गायरान अतिक्रमण निष्कासित करण्यास तात्पुरती स्थगिती
गायरान अतिक्रमण निष्कासित करण्यास तात्पुरती स्थगिती
त्याविरूध्द मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे अंतरिम अर्ज क्रमांक २०१४८, २०१४९, २०१५४, २०१५९, २०१६१, २०१६२, २०१६३, २०१६५,
२०२०६, २०२६६, २०२७०, २०२८९ असे अनेक व्यक्ती आणि संघटनेतर्फे दाखल करण्यात आले
होते.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या उक्त निर्देशांच्या अनुषंगाने, मा. श्री. पी.पी. काकडे, सरकारी वकील, (रिट सेल), उच्च न्यायालय मुंबई यांनी, त्यांच्याकडील तातडीचे पत्र, दिनांक ८.१२.२०२२ अन्वये मा. अपर मुख्य सचिव, ग्रामीण विकास विभाग, मंत्रालय, मुंबई आणि मा. प्रधान सचिव, (महसूल विभाग) मंत्रालय, मुंबई यांना कळविले आहे की,
‘‘माननीय सरन्यायाधीश आणि मा.
न्यायमूर्ती श्री.
अभय आहुजा
यांच्यासमोर दिनांक १.१२.२०२२ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, माननीय न्यायालयाने राज्याला, गायरान जमिनीवरील कथित अतिक्रमणधारकांना, अशा जमिनींवर कब्जा करून राहण्याचा अधिकार सिध्द करण्यासाठी पुरेसा वेळ देणार्या
नोटीसचा
मसुदा
न्यायालयासमोर
ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढे, मा. न्यायालयाने कथित अतिक्रमणधारकांविरुद्ध निष्कासनाची कारवाई
न करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सबब, आपणास विनंती आहे की, वरील आदेश लवकरात लवकर सर्व जिल्हाधिकारी आणि इतर सक्षम अधिकाऱ्यांना कळवावेत.
माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि दिनांक १६.११.२०२२ च्या प्रतिज्ञापत्रात कथन केल्याप्रमाणे आपण सुधारित रोड मॅप तयार करण्याचे काम पुढे सुरू ठेवण्यास विनंती आहे.
hg
गायरान अतिक्रमण निष्कासित करण्यास तात्पुरती स्थगिती.
याबाबत महत्वाची माहिती. ✔️
नमस्कार मित्रांनो.आज आपण या व्हिडिओमध्ये "गायरान अतिक्रमण निष्कासित करण्यास तात्पुरती स्थगिती ." याविषयी सविस्तर माहिती घेऊ.
ईतर व्हिडीओ पाहण्यासाठी Mahsul Guru (महसूल गुरु) चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.....
Mahsul Guru Youtube Channelडॉ. संजय कुंडेटकर,
उपजिल्हाधिकारी
Comments