उत्तर: सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी अद्ययावत केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे.
- पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद.
- पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करून घ्यावी
- वैद्यकिय दाखल्याची नोंद
- जात पडताळणी बाबतची नोंद
- भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद
- निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद
- मृत्यू अणि सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद
- गटविमा योजनेच्या सदस्यत्वाची नोंद
- गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद
- गटविमा नामनिर्देशनाची नोंद
- विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद
- हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद
- सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद
- वार्षिक वेतनवाढ नोंद
- नावात बदल असल्यास त्याची नोंद
- बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद
- बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद
- सेवेत कायम केल्याची नोंद
- स्वग्राम घोषणापत्राची नोंद
- वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद
- पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद
- पुरस्कार व तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी
- अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद
- घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद
- रजा प्रवास सवलत नोंद
- दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद
- मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी
- सेवा पडताळणीची नोंद.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सेवापुस्तक अद्ययावत करतांना कोणत्या नोंदी अद्ययावत केल्याची खात्री करावी ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !