हक्कसोडपत्र
व
त्यानंतरची वारस नोंद
हक्कसोडपत्र (Relinquishment Deed) म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सहहिस्सेदाराने, त्याचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिस्स्याचा वैयक्तिक हक्क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याच्या किंवा सहदायकाच्या लाभात, स्वेच्छेने आणि कायम स्वरुपी सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्त.
एकत्र
कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार, त्याला फक्त
वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या
हिस्स्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र, त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री
अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात करु शकतो.
फक्त
वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या
हिस्स्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र करता येते.
= हक्कसोडपत्र
कोणाच्या लाभात करता येते ?
फक्त
त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या
लाभात हक्कसोडपत्र करता येते. त्या एकत्र कुटुंबाचे सदस्य किंवा सहहिस्सेदार
नसलेल्या व्यक्तीच्या लाभात झालेला दस्त हक्कसोडपत्र होत नाही. असा दस्त हस्तांतरणाचा
दस्त म्हणून गृहीत धरला जातो व मुंबई मुद्रांक कायदा १९५८ मधील तरतुदींन्वये
मूल्यांकनास व मुद्रांक शुल्कास पात्र ठरतो.
सर्वसाधारणपणे
हक्कसोडपत्र विनामोबदला केले जाते परंतु हक्कसोडपत्र
हे मोबदल्यासह असू शकते. मोबदल्यासह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र
कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात असल्याने त्यावर मुद्रांक
शुल्क आकारले जात नाही तथापि हक्कसोडपत्र नोंदणीकृत असते त्यामुळे ते नोंदणी
शुल्कास पात्र असते.
होय,
हक्कसोडपत्राचा समावेश, नोंदणी कायदा १९०८, कलम १७ अंतर्गत येत असल्यामुळे ते दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य आहे. हक्कसोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्यावश्यक
आहे अन्यथा त्याची नोंद गाव दप्तरी होणार
नाही तसेच तो न्यायालयात पुरावा म्हणुन ग्राह्य ठरणार नाही. हक्कसोडपत्रामुळे
हक्काचे हस्तांतरण होते त्यामुळे हस्तांतरणास
प्रतिबंध असलेल्या शर्तीवरील जमिनींबाबत हक्कसोडपत्र करतांना सक्षम अधिकार्याची परवानगी आवश्यक असते.
मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ कलम १२३ अन्वये असे दान/बक्षीस द्वारे झालेले
हस्तांतरण नोंदणी झालेल्या लेखाने करणे आवश्यक असते.
एकत्र
कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारा आणि तो हक्क ग्रहण करणारा यांना स्वतंत्रपणे
अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे, त्याच एकत्र कुटुंबातील
कोणाही एकाच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्राचा दस्त
करता येतो.
असा
दस्त रक्कम रु. २००/- च्या मुद्रांकपत्रावर (स्टँप पेपरवर) लेखी असावा. याकामी
जाणकार विधिज्ञाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.
P हक्कसोडपत्राचा
दस्त लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
P हक्कसोडपत्राचा
दस्त लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
P
एकत्र कुटुंबाची वंशावळ.
P
एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण.
P दोन
निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वाक्षरी.
P दस्ताचे
निष्पादन व नोंदणी.
P हक्कसोडपत्र,
स्वत:च्या हिस्स्याच्या सर्व किंवा काही मिळकतींबाबत करता येते. हक्कसोडपत्र
स्वत:च्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात करीत
आहे आणि स्वत:च्या हिस्स्याच्या कोणत्या मिळकतींबाबत हक्कसोडपत्र केलेले
नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोडपत्रात असावा. यामुळे भविष्यात
कायदेशीर अडचण येणार नाही.
= हक्कसोडपत्राची
मुदत
हक्कसोडपत्र
कधीही करता येते,
त्यास मुदतीचे बंधन नाही. हक्कसोडपत्रासाठी ७/१२ अथवा मिळकत पत्रीकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्याची आवश्यकता
नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिध्द करण्याइतपत पुरावा
असावा.
हक्कसोडपत्र करणारी व्यक्ती अल्पवयीन नसावी, ती मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि मालमत्तेची
विल्हेवाट लावण्याबाबत तर्कशुद्ध निर्णय घेण्यास आणि करार करण्यास सक्षम असावी.
नाही, एकदा हक्कसोडपत्राचा
नोदणीकृत दस्त केल्यानंतर ते रद्द करता
येत नाही. हक्क
सोडलेल्या मिळकतीत पुन्हा हक्क, हिस्सा मागण्याबाबत कोणतीही कायदेशीर तरतुद
नाही.
तथापि, हक्कसोडपत्र करणार्याने,
•
जर त्याची फसवणूक
करून हक्कसोडपत्र करून घेतले गेले.
•
त्याला हक्कसोडपत्र करण्यास
भाग
पाडले गेले.
•
हक्कसोडपत्राच्या दस्तऐवजात
त्याच्या हेतूचा चुकीचा अर्थ लावला गेला.
या बाबी पुराव्यासह सिध्द केल्या तर, न्यायालयात दाद
मागून हक्कसोडपत्र रद्द करता येईल.
मुदत कायद्याच्या तरतुदींनुसार, हक्कसोडपत्र निष्पादीत केल्याच्या दिनांकापासून तीन वर्षांच्या तो रद्द करण्यासाठी दावा दाखल करणे आवश्यक आहे.
हक्कसोडपत्र |
बक्षीसपत्र |
हक्कसोडपत्र
त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभातच करता येते. त्रयस्त व्यक्तीच्या लाभात करता येत नाही.= |
बक्षीसपत्र करतांना लाभार्थी हा कायदेशीर वारस आहे किंवा नाही
हे पाहण्याची आवश्यकता नसते. बक्षीसपत्र कोणाच्याही त्रयस्त व्यक्तीच्या लाभात
करता येते. |
हक्कसोडपत्र करतांना सर्वसाधारणपणे मोबदला घेता येतो किंवा घेण्यात
येत नाही. |
बक्षीसपत्र करतांना मोबदला घेतला जात नाही. |
दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य
आहे. |
दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य
आहे |
हक्कसोडपत्र नोंदणीवर नगण्य
मुद्रांक शुल्क आकारले जाते. |
बक्षीसपत्र नोंदणीवर हक्कसोडपत्र नोंदणीपेक्षा
जास्त मुद्रांक शुल्क आकारले जाते. |
सामान्यत: हक्कसोडपत्राचा
नोदणीकृत दस्त केल्यानंतर ते रद्द
करता येत नाही. |
सामान्यत: बक्षीसपत्राचा नोदणीकृत
दस्त केल्यानंतर ते रद्द करता येत नाही. |
व्यक्तीबद्दल नैसर्गिक प्रेम आणि आपुलकी हाच एकमेव विचार हक्कसोडपत्र करतांना केला जातो. |
मालमत्तेतील मालकी हक्कांचे ऐच्छिक हस्तांतरण केले जाते. |
हक्कसोडपत्राची
कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी हक्कसोडपत्राचा दस्त हा नोंदणीकृत असल्याची
खात्री करावी.
अनोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंद करु नये. हक्कसोडपत्राची नोंद करतांना संबंधिताने
स्वत:च्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात
हक्कसोडपत्र केले आहे आणि स्वत:च्या हिस्स्याच्या कोणत्या मिळकतींबाबत हक्कसोडपत्र
केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख फेरफार नोंदीत करावा. यामुळे भविष्यात
कायदेशीर अडचण येणार नाही. हक्कसोडपत्र नोंदणीकृत असले
तरच गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद करावी. सर्व हितसंबंधीतांना
नोटीस बजवावी. अनोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंद करणे अवैध आहे.
एखाद्या मिळकतीवरील हक्क सोडणे म्हणजे त्या मिळकती
संबंधातील स्वत:चे आणि भविष्यात जे हक्क सोडणार्या व्यक्तीचे वारस ठरतील त्यांचेही
त्या मिळकतीवरील हक्क संपुष्टात आणणे. त्यामुळे
एखाद्या मिळकतीवरील त्याचा हक्क एखाद्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांने सोडला असेल आणि हक्क सोडलेला असा सदस्य मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांची नावे पुन्हा, त्याने हक्क सोडलेल्या
मिळकतीवर दाखल करणे योग्य होणार नाही.
उदाहरण १: मयत शंकररावांच्या नावावर गावात स्वकष्टार्जित एकच शेतजमीन होती. ते मयत झाल्यानंतर
त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच दोन मुली- अलका आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली.
काही दिवसानंतर अलका व सुलोचना यांनी भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले.
कालांतराने पार्वती मयत झाली. आता वारस नोंद करतांना पार्वतीचे वारस म्हणून
राजेंद्र, विजय आणि अनिल यांची नावे दाखल करावीत आणि अलका
आणि सुलोचना या दोन वारसांनी दिनांक ... /.../.... रोजी, राजेंद्र, विजय आणि अनिल या भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले आहे त्याची
नोंद फेरफार क्रमांक ....... अन्वये नोंदविलेली आहे असे नमूद करावे.
उदाहरण २: मयत शंकररावांच्या नावावर गावात स्वकष्टार्जित तीन शेतजमिनी, एक घर आणि एक फार्महाऊस होते. ते मयत झाल्यानंतर त्यांच्या उपरोक्त पाच मिळकतींना त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच दोन मुली- अलका आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली. काही दिवसानंतर अलका व सुलोचना यांनी भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले. या हक्कसोड पत्राची नोंद करतांना, अलका व सुलोचना यांनी उपरोक्त कोणकोणत्या मिळकतींवरील हक्क सोडला आहे याची सविस्तर नोंद घ्यावी. जरूर तर ज्या मिळकतींवरील हक्क सोडलेला नाही त्याबाबत स्पष्टपणे नमूद करावे. कालांतराने पार्वती मयत झाली. आता वारस नोंद करतांना पार्वतीचे वारस म्हणून राजेंद्र, विजय आणि अनिल यांची नावे दाखल करावीत आणि अलका आणि सुलोचना या दोन वारसांनी दिनांक ... /.../.... रोजी, राजेंद्र, विजय आणि अनिल या भावांच्या हक्कात ....., ......, या मिळकतींवरील हक्कसोडपत्र करुन दिले आहे, त्याची नोंद फेरफार क्रमांक ......., दिनांक ... /.../.... अन्वये नोंदविलेली आहे. परंतु ....., या मिळकतीबाबत अलका आणि सुलोचना त्यांनी हक्कसोडपत्र करुन दिलेले नाही. त्यामुळे हक्कसोडपत्र करुन न दिलेल्या ......... या मिळकतीवर राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच अलका आणि सुलोचना यांचे नाव पर्वतीचे वारस म्हणून दाखल केले आहे असे नमूद करावे.
उदाहरण ३: मयत सोपानरावांच्या नावावर गावात एकच स्वकष्टार्जित शेतजमीन होती. ते मयत झाल्यानंतर त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी शेवंता, दोन मुले- राजेश आणि सुनिल यांची नावे दाखल झाली. काही दिवसानंतर राजेशने त्याची आई आणि भाऊ यांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले. कालांतराने राजेश मयत झाला. आता वारस नोंद करतांना मयत सोपानरावांच्या मिळकतीवर राजेशचे नाव वारस म्हणुन दाखल होणार नाही कारण राजेशने त्याच्या हयातीतच सदर मिळकतीवरील हक्क सोडलेला आहे. शेवंता मयत झाल्यावर फक्त सुनिलचे नाव वारस म्हणुन दाखल होईल.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हक्कसोडपत्र व त्यानंतरची वारस नोंद. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !