आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

अ.पा.क. अर्थात अज्ञान पालनकर्ता

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

अ.पा.क. अर्थात अज्ञान पालनकर्ता

अज्ञान पालनकर्ता ही पध्‍दत आजरोजी अस्‍तित्‍वात असल्‍याचे दिसून येत नसले तरी जुन्‍या सात-बारा सदरी अ.पा.क. चे शेरे आजही आहेत. पूर्वीची एकत्र कुटुंब पध्‍दत, जमीन धारणेवर मर्यादा आणणारे कायदे यांमुळे ही पध्‍दत सुरू झाली असावी.
बहूतांश ठिकाणी, अज्ञान (वय वर्षे अठरापेक्षा कमी) मुलांच्‍या नावे जमिनी खरेदी केल्‍या गेल्‍या आणि वडील, आई अशा जवळच्‍या नातेवाइकांचे नाव त्‍या अज्ञान मुलांचे पालनकर्ता म्‍हणून गाव दप्‍तरी दाखल करण्‍यात आले. अज्ञान पालनकर्ता यांची भूमिका विश्‍वस्‍ताची (Trusty) असते.

हिंदू अज्ञानत्‍व व पालकत्‍व अधिनियम १९५६, कलम ३ अन्‍वये, अज्ञानत्‍व व पालकत्‍व ही संकल्‍पना फक्‍त हिंदू धर्मीयांना लागू आहे. या अधिनियमाच्‍या कलम ४ अन्‍वये अज्ञानाची आणि पालकाची व्‍याख्‍या दिलेली आहे.
या अधिनियमाच्‍या कलम ६ अन्‍वये जे पालक निश्‍चित केलेले आहेत त्‍यात आई, वडील, दत्तक पुत्राचे आई- वडील, आणि विवाहित मुलीच्‍या बाबतीत तिचा पती यांचा समावेश आहे. या अधिनियमाच्‍या कलम ८ अन्‍वये, अशा पालकास, अज्ञानाच्‍या नावे असणार्‍या जमिनीची विक्री विशिष्‍ठ कारणांशिवाय, न्‍यायालयाच्‍या पूर्व परवानगीशिवाय करता येत नाही.
ही विशिष्‍ठ कारणे पुढील प्रमाणे:  
() सरकारी कर किंवा कुटुंबावर असलेले कर्ज फेडण्याससाठी
() सहहिस्सेदार किंवा कुंटुंबीयांच्या पोटपाण्यासाठी किंवा आजारपणासाठी
() सहहक्कदार किंवा सहहिस्सेदाराच्या किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी
() जरुरीचे कौटुंबीक अंत्यविधी संस्कार, श्राध्द किंव कौटुंबीक समारंभ खर्चासाठी
() कुटुंबासाठी मालमत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी
() कुटुंबाच्या कर्त्यावर किंवा इतर सभासदांवर गंभीर फौजदारी तोहमत झाली असेल तर त्यांच्या संरक्षणासाठी करावा लागणारा खर्च भागविण्यासाठी
() कुटुंबाच्या व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी
() कुटुंबाच्या इतर जरुरीच्या कारणांसाठी
उपरोक्त कायदेशीर गरजांसाठी संपूर्ण मिळकत विकण्याचा अधिकार फक्त कर्ता आणि वडिल यांनाच आहे. कायदेशीर गरज केवळ खरेदीपत्राच्या मजकुरावरुन सिध्द  होत नाही. त्यासाठी इतर सुसंगत पुरावा द्यावा लागतो. असा व्यवहार जर उपरोक्त कायदेशीर गरजांसाठी होत नसेल तर सहवारसदार मनाई हुकुमाचा दावा दाखल करु शकतात.    
वडिलांचा विशेषाधिकार: अज्ञान मुलांची मिळकत विकण्याचा, गहाण देण्याचा विशेषाधिकार वडिलांना आहे. पूर्वीचे, नैतिक व कायदेशीर कारणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठीही अशी मिळकत विकण्याचा, गहाण देण्याचा विशेषाधिकार वडिलांना आहे.
  
त्‍यावेळेसचे कमी कार्यक्षेत्र असलेली तलाठी कार्यालये लक्षात घेता, ज्‍या अज्ञान मुलांच्‍या नावे जमिनी होत्‍या, ते फेरफार बघून, जर अज्ञान हे सज्ञान झाले असतील तर, तलाठी यांनी स्‍वत:हून (Suo-moto) अशा अज्ञानांना नोटिस देऊन, त्‍यांच्‍या सज्ञानतेचे पुरावे घेऊन, त्‍यांची नावे कब्‍जेदार सदरी दाखल करणे अपेक्षित होते. त्‍यामुळेच अज्ञान व्‍यक्‍ती सज्ञान झाल्‍यावर फेरफार नोंद न घालता, वर्दीवरून अज्ञानाच्‍या पालनकर्‍त्‍याचे नाव कमी करता येण्‍याची तरतुद आहे.
माझ्‍यामते, चावडी वाचन करतांना जे अज्ञान सज्ञान झाले आहेत, त्‍यांचीही माहिती घेणे योग्‍य ठरेल किंवा यासाठी तालुका स्‍तरावर विशेष माहिमेचे आयोजन करण्‍यात यावे.

बहूतांश वेळी, सज्ञान झालेल्‍या व्‍यक्‍तीने अथवा अज्ञानाच्‍या पालनकर्‍त्‍याने सादर केलेल्‍या अर्ज व पुराव्‍यांवरून अ.पा.क. चे नाव कमी करण्‍यात येते.

æ पुरावे: अ.पा.क. चे नाव कमी करून सज्ञान झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव कब्‍जेदार म्‍हणून दाखल करतांना खालील पुरावे घ्‍यावे.
१) अर्ज
२) अ.पा.क. म्‍हणून नाव दाखल झाल्‍याचा फेरफार
३) सज्ञान झालेल्‍या व्‍यक्‍तीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा शासकीय वैद्‍यकीय अधिकार्‍याने दिलेला वयाचा दाखला.
४) प्रतिज्ञापत्र/स्‍वयंघोषणापत्र

वरील कागदपत्रे घेऊन सज्ञान झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव कब्‍जेदार सदरी दाखल करून अ.पा.क. चे नाव कमी करण्‍यात येऊ शकते. खरेतर यासाठी स्‍वतंत्र फेरफार घेण्‍याची आणि नोटिस बजावण्‍याचीही तरतुद नाही.
तथापि, आजच्‍या माहितीच्‍या अधिकाराच्‍या युगात, अ.पा.क. चे नाव कमी करतांना, स्‍वतंत्र फेरफार नोंदवून आणि नोटिस बजावूनच ही प्रक्रिया पूर्ण करणे योग्‍य आणि सुरक्षित राहील.    

æ अन्‍य दक्षता: अ.पा.क. चे नाव कमी करून सज्ञान झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव कब्‍जेदार म्‍हणून दाखल करतांना खालील बाबींची दक्षता घ्‍यावी.
१) अ.पा.क. हा फक्‍त अ.पा.क. होता किंवा अ.पा.क. च्‍या नावेही काही जमीन त्‍या भूमापन क्रमांकात आहे याची खात्री करावी.
२) अज्ञानाच्‍या नावे विशिष्‍ठ क्षेत्र खरेदी केले होते काय याची खात्री करावी.
३) सदर अज्ञानाशिवाय इतर अन्‍य अज्ञानांच्‍या नावे त्‍या भूमापन क्रमांकात काही क्षेत्र आहे काय याची खात्री करावी.
४) अ.पा.क. ने सदर जमिनीवर काही कर्ज/बोजा निर्माण केला आहे काय याची खात्री करावी.

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला अ.पा.क. अर्थात अज्ञान पालनकर्ता. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

31 تعليقًا

  1. धन्यवाद
    1. अज्ञान पालक कर्ता यास शासनाच्या अनुदानाचा लाभ घेता येईल का ???
  2. अ पा क नाव कमी करण्यासाठी अर्ज
    1. येस
    2. अर्ज कसा करावा
    3. अ. पा. क नोंद कमी करण्यासाठी सर्व कागदपत्रे देऊनही सदर नोंद तलाठी कमी करत नाहीत.


      तक्रार कुठे करावी
    4. मंडळ अधिकारी यांच्याकडे तक्रार करता येईल .तहसील मध्ये
    5. अ पा क मध्ये मामाचे नाव लागू शकते का आणि अ पा क भाच्याचे मृत्यू झाल्यावर जमीन मामाच्या नावावर होईल का
  3. अ पा क परिपत्रक मिळत नाही,कसे मिळेल कृपया मदत करा
  4. Apak chi jar death jhali asel Ani tyache vadil jivant astil Ani apak la bayko va mule astil tr kaydyane nav konache rahu.. shakte vadilanche tr kharedi var rahnarach pn mag bayko va mulanchi nave Kashi lavavi
  5. अदनान मुलाचे नावे खरेदी आहे परंतु ७/१२ वर अ पा क चि नोंद नाही काय करावे
  6. मा.साहेबांना विनंती आहे की मला कुरपया मार्गदर्सन करावे वडिलांनी शेती घेतली होती वडील वारले आहे आता आई आणि दोन् मुले आहे त्यामधील एक अ प क आहे मणजे अज्ञान आहे तर ते न्यायालयाच्या बिना परवानगीने शेती विकू शकतात का की याला मा, न्यायालयाची परवानगीची आवस्यकता आहे या बाबत मार्ग सुचवावे ही विनंती
  7. माझे वडीलानी मी अज्ञान असतानी वाटनि करूँन अ पा क आई नाव दाखल केले मी ६२ वय असुन ६ महीने पहिले अपाक हटविने बाबत अप्लिकेशन केले नाव हटविले नाहीं याबाबत काय करावे नियम काय हे सागावे ही विनंति
  8. अ.प.क.म्हणून वडिलांचे कबुली जबाबावर नाव होते पूढे सज्ञान झालेल्या मुलाचे नाव लागले सातबाराच्या उतारे वर वडिलांचेनाव कधीच नव्हते फक्त कबुली जबावर अ.प. क उल्लेख होता तेव्हा तति जमीन मुलाच्या भाव हिस्सा द्यावी लागणार का
    1. Give answer
  9. अज्ञान पालकर्त्याने जमीन विकली ती परत मिळेल का
  10. अ.पा.क शेरा काढण्याचा अर्ज
    1. Reply plz
  11. मला आई अज्ञान पालक होती,तिघे भाऊ आहोत,आई मयत आहे,वडिलांकडून एका माणसाने आमच्या तिघा भावांच्या नावावरील 1.02 आर जमीन फसवून 1990 ला खरेदी करून घेतली,ती 2020 ला आमच्या लक्षात आली,वडील मयत आहेत,त्या दस्तावर आम्हा तिघांच्या सह्या नाहीत. दस्त रद्द होऊ शकतो काय?
  12. माझ्या वडिलांना मी स्वतः तसेच आई एक भाऊ एक बहीण असे वारस आहेत माझे वय 31 भावाचे वय 36 बहीणीचे वय 28 आईचे वय 62 आहे
    माझी बहिण मतीमंद आहे माझे वडील मयत झाले असुन वारस नोंद कशी करावी याची माहिती देण्यात यावी ही विनंती
  13. Nice information
  14. मुली च्यानावे जमीन आहे आपाक आई आहे आईचा मुत्यू झाला मुलगी सज्ञान झाली आहे तर मुलगीजमीन विकूशाकते काय विकल्यास त्याला पुढे कायपुरावे लागतील
  15. अ पा क ची जमीन खरेदी होते का ,कोणाची परवानगी लागते
  16. माहितीकरिता धन्यवाद
  17. 18 varsha nanter sudyan na che nava vr sheti hou nye mhnun adyan palaka ne kay procissor karave . Karan adyan mulga ha vasnadin zala ahe. Aai adyan palak ahe. Aai la bolto 18 varshya nanter sheti mazya nava vr yete me vikun taknar.
  18. अ.पा.क.चे वडील मयत असल्यास अ.पा.क.च्या आईला जमीन विकण्याचा अधिकार आहे काय ? त्यासाठी कोणता कायदा आहे?
  19. Sakshi Ganesh Sathe, Rukmeen Ganesh Sathe Deta Birth 05/11/2014
  20. अ. पा. क.ची जमीन फसून जमीन विक्री केली आहे ती महागारी मिळू शकते का
  21. अ. पा.क चे नाव कमी करून सज्ञान झालेल्या व्यक्तीचे नाव कब्जेदार म्हणून दाखल झाल्यानंतर
    पुन्हा तेच अ अ. पा.क. स्वतःचे नाव सज्ञान झालेल्या व्यक्तीकडे फेर नाव नोंदणी करिता दावा दाखल करू
    शकतात का? अशी कायद्यात तरतूद आहे का?
  22. अज्ञान पालक कर्ता in english
  23. अ.पा.क.चे वडील मयत असल्यास अ.पा.क.च्या आईला जमीन विकण्याचा अधिकार आहे काय ? त्यासाठी कोणता कायदा आहे?
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.