पा. म. लि. चिकित्सा
सकाळी
चहा घेण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस व दोन चमचे मध टाकून चांगले
ढवळून घ्या. हे मिश्रण घाई न करता घोट घोट प्या.
अर्ध्या तासानंतर हवा तर चहा प्या. पा.
म. लि. चिकित्सेमुळे शरीराची
नैसर्गिकरीत्या सफाई होते.
लिंबामुळे
शरीरास ‘क’ जीवनसत्त्व मिळते व
रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातील अंतर्गत जखमा भरून निघतात.
शरीरातील विषाणूंची ताकद कमी होते, गाऊट,
संधिवात, आमवात या रोगांना आळा बसतो. हाडांचे, सांध्याचे रोग होत नाहीत. मूत्रपिंडातील युरिक ॲसिड कमी होते. दात व हिरड्यांचे
विकार दूर होतात.
मधात
ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज ह्या
तीन नैसर्गिक साखर आढळतात, ही नैसर्गिक साखर प्राणवायू साठवून
ठेवते. मधातील डेक्स्ट्रीन ह्या चिकट पदार्थामुळे मध सरळ रक्तात
मिसळते. शिवाय मधात
बावीस प्रकारचे ॲमिनो ॲसिड, अठ्ठावीस प्रकारची
खनिजे, अकरा प्रकारचे एन्झाईम्स, चौदा प्रकारची
मेदाम्ले, अकरा प्रकारचे पिष्टमय पदार्थ असतात. मध हे सौम्य जंतुनाशक आहे. मधामुळे रक्तात हिमोग्लोबीन
वाढते. डोळ्याचे विकार, लठ्ठपणा,
मोतीबिंदू होत नाही. जठर, हृदयरोग, फुप्फुसाचे विकार होत नाहीत.
पाणी हे लिंबू व मधाला पेशीपेशींपर्यंत पोहोचवण्याचे
काम करतो.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला पा. म. लि. चिकित्सा. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !