आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

उपाय: चेहर्‍यावर डाग /सुरकुत्या पडणे

उपाय: चेहर्‍यावर डाग /सुरकुत्या पडणे (Wrinkles /Pigmentation)
 बध्दकोष्ठता, ऊन्हात जास्त काम करणे, धुम्रपान, मद्यपान, अति रागावणे, मानसिक ताण, अनिद्रा, अति शारीरीक ताण ह्यामुळे चेहर्‍यावर सुरकुत्या पडु शकतात.
खालील कुठलाही उपाय करण्याआधी चेहर्‍याला तेल अथवा तत्सम द्रवाने, दहा मिनिटे मसाज करावा, नंतर चेहरा कापसाने पुसुन दहा मिनिटे गरम पाण्याची वाफ घ्यावी. नंतरच उपाय करावे. त्वचेच्या आतील थरातील घाण निघुन जाण्यासाठी हे आवश्यक आहे. प्रत्‍येक लेप चहेर्‍यावर तीस मिनिटे ठेवावा व नंतर साबण न लावता उटणे लाऊन चहेरा धुवावा.
* जांभळाच्या बिया दुधात उगाळून किंवा जांभळाच्या बियांचे चूर्ण दुधात कालवून चेहर्‍याला लाववा.
* रोज एक चमचा हळद थोडी गरम करून मध व थोड्या गुलाबपाण्याबरोबर कालवून चेहर्‍याला लावावा.
* सीताफळ मिळत असेल तेव्हा त्याचा भरपूर वापर करावा. यात जीवनसत्त्व’,‘’, असल्याने त्वचेचे आरोग्य राखले जाते.
* पिकलेले अर्धे केळे चांगले कुस्करून चेहर्‍याला लावावे.
* चेहर्‍यावर आठवड्‍यातुन तीनवेळा मध लावावा.
* ानकोबीचा रस व मध एकत्र करून चेहर्‍याला लावावा.  
* कांद्याचा रस आणि पांढरे व्‍हिनेगर सम प्रमाणात घेवुन चेहर्‍यावर लावावा.
* चेहर्‍यावर ताज्या कलिंगडाचा रस लावून तीस मिनिटांनी चहेरा धुवावा. सुरकुत्या कायमच्या निघून जातात.
* चेहेर्‍यावर डाग असले तर प्रत्येकी पन्नास ग्रॅम आवळा चूर्ण, पुनर्नवा पावडर, ज्येष्ठमध चूर्ण व दहा ग्रॅम आंबेहळद घेऊन एकत्र करून ठेवावी. त्वचा रूक्ष असेल तर दूध किंवा लिंबाच्या रसात पेस्ट बनवून लावावी, त्वचा तेलकट असेल तर गुलाबपाण्यात पेस्ट बनवून पंधरा दिवस नियमित चेहेर्‍याला लावावी. यामुळे मृत त्वचा निघून जाते व चेहर्‍यावर तकाकी येते.
* चेहर्‍यावर डाग असले तर जायफळ व अनंतमुळ चूर्ण सम प्रमाणात घेऊन दुधामध्‍ये उगाळून ही पेस्ट पंधरा दिवस नियमित चेहर्‍याला लावावी.
* चेहर्‍यावर ताजा लिंबू कापून त्याची फोड घासावी.
* काकडीचा रस चेहर्‍यावर लावावा.
* चेहर्‍यावर पपईचा गर लावावा.
* सफरचंद व अननसचा रस समप्रमाणात घेऊन चेहर्‍यावर लावावा.
* ऊसाच्या रसात, हळद टाकुन लेप तयार करून चेहर्‍याला लावावा.
* ओल्या नारळाचे दूध चेहर्‍यावर लावावे, हे उत्तम Moisturizer असून चेहर्‍यावर तेज व गोरेपणा आणतो.
* सकाळी उठल्यावर चेहर्‍यावर जे तेल येते ते Anti Wrinkle आहे. हे तेल चेहर्‍यावर हलका मसाज करून जिरवावे नंतर चेहरा धुवावा.
* एरंडेल तेल अथवा ग्लिसरीन मध्‍ये लिंबाचा रस, हळद, रक्तचंदन व कापराची वस्त्रगाळ पूड टाकून मलम तयार करावे. दाढी केल्यावर चेहर्‍याला लावावे. चेहरा कांतिमान होऊन त्वचेखालील अतिरिक्त चरबी कमी होते.
* एरंडेल तेल व दूध सम प्रमाणात घेऊन चेहर्‍यावर हलका मसाज करून जिरवावे नंतर चेहरा धुवावा.
* चेहर्‍यावर डाग असतील तर आठवड्यात दोनदा, एक बटाटा उकडून थंड झाल्यावर त्यात एका काकडीचा रस व अर्धा लिंबू पिळून एकत्र करून पेस्ट बनवुन चेहेर्‍याला लावावी.
* चेहर्‍यावर सुरकुत्या असतील तर आठवड्यात दोनदा, एक चमचा पांढरे व्‍हिनेगर, कच्च्या अंड्यातील पांढरे तरल द्रव्‍य व एक पिकलेले केळे एकत्र करून पेस्ट बनवुन चेहर्‍याला लावावी.
* नारळाची करवंटी जाळून, त्या राखेत, कापूर व नारळाचे तेल मिसळून, तारुण्यपिटिकेमुळे झालेल्या व्रणावर लावावा.
* दूर्वा चांगल्या कुटून त्याचा लेप तारुण्यपिटिकेमुळे झालेल्या व्रणावर लावावा.
* जीवनसत्वयुक्त गोळ्या घ्याव्या. गाजर, टोमॅटो, आवळा यांचे सेवन करावे.

* नारळाच्या तेलाने चेर्‍यावर मसाज करावा.

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel