सर्च रिपोर्ट किंवा टायटल रिपोर्ट
´ सर्च किंवा टायटल रिपोर्ट म्हणजे काय?: एखादी जमीन पूर्वी कोणाच्या मालकीची होती, आता कोणाच्या मालकीची आहे, जमिनीबाबत हक्कांचे हस्तांतरण कसे झाले, जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात काही वाद/दावे झाले होते काय?, अशा वाद/दाव्यांचा निकाल काय झाला, आज रोजी जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात काही वाद/दावे दाखल/प्रलंबीत आहे काय? जमीनीवर काही कर्ज घेतले आहे काय? जमीन गहाण ठेवली आहे काय? इत्यादी बाबींची पुराव्यांसह माहिती संकलीत करणे म्हणजे सर्च किंवा टायटल रिपोर्ट.
´ आवश्यकता: आपण विकत घेत असलेली जमीन निर्वेध असावी, भविष्यात त्याबाबत काही त्रास किंवा वाद निर्माण होऊ नये म्हणून सर्च किंवा टायटल रिपोर्टची आवश्यकता असते.
´ सर्च किंवा टायटल रिपोर्ट कोणी बनवावा?: सामान्यतः ज्या ठिकाणी जमीन स्थित आहे त्या ठिकाणी स्थाईक असलेल्या वकिलांकडून सर्च किंवा टायटल रिपोर्ट बनवून घ्यावा. एकतर वकील असल्यामुळे त्यांना कायद्याचे ज्ञान असते आणि स्थानिक असल्यामुळे ओळखी असतात परिस्थिती माहीत असते.
· संबंधीत मालमत्ता ज्या
दुय्यम निबंधकाच्या कार्यक्षेत्रात आहे त्यांच्याकडे समक्ष जाऊन मालमत्तेच्या
शिर्षकाबाबत चौकशी केली जाते. आवश्यक त्या कागदपत्रांच्या नकला घेतल्या जातात.
· संबंधीत मालमत्ता ज्या तलाठ्यांच्या
कार्यक्षेत्रात आहे त्यांच्याकडे समक्ष जाऊन
मालमत्तेच्या संदर्भातील ७-१२ उतारे,
फेरफार नोंदी तसेच मिळकत पत्रिका इत्यादीबाबत चौकशी केली जाते. आवश्यक त्या
कागदपत्रांच्या नकला घेतल्या जातात.
· संबंधीत मालमत्ता ज्या तहसिलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आहे तिथे जाऊन अभिलेखातील जुने ७-१२, फेरफार नोंदी, काही आदेश असल्यास ते तपासले जातात. आवश्यक त्या कागदपत्रांच्या नकला घेतल्या जातात.
· आवश्यकतेनुसार,
जुने/जाणते तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील, संबंधीत मालमत्तेच्या जवळ-पास
राहणार्या लोकांकडे चौकशी केली जाते.
· मिळकतीवर वित्तिय संस्थेचा
बोजा असल्यास संबंधीत वित्तिय संस्थेत चौकशी केली जाते.
· जरूर तर स्थानिक वर्तमानपत्रात
जाहीर नोटीस दिली जाते.
· संबंधीत मालमत्तेचे हस्तांतरण
कसे कसे होत गेले याबाबत माहिती प्राप्त केली जाते.
उक्त सर्व
माहिती गोळा केल्यानंतर तिची सोयीस्कर मांडणीकरून, अभिप्रायासह लेखी अहवाल तयार
केला जातो. याला सर्च किंवा टायटल रिपोर्ट म्हणतात.
असा लेखी
अहवाल/ सर्च किंवा टायटल रिपोर्ट
संबंधीत व्यक्तीला पुराव्यांसह सादर केला जातो.
=
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सर्च किंवा टायटल रिपोर्ट. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !