साईज झिरो
आजच्या
तरुण पिढीमध्ये, विशेषतः मुलींमध्ये ‘साईज झिरो’ चा फार मोठा ‘संसर्ग’
झाला आहे. ‘साईज झिरो’ म्हणजे
बॉडीमास इंडेक्स (Body Mass Index) अठरा पेक्षा कमी ठेवणे. परंतु ‘साईज झिरो’
च्या नादात आपण रोगांना निमंत्रण देत आहोत व पुढील आयुष्य विविध समस्यांबरोबर घालवणार आहोत याची त्यांना
जाणीव नसते.
एका व्यक्तीला
एका दिवसाच्या उर्जेसाठी किमान तीन हजार उष्मांकांची आवश्यकता असते. ‘साईज झिरो’ चे ‘रोगी’ या नादांत आरोग्यास व शारीरिक वाढीस अनिवार्य ठरणारे पदार्थ खाण्याचे टाळतात.
उदा. केळी खाल्ल्याने शरीरास आर्यन मिळते जे शरीरासाठी
अत्यावश्यक आहे, प्रमाणात खाल्लेल्या मांसाहारी पदार्थात कॅल्शियम
व शाकाहारी पदार्थातून न मिळवता येणारे प्रोटीन्स व इतर घटक असतात, प्रमाणात आहारात असलेले तेल हे शरीरासाठी, हाडांसाठी
वंगण (Lubricant) म्हणून काम करते. हे ‘रोगी’
वजन वाढेल या भीतीने या अत्यावश्यक पदार्थांचा त्याग (?) करतात.
‘साईज झिरो’
च्या ‘रोग्यांना’ भविष्यात
‘ऑस्टीयोपोरोसीस’ नावाचा हाडांचा रोग होण्याची
शक्यता असते. यांत हाडे अशक्त बनल्यामुळे कंबर दुखणे,
पाठ दुखणे, हाडांची इतर दुखणी, हाडे ठिसूळ बनल्यामुळे सतत फ्रॅक्चर होणे या समस्या, जरूर त्या वयात अत्यावश्यक
व पौष्टिक आहार न घेतल्याने होतात.
या लोकांना ‘एनोरेक्सिया’ नावाचा दुसरा आजार होण्याची शक्यता
असते. यांत व्यक्ती खाण्या-पिण्याबाबत अतिजागृत
(Over causious) व संशयी बनत जाते. भूक लागली तरी, वजन वाढेल या भीतीने काही खात नाही व पुढे हा अतिजागृतपणा (Over causiousness) व संशयी वृत्ती हा त्यांचा स्वभाव बनतो व त्यामुळे अशा व्यक्ती सतत तणावाखाली
असतात. यांना पुढे तणावामुळे पित्तविकार, अल्सर, मानसिक विकार जडण्याचा संभव असतो.
बॉडीमास
इंडेक्स (Body Mass Index) 18.05
पेक्षा कमी असलेल्यांना भविष्यात ‘ट्युबरक्यलॉसिस’ (T.B.) चा विकार होऊ शकतो असेही एका संशोधनात आढळून आले आहे.
या लोकांना
पुढे डोळ्यांचे विकार, गर्भधारणेत अडचणी येणे इत्यादी अनेक समस्यांना
तोंड द्यावे लागते.
त्यामुळे ‘‘साईज झिरो’ च्या ‘रोग्यांनो’
आत्ताच विचार करा. तुम्हांला काही दिवसांसाठीच
‘साईज झिरो’ बनायचे आहे की संपूर्ण आयुष्य निरोगी
रहायचे आहे?
Slim राहण्यापेक्षा Fit राहणे कधीही चांगले.
==========XXXXXXX=============
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला साईज झिरो. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !