर्ज दिनांक २७ एप्रिल १९९५ रोजी दाखल झाल्याचे दर्शविले असताना तलाठ्याने त्यापूर्वीच म्हणजे २४ एप्रिल १९९५ रोजी ओंकार पाटील यांचे नाव कमी करून गिरधर यांचे नाव दाखल केले होते.
∙ या फेरफार प्रक्रियेमध्ये ओंकार पाटील यांना नोटीस बजावण्यात आली नव्हती, असा नलिनी पाटील यांचा आक्षेप होता.
∙ त्यानंतर दिनांक ५ डिसेंबर १९९५ रोजी गिरधर यांनी सदर जमिनीतील भूखंड क्रमांक ५ ते ८ हे ओंकार सहकारी गृहनिर्माण संस्थेला विक्री केले. त्यानुसार पुढील फेरफार नोंदी करण्यात आल्या.
∙ ओंकार पाटील यांचे दिनांक ७ एप्रिल १९९६ रोजी निधन झाले.
∙ नलिनी पाटील यांनी या फेरफार नोंदींना आव्हान देऊन महसुली अपील व पुनरीक्षण कार्यवाही केली. तसेच मालकी हक्कासाठी दिवाणी न्यायालयातही दावा दाखल केला.
w या
प्रकरणातील कायदेशीर मुद्दा:
या
प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील पुढील तरतुदींचा विचार करण्यात आला:
∙ कलम १४९ – हक्क संपादनाची माहिती देणे.
∙ कलम १५० – फेरफार नोंदवही व फेरफार नोंदीची कार्यपद्धती.
∙ कलम १५४ – नोंदणीकृत दस्तऐवजाची माहिती महसूल अधिकाऱ्यांना
देणे.
∙ कलम १५७ – अधिकार अभिलेखातील नोंदींच्या सत्यतेबाबत अनुमान.
∙ नोंदणी अधिनियम, १९०८
∙ मुद्रांक कायद्यातील तरतुदी
w महसूल अधिकाऱ्यांच्या दृष्टीने या निकालाचे महत्त्व: एखाद्या व्यक्तीच्या नावावरील फेरफार नोंद केवळ अर्जाच्या आधारे किंवा पुरेशा कायदेशीर आधाराशिवाय कमी करून दुसऱ्या व्यक्तीचे नाव दाखल करता येत नाही. फेरफारासाठी वैध हक्कसंपादनाचा आधार आणि विहित कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे. तसेच महसुली नोंदींमधील बदलामुळे दिवाणी मालकी हक्काचा अंतिम निर्णय होत नाही.
w मा. न्यायालयाने हक्क नोंदणी अभिलेखाबाबत खालीलप्रमाणे भाष्य केले आहे:
∙ कलम १४८: प्रत्येक गावामध्ये अधिकार अभिलेख ठेवण्यात येतील व अशा अधिकार अभिलेखात, ज्या व्यक्ती जमीन धारण करणाऱ्या, भोगवटा करणाऱ्या, मालक किंवा जमीन गहाण घेणाऱ्या किंवा तिचे भाडे किंवा महसूल आपल्या नावे करून घेणाऱ्या असतील अशा सर्व व्यक्तींची नावे, शासकीय पट्टेदार म्हणून किंवा संबंधित कुळकायद्याच्या अर्थकक्षेतील कुळे धरून, कुळे म्हणून ज्या व्यक्ती जमीन धारण करीत असतील अशा सर्व व्यक्तींची नावे, अशा व्यक्तींच्या परस्पर हितसंबंधाचे स्वरूप, त्याची मर्यादा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या अटी किंवा दायित्वे असल्यास त्या अटी किंवा दायित्वे आणि राज्य सरकार नियमान्वये ठणत्तऊन देईल अशा इतर माहिती नमूद असेल.
∙ कलम १४९: राज्यातील कोणत्याही
क्षेत्रामध्ये असलेली
जमीन, धारण करणारा, भोगवटा करणारा, जमीनमालक, जमीन गहाण ठेवून घेणारा, शासकीय पट्टेदार किंवा कुळ म्हणून किंवा तिच्या खंडाचा किंवा महसुलाचा
अभिहस्तांकिती म्हणून कोणताही अधिकार उत्तराधिकाराने अनुजीविताधिकाराने, वारसाहक्काने, विभागणीने, खरेदीने, गहाणाने, देणगीने, पट्ट्याने किंवा अन्य रीतीने संपादन करणारी कोणतीही व्यक्ती, असा अधिकार तिने संपादन
केल्याबद्दल, असा अधिकार संपादन केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत तलाठ्यास
तोंडी अथवा लेखी कळवील आणि उक्त तलाठी, कळविणाऱ्या व्यक्तीला असे प्रतिवृत्त मिळाल्याची लेखी पोच तात्काळ देईल.
परंतु असा अधिकार संपादन करणारी व्यक्ती
अज्ञान असेल किंवा अन्यथा
अपात्र असेल तेव्हा असे प्रतिवृत्त
तिचा पालक किंवा तिची मालमत्ता
जिच्या ताब्यात असेल अशी इतर व्यक्ती तलाठ्यास देईल.
परंतु आणखी असे की, जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीनुसार किंवा नोंदलेल्या दस्तऐवजांच्या आधारे अधिकार संपादन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, तलाठ्यास प्रतिवृत्त देण्याबाबतच्या जबाबदारीतून सूट देण्यात येईल.
परंतु आणखी असे की, जिल्हाधिकार्यांच्या परवानगीने अधिकार संपादन केला असल्याचा एखाद्या व्यक्तीचा दावा असेल, त्याबाबतीत या अधिनियमाच्या किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींन्वये, अशी परवानगी आवश्यक असेल त्याबाबतीत, अशी व्यक्ती, तलाठ्याने त्यास तसे करण्यास फर्माविले तर, या अधिनियमान्वये करण्यात आलेल्या नियमान्वये आवश्यक असेल त्याप्रमाणे अशी परवानगी ज्या आदेशाद्वारे देण्यात आली असेल त्या आदेशाबाबतचा पुरावा सादर करील.
∙ कलम १५०: फेरफार
नोंदवही व विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवहीशी संबंधित आहे.
कलम १५०(२) अन्वये, जेव्हा एखादा तलाठी, फेरफार, नोंदवहीत एखादी नोंद करील तेव्हा तो अशा नोंदीची एक प्रत चावडीतील ठळक जागी त्याच वेळी लावील आणि सदर फेरफारामध्ये ज्यांचा हितसंबंध आहे असे अधिकार अभिलेखावरून किंवा फेरफार नोंद वहीवरून त्यास दिसून येईल अशा सर्व व्यक्तींना आणि त्यात ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तींना लेखी कळवील.
∙ कलम १५०(३): उपरोक्त कलम १५०(१) अन्वये फेरफार नोंदवहीत
केलेल्या कोणत्याही नोंदीच्या संबंधात तलाठ्याकडे तोंडी किंवा लेखी आक्षेप घेण्यात आले असतील तर वादग्रस्त
प्रकरणांच्या नोंदवहीत त्या आक्षेपांच्या तपशीलाची नोंद करणे हे तलाठ्याचे कर्तव्य असेल. आक्षेप सादर करणाऱ्या
व्यक्तींना तलाठी त्याबाबत विहित नमुन्यात लेखी पोच देईल.
अधिकार अभिलेखात दाखल करण्यात येतील. परंतु फेरफार नोंदवहीतील नोंद योग्यरीतीने प्रमाणित आल्याखेरीज अधिकाराभिलेखात दाखल करण्यात येणार नाही.
∙ कलम १५०(६): संबंधित पक्षकारांवर त्याबाबतीत नोटीस बजाविण्यात आल्याशिवाय अशा कोणत्याही नोंदी प्रमाणित करण्यात येणार नाहीत.
∙ कलम १५४: शेती प्रयोजनार्थ उपयोगात
आणलेल्या किंवा ज्याच्या संबंधात अधिकार अभिलेख तयार करण्यात आले आहेत अशा जमिनीवरील कोणताही मालकी हक्क किंवा भार निर्माण करणारा, त्याचे अभिहस्तांकन करणारा किंवा तो नष्ट करणारा म्हणून अभिप्रेत
असलेला कोणताही दस्तऐवज भारतीय नोंदणी अधिनियम, १९०८ अन्वये नोंदविण्यात आला असेल तेव्हा
अशा
दस्तऐवजाची नोंदणी करणारा अधिकारी ज्या गावामध्ये ती जमीन असेल त्या गावाच्या
तलाठ्यास किंवा त्या तालुक्याच्या तहसिलदारास या अधिनियमान्वये करण्यात आलेल्या नियमाद्वारे विहित
करण्यात
येईल अशा नमुन्यात आणि विहित करण्यात
येईल अशा वेळी, त्याबाबत कळवील.
∙ कलम १५७: अधिकार अभिलेख व फेरफार नोंदवही यांमधील
नोंदी बरोबर असल्याचे गृहीत धरणे
अधिकार अभिलेखातील नोंद आणि फेरफार नोंदवहीतील प्रमाणित नोंद ही, एतद्विरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत किंवा त्याबद्दल नवीन नोंद कायदेशीररीत्या दाखल करण्यात येईपर्यंत खरी असल्याचे गृहीत धरण्यात येईल.
∙ कलम १५६: नकाशे, नोंदवही आणि अधिकार अभिलेख याशिवाय 'विहित' करण्यात येईल असे इतर भूमि अभिलेख प्रत्येक गावासाठी तयार करण्यात येतील. 'विहित' ची व्याख्या कलम २(२८) मध्ये नमूद आहे, त्यानुसार ‘विहित' म्हणजे, राज्य शासनाने या अधिनियमन्वये केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले.
राज्य शासनाने याबाबत जे नियम तयार केलेले आहेत त्यात राज्यातील जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे याबाबत सविस्तर नियम केलेले आहेत. या नियमांतील नियम ८ अन्वये अधिकार अभिलेख आणि फेरतपासणी आणि फेरफाराची नोंदवही ठेवण्याची जबाबदारी, ते गाव ज्या तालुक्याच्या तहसिलदारच्या अधिकारक्षेत्रात येत असेल त्या तहसिलदारची राहील.
नियम ११ अन्वये फेरफाराच्या नोंदवहीत नोंदी करण्याची जबाबदारी तलाठ्याची आहे. कलम १५४ मध्ये उल्लेखिलेल्या दस्तऐवजांच्या नोंदींसंबंधी तलाठ्याला सूचना मिळाल्यावर तो लवकरात लवकर प्राप्त दस्तऐवजांपैकी प्रत्येक दस्तऐवजांद्वारा केलेल्या फेरफाराच्या बाबतीत फेरफाराच्या नोंदवहीत वेगवेगळ्या नोंदी करील.
नियम १२ अन्वये कोणत्याही जमिनीच्या हस्तांतरणाचा परिणाम म्हणून अशा जमिनीतील अधिकार संपादन करण्यात आले असतील आणि अशा हस्तांतरणास जिल्हाधिकार्यांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल त्या बाबतीत, तलाठी कलम १४९ अन्वये त्याला प्रतिवृत्त देणार्या व्यक्तीस अशी परवानगी किंवा अशी परवानगी ज्या आदेशाद्वारे देण्यात आली असेल असा आदेशाचा पुरावा आपल्यासमोर हजर करण्याबद्दल फर्मावील आणि असा पुरावा हजर केल्यानंतर तलाठी ही गोष्ट फेरफाराच्या नोंदवहीत स्तंभ २ मध्ये नोंदीच्या शेवटी नमूद करील. जर परवानगी मिळविली असेल परंतु हजर करण्यात आली नसेल किंवा अशी परवानगी मुळीच मिळविली नसेल तर तलाठी पूर्वोक्तप्रमाणे ही गोष्ट सुद्धा नमूद करील.
नियम ९ अन्वये कलम १४९ अन्वये कोणत्याही व्यक्तीने दिलेले प्रतिवृत्त मिळाल्याची पोहोच तलाठी नमुना ७ मध्ये देईल.
त्यामुळे हे स्पष्ट आहे की, संहितेच्या कलम १४९ अन्वये विनिर्दिष्ट हक्क प्राप्त केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने तोंडी किंवा लेखी केलेल्या विनंतीनुसार फेरफार नोंदी करण्याचे अधिकार वापरताना, जेव्हा मालमत्तेचे मूल्य वरवर पाहता १००/- रुपये किंवा त्याहून अधिक असल्याचे दिसते, तेव्हा नोंदीत कोणताही फेरफार करण्यापूर्वी तलाठ्याने अशा दाव्याच्या समर्थनार्थ असलेल्या कागदोपत्री पुराव्याचा आग्रह धरणे आणि त्याचा विचार करणे आवश्यक आहे.
ही संहिता मूलतः जमीन महसूल आणि त्यासंबंधित बाबींशी संबंधित आहे यात शंका नाही. तथापि, त्याच वेळी, संहितेमध्ये असलेल्या विविध तरतुदी आणि विशेषतः त्यातील कलम १५७, हक्क नोंदी तसेच फेरफार नोंदवहीमध्ये केलेल्या नोंदींना स्पष्टपणे अनुमानित मूल्य देते आणि हे लक्षात घेता, कलम १४९ अन्वये कार्यरत असलेल्या प्राधिकरणाकडे (तलाठीकडे) अमर्याद आणि अनियंत्रित अधिकार आहेत असे गृहीत धरता येणार नाही. कलम १४९ चा कोणताही अन्य अर्थ लावल्यास आणि स्थावर मालमत्तेवरील हक्क संपादनाच्या दाव्यासंदर्भात कोणत्याही कायदेशीर दस्तऐवजाच्या आधाराशिवाय केवळ पक्षांच्या अर्जांवर तलाठ्याला नोंदींमध्ये फेरफार करण्याची परवानगी दिल्यास, ते प्राधिकरणाला त्या नोंदींमध्ये कोणतीही नोंद करण्यासाठी अक्षरशः पूर्ण मोकळीक देण्यासारखे होईल आणि अशा प्राधिकरणाकडून या अधिकाराचा निश्चितपणे गैरवापर केला जाऊ शकतो आणि प्रस्तुत प्रकरणापेक्षा याचे उत्तम उदाहरण असू शकत नाही.
b|b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हक्क नोंदणीबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देश - नलिनी ओमकार पाटील वि. गिरधर काशिनाथ पाटील आणि इतर . याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !