मानसिक दृष्ट्या अक्षम व्यक्ती
[एखादी व्यक्ती 'दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६' अन्वये परिभाषित दिव्यांग व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीला सदर अधिनियमाच्या कलम ५७ व ५८ अन्वये सक्षम अधिकार्याने प्रमाणपत्र प्रदान केलेले असते.]
(१) "दिव्यांग
व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६" (Rights of Persons with Disabilities Act, 2016)
(२) "ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मानसिक मंदता आणि
एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय ट्रस्ट कायदा,
१९९९" (National Trust for the Welfare of Persons with Autism,
Cerebral Palsy, Mental Retardation and Multiple Disabilities Act, 1999)
"दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६"
शारीरिक/मानसिक दृष्ट्या अक्षम व्यक्ती देखील भारताच्या मजबूत बांधणीसाठी महत्वाचे घटक
आहेत या दृष्टीकोनातून भारत सरकारने "दिव्यांग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) कायदा" तयार केला होता जो दिनांक ७ फेब्रुवारी १९९६ रोजी अंमलात
आला होता. त्यानंतर हा कायदा निरसीत करून, अधिक प्रभावी "दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६" (Rights of Persons with Disabilities Act, 2016) हा कायदा दिनांक २६ डिसेंबर
२०१६ रोजी राजपत्रात प्रसिध्द करून दिनांक १९.४.२०१७ रोजी अंमलात आला. या अधिनियमात दिव्यांगत्वाची
व्याख्या गतिशील आणि व्यापक अर्थाने करण्यात आली तसेच दिव्यांग गटाच्या
प्रकारांची संख्या ७ वरून २१ पर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे शारीरिक आणि
मानसिक अशा दोन्ही दृष्ट्या अक्षम व्यक्तींचा समावेश "दिव्यांग" या व्याख्येत करण्यात आला.
['दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६', कलम १०२ अन्वये 'दिव्यांग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) कायदा, १९९५' निरसीत (repeal) केला गेला.]
Ü या अधिनियमाच्या
कलम २, खंड झेडसी अन्वये असलेल्या परिशिष्ठामध्ये दिव्यांगत्वात खालील बाबींचा
समावेश करण्यात आला आहे.
१. लोकोमोटर दिव्यांगता (Locomotor disability) म्हणजे स्नायू
व हाडांच्या किंवा चेतासंस्थेच्या (musculoskeletal or nervous system) किंवा दोन्हींच्या
त्रासामुळे स्वतःच्या शरीराच्या आणि वस्तूंच्या हालचाली करता न येणे), यामध्ये खालील
बाबींचा समावेश होतो—
(अ) "कुष्ठरोगातून बरी झालेली व्यक्ती" म्हणजे ज्या व्यक्तीचा
कुष्ठरोग बरा झाला आहे परंतु तिला खालील त्रास आहेत
(i) हातापायांना तसेच डोळ्यांना व पापण्यांना संवेदना नसणे आणि
पक्षाघात होणे, परंतु कोणतीही उघड विरुपता नसणे;
(ii) उघड विरुपता आणि पक्षाघात असणे परंतु तरीही सामान्य आर्थिक
हालचाली करण्यासाठी आवश्यक असलेल्या हातापायांच्या हालचाली करता येणे;
(iii) टोकाची शारीरिक विरुपता तसेच वाढलेले वय ज्यामुळे कोणताही फायदेशीर व्यवसाय करता न येणे आणि त्यानुसार "कुष्ठरोगातून बरे झालेले" या अभिव्यक्तीचा अन्वयार्थ लावला जाईल;
(ब) "सेरेब्रल पाल्सी" (cerebral
palsy) म्हणजे, मेंदूच्या एका किंवा विशिष्ट भागांना, सहसा जन्माच्या
वेळी किंवा नंतर लगेचच, इजा झाल्यामुळे शरीराच्या हालचाली आणि स्नायूंमध्ये समन्वय
साधण्यावर परिणाम करणारा, वाढत न जाणारा चेतासंस्थेच्या स्थितीचा समूह.
(क) "बुटकेपणा" (dwarfism) म्हणजे एक अशी वैद्यकीय किंवा जनुकीय स्थिती ज्यामध्ये प्रौढ
व्यक्तीची उंची ४ फूट १० इंच (१४७ सेंटिमीटर) किंवा त्याहून कमी असते;
(ड) "मस्क्युलर डिस्ट्रॉफी (muscular
dystrophy-स्नायूंमध्ये दोष)" म्हणजे अनुवंशिक जनुकीय स्नायू विकारांचा
समूह ज्यामुळे मानवी शरीराच्या हालचालीसाठी आवश्यक असलेले स्नायू कमकुवत होतात. असे
अनेक दोष असलेल्या व्यक्तींच्या जनुकांबाबत माहिती चुकीची आणि गहाळ झालेली असते, ज्यामुळे
निरोगी स्नायूंसाठी आवश्यक असलेली प्रथिने त्यांच्या शरीरात तयार होत नाहीत. हाडे व
स्नायूचा कमकुवतपणा वाढत जाणे, स्नायूंच्या प्रथिनांमध्ये दोष आणि स्नायूंच्या पेशी
व उती मृत होणे ही याची वैशिष्ट्ये आहेत;
(इ) "अॅसिड हल्ल्याचे पिडीत" (acid attack victims) म्हणजे अॅसिड किंवा तत्सम क्षरणकारी पदार्थ फेकून हिंसक हल्ला झाल्यामुळे विद्रुप झालेली व्यक्ती.
२. दृष्टी दोष—
(अ) "अंधत्व" (blindness) म्हणजे पूर्ण उपचार केल्यानंतरही एखाद्या व्यक्तीची खालीलपैकी
कोणतीही स्थिती असणे—
(i) अजिबात न दिसणे; किंवा
(ii) सर्व संभाव्य उपचार केल्यानंतरही चांगल्या डोळ्यामध्ये,
३/६० पेक्षा कमी किंवा १०/२०० (स्नेलेन) पेक्षा कमी दृश्यमान सूक्ष्मता (व्हिज्युअल
अॅक्युईटी); किंवा
(iii) १० अंशांहून कमी कोनातील दृष्टीच्या क्षेत्राची मर्यादा.
(ब) "कमी दिसणे" (low-vision) म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची खालीलपैकी कोणती
स्थिती असते:—
(i) सर्व संभाव्य दुरुस्ती केल्यानंतरही चांगल्या डोळ्यामध्ये,
६/१८ च्या पुढे न जाणारी किंवा २०/६० पेक्षा कमी ३/६० पर्यंत किंवा १०/२०० (स्नेलेन)
पर्यंत कमी दृश्यमान सूक्ष्मता (visual acuity); किंवा
(ii) ४० अंशांहून कमी किंवा १० अंशापर्यंत कोनातील दृष्टीच्या
क्षेत्राची मर्यादा.
३. श्रवण दोष—
(अ) "बहिरा” (deaf) म्हणजे बोलण्याच्या
वारंवारितेसाठी दोन्ही कानांना ७०डीबी श्रवण बाधा झालेल्या व्यक्ती;
(ब) "अंशतः बधीर” (hard of hearing) म्हणजे
बोलण्याच्या वारंवारितांमध्ये दोन्ही कानांना ६० ते ७० डीबी श्रवण बाधा झालेल्या व्यक्ती;
४. वाचा आणि भाषा अक्षमता (speech and language disability) म्हणजे लॅरिन्जेक्टॉमी (स्वरयंत्र काढून टाकणे) किंवा अफशिया (वाचा शक्ती नष्ट
होणे) यांसारख्या जैविक किंवा चेतासंस्थेच्या स्थितींमुळे वाचा व भाषेच्या एक किंवा
अधिक घटकांवर परिणाम होऊन निर्माण झालेली कायमस्वरूपी दिव्यांगता.
५. बौद्धिक अक्षमता (Intellectual disability) म्हणजे एक अशी स्थिती ज्यामध्ये बौद्धिक कार्यात्मकता (तर्क
करणे, शिकणे, समस्या सोडवणे) आणि अनुकूल वर्तन या दोन्हींवर ठळक मर्यादा येते ज्यामध्ये
अनेक दैनंदिन, सामाजिक आणि व्यावहारिक कौशल्ये असतात, यामध्ये समावेश होतो—
(अ) "विशिष्ट शैक्षणिक अक्षमता" (specific learning disabilities) म्हणजे स्थितींचा एक विषम समूह ज्यामध्ये बोललेल्या किंवा लिखित भाषेवर प्रक्रिया करण्यात त्रुटी असते, जे समजून घेणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, शब्दलेखन करणे किंवा गणितीय गणना करण्यातील अडचणीतून व्यक्त होते आणि यामध्ये संकल्पनात्मक अक्षमता, वाचन अक्षमता (डिस्लेक्सिया), लेखनदोष (डिसग्राफिया), आकडेमोड करता न येणे (डिसकॅल्क्युलिया), असूत्रता दोष (डिस्प्रॅक्सिया) आणि विकासात्मक वाचाघात (अफॅसिया) यांसारख्या स्थितींचा समावेश होतो;
(ब) "ऑटिझम स्पेक्ट्रम विकार" (autism
spectrum disorder) म्हणजे एक अशी चेता-विकास स्थिती जी सहसा वयाच्या पहिल्या
तीन वर्षांमध्येच दिसून येते. याचा व्यक्तीच्या इतरांशी संवाद साधणे, नाती समजावून
घेणे आणि इतरांशी संबंध जोडणे यावर परिणाम होतो आणि अनेकदा असामान्य किंवा साचेबंद
क्रिया किंवा वर्तनाशी संबंधित असते.
६. मानसिक वर्तन,— "मानसिक आजार" (mental illness) म्हणजे विचार करणे, मनःस्थिती, दृष्टीकोन, अभिमुखता किंवा स्मरणशक्तीतील बिघाड ज्यामुळे अंदाज बांधणे, वर्तणूक, वास्तविकता ओळखण्याची क्षमता किंवा जीवनातील सामान्य मागण्या पूर्ण करण्याची क्षमता कमी होते, परंतु यामध्ये मंदन समाविष्ट होत नाही जी व्यक्तीच्या खुंटलेल्या किंवा अपूर्ण मानसिक विकासाची स्थिती असून याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बुद्धिमत्तेचा विकास खुंटणे हे आहे.
बी. पुढील गोष्टींमुळे येणारे अपंगत्व -
(अ) चेतासंस्थेच्या दिर्घकालीन अवस्था, (chronic neurological conditions) जसे की—
(i) "मल्टिपल स्क्लेरोसिस" (multiple
sclerosis) म्हणजे एक दाहक, चेतासंस्थेचा विकार ज्यामध्ये मेंदू आणि मेरूदंडाभोवतीच्या
चेतापेशीच्या तंतूंचे संरक्षण करणाऱ्या मायलेन शीथला नुकसान पोहोचून डेमिलेनेशन होते
व मेंदू आणि मेरूदंडातील चेतापेशींच्या परस्परांशी संवाद साधण्याच्या क्षमतेवर परिणाम
होतो;
(ii) "पार्किन्सनचा आजार" (Parkinson’s disease) म्हणजे चेतासंस्थेचा एक वाढत जाणारा आजार ज्याची लक्षणे म्हणजे कंप, स्नायू कडकपणा आणि संथ, अस्थिर हालचाल ही असतात. प्रामुख्याने मध्यम वयाच्या आणि वृद्ध लोकांवर याचा परिणाम होतो. मेंदूच्या तळाशी असलेल्या गंडिकेचा ऱ्हास (बेसल गॅन्ग्लियाचा ऱ्हास) आणि चेतापारेषक (न्युरोट्रान्समीटर) डोपामाईनच्या कमतरतेमुळे ही स्थिती निर्माण होते.
(७) रक्त विकार—
(i) "हिमोफिलिया" (hemophilia) म्हणजे एक अनुवंशिक आजार, हा सहसा केवळ पुरुषांनाच होतो, परंतु
स्त्रियांद्वारे त्यांच्या मुलग्यांना होऊ शकतो. यामध्ये रक्ताची गुठळी होण्याची क्षमता
गमावली जाते किंवा बाधीत होते त्यामुळे किरकोळ जखमेतूनही प्राणघातक रक्तस्त्राव होऊ
शकतो;
(ii) "थॅलेसेमिया" (thalassemia) म्हणजे अनुवंशिक विकारांचा एक समूह ज्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते किंवा
अजिबात नसते.
(iii) "सिकल सेल डिसीज" (sickle
cell disease) म्हणजे एक हिमोलायटिक (hemolytic) विकार ज्यामध्ये संबंधित उती (tissue) आणि इंद्रियांना (organ) नुकसान पोहोचल्याने जुनाट रक्ताल्पता (अॅनिमिया), वेदनादायक घटना आणि विविध गुंतागुंती
निर्माण होतात; "हिमोलायटिक" म्हणजे लाल रक्तपेशींच्या अस्तराचा ऱ्हास होऊन
हिमोग्लोबिन मुक्त होणे.
सी. एकाधिक दिव्यांगता (Multiple Disabilities) वर निर्दिष्ट दिव्यांगतांपैकी एकापेक्षा जास्त दिव्यांगता असणे. यामध्ये व्यक्तीला श्रवण आणि दृष्टी बाधा दोन्ही असते त्यामुळे तीव्र संवाद, विकास आणि शैक्षणिक समस्या उद्भवतात.
डी. केंद्र शासनाने सूचित केलेली इतर कोणतीही श्रेणी.
Ü "बेंचमार्क अक्षमता असलेल्या व्यक्ती" (person with benchmark disability) चा अर्थ, चाळीस टक्क्यांहून जास्त दिव्यांगता असलेल्या व्यक्ती असा होतो.
Ü "दिव्यांग व्यक्ती" म्हणजे दीर्घकालीन शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा संवेदनाक्षम असणारी व्यक्ती असा होतो.
Ü "उच्च समर्थन
आवश्यकता असलेल्या अक्षम व्यक्ती " (person
with disability having high support needs) म्हणजे, कोणत्याही दिव्यांगांपैकी
कमीतकमी ४०% दिव्यांगत्व असलेली व्यक्ती, ज्याला आधाराची आवश्यकता आहे आणि
ज्याने सदर अधिनियमाच्या कलम ५८ (२)(अ)
अन्वये विहित अधिकार्याकडून प्रमाणपत्र धारण केले आहे.
Ü या अधिनियमाच्या कलम ७(२) अन्वये, दिव्यांग व्यक्तीबरोबर गैरवर्तन, हिंसा किंवा शोषण केले गेले आहे, किंवा केले जात आहे किंवा ते केले जाऊ शकते याबाबत कोणतीही व्यक्ती किंवा नोंदणीकृत संस्था, स्थानिक अधिकारिता असणार्या 'कार्यकारी दंडाधिकारी' यांना माहिती देऊ शकेल.
अशी माहिती प्राप्त होताच, संबंधित कार्यकारी दंडाधिकारी,
सदर घटनेला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आणि दिव्यांग व्यक्तीच्या
संरक्षणासाठी तात्काळ कारवाई करेल. त्यात खालील बाबींचा समावेश असू शकेल:-
(अ) पोलीस किंवा दिव्यांग व्यक्तींच्या
सुरक्षेचे किंवा पुनर्वसनासाठी काम करणार्या संस्थेस किंवा दोघांना, अशा पिडीत
दिव्यांग व्यक्तीस सोडवून आण्यासाठी आदेशीत करू शकेल.
(ब) दिव्यांग व्यक्तीची ईच्छा असल्यास, त्याला सुरक्षात्मक संरक्षण प्रदान करू शकेल.
(क) दिव्यांग व्यक्तीच्या देखरेखीची (provide maintenance) व्यवस्था करू शकेल.
बेंचमार्क अक्षमता असलेल्या, सहा ते अठरा वयोगटातील प्रत्येक
मुलाला, त्याच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत
त्याच्यासाठी योग्य वातावरण असलेल्या एखाद्या परिचित आणि
आवडीच्या शाळेत विनामूल्य शिक्षणाचा अधिकार असेल.
Ü या अधिनियमाच्या
कलम ८९ अन्वये, जी व्यक्ती या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींचे किंवा कोणत्याही
नियमाचे उल्लंघन करेल ती, प्रथम उल्लंघनासाठी रूपये दहा हजार पर्यंतच्या दंडासाठी
पात्र ठरेल आणि त्यानंतरच्या कोणत्याही भंगासाठी रूपये पन्नास हजार ते रुपये पाच लाख पेक्षा कमी
नाही इतक्या दंडासाठी पात्र ठरेल.
Ü या अधिनियमाच्या
कलम ९१ अन्वये, जी व्यक्ती बेंचमार्क अक्षमता असलेल्या व्यक्तींसाठी असलेल्या
सवलतींचा फायदा फसवणुक करून मिळवेल किंवा मिळविण्याचा प्रयत्न करेल ती व्यक्ती दोन वर्षापर्यंत कारावासाच्या आणि/किंवा रुपये
एक लाख रुपयापर्यंतच्या दंडास किंवा दोन्ही शिक्षांसाठी पात्र ठरेल.
Ü या अधिनियमाच्या
कलम ९२ अन्वये, जो कोणी-
(अ) एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, जाणूनबुजून, एखाद्या दिव्यांग
व्यक्तीला अपमानीत करेल किंवा भयभीत करेल;
(ब) एखाद्या दिव्यांग
व्यक्तीला अपमानीत करण्यासाठी त्यावर हल्ला करेल किंवा बळाचा वापर करेल किंवा
एखाद्या दिव्यांग स्त्रीबरोबर असभ्य वर्तन करेल;
(क) एखाद्या दिव्यांग व्यक्तीच्या अंगावर जाऊन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करेल किंवा अशा दिव्यांग व्यक्तीला जाणूनबुजून अन्न किंवा पाणी देण्याचे नाकारेल;
(ड) दिव्यांग मुलाच्या किंवा स्त्रीच्या इच्छेवर वर्चस्व मिळविण्यासाठी
त्यांचे लैंगिक शोषण करेल;
(ई) कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला स्वेच्छेने हानी पोहोचवेल,
नुकसान करेल किंवा त्याच्या विरूध्द कोणतेही सहायक उपकरण वापरेल;
(फ) अशा कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेचे आयोजन किंवा निर्देशन
करेल ज्यामुळे एखाद्या दिव्यांग स्त्रीचा
गर्भपात होईल किंवा तशी शक्यता निर्माण होईल; (गंभीर प्रकरणांमध्ये नोंदणीकृत वैद्यकीय
व्यवसायी आणि दिव्यांग स्त्रीच्या पालकांच्या संमतीने गर्भपात केला जाऊ शकतो)
अशा व्यक्तीस सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत कारावासाची आणि दंडाची शिक्षा होऊ
शकेल.
"ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मानसिक
मंदता आणि एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय ट्रस्ट
कायदा, १९९९"
(ब) "सेरेब्रल पाल्सी" (cerebral palsy) म्हणजे, मेंदूच्या एका किंवा विशिष्ट भागांना, सहसा
जन्माच्या वेळी किंवा नंतर लगेचच, इजा झाल्यामुळे शरीराच्या हालचाली आणि स्नायूंमध्ये
समन्वय साधण्यावर परिणाम करणारा, वाढत न जाणारा चेतासंस्थेच्या स्थितीचा समूह.
(क) मानसिक मंदता (Mental retardation) हा एक मानसिक आजार आहे ज्यात व्यक्तीची संज्ञानात्मक कार्यप्रणाली मोठ्या प्रमाणावर कमी होते आणि दोन किंवा जास्त अनुकूल वर्तनांमध्ये (adaptive behaviors) कमतरता होते. मानसिक मंदता ही विकासाशी संबंधित मानसिक स्थिती आहे.
(ड) एकाधिक दिव्यांगता (Multiple Disabilities) म्हणजे एकापेक्षा जास्त दिव्यांगता असणे. यामध्ये व्यक्तीला श्रवण आणि दृष्टी
बाधा दोन्ही असते त्यामुळे तीव्र संवाद, विकास आणि शैक्षणिक समस्या उद्भवतात.
स्थानिक पातळीवरील समितीमध्ये खालील सदस्य असतात.-
(अ) केंद्र किंवा राज्य
शासनाच्या नागरी सेवेमधील 'जिल्हा दंडाधिकारी' दर्जापेक्षा
कमी दर्जाचा नसलेला अधिकारी
(बी) दिव्यांग व्यक्तींच्या सुरक्षेचे किंवा पुनर्वसनासाठी
काम करणार्या नोंदणीकृत संस्थेचे प्रतिनिधी; आणि
(सी) 'दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६' अन्वये परिभाषित दिव्यांग व्यक्ती.
या स्थानिक पातळी समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्यांत
कमीतकमी एकदा किंवा आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल.
यासाठी दिव्यांग व्यक्तीच्या आई किंवा वडीलांनी किंवा पालकांनी किंवा तिच्या नातेवाईकाने
किंवा दिव्यांग व्यक्तींच्या सुरक्षेचे किंवा पुनर्वसनासाठी काम करणार्या नोंदणीकृत
संस्थेने स्थानिक पातळीवरील समितीकडे 'दिव्यांग व्यक्तीचा पालक' (guardian of the persons with disability) म्हणून नियुक्तीसाठी "ऑटिझम, सेरेब्रल
पाल्सी, मानसिक मंदता आणि एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या
कल्याणासाठी राष्ट्रीय ट्रस्ट नियम, २०००, नियम १६(१) अन्वये फॉर्म-ए मध्ये अर्ज
करावा लागतो.
पालक म्हणून नियुक्ती झाल्यावर अशा पालकाने सहा महिन्याच्या आत, नियम २७(१) अन्वये फॉर्म-सी मध्ये दिव्यांग व्यक्तीच्या मालमत्तेबाबतचे विवरणपत्र सादर करावे लागते तसेच प्रत्येक आर्थिक वर्षाच्या समाप्तीच्या तीन महिन्यांच्या आत नियम २७(२) अन्वये फॉर्म-डी मध्ये दिव्यांग व्यक्तीच्या मालमत्तेचे हिशोब (account of the property and assets) सादर करावा लागतो.
bb
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मानसिक दृष्ट्या अक्षम व्यक्ती. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !