वारस नोंदीच्या अर्जाचा नमुना:
|
तलाठी,
मौ..................
ता.............. जि............
विषय:- वारस
नोंद होणे बाबत अर्ज.
अर्जदाराचे
संपूर्ण नाव..........., पत्ता ........, संपर्क/ मोबाईल क्रमांक .........व आधार कार्ड
क्रमांक....
महोदय,
मी, उपरोक्त अर्जदार याव्दारे विनंती करतो की, माझ्या -------------- (मयताशी असलेला नातेसंबंध नमूद करावा) नावे खाली नमुद केल्यानुसार शेतजमीन आहे.
मौजे:
तालुका: जिल्हा: |
||||
खाते क्रमांक: |
||||
भूमापन क्रमांक |
क्षेत्रफळ |
आकार |
||
हे. |
आर./चौमी |
रु. |
पै. |
|
१. |
|
|
|
|
२. |
|
|
|
|
सदरची/च्या जमीन/जमिनी ही/ह्या उपरोक्त मयत व्यक्तीची स्वकष्टार्जीत/वडीलोपार्जीत मालमत्ता होती, ते दिनांक .......... रोजी मयत झाले आहेत. आम्ही ............ या धर्माचे आहोत. मयत व्यक्तीस असणार्या वारसांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
मयत
व्यक्तीचे नाव: |
||||||||
अ. क्र. |
वारसाचे नाव |
स्त्री/पुरूष |
वारसाचे वय |
मयताशी नाते |
वारसाचा सादर केलेला
पुरावा |
वारसाचा संपूर्ण पत्ता
आणि संपर्क क्रमांक |
मोबाईल
नंबर |
आधार कार्ड क्रमांक |
१ |
|
|
|
|
|
|
|
|
२ |
|
|
|
|
|
|
|
|
मयत व्यक्तीस वरील प्रमाणे वारस असून त्यांची नावे मयताचे वारस म्हणून अभिलेख सदरी दाखल करण्यात यावीत ही विनंती.
दिनांक:
अर्जदाराची सही
आवश्यक कागदपत्रे:
१. मूळ किंवा प्रमाणीत
मृत्यु-दाखला
२. गाव नमुना सात-बारा उतार्याची नक्कल
३. गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल
४. संबंधीत फेरफार उतार्यांची नक्कल
५. सर्व वारसांच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकीत प्रत
६. सर्व वारसांच्या आधार कार्डची स्वसांक्षांकीत प्रत
७. वारसांबाबत विहित नमुन्यातील शपथपत्र-स्वयंघोषणापत्र
८. अर्जातील सर्व वारसांबाबत पत्ता, भ्रमण
ध्वनी यांचा पुराव्यासह तपशील.
९. परदेशस्थ वारसाचा इ-मेल व पत्ता याचा पुरावा
१०. शिधापत्रिकेची स्वसांक्षांकीत प्रत (असल्यास)
वारस नोंदीबाबत शपथपत्र/स्वयंघोषणापत्राचा नमुना:
शपथपत्र-स्वयंघोषणापत्र
(साध्या कागदावर)
आम्ही खाली सह्या करणार, या शपथपत्र-स्वयंघोषणापत्राव्दारे शपथेवर असे
घोषित करतो की, मौजे ........, तालुका ............ जिल्हा ..........
येथील खातेदार नामे, .............. (मयताचे नाव) हे दिनांक
------- रोजी मयत झाले असून त्यांच्या नावे खाली
नमुद केल्यानुसार शेतजमीन/मिळकती आहेत.
मयत खातेदार व आम्ही
............
या धर्माचे आहोत.
खाते (आठ-अ) क्रमांक: |
|||||||||
अ.क्र. |
मौजे/गाव |
तालुका, जिल्हा |
भूमापन क्र. व पोट हिस्सा क्र. |
एकूण क्षेत्र हे.आ./चौ.मी |
एकूण क्षेत्रापैकी मयत खातेदाराचा हिस्सा हे.आ./चौ.मी |
आकार रु. पै. |
|||
१ |
|
|
|
|
|
|
|
|
|
२ |
|
|
|
|
|
|
|
|
|
सदर मिळकत ही मयत खातेदाराची वडीलोपार्जीत / स्वकष्टार्जीत जमीन होती.
आम्हाला लागू वैयक्तिक कायद्याप्रमाणे उपरोक्त
मयत खातेदारास, आम्ही खाली नमूद
वारस आहोत.
मयत खातेदाराचे नाव: |
||||||
अ. क्र. |
वारसाचे नाव |
स्त्री/पुरूष |
वारसाचे वय |
मयत खातेदाराशी नाते |
वारसाचा सादर केलेला
पुरावा |
वारसाचा संपूर्ण पत्ता: .................................. मोबाईल
क्रमांक: .................................. इ-मेल आय.डी.: आधार
कार्ड क्रमांक: |
१ |
|
|
|
|
|
|
२ |
|
|
|
|
|
|
उक्त वारसांत, मयत खातेदाराचा कोणताही वारस, विशेषत: मुली किंवा विवाहीत मुलींना डावलण्यात आलेले नाही याची आम्ही खात्री देतो.
वरील मजकूर आम्ही संपूर्णपणे शुध्दीवर असतांना आणि आमची सद्सदविवेकबुध्दी
जागृत ठेऊन शपथेवर लिहून दिला आहे, त्याबाबत आमच्यावर
कोणत्याही प्रकारचा दबाव नाही.
वरील मजकूर
चुकीचा किंवा खोटा आढळल्यास त्यास फक्त आम्हीच जबाबदार असू आणि भा.दं.वि. कलम १९९,
२००, २०३
अन्वये शिक्षेस पात्र ठरू.
शपथपत्र/स्वयंघोषणापत्र शपथपत्र/स्वयंघोषणापत्र करणार्या व्यक्तींना
करणार्यांची नावे व सह्या ओळखणार्याचे
नाव सही
१.
२.
३.
स्थळ: दिनांक:
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला वारस नोंदीच्या अर्जाचा नमुना. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !