अ.पा.क.
अर्थात अज्ञान पालनकर्ता
अज्ञान
पालनकर्ता ही पध्दत आजरोजी अस्तित्वात असल्याचे दिसून येत नसले तरी जुन्या
सात-बारा सदरी अ.पा.क. चे शेरे आजही आहेत. पूर्वीची एकत्र कुटुंब पध्दत, जमीन
धारणेवर मर्यादा आणणारे कायदे यांमुळे ही पध्दत सुरू झाली असावी.
बहूतांश
ठिकाणी, अज्ञान (वय वर्षे अठरापेक्षा कमी) मुलांच्या नावे जमिनी खरेदी केल्या
गेल्या आणि वडील, आई अशा जवळच्या नातेवाइकांचे नाव त्या अज्ञान मुलांचे
पालनकर्ता म्हणून गाव दप्तरी दाखल करण्यात आले. अज्ञान पालनकर्ता यांची भूमिका
विश्वस्ताची (Trusty) असते.
हिंदू
अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम १९५६, कलम ३ अन्वये, अज्ञानत्व व पालकत्व ही
संकल्पना फक्त हिंदू धर्मीयांना लागू आहे. या अधिनियमाच्या कलम ४ अन्वये
अज्ञानाची आणि पालकाची व्याख्या दिलेली आहे.
या
अधिनियमाच्या कलम ६ अन्वये जे पालक निश्चित केलेले आहेत त्यात आई, वडील, दत्तक
पुत्राचे आई- वडील, आणि विवाहित मुलीच्या बाबतीत तिचा पती यांचा समावेश आहे. या
अधिनियमाच्या कलम ८ अन्वये, अशा पालकास, अज्ञानाच्या नावे असणार्या जमिनीची
विक्री विशिष्ठ कारणांशिवाय, न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय करता येत नाही.
ही
विशिष्ठ कारणे पुढील प्रमाणे:
(१) सरकारी कर किंवा कुटुंबावर असलेले कर्ज फेडण्याससाठी
(२) सहहिस्सेदार किंवा कुंटुंबीयांच्या पोटपाण्यासाठी
किंवा आजारपणासाठी
(३) सहहक्कदार किंवा सहहिस्सेदाराच्या किंवा त्यांच्या
मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी
(४) जरुरीचे कौटुंबीक अंत्यविधी संस्कार, श्राध्द किंव कौटुंबीक समारंभ खर्चासाठी
(५) कुटुंबासाठी मालमत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी
होणारा खर्च भागविण्यासाठी
(६) कुटुंबाच्या कर्त्यावर किंवा इतर सभासदांवर गंभीर
फौजदारी तोहमत झाली असेल तर त्यांच्या संरक्षणासाठी करावा लागणारा खर्च भागविण्यासाठी
(७) कुटुंबाच्या व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड
करण्यासाठी
(८) कुटुंबाच्या इतर जरुरीच्या कारणांसाठी
उपरोक्त
कायदेशीर गरजांसाठी संपूर्ण मिळकत विकण्याचा अधिकार फक्त कर्ता आणि वडिल यांनाच आहे. कायदेशीर गरज केवळ खरेदीपत्राच्या मजकुरावरुन सिध्द होत नाही. त्यासाठी
इतर सुसंगत पुरावा द्यावा लागतो. असा व्यवहार जर उपरोक्त कायदेशीर
गरजांसाठी होत नसेल तर सहवारसदार मनाई हुकुमाचा दावा दाखल करु शकतात.
वडिलांचा विशेषाधिकार: अज्ञान मुलांची मिळकत विकण्याचा, गहाण देण्याचा विशेषाधिकार
वडिलांना आहे. पूर्वीचे, नैतिक व कायदेशीर
कारणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठीही अशी मिळकत विकण्याचा, गहाण
देण्याचा विशेषाधिकार वडिलांना आहे.
त्यावेळेसचे
कमी कार्यक्षेत्र असलेली तलाठी कार्यालये लक्षात घेता, ज्या अज्ञान मुलांच्या
नावे जमिनी होत्या, ते फेरफार बघून, जर अज्ञान हे सज्ञान झाले असतील तर, तलाठी
यांनी स्वत:हून (Suo-moto) अशा अज्ञानांना नोटिस देऊन, त्यांच्या सज्ञानतेचे पुरावे घेऊन, त्यांची
नावे कब्जेदार सदरी दाखल करणे अपेक्षित होते. त्यामुळेच अज्ञान व्यक्ती सज्ञान
झाल्यावर फेरफार नोंद न घालता, वर्दीवरून अज्ञानाच्या पालनकर्त्याचे नाव कमी
करता येण्याची तरतुद आहे.
माझ्यामते,
चावडी वाचन करतांना जे अज्ञान सज्ञान झाले आहेत, त्यांचीही माहिती घेणे योग्य
ठरेल किंवा यासाठी तालुका स्तरावर विशेष माहिमेचे आयोजन करण्यात यावे.
बहूतांश
वेळी, सज्ञान झालेल्या व्यक्तीने अथवा अज्ञानाच्या पालनकर्त्याने सादर
केलेल्या अर्ज व पुराव्यांवरून अ.पा.क. चे नाव कमी करण्यात येते.
æ पुरावे:
अ.पा.क. चे नाव कमी करून सज्ञान झालेल्या व्यक्तीचे नाव कब्जेदार म्हणून दाखल
करतांना खालील पुरावे घ्यावे.
१)
अर्ज
२)
अ.पा.क. म्हणून नाव दाखल झाल्याचा फेरफार
३)
सज्ञान झालेल्या व्यक्तीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा
दाखला किंवा शासकीय वैद्यकीय अधिकार्याने दिलेला वयाचा दाखला.
४)
प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र
वरील
कागदपत्रे घेऊन सज्ञान झालेल्या व्यक्तीचे नाव कब्जेदार सदरी दाखल करून
अ.पा.क. चे नाव कमी करण्यात येऊ शकते. खरेतर यासाठी स्वतंत्र फेरफार घेण्याची
आणि नोटिस बजावण्याचीही तरतुद नाही.
तथापि,
आजच्या माहितीच्या अधिकाराच्या युगात, अ.पा.क. चे नाव कमी करतांना, स्वतंत्र
फेरफार नोंदवून आणि नोटिस बजावूनच ही प्रक्रिया पूर्ण करणे योग्य आणि सुरक्षित
राहील.
æ अन्य
दक्षता:
अ.पा.क. चे नाव कमी करून सज्ञान झालेल्या व्यक्तीचे नाव कब्जेदार म्हणून दाखल
करतांना खालील बाबींची दक्षता घ्यावी.
१)
अ.पा.क. हा फक्त अ.पा.क. होता किंवा अ.पा.क. च्या नावेही काही जमीन त्या भूमापन
क्रमांकात आहे याची खात्री करावी.
२)
अज्ञानाच्या नावे विशिष्ठ क्षेत्र खरेदी केले होते काय याची खात्री करावी.
३)
सदर अज्ञानाशिवाय इतर अन्य अज्ञानांच्या नावे त्या भूमापन क्रमांकात काही
क्षेत्र आहे काय याची खात्री करावी.
४)
अ.पा.क. ने सदर जमिनीवर काही कर्ज/बोजा निर्माण केला आहे काय याची खात्री करावी.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला अ.पा.क. अर्थात अज्ञान पालनकर्ता. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !