आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

सर्व्हे नंबर/ गट नंबर/ भूमापन क्रमांक


र्व्हे नंबर/ गट नंबर/ भूमापन क्रमांक

अनेक कागदपत्रात आपण सर्व्हे नंबर/ गट नंबर/ भूमापन क्रमांक असा उल्‍लेख वाचतो. वस्‍तुत: सर्व्हे नंबर/ गट नंबर/ भूमापन क्रमांक या संज्ञांचा वापर विशिष्‍ठ योजनांदरम्‍यान केला गेला आहे. त्‍यामुळे त्‍या त्‍या विशिष्‍ठ योजनांचा उल्‍लेख करतांना त्‍या त्‍या विशिष्‍ठ संज्ञेचा वापर करणे अपेक्षीत आहे.
(१) बंदोबस्‍त योजनेदरम्‍यान: सर्व्हे नंबर (स.न.) या संज्ञेचा वापर करण्‍यात आला आहे.
(२) पूनर्मोजणी योजनेदरम्‍यान: भूमापन क्रमांक (भू.क्र.) या संज्ञेचा वापर करण्‍यात आला आहे.
(३) एकत्रीकरण योजनेदरम्‍यान: गट नंबर (गट नं.) या संज्ञेचा वापर करण्‍यात आला आहे.

उपरोक्‍त योजनांची थोडक्‍यात माहिती खालील प्रमाणे:

(१) बंदोबस्‍त योजना: महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, प्रकरण ६ मधील कलम ९० ते १०७ मध्‍ये जमाबंदीबाबत तरतूद आहे. जी कार्यपध्‍दती अवलंबून जमाबंदी अधिकारी जमीन महसुलाची रक्‍कम ठरवितो तिला जमाबंदी म्‍हणतात. कलम ९३ अन्‍वये जमाबंदीची मुदत ३० वर्षे असते. त्‍यानंतर पुन्‍हा जमाबंदी अपेक्षीत असते.
इंग्रजांच्‍या काळामध्‍ये राबविण्‍यात आलेली बंदोबस्‍त योजना अथवा करण्‍यात आलेली जमाबंदी तत्‍कालीन इंग्रज सरकारच्‍या कायद्‍यानसार पार पाडण्‍यात आली होती. पहिली रिव्‍हिजन सेटलमेंट १८८९ ला तर दुसरी रिव्‍हिजन सेटलमेंट नागपुरमध्‍ये साधारणत: १९१० ते १९२० दरम्‍यान राबविण्‍यात आली.
या बंदोबस्‍त योजने दरम्‍यान प्रत्‍यक्ष जागेवर जाऊन ऑफसेट, शंकू साखळीद्‍वारे शेत जमिनींची मोजणी करण्‍यात आली. त्‍याप्रमाणे जमिनीचा सारा, आकार, जमा निश्‍चित करण्‍यात आला. व त्‍या अनुषंगाने अभिलेख नकाशे, आकारबंद, बंदोबस्‍त मिसळ, पी-१, पी-२, पी-९ वगैरे तयार करण्‍यात आले. बंदोबस्‍त नकाशे १६ इंचास १ मैल (१:४०००) या परिमाणात आहेत. बंदोबस्‍त योजनेमध्‍ये प्रत्‍यक्ष सविस्‍तर मोजणी सोबतच शेत जमिनीचे क्षेत्रफळ, व मालकी हक्‍काबाबत चौकशी करण्‍यात आली. त्‍यामुळे या योजनेमध्‍ये क्षेत्र/नकाशा/नावामध्‍ये चुका झाल्‍याबाबत तक्रारी नगण्‍य आहेत.

(१.१) बंदोबस्‍त नकाशा: बंदोबस्‍त नकाशा हे सन १९१० च्‍या आसपास राबविलेल्‍या बंदोबस्‍त योजने दरम्‍यान तयार केलेले नकाशे होत. हे नकाशे १६ इंचास १ मैल (१:४०००) या परिमाणात तयार करण्‍यात आले आहेत.
ज्‍या गावांमध्‍ये अद्‍यापही बंदोबस्‍त योजना प्रचलित आहे तेथे बंदोबस्‍त नकाशाची चार पट करून मोजणीची कार्यवाही केली जाते. बंदोबस्‍त नकाशातील शेताच्‍या दर्शक क्रमांकास "सर्व्हे नंबर" (नागपुर भागात "खसरा क्रमांक") असे म्‍हणतात.


(२) पनर्मोजणी योजना: महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, प्रकरण ५ मधील कलम ७९ अन्‍वये पूनर्मोजणी योजना राबवली जाते. इंग्रजांच्‍या काळात राबविण्‍यात आलेल्‍या बंदोबस्‍त योजनेनंतर राज्‍यात बंदोबस्‍त योजना (जमाबंदी) राबविण्‍यात आलेली नाही. शासनाने सन १९७५ च्‍या आसपास बंदोबस्‍त योजनेऐवजी पनर्मोजणी योजना राबविण्‍याचे प्रयत्‍न झाले होते. पनर्मोजणी योजनेमध्‍ये प्रत्‍यक्ष जागेवर जाऊन, संबंधीत शेतकरी त्‍याच्‍या शेतीची वहिवाट दाखवेल त्‍याप्रमाणे मोजणीची कार्यवाही करण्‍यात आली. परंतु पनर्मोजणी योजनेमध्‍ये जमिनीचा सारा/आकार नव्‍याने निश्‍चित करण्‍यात आला नाही. तसेच जमिनीच्‍या मालकी हक्‍क व क्षेत्रफळाबाबतही चौकशी करण्‍यात आली नाही. धारकांचे नाव जुन्‍या याजनेतील अभिलेखांवरूनच कायम करण्‍यात आले. त्‍यामुळे या योजनेमध्‍ये बर्‍याच चुका झाल्‍याच्‍या तक्रारी आहेत.
पूनर्मोजणी योजने दरम्‍यान तयार झालेला अभिलेख म्‍हणजे आकारबंद, गुणाकार बुक, पुरवणी आकारफोड पत्रक, सविस्‍तर मोजणी नकाशे (पी.टी. शीट), ग्राम नकाशे हे आहेत.
नर्मोजणी योजनेमधील सविस्‍तर मोजणी नकाशे १:१००० या परिमाणात तर गाव नकाशे १:५००० या परिमाणात आहेत.
राज्‍यात पनर्मोजणी योजना १९७५ ते १९९५ पर्यंत सुरू होती. याच दरम्‍यान शासनाने एकत्रीकरण योजना राबविण्‍यास सुरूवात केल्‍यामुळे पनर्मोजणी योजना व एकत्रीकरण योजना ओव्‍हलॅप झाली. त्‍यामुळे एकाच तालुक्‍यातील काही गावांमध्‍ये पनर्मोजणी योजना तर काही गावांमध्‍ये एकत्रीकरण योजना प्रचलित आहे तर काही गावांमध्‍ये दोन्‍हीपैकी कोणतीही योजना नसल्‍यामुळे बंदोबस्‍त योजनाच असल्‍याचे दिसून येते.

(२.१) पनर्मोजणी नकाशा:नर्मोजणी नकाशा, सविस्‍तर मोजणी शीट (पी.टी.शीट- प्‍लेन टेबल शीट),
हे १: १००० या परिमाणात असून प्रत्‍यक्ष जागेवर जाऊन खातेदाराने दाखविल्‍याप्रमाणे, वहिवाटीप्रमाणे मोजणी करून तयार केलेले नकाशे आहेत. ज्‍या गावात पूनर्मोजणी योजना प्रचलित आहे तेथे पनर्मोजणी नकाशांच्‍या आधारेच मोजणीची कार्यवाही केली जाते.
नर्मोजणी ग्राम नकाशे मात्र १:५००० या परिमाणात आहेत. सविस्‍तर मोजणी शीटला १/५ या प्रमाणात कमी करून ग्राम नकाशे तयार केलेले आहेत. सविस्‍तर मोजणी शीट उपलब्‍ध नसल्‍यास, ग्राम नकाशामधील विशिष्‍ठ भूमापन क्रमांकाच्‍या नकाशाला पाचपट करून मोजणीची कार्यवाही केली जाऊ शकते.
नर्मोजणी योजनेमधील शेताच्‍या दर्शक क्रमांकास "भूमापन क्रमांक" असे म्‍हणतात.


(३) एकत्रीकरण योजना: देशाची वाढती लोकसंख्‍या, वारस हक्‍क कायदे, खरेदी-विक्री व्‍यवहार इत्‍यादी कारणांमुळे जमिनींचे लहान-लहान तुकडे पडले. अशा लहान तुकड्‍यांवर शेती करून उत्‍पादन घेणे शक्‍य होत नव्‍हते. त्‍यामुळे हजारो हेक्‍टर जमीन पडीत राहू लागली. या तुकड्‍यांचे एकत्रीकरण करून जमिनीची उत्‍पादकता वाढविण्‍याच्‍या उद्‍देशाने मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्‍यास प्रतिबंध व त्‍यांचे एकत्रीकरण कायदा, १९४७ अस्‍तित्‍वात आला. या कायद्‍यानसार प्रत्‍येक विभाग, जिल्‍हा, तालुका येथील स्‍थानिक परिस्‍थिती, जमिनीचा प्रकार, पीक पध्‍दती, सिंचन पध्‍दती इत्‍यादी लक्षात घेऊन प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्‍यात आले. एकत्रीकरण योजना राबवितांना प्रत्‍यक्ष जागेवर जाऊन प्रत्‍येक शेत जमिनीची मोजणी करण्‍यात आली. फक्‍त ज्‍या दोन किंवा त्‍यापेक्षा जास्‍त जमिनींचे एकत्रीकरण करण्‍यात आले अशाच जमिनींची प्रत्‍यक्ष मोजणी करण्‍यात आली. एकत्रीकरण योजनेदरम्‍यान तयार झालेला अभिलेख म्‍हणजे एकत्रीकरण पत्रक, ९(१) आणि ९(२) चे नकाशे आणि आकारबंद हे आहेत. एकत्रीकरण योजनेतील नकाशे १:५००० या परिमाणात तयार केलेले आहेत. त्‍यामुळे त्‍या आधारे मोजणी करतांना नकाशाला पाचपट करूनच प्रत्‍यक्ष जागेवर मोजणी करावी लागते.

(३.१) एकत्रीकरण नकाशा: एकत्रीकरण नकाशा हे १:५००० या परिमाणात असतात. या नकाशांमध्‍ये ९(१) आणि ९(२) असे दोन प्रकार असतात. ९(१) आणि ९(२) हे मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्‍यास प्रतिबंध व त्‍यांचे एकत्रीकरण नियम, १९५९ मधील नियम क्रमांक आहेत. ९(१)चा नकाशा म्‍हणजे एकत्रीकरणापूर्वीचा नकाशा आणि ९(२) चा नकाशा म्‍हणजे एकत्रीकरणानंतरचा नकाशा. कार्यालयात हे दोन्‍ही नकाशे एकाच पत्रकावर (एकाच शीटवर) एकमेकांवर ओव्‍हरलॅप झालेले असतात. यावर काळ्‍या शाईने असलेले शेत नंबर (दर्शक क्रमांक) एकत्रीकरण योजनेपूर्वीचा तर लाल शाईने असलेले शेत नंबर (दर्शक क्रमांक) एकत्रीकरण योजनेत दिलेला गट नंबर असतो. एकत्रीकरण योजनेत पूर्वीच्‍या दोन किंवा अधिक सर्व्हे नंबर/भूमापन क्रमांकांचे एकत्रीकरण करून, एकत्रीकरण योजनेमध्‍ये एकच गट क्रमांक तयार झाला असल्‍यास अशी दुरूस्‍ती नकाशावर लाल शाईने केलेली असते.
ज्‍या गावात एकत्रीकरण योजना प्रचलित आहे तेथे एकत्रीकरण नकाशांच्‍या पाचपट करून मोजणीची कार्यवाही केली जाते. एकत्रीकरण योजनेपूर्वीचा पनर्मोजणी योजनेमधील विशिष्‍ट शेताचा नकाशा कोणताही बदल न होता एकत्रीकरण योजनेनंतरही तसाच असल्‍यास, पनर्मोजणी योजनेमधील सविस्‍तर मोजणी नकाशा (पीटी शीट) च्‍या आधारे मोजणीची कार्यवाही करणे अपेक्षीत आहे. कारण एकत्रीकरण योजनेमधील १:५००० या परिमाणात असलेला नकाशा पाचपट करण्‍यामध्‍ये चुका होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. एकत्रीकरण योजनेतील ग्राम नकाशासुध्‍दा १:५००० या परिमाणात असतो.
एकत्रीकरण योजनेमधील शेताच्‍या दर्शक क्रमांकास "गट नंबर" असे म्‍हणतात.

b|b

Comments

  1. याची केस दाखल करण्यास विलंब झाला असेल तर काय करावे?

    ReplyDelete
  2. Gat no nakashamadhe gatanche no adalabadal karneche adhikar konala ahet

    ReplyDelete
  3. सरकारी जूनी चावडी ची पडकी इमारती कारखाने शासन देते का

    ReplyDelete
  4. सरकारी मोबदला कराराने शासकीय इमारती दूकानदारी करीता देता त का

    ReplyDelete
  5. गट एकत्रीकरणातील चुका दुरुस्त आजही होतील का?

    ReplyDelete
  6. Replies
    1. 8010842266 7 12 aurangabad kannad pishore gat na 211

      Delete
  7. कायदा शी निगडीत प्रश्न— माहिती असेल तर कळवावे... अजोबाच्या काळापासुन वडिलोपर्जीत स्वत: ची मालकी असलेली जमिन जी की आज ती जमिन आमच्या ताब्यात असुन जमिन कसतोय आहे परंतु गट एकत्रीकरण कायदा मध्ये आमच्या मालकीत असलेली जमिन दुसर्‍या व्यक्तीच्या नावे गेली व सदरील जमिन त्याने तिसर्‍या व्यक्तीच्या नावे केली. जी की ही जमीन आमची असल्यामुळे ताब्यात मात्र अजुन आमच्या आहे. सदरील जमीन आमच्या नावे करण्यासाठी आपल्या माहिती असल्यास पर्याय सुचवावे मी अत्यंत आभारी राहील..

    ReplyDelete
    Replies
    1. कञीकरण तक्रारी अर्ज उप संचालक भूमि अभिलेख यांचेकडे करून दाद मागून घ्यावी .. जर उपसंचालक यांनी एकञीकरणातील चूक नाही म्हणून अर्ज निकाली काढल्यास पोटहिस्सा व फाळणी बारा चे अपिल जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचे कडे करावा .

      Delete

  8. गट एकत्रीकरणातील चुका दुरुस्त आजही होतील का?

    ReplyDelete
  9. ON OF GAT NO NOT FOUND IN GAV NAKASHA AND ALSO ON DIGITAL MAP
    HOW TO MAKE CORRECTION FOR THAT

    ReplyDelete
  10. 1;1000 म्हणजे जमिनीवर किती अंतर आहे

    ReplyDelete
  11. आमची जमीन 1 ठिकाणी आणि गट स्कीम मधे दुसरीकडेच दाखवत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. तालुका भुमी अभिलेख कार्यालयातून नकाशा प्राप्त करता येतो. एकत्रीकरणातील चुक आहे. उपआयुक्त कार्यालयात अर्ज करून दुरूस्ती करून घेता येईल.

      Delete
  12. सरवे नंबर नकाशा कुठे मिळते

    ReplyDelete
  13. 7/12मोबाईल वर कशा पद्धतीने बघता येईल

    ReplyDelete
  14. विष्णू वासुदेव गावडे

    ReplyDelete
  15. सर्वे नंबर चा बंदोबस्त नकाशा मिळतो काय किंवा कसे?

    ReplyDelete
  16. मोवजा सतरापूर रामटेक पहन 25

    ReplyDelete
  17. सरवे नंबर नकाशा कुठे मिळते

    ReplyDelete
    Replies
    1. भुमी अभिलेख विभागात

      Delete
  18. एका गटातील जमीन दोन गटात झाली एकतर करायची आहे उपाय सांगा

    ReplyDelete
  19. Bhogvatdara chya nanavar malki hakk karaycha ahe upay sanga

    ReplyDelete
  20. 1981साली सर्व्हे झाला,नोंदी चुकीच्या झाल्या त्या दुरुस्ती साठी प्रकरण भूमी अभिलेख ला टाकले उपयोग झाला नाही विलंब झाला म्हण हाय कोर्टात जावा लागेल,ती जागा ग्रामपंचायत महाराष्ट्र शासन आहे गावठाण आणि कब्जा वाहिवतिस् आहे

    ReplyDelete
  21. ग्रामपंचायत उतारे आहे मग अडचण काय,सीटी सर्व्हे होऊन चाळीस वर्षे झाले,प्ररात सर्व्हे झाला नाही,1981 ला सर्व्हे झाला त्याचा आधीपासुन आत्तापर्यंत सगळे ग्रामपंचायत उतारे आहे कब्जा वाहीवतिष आहे तरी चुकीच्या नोंदी निघना काय करावा भूमी अभिलेख कार्यालात प्रकरण fhetalale,

    ReplyDelete
  22. शहर भूमापण क्रमांक कसा बघणे

    ReplyDelete
    Replies
    1. Sarve 27 gav no. 280 ta. maregaon Gil. Youtmal

      Delete
  23. ग्रामीण सर्वे नंबर नकाशे कसे बघावे

    ReplyDelete
  24. सॅवे नकाशा ३६/२

    ReplyDelete
  25. Yekatare Karan madeaje jamen kame jhale the chukeche durusyte sathee parkaran bhume abhe lek Kade chalewale parantu

    ReplyDelete
  26. 1930 साली माझे पजोबा मयत झालं आहे आणि त्याना चार मुले फेरफारने ती आली पण पण त्या फेरफार ने मोठा आजोबा एकुम्ं म्हनुन आला आणि तो 1965चालू मयत झाला मग त्या तीन भाऊ आणि त्याच्यी मुले येयला पाहिजे ना त्या फेरफारने चुलत चुलते चुलत भाऊ हे कसे येतोल त्याच्यी नावे कमी करायला काय लागेल

    ReplyDelete
    Replies
    1. तहसील मध्ये एकुम्या नोंदी विरुद्ध अर्ज करा

      Delete
  27. नकाशावर गट नंबर आढळत नसल्यास तक्रार कोठे करावी

    ReplyDelete
    Replies
    1. जमिन थोरले भावाचे नावावरच आहे भाऊ भाऊ जमिन तुकडे वेग वेगळे करून खातात पण अजून वाटप झाले ले नाही .पण आता थोरला भाऊ लहान भावाना देत नाही. जी जमिन थोरल्या भावाचे नावावर केलेली आहे.ती वाटून देत नाहीत मग काय ⁉ करायला पाहिजे

      Delete
  28. नकाशावर गट नंबर आढळत नसल्यास तक्रार कोठे करावी

    ReplyDelete
  29. नकाशावर गट नंबर आढळत नसल्यास तक्रार कोठे करावी

    ReplyDelete
  30. सर्वे नंबर वरुण नकाशा कसा मिळवावा

    ReplyDelete
    Replies
    1. वरती केल्यावरती ओपन होत नाही कारण का

      Delete
  31. फेरफार वर गट नंबर आहे व सात बारा वर सर्वे नंबर आहे तो जुळत नाही काय उपाय करावा.

    ReplyDelete
  32. मालकीच्या जमिनिवर येकाधि इमारत बांधली आसेल तर काय करावे लागेल ती इमारत हटवन्यासाठी काय करावे लागेल..

    ReplyDelete
  33. १ साखळी म्हणजे किती फूट.

    ReplyDelete
  34. सांगली जिल्हा फेरफार कसा शोधावा ऑनलाइन

    ReplyDelete
  35. भुमापक हद्द खुना नष्ट करुन अतिक्रमण जमिनीत पिके घेत आहे.
    त्या अतिक्रमण धारका कडीन जमिन सोडविण्यासाठी
    कायदेशीर उपाय सुचवावा.
    हद्द खुना संबंधि कोणती कार्यवाही होते.

    ReplyDelete
  36. गट अदला बदल झालेले आहे दुरुस्ती कोणत्या ऑफिस ला होईल

    ReplyDelete
    Replies
    1. गट नंबर आदला बदली कसा करता येतो

      Delete
  37. नकाशा चुकीचा असेल तर काय करावे

    ReplyDelete
  38. Serve no che band kiti feet astat.
    Shiv kiti feet aste.

    ReplyDelete
  39. Isvisan १८०० पासूनचे रेकॉर्ड कुठे मिळेल मला जुने परडी नंबर आणि सर्व्हे नंबर चे उतारे हवेत कुठे अर्ज करावा फेरफार पण नाही मिळते तलाठ्याकडे फेरफार नाहीत

    ReplyDelete
  40. आमच्या जमीनीचे साटखरेदीखत आहे तर ती जमीन आम्हाला मिळेल का

    ReplyDelete
    Replies
    1. हो ,कोर्टात दाखल करा

      Delete
  41. जुना रेकाँर्ड प्रमाणे 712 वर जमीन बरोबर आहे पण आजच्या 712 वर शेती फारच कमी झाली आहे जुने तहेसिलचे 712 पुरावा म्हणुन आहे.बाकी पुरावे आहे नाही म्हणुन प्रमाणपत्र आहे तरी दुरूस्ती कशी करता येईल.जमीन सध्यस्थित ताब्यात आहे माझ्या जुन्या 712 प्रमाणे.

    ReplyDelete
  42. falni nakasha chukicha zalela aahe to kuthe durust karun gheta yeto v tyasathi dockument ky lagtat
    plz inforn 9764511937

    ReplyDelete
  43. पुर्वी सर्वे नं होते आता गट नं झाले. नविन मोजणीत नकाशे बदलले काय? सर्वे नं गट नं बदलले काय?

    ReplyDelete
  44. एकत्रीकरण मध्ये माझी जमीन गट न दुसर्याच्या ताब्यात आहे व दुसर्याची जमीन गट न माझ्या ताब्यात आहे.व्यवस्थित करण्याबाबत सुचवावे .

    ReplyDelete
  45. मोजणी होताना कोणत्या नकाशा आधारे होते ,सर्वे नंबर का गट नंबर ,कोणता नकाशा महत्वाचा असतो

    ReplyDelete
  46. एकत्रिकरण करताना आमच्या जमिनीवर कमी शेती दाखवतेय. नकाशात एकच दाखवली आहे. पण सर्व गुंठे दाखवत नाही काय करावे. सांगाल का

    ReplyDelete
  47. Gut no 129 - survey no ?

    ReplyDelete
  48. गट नंबर वरून सर्वे नंबर कसा शोधावा

    ReplyDelete
Mahsul Guru

Subscribe YouTube Channel