आचरण
आणि शिष्टाचार
Etiquette And Manners
असा गैरसमज आहे की, आचरण आणि शिष्टाचार या दोन्ही बाबी
एकच आहेत. खरंतर या दोन्ही बाबी भिन्न आहेत.
आचरण (Etiquette) सामाजिक नियमांचा एक संच आहे जो सकारात्मक मानवी
परस्परसंवादासाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करतो तर शिष्टाचार (Manners) ही अशी वागणूक आहे जी एखाद्या व्यक्तीची वृत्ती दर्शवते.
आचरण (Etiquette) म्हणजे समाजातील विनयशील वर्तनाची संहिता तर शिष्टाचार (Manners) म्हणजे वागण्याच्या अपेक्षित नियमांनुसार वागण्याची, बोलण्याची आणि जगण्याची पद्धत.
आचरण ही एक विशिष्ट
आचारसंहिता आहे, शिष्टाचाराचे तसे नाही.
आचरण म्हणजे समाजातील
विनम्र वर्तनाची संहिता तर शिष्टाचार म्हणजे वागण्याच्या,
बोलण्याच्या अपेक्षित
पध्दतीनुसार जगण्याची पद्धत.
शिष्टाचार अधिक
सामान्यीकृत (generalized) आहेत,
आचरण हे विशिष्ट आचारसंहिता
ठरवून देतात.
व्यक्ती बालपणापासूनच
सूचना आणि सामाजिकीकरणाद्वारे शिष्टाचार शिकतो परंतु
आचरण विशेषत: शिकणे आवश्यक असते.
शिष्टाचार म्हणजे
सामान्य ज्ञान तर आचरणाचे नियम हे मार्गदर्शक संहिता
आहेत जे
आपल्याला शिष्टाचाराचा
सराव करण्यास
सक्षम करतात.
शिष्टाचार एखाद्या
व्यक्तीचा पाया
घालतात ज्याद्वारे
व्यक्ती आचरण शिकून
प्रगती करते.
¡ आचरण (Etiquette) म्हणजे काय?
आचरण म्हणजे समाजातील
विनयशील वर्तनाची
संहिता. आचरणाच्या विपरीत, शिष्टाचार ही
विशिष्ट वर्तनाची एक
संहिता आहे.
आचरण शिष्टाचारापेक्षा श्रेष्ठ मानले जाते.
कारण आचरण हे शिष्टाचाराच्या पलीकडे
जाऊन विचार करायला भाग पाडते.
तथापि, जर एखाद्या व्यक्तीला शिष्टाचार माहीत नसतील तर त्याच्याकडून योग्य आचरणाचीही अपेक्षा करता येत
नाही कारण चांगल्या
शिष्टाचाराच्या पायावरच
आचरण जोपासले जाते.
आचरण शिकण्यासाठी, एखाद्याने
जाणीवपूर्वक प्रयत्न
केले पाहिजेत.
उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट कार्यक्रमात वागण्याची पध्दत किंवा केव्हा कोणता काटा
किंवा चमचा वापरायचा हे समजून घेण्यासाठी, व्यक्तीला ते शिकावेच लागेल.
आचरण, व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीत
सामाजिकरित्या मान्यताप्राप्त आणि सुसंस्कृत रीतीने
वागण्याची तसेच
परिस्थितीशी संवेदनशील
राहून इतर
व्यक्तींशी वागण्याची
समज (understanding) देते.
¡ सामाजिक आचरण म्हणजे काय?
लोकांची नावे लक्षात ठेवणे.
शिंकल्यावर,
जांभाई दिल्यावर लगेच 'सॉरी’ (‘sorry’) किंवा 'माफ करा’ ('excuse me’) म्हणणे.
परिस्थितीनुरूप 'धन्यवाद’ (‘thank you’) आणि 'माफ करा’ ('sorry’) हे शब्द वापरणे.
गर्दीतून चालतांना 'माफ करा’ ('excuse me’) म्हणणे.
तुमच्या मागे
उभ्या असलेल्या एखाद्या वृध्द व्यक्ती किंवा महिलेसाठी दरवाजा धरून ठेवणे.
अभिवादन (Greet) करणे, अभिवादन करण्याची
संस्कृती उच्च
आचरण दर्शवते.
टेबल शिष्टाचार. (Table manners)
प्रवेश करण्यापूर्वी दरवाजा उघडण्यापूर्वी ठोठावणे (Knocking).
इतरांबद्दल आदर ठेवणे आणि विनम्रपणे (courteously) बोलणे.
इतरांशी बोलतांना आदरयुक्त भाषा (respectful
language) वापरणे.
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी (to
express gratitude) ‘कृपया’ (‘please’) आणि 'धन्यवाद’ (‘thank
you’) म्हणणे.
एखाद्याशी संभाषण करतांना मोठ्याने (loudly) बोलणे टाळणे.
योग्य कपडे घालणे: प्रत्येक कार्यक्रम आणि
ठिकाणाचा ड्रेस
कोड (dress
code) असतो. ऑफिसला
कामासाठी जातांना किंवा
एखाद्या कार्यक्रमाला जातांना योग्य पोशाख घालणे
हे दर्शविते
की आपण
तपशीलांकडे लक्ष
देता. उदाहरणार्थ, नोकरीच्या मुलाखतीला
जात असाल
तर औपचारिक
पोशाख (formal wear)
निवडा, पण लग्नाला जात
असाल तर
पारंपारिक (traditional) पोशाख घाला.
योग्य कपडे
तुम्हाला प्रेझेंटेबल
बनवतात आणि
सामाजिक अपेक्षा
पूर्ण करण्यात
मदत करतात.
वेळ पाळणे (Be On Time): सभ्य व्यक्ती नेहमी वेळेचे पालन करतात. वेळ पाळणे केवळ
तुमचा वक्तशीरपणाच नाही तर इतरांच्या वेळेचाही तुम्ही सन्मान करता हे ही
दर्शवते. जरूर तर काही मिनिटे लवकर जाण्याचे
मन मोकळे ठेवा
(Keep An Open Mind): जीवनात, आपल्याला वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील विविध
प्रकारचे लोक
भेटतात. आपले
म्हणणे किंवा
प्रस्ताव प्रत्येकजणशला
मान्य असेलच असे
नाही. मतभेदांमुळे संघर्ष निर्माण
होण्याची शक्यता
असते. लवचिकता
(Flexibility ) संघर्ष वाढण्यापासून
प्रतिबंध करते
आणि सकारात्मक
आणि विनम्र
वातावरण राखण्यात
मदत करते.
आवश्यकतेनुसार कृपया (please), धन्यवाद (thank you) माफ करा (excuse me) या शब्दांचा वापर करणे.
लोकांशी बोलतांना त्यांच्या डोळ्यात पाहून बोलणे.
चूक झाली असेल तर विना विलंब आणि मनापासून माफी मागणे.
चेहेर्यावर स्मित हास्य आणि विचारात सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे.
आपले बोलणे थोडक्यात संपवणे.
संबंधिताची परवानगी घेतल्याशिवाय त्यांच्या कोणत्याही वस्तुला हात न
लावणे.
प्राथमिक टेबल मॅनर्स जाणून घेणे.
दुसर्याचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकणे.
खातांना तोंड
बंद ठेवावे. (chewing with mouths closed)
चर्चा करतांना नकारात्मक टिपणी (Negative Remarks) न करणे.
कौतुक आणि कृतज्ञता दाखवणे: भेटायला आलेल्या व्यक्तीसाठी, "आपले स्वागत
आहे"
वगैरे शब्दांचा वापर
केल्याने इतरांना
आपले शिष्टाचार चांगले
आहेत हे
दिसून येते.
प्रत्येकजण कौतुक
आणि कृतज्ञतेच्या
प्रदर्शनाची प्रशंसा
करतो. कोणीही केलेल्या
चांगल्या कामाचे मनापासून कौतूक करा. कोणी काही भेट दिली असता मनापासून धन्यवाद
म्हणणे. आजच्या युगात व्हॉट्सअपवरच ‘थम्मसअप’ चा इमोजी पाठवून कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. परंतु तितके पुरेसे नसते. फोनवर किंवा प्रत्यक्ष
संपर्क साधून कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात जास्त आपलेपणा दिसून येतो हे
लक्षात ठेवावे.
रांगेत चालतांना किंवा वाहन
चालवताना आणि
इतर ठिकाणी
थांबताना इतरांशी
सौजन्य दाखवावे.
एखाद्याला
गरजू व्यक्तीला, वृध्द व्यक्ती किंवा महिलेला मदतीची आवश्यकता असल्यास
लगेचच योग्य ती मदत करणे.
समाजात एकत्र राहून सुसंवादाने जगण्यासाठी योग्य आचरण आणि
शिष्टाचार आवश्यक आहेत. सामाजिक जबाबदारीने कसे वागावे हे कळल्यावरच समाज प्रगती
करू शकतो.
योग्य आचरण आणि चांगले शिष्टाचार केवळ वैयक्तिक नाते-संबंधच
नाही तर व्यावसायिक संबंध सुध्दा विकसित आणि मजबूत करण्यास मदत करतात. जेव्हा
स्वतःला सर्वोत्तम पध्दतीने कसे सादर करायचे हे आपल्याला माहित असेल तेव्हाच
आपल्या सहकार्यांवर आणि जनतेवर आपण कायम स्वरूपी छाप सोडू शकतो.
इतरांशी आपण कसे वागावे अशी त्यांची अपेक्षा आहे हे समजल्यावर आपल्याला
अधिक आरामदायक वाटते. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो.
इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे आणि आदरपूर्वक प्रतिसाद द्यावा याची समज
इतरांशी प्रभावी संवादाला प्रोत्साहन देते.
इतरांच्या भावना विचारात घेणे आणि इतरांच्या परिस्थीतीत स्वतःला कसे ठेवावे
हे शिकल्यामुळे सहानुभूती वाढते. यातून सामाजिक-सांस्कृतिक नियमांशी परिचित
होण्यास आणि लोकांशी दयाळूपणे आणि आदराने वागण्यास मदत मिळते ज्यामुळे सामाजिक
संबंध मजबूत होतात.
hf
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला आचरण आणि शिष्टाचार (Etiquette And Manners). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !