इकरार
‘इकरार'
या
शब्दाचा अर्थ 'संमती
देणे (Consent), असा
होतो. एखाद्या सहकारी संस्थेचा सभासद असलेला कोणीही खातेदार, स्वत:च्या जमिनीवर
एखाद्या सहकारी विकास संस्थेकडून किंवा सहकारी बँकेकडून,
शेतीच्या
विकासासाठी कर्ज घेतो तेव्हा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० मधील नमुना ʻलʼ
मध्ये त्याची संमती घेऊन, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० मधील नियम ४८(५)
अन्वये, अशा व्यवहाराची नोंद गाव नमुना ७-१२ च्या इतर हक्कात नोंदविण्यात
येते.
तथापि, भारतीय रिझर्व बँकेचे परिपत्रक क्र. आरबीआय/२०१८-१९/११८, दिनांक ७.२.२०१९ अन्वये रिझर्व बँकेने कृषी कर्जाबाबत सुधारीत योजना सुरू केली असून रक्कम रुपये एक लाख साठ हजार पर्यंतच्या कर्जासाठी जामीनाची (Security) आवश्यकता असणार नाही असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रक्कम रुपये एक लाख साठ हजार पर्यंतच्या कर्जाची नोंद सात-बाराच्या इतर हक्कात करण्याची आवश्यकता नाही.
gh
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला इकरार. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !