आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

उपाय: तारुण्य पिटिका/मुरूम

 त्वचेच्या खालील तैलीय ग्रंथी (Sibetious Glands) त्वचेच्या रक्षणासाठी तेल (Sibum) उत्पन्न करत असतात, हे तेल त्वचेतील बारीक नलीकांव्दारे त्वचेवर येत असते. जेव्हा हे तेल जास्त प्रमाणात उत्पन्न होते व त्यास बाहेर येण्यास अडथळा निर्माण होतो तेव्हा या तैलीय ग्रंथी (Sibetious Glands) फुगतात, याला आपण तारुण्य पिटिका म्हणतो. विशेषत: पित्ताच्या आधिक्याने तारूण्य पिटिका होतात.
खालील कुठलाही उपाय करण्याआधी चेहर्‍याला तेल अथवा तत्सम द्रवाने, दहा मिनिटे मसाज करावा, नंतर चेहरा कापसाने पुसुन दहा मिनिटे गरम पाण्याची वाफ घ्यावी. नंतरच उपाय करावे. त्वचेच्या आतील थरातील घाण निघुन जाण्यासाठी हे आवश्यक आहे.
* लिंबाचा रस व गुलाबपाणी सम प्रमाणात घेऊन दर तासाने ह्या पाण्याने चेहरा धुवावा. असे पंधरा दिवस करावे.
* आंघोळी पूर्वी अर्धा तास लिंबाची साल चेहर्‍यावर घासावी.
* रात्री झोपताना कच्च्या दुधात जायफळ उगाळून तारुण्य पिकांना लावावे, सकाळी चेहरा धुवावा.
* संत्र्याच्या साली व चण्याची डाळ रात्री भिजवून सकाळी त्याची पेस्ट करून चेहर्‍यावर लावावी, हा लेप वाळल्‍यानंतर चेहरा धुवावा.
* चारोळी, मसूर डाळ, पिवळी मोहरी, तांदूळ व थोडा कापूर यांची एकत्र पावडर करून रात्री काकडीच्या रसाबरोबर अथवा कच्च्या दुधाबरोबर चेहर्‍यावर लावावी व पंधरा मिनिटे ठेऊन चेहरा धुवावा.
* कडुलिंबाची 10 पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने तोंड धुवावे.
* तुळशीचा रस व लिंबाचा रस सम प्रमाणात घेऊन रात्री झोपताना चेहर्‍याला लावावा. सकाळी चेहरा धुवावा.
* कोथिंबीरचा रस व पुदिन्याचा रस एकत्र करून चेहर्‍याला लावावा.
* कोरफडीचा रस नियमीत प्यावा.
* कच्चा बटाटा, गाजर, बीट, दुधी यांचा अर्धा कप रस एकत्र करून रोज घ्यावा.
* धणे, जिरे, वावडिंग पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्यायल्यास रक्त शुद्ध होते, त्वचा साफ होते.
* जायफळ व वेखंड उगाळून त्याचा लेप मुरमांवर लावावा.
* काही व्यक्तींच्या चेहर्‍यावर तारुण्यपिटिकांचे डाग दिसून येतात. यावर एक चमचा शेंगदाणा तेलात एक चमचा लिंबू रस पिळून हा लेप चेहर्‍याला लावावा. वीस मिनिटांनी चेहरा धुवावा. एक महिना नियमित हा उपचार केल्यास चेहर्‍यावरील डागांत फरक पडतो.
* तारुण्यपिटिकांवर पिकलेल्या पेरूचा गर आणि पाव चमचा हळद, थोड्या गुलाबपाण्याबरोबर कालवून लावावा.
* जांभळाची बी दुधात उगाळुन लावावी.
* आहारात कलौंजी (Nigella) चा वापर करावा.
* खजूर बी दुधात उगाळून, त्यात थोडी जायफळ पावडर टाकून तारूण्यपिटीकांवर लावावी.
* कमळाचे फुल आणून ते सावलीत सुकवावे, त्याची पावडर करून दूध किंवा दही किंवा मध यांबरोबर लेप करून चेहर्‍यावर लावल्यास त्वचा उजळते.
* नारळाची करवंटी जाळून, त्या राखेत, कापूर व नारळाचे तेल मिसळून, तारुण्यपिकेवर लावावे. हा लेप तारुण्यपिकेमुळे झालेल्या व्रणावरही लावता येतो.

* दूर्वा चांगल्या कुटून त्याचा लेप तारुण्यपिकेवर लावावा. हा लेप तारुण्यपिटिकेमुळे झालेल्या व्रणावरही लावता येतो.

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel