मयत
आईचे वारस
एक खातेदार मयत झाल्यानंतर त्याचे वारस म्हणून मयत
खातेदाराची विधवा, मुलगी आणि मुलगा दाखल झाले. कालांतराने मयत खातेदाराच्या वारस
मुलीने, मयत खातेदाराच्या वारस मुलाच्या नावे नोंदणीकृत हक्कसोड पत्र करून दिले.
(बहिणीने भावाच्या लाभात नोंदणीकृत हक्कसोडपत्र करून दिले.) आता गाव नमुना
सात-बारावर फक्त मयत खातेदाराचे वारस म्हणून विधवा आणि वारस मुलगा (आई आणि
मुलगा) दाखल आहेत.
कालांतराने मयत खातेदाराची वारस विधवा (आई) मयत झाली, तर मयत आईची वारस म्हणून, भावाच्या लाभात नोंदणीकृत हक्कसोडपत्र केलेल्या
मुलीचे नाव दाखल होईल काय?
w कायदेशीर निष्कर्ष: होय.
सदर हक्कसोडपत्र केलेल्या मुलीचा वडिलांच्या मालमत्तेतील पूर्वीचा हक्क आणि आईची वारस म्हणून
मिळणारा हक्क आणि
हे दोन स्वतंत्र विषय आहेत. केवळ वडिलांच्या मालमत्तेतील हक्क सोडल्याने आईच्या स्वतंत्र मालमत्तेतील संभाव्य वारसाहक्क आपोआप
संपतो, असे म्हणता
येत नाही.
मूळ खातेदार मयत झाल्यानंतर त्याच्या
विधवेला मिळालेल्या मालमत्तेची, ती विधवा, हिंदू वारसा
कायदा, १९५६, कलम
१४ अन्वये संपूर्ण मालक (Absolute
Owner) झाली आहे.
उक्त तरतुदीन्वये, संपूर्ण मालक (Absolute
Owner) झालेली सदर विधवा (आई) जर मृत्युपत्र न करता मरण पावली तर,
तिच्या मालमत्तेबाबत, हिंदू वारसा कायदा,
१९५६, कलम १५ पोट-कलम (१) च्या सामान्य नियमान्वये
चे वारस (अ):
मुलगे आणि मुली (पूर्वमृत मुलगा किंवा मुलीची मुले धरून)
आणि पती असे आहेत.
त्यामुळे, सदर मयत विधवा (आई) च्या
नावे दाखल क्षेत्रास, तिचा मुलगा आणि मुलगी वारस म्हणून दाखल होतील.
सबब, आईच्या मृत्युसमयी तिची मुलगी
हयात असल्यास, केवळ तिने
वडिलांच्या मालमत्तेतील हक्क
सोडला होता या
कारणावरून तिला आईच्या
मालमत्तेच्या वारसाहक्कातून आपोआप
वगळता येणार नाही.
t
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मयत आईचे वारस. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !