सार्वजनिक उपद्रव (फौ.प्र.सं. कलम १३३)
तालुका दंडाधिकारी आणि
उपविभागीय दंडाधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १३३
अन्वये सार्वजनिक उपद्रवाविरूध्द कारवाई संबंधीत असलेल्या अधिकाराचा वापर करुन अत्यंत
प्रभावीपणे काम करता येऊ शकते.
P पोलीस अहवाल किंवा खाजगी
व्यक्तीने अथवा वृत्तपत्र, दूरदर्शन अथवा अन्य प्रकारे सार्वजनिक उपद्रवाबाबत
मिळालेल्या माहितीवरून तालुका दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांना या कलमान्वये
कारवाई करता येते. या कलमाचा वापर करतांना खालील बाबी लक्षात
घ्याव्यात.
P फौजदारी प्रक्रिया
संहिता, कलम १३३ चा वापर खाजगी वाद किंवा लोकांमधील आपसातील वाद सोडविण्यासाठी करु
नये.
P जेथे सामान्य
कायद्याखाली कारवाई करणे शक्य असेल तर फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १३३
चा वापर टाळावा.
P सार्वजनिक उपद्रवाविरूध्द
कोणतीही कारवाई करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १३३
अन्वये सशर्त आदेश काढणे आवश्यक आहे.
P सशर्त आदेश काढला
गेला नसल्यास पुढची सर्व कारवाई अवैध ठरेल.
P फौजदारी प्रक्रिया
संहिता, कलम १३३ चा वापर अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक उपद्रवासाठी करता येईल,
भविष्यात उद्भवणार्या सार्वजनिक उपद्रवांसाठी नाही.
F फौ.प्र.सं. कलम १३३ : ज्यावेळेस तालुका दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी
यांना सार्वजनिक उपद्रवाबाबत अशी माहिती मिळेल की,
१. सर्वसामान्य
लोक ज्या सार्वजनिक स्थळाचा/रस्त्याचा/नदीचा/जलमार्गाचा कायदेशीररित्या वापर करतात त्यात कोणीतरी बेकायदेशीरपणे अडथळा निर्माण
केला आहे. किंवा
२. एखादा
व्यवसाय/ठेवलेला माल, सर्वसामान्य लोकांच्या
आरोग्याला घातक ठरु शकेल, किंवा
३. एखाद्या
मालामुळे/इमारतीमुळे किंवा अन्य कारणामुळे आग लागू शकेल अथवा
स्फोट होऊ शकेल अथवा या प्रकारच्या पदार्थाची विल्हेवाट करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक
आहे, किंवा
४. एखाद्या
इमारत/तंबू/झाड यामुळे येणार्या-जाणार्या सर्वसामान्य लोकांना इजा होऊ शकेल, किंवा
५. एखाद्या
खोदकामामुळे/ तलाव/विहिरीमुळे सर्वसामान्य
लोकांना अपघात होऊ शकेल त्यामुळे अशा जागी कुंपण घालणे आवश्यक आहे, किंवा
६. कोणतेही
धोकादायक जनावर नष्ट करणे/कोंडुन ठेवणे आवश्यक आहे, किंवा
७. एखाद्या
घरातून/इमारतीतून बाहेर येणार्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरलेली
असून लोकांना काम करता येणे अशक्य झाले आहे अथवा अशा सांडपाण्यामुळे सार्वजनिक रोगराई
पसरण्याचा धोका आहे, किंवा
८. टोकदार
खिळे रस्त्यावर पसरवण्यात आले आहेत, किंवा
९. एखाद्या
व्यक्तीने सार्वजनिक विहिरीजवळ शौचालय बांधले आहे, किंवा
१०. एखाद्या
व्यक्तीने सार्वजनिक जागेवर भिंत उभी केली आहे, किंवा
११. एखाद्या
व्यक्तीने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, किंवा
१२. एखाद्या
व्यक्तीने सार्वजनिक रस्त्यावर चबुतरा बांधला आहे,
या किंवा अशा सार्वजनिक
उपद्रवाची माहिती मिळताच तालुका दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनी फौ.प्र.सं. कलम १३३ अन्वये असा सार्वजनिक उपद्रव निर्माण करण्यास
कारणीभूत व्यक्तीला सशर्त आदेश काढावा. अशा व्यक्तीस आवश्यक तो
अवधी देऊन सदर उपद्रव बंद करण्यासाठी/इतरत्र हलविण्यासाठी आदेश
पारित करावा किंवा म्हणणे मांडण्यासाठी समक्ष हजर राहण्याचा आदेश पारित करावा.
F फौ.प्र.सं. कलम १३४: फौ.प्र.सं. कलम १३३ अन्वये पारित केलेला आदेश संबंधीत उपद्रव
निर्माण करण्यास कारणीभूत व्यक्तीवर बजावला गेला पाहिजे. आदेश
बजावणे शक्य नसल्यास तो उद्घोषणेद्वारे प्रसिध्द करावा. अशा व्यक्तीला
तो आदेश कळावा म्हणून योग्य ठिकाणी असा आदेश डकवावा.
F फौ.प्र.सं. कलम १३५: फौ.प्र.सं. कलम १३४ अन्वये आदेश बजावला गेल्यानंतर संबंधीत व्यक्तीने
असा उपद्रव नमूद अवधीत दूर केला पाहिजे किंवा समक्ष हजर राहून म्हणणे सादर केले पाहिजे.
F फौ.प्र.सं. कलम १३६: फौ.प्र.सं. कलम १३५ अन्वये आदेश बजावला गेल्यानंतरही संबंधीत
व्यक्तीने असा उपद्रव नमूद अवधीत दूर केला नाही किंवा समक्ष हजर राहून म्हणणे सादर
केले नाही आणि आदेशाचे पालन केले नाही तर अशी व्यक्ती भारतीय दंड संहिता, कलम १८८ अन्वये कारवाईस पात्र ठरेल.
F फौ.प्र.सं. कलम १३७: असा सार्वजनिक उपद्रव निर्माण करण्यास कारणीभूत
व्यक्ती हजर झाल्यास तिला तिचे म्हणणे आणि समर्थनार्थ पुरावे सादर करता येतील.
F फौ.प्र.सं. कलम १३८: अशा व्यक्तीने सादर केलेल्या पुराव्यांचा अभ्यास
करुन उपरोक्त आदेश रद्द करण्यात येईल किंवा त्यात बदल करण्यात येईल किंवा तो आदेश कायम
करण्यात येईल.
F फौ.प्र.सं. कलम १३९: अशा व्यक्तीने सादर केलेल्या पुराव्यांचा अभ्यास
किंवा अन्वेषण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करता येईल.
F फौ.प्र.सं. कलम १४०: अशा व्यक्तीने सादर केलेल्या पुराव्यांचा अभ्यास
किंवा अन्वेषण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना आदेश देता येईल.
F फौ.प्र.सं. कलम १४१: फौ.प्र.सं. कलम १३८ अन्वये आदेश कायम केला गेला असूनही संबंधीत
व्यक्तीने असा उपद्रव दूर केला नाही
आणि आदेशाचे पालन केले नाही तर त्या व्यक्तीविरुध्द भारतीय दंड
संहिता, कलम १८८ अन्वये कारवाईस करण्यात येईल.
b|b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सार्वजनिक उपद्रव. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !