आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

कुळ कायदा कलम ८४ क आणि ८४ कक मधील सुधारणा

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

कुळ कायदा कलम ८४ क आणि ८४ कक मधील सुधारणा 

शासन राजपत्र असाधारण क्रमांक २९,  महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०/२०१६,

दिनांक ७ मे २०१६ अन्‍वये, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५० आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन

(विदर्भ प्रदेश) अधिनियम १९५८ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता ‘‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन ( विदर्भ प्रदेश) (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१६’’ पारित करण्‍यात आला आहे. त्‍यान्‍वये,

(१) w महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ८४क मध्ये, पोट-कलम (५) नंतर, खालील प्रमाणे पोट-कलम (६) जादा दाखल करण्यात आले आहे.

w हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५०, कलम ९८क मध्ये, पोट-कलम (५) नंतर, खालील प्रमाणे पोट-कलम (६) जादा दाखल करण्यात आले आहे.

w महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन ( विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८, कलम १२२ मध्ये, पोट-कलम (५) नंतर, खालील प्रमाणे पोट-कलम (६) जादा दाखल करण्यात आले आहे. 

कलम ८४-क. (१) सुधारणा अघिनियम १९५५ च्या प्रारंभाच्या दिवशी किंवा त्यांनतर केलेल्या कोणत्याही जमिनीच्या हस्तांतरणाच्या किंवा संपादनाच्या बाबतीत, मामलेदार, स्वतः होऊन किंवा अशा जमिनीत हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या अर्जावरून, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदी अन्वये असे हस्तांतरण किंवा संपादन विधिअग्राहय (invalid) आहे किंवा ते विधिअग्राह्य ठरते असे सकारण वाटेल तेव्हा नोटीस देईल व चौकशी करील आणि असे हस्तांतरण किंवा संपादन विधिग्राह्य आहे किंवा नाही याबद्दल निर्णय वेईल.

 (२) मामलेदार अशी चौकशी केल्यांनतर असे हस्तांतरण किंवा संपादन विधिअग्राह्य आहे अशा निष्कर्षाप्रत आला तर तो असे हस्तांतरण किंवा संपादन विधिअग्राहय आहे असे घोषित करणारा आदेश देईल:

[परंतु, जमीन मालकाने, जमिनीच्या कुळाकडे जमिनीचे हस्तांतरण केले असेल आणि कूळ स्वतः जी कोणतीही इतर जमीन व्यक्तिशः कसत असेल त्या जमिनीचे क्षेत्रफळ धरून अशा रीतीने हस्तांतरित केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ हे जमीन धारणेच्या कमाल क्षेत्राहून अधिक होत नसेल, त्याबाबतीत –

Provided that, where the transfer of land was made by the landlord to the tenant of the land and area of the land so transferred together with the area of other land, if any, cultivated personally by the tenant did not exceed the ceiling area, the Mamlatdar shall not declare such transfer to be invalid.

 (एक) जर जमिनीची किंमत म्हणून जमीन मालकास मिळालेली रक्कम ही कलम ६३ अ अन्वये निर्धारित करण्यात आलेल्या वाजवी किंमती इतकी किंवा तिच्यापेक्षा कमी असेल आणि हस्तांतरितीने राज्य शासनाला मामलेदार निश्चित करील अशा तीन महिन्यांपेक्षा जास्त नसलेल्या कालावधीत एक रूपया शास्ती दिली असेल तर;

(i) if the amount received by the landlord as the price of the land is equal to or less than the reasonable price determined under section 63A and the transferee pays to the State Government a penalty of one rupee within such period not exceeding three months as the Mamlatdar may fix;

 (दोन) जर जमिनीची किंमत म्हणून जमीन मालकास मिळालेली रक्कम ही कलम ६३ - क अन्वये निर्धारित करण्यात आलेल्या वाजवी किंमतीपेक्षा जास्त असेल आणि हस्तांतरकाने व त्याचप्रमाणे हस्तांतरितीने राज्य शासनाला मामलेदार निर्धारित करील त्या कालावधीत प्रत्येकी वाजवी किंमतीच्या एक दशांश इतकी शास्ती दिली असे. तर, मामलेदार असे हस्तांतरण विधिअग्राहय आहे असे घोषित करणार नाही].

(ii) if the amount received by the landlord as the price of the land is in excess of the reasonable price determined under section 63A and the transferor as well as the transferee pays to the State Government each a penalty equal to one-tenth of the reasonable price within such period as the Mamlatdar may fix.

 (३) मामलेदारने पोट-कलम (२) अन्वये संपादन विधिअग्राहय आहे असे घोषित केल्यानंतर-

 (अ) अशी जमीन राज्य शासनाकडे ज्या तारखेस निहित होणार असेल त्या तारखेस तिच्यावर कायदेशीररीत्या आलेल्या बोजांपासून मुक्त होऊन ती राज्य शासनाकडे निहित झाली आहे असे मानण्यात येईल व तिची विल्हेवाट पोट-कलम (४) मध्ये तरतूद केलेल्या रीतीने करण्यात येईल.

जमिनीच्या खरेदीच्या किंमतीतून बोजांबद्दलच्या रकमा देण्याविषयी कलम ३२- क्यू मध्ये ज्या रीतीची तरतूद करण्यात आली असेल त्या रीतीने अशा बोजांबद्दलच्या रकमा भोगवटा मूल्याच्या रकमेतून देण्यात येतील; परंतु अशा बोजा धारकास आपल्या हक्काची कोणत्याही इतर रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी अशी रक्कम देण्यास दायी असलेल्या व्यक्तीविरूध्द कारवाई करण्याचा जो कोणताही हक्क असेल त्यास बाधा येणार नाही.

 (ब) हस्तांतरकास जमिनीची किंमत म्हणून जी कोणतीही रक्कम मिळाली असेल तिचे राज्य शासनाकडे समपहरण करण्यात आले आहे असे नानण्यात येईल आणि ती जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करता येईल आणि

 (क) मामलेदार, कलम ६३-अ च्या तरतुवीअनुसार अशा जमिनीची वाजवी किंमत निर्धारित करील.

 (४) वाजवी किंमत निर्धारित केल्यानंतर, मामलेदार, अशी जमीन नवीन व अविभाज्य भूधारणा पध्दतीने आणि पोट-कलम (३) अन्वये निर्धारित केलेल्या वाजवी किंमती इतके भोगवटा मूल्य दिल्यावर विहित रीतीने पुढील प्राथन्य क्रमानुसार देईल.

(एक) अशी जमीन प्रत्यक्ष कब्जात असलेले कूळ.

 (दोन) प्राथम्य यादीत दिलेल्या क्रमातील व्यक्ती किंवा निकाय

[परंतु. जमीन मालकाकडून त्या जमिनीच्या कुळाकडे जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले असेल आणि कूळ स्वतः कोणतीही इतर जमीन व्यक्तीशः कसत असेल तर त्या जमिनीचे क्षेत्रफळ धरून अशा रीतीने हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ हे, जमीन धारणेच्या कमाल क्षेत्राहून अधिक नसेल]

(एक) हस्तांतरकास जमिनीची किंमत म्हणून मिळालेली रक्कम वाजवी किंमती इतकी किंवा त्यापेक्षा कमी असेल तर, पोट-कलम (३) अन्वये समपहरण केलेली रक्कम हस्तांतरकास परत करण्यात येईल आणि प्रत्येक बाबतीत एक रूपया शास्ती भरल्यावर हस्तांतरितीस जमीन परत करण्यात येईल आणि (दोन) हस्तांतरकास जमिनीची किंमत म्हणून मिळालेली रक्कम वाजवी किंमतीपेक्षा अधिक असेल तर, वाजवी किंमतीच्या एक-दशांश इतके भोगवटामूल्य दिल्यावर मामलेदार ती जमीन नवीन व अविभाज्य भू-धारणा पध्दतीने हस्तांतरितीस देईल आणि पोट-कलम (३) अन्वये समपहरण केलेल्या रकमेतून वाजवी किंमतीच्या नऊ-दशांश (nine-tenths) इतकी रक्कम हस्तांतरकास परत करण्यात येईल.

 (५) पोट-कलम (४) अन्वये वसूल झालेली भोगवटामुल्याची रक्कम पूर्वोक्तप्रमाणे अशा जमिनीवर असलेल्या कोणत्याही बोजांबद्दल देणे असलेली रक्कम अशा रकमेतून देण्याच्या अधीनतेने राज्य शासनाकडे जमा करण्यात येईल.

 परंतु असे की, दानामुळे किंवा मृत्‍युपत्रित दानामुळे एखादी अत्यधिक जमीन संपादन करण्यात आली असेल त्याबाबतीत. पोट-कलम (४) खाली वसूल करण्यात आलेली भोगवटामुल्याची रक्कम ही, ती जमीन अशा संपादनामुळे ज्या अदात्याच्या किंवा उत्तरग्राहीच्या ताब्यात गेली असेल त्याला त्या जमिनीवर असणार्‍या कोणत्याही बोजांबद्दल देणे असलेली रक्कम या रकमेतून चुकती करण्याच्या अधीन राहून देण्यात येईल.

Provided that where the acquisition of any excess land was on account of a gift or bequest, the amount of the occupancy price realised under sub-section (4) in respect of such land shall subject to the payment of any encumbrances subsisting thereon, be paid to the donee or legatee in whose possession the land had passed on account of such acquisition.

 l सुधारणा:

" (६) पोट-कलमे (१) ते (५) यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, -

 (एक) जर अशा जमिनीच्या हस्तांतरणाच्या किंवा संपादनाच्या बाबतीत पोट-कलम (१) खालील कार्यवाही उक्‍त सुधारणा अधिनियम, २०१६ च्‍या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी (दिनांक ७ मे २०१६) सुरू करण्यात आलेली असेल, परंतु, प्रारंभाच्या दिनांकास किंवा दिनांकाच्या पूर्वी पोट-कलम (२) अन्वये कोणताही आदेश काढण्यात आलेला नसेल; आणि

(i) the proceedings under sub-section (1), in respect of transfer or acquisition of such land are initiated after the date of commencement of the Maharashtra Tenancy and Agricultural Lands, the Hyderabad Tenancy and Agricultural Lands and the Maharashtra Tenancy and Agricultural Lands (Vidarbha Region) (Second Amendment) Act, 2016 (Mah. 20 of 2016) or had been initiated before the commencement date, but no order under sub-section (2) had been made on or before the commencement date; and

 (दोन) जर शेतकरी असलेल्या हस्तांतरितीने धारण केलेल्या, इतर जमिनीचे, कोणत्याही असल्यास, क्षेत्र धरून अशा जमिनीचे क्षेत्र हे, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या जमीन धारणेच्या कमाल क्षेत्राहून अधिक होत नसेल; आणि

(ii) the area of such land including other land, if any, held by the transferee, who is an agriculturist, is not in excess of the ceiling area permissible under the Maharashtra Agricultural Lands (Ceiling on Holdings) Act, 1961 and

 (तीन) जर अशी हस्तांतरित किंवा संपादित केलेली जमीन ही –

(iii) the land so transferred or acquired....

(अ) केवळ शेतीविषयक प्रयोजनांसाठीच वापरण्यात येत असेल, आणि हस्तांतरितीने (कूळ वगळून) वार्षिक दर विवरणपत्रानुसार, अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पन्नास टक्के एवढी रक्कम प्रदान केली असेल; किंवा

(a) is being used only for the agricultural purposes and the transferee (other than tenant) pays an amount equal to fifty per cent. of the market value of such lands as per the Annual Statement of Rates; or

 (ब) शेतीविषयक प्रयोजनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी वापरण्यात येत असेल हस्तांतरितीने वार्षिक दर विवरणपत्रानुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पंचाहत्तर टक्के एवढी रक्कम प्रदान केली असेल, -

 (b) is being put to use for any purpose other than agricultural purposes and the transferee pays an amount equal to seventy-five per cent. of the market value of such land as per the Annual Statement of Rates.

 तर, मामलेदार अशा कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा संपादन विधिअग्राह्य आहे, असे घोषित करणार नाही.

So, the Mamlatdar shall not declare the transfer or acquisition of any such land to be invalid.

~ ~ l~ ~

 ३. महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम १९४८ च्या कलम ८४कक मध्ये,

पोट-कलम (३) नंतर, खालील प्रमाणे पोट-कलम (४) जादा दाखल करण्यात आले आहे.

w हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५०, कलम ९८क-२ मध्ये, पोट-कलम (४) नंतर, खालील प्रमाणे पोट-कलम (४-अ) जादा दाखल करण्यात आले आहे.

w महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन ( विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८, कलम १२२ -अ मध्ये, पोट-कलम (३) नंतर, खालील प्रमाणे पोट-कलम (४) जादा दाखल करण्यात आले आहे. 

कलम ८४ कक.

(१) कलम ६३ अन्वये ज्या शर्तीच्या अधीनतेने जमिनीचे हस्तांतरण करण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करण्यात आले आहे असे जिल्हाधिकार्‍यांना स्वतः होऊन किंवा त्याबाबतीत त्‍यांच्याकडे केलेल्या अर्जावरून, सकारण वाटेल तर ते, एक नोटीस देतील आणि चौकशी करतील; आणि ज्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ असे हस्तांतरण करण्यात आले असेल त्या व्यक्तीस आपली बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर ते हस्तांतरणाच्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करण्यात आले आहे किंवा नाही याविषयी निर्णय देतील.

आणि असे उल्लंघन झाले आहे असे मानल्यावर अशा शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन अशा व्यक्तीच्या आवाक्याबाहेरील कारणामुळे घडून आलेली नाही असा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी दिला असेल तर, जिल्हाधिकारी आदेश देऊन असे हस्तांतरण विधिअग्राह्य आहे असे घोषित करतील.

(२) पोटकलम (१) अन्वये आदेश दिल्यावर अशा जमिनीचे समपहरण होऊन ती राज्य शासनाकडे हस्तांतरित होईल आणि तिचे आणखी हस्तांतरण न करता ती राज्य शासनाकडे निहित होईल.

 (३) जिल्हाधिकारी पोटकलम (२) अन्वये राज्य शासनाकडे निहित झालेल्या जमिनीची, ती कलम ३२ प पोटकलम (२) मध्ये दिलेल्या क्रमानुसार व्यक्तींना किंवा निकायांना देऊन किंवा राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाव्दारे निर्देश देतील अशा इतर रीतीने विल्हेवाट करतील.

उक्त जमीन राज्य शासनाकडे निहित झाल्याच्या तारखेस तीवर विधितः जे बोजे असतील त्या बोजांबद्दल देणे असलेल्या रकमा, जमिनींची विक्री केल्यावर तिच्या खरेदी किंमतीतून अशा रकमा देण्याविषयी कलम ३२-क्यू मध्ये ज्या रीतीची तरतूद करण्यात आली आहे त्या रीतीने, भोगवटामुल्यातून देण्यात येतील; परंतु, अशा बोजाधारकास आपल्या हक्काची कोणत्याही इतर रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी अशी रक्कम देण्यास दायी असलेल्या व्यक्तींविरुध्द कारवाई करण्याचा जो कोणताही हक्क असेल त्यास बाधा येणार नाही. 

पोट-कलम (३) नंतर, पुढील पोट- कलम जादा दाखल करण्यात येईल :-

" (४) पोट-कलमे (१) ते (३) यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जेथे हस्तांतरिती कलम ६३ च्या पोट-कलम (१) खालील आवश्यकतांची पूर्तता करीत असेल तेथे, -

कलम ६३(१): या अधिनियमात जी तरतूद केली असेल ती खेरीज करुन जी व्यक्ती शेतकरी नाही किंवा जी व्यक्ती शेतकरी असून तिच्या प्रित्यर्थ कोणत्याही जमिनीची विक्री करुन दिल्यानंतर, देणगी दिल्यानंतर, अदलाबदल केल्यानंतर किंवा कोणतीही जमीन तिला पट्ट्याने दिल्यानंतर किंवा तिच्याकडे गहाण ठेवल्यानंतर महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये निर्धारित करण्यात आलेल्या कमाल क्षेत्राच्या दोन तृतीयांशापेक्षा अधिक इतकी जमीन धारण करील  किंवा जी व्यक्ती शेतमजूर नाही अशा व्यक्तीच्या प्रित्यर्थ-

(अ) कोणत्याही जमिनीची किंवा तिच्यातील हितसंबंधाची कोणतीही विक्री (दिवाणी न्यायालयाचा हुकूमनामा अंमलात आणताना केलेली विक्री किंवा जमीन महसुलाची थकबाकी वसूल करण्यासाठी किंवा जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करण्याजोग्या रकमा वसूल करण्यासाठी केलेली विक्री धरुन) करणे, ती देणगी म्हणून देणे, तिची अदलाबदल करणे किंवा ती पट्ट्याने देणे हे विधिग्राह्य असणार नाही.

या पोट-कलमाच्या प्रयोजनासाठीशेतकरीया शब्दप्रयोगात, ज्या व्यक्तीची जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित केलेली असेल आणि अशा संपादनाच्या परिणामी ती, अशा संपादनाच्या दिनांकापासून भूमिहीन झालेली असेल अशी कोणतीही व्यक्ती आणि तिचे वारस, यांचा समावेश होईल.

१-अ ] ज्या शर्तीच्या अधीनतेने हस्तांतरण करण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करण्यात आले असेल त्या बाबतीत, ज्या जमिनीच्या संबंधात अशी परवानगी देण्यात आली होती ती जमीन, कलम ८४ कक च्या तरतुदीनुसार समपहरण केली जाण्यास पात्र होईल.

Transfers to non-agriculturists barred:

 (1) Save as provided in this Act....

(a) no sale (including sales in execution of a decree of a Civil Court or for recovery of arrears of land revenue or for sums recoverable as arrears of land revenue), gift, exchange or lease of any land or interest therein, or

 (b) no mortgage of any land or interest therein, in which the possession of the mortgaged property is delivered to the mortgagee, shall be valid in favour of a person who is not an agriculturist or who being an agriculturist will, after such sale, gift, exchange, lease or mortgage, hold land exceeding two-thirds of the ceiling area determined under the Maharashtra Agricultural Lands (Ceiling on Holdings) Act, 1961 or who is not an agricultural labourer.

Explanation: For the purpose of this sub-section, the expression “agriculturist” shall include any person and his heirs whose land has been acquired for a public purpose and who as a result of such acquisition has been rendered landless from the date of such acquisition.

 (1A) Where any condition subject to which permission to transfer was granted is contravened, then the land in respect of which such permission was granted shall be liable to be forfeited in accordance with the provisions of section 84CC.

 l सुधारणा:

(एक) जर कलम ८४ कक, पोट-कलम (१) खालील कार्यवाही ही महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१६ याच्या प्रारंभाच्या दिनांकानंतर (७ मे २०१६ नंतर) सुरू झाली असेल किंवा ती, प्रारंभाच्या दिनांकापूर्वी सुरू करण्यात आलेली

असेल, परंतु, कलम ६३ अन्वये ज्या शर्तींच्या अधीनतेने जमीन हस्तांतरण करण्याची परवानगी देण्यात आली होती अशा कोणत्याही शर्तींचा भंग केल्याबद्दल, अशा प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी उक्त पोट-कलम (१) अन्वये कोणताही आदेश काढण्यात आलेला नसेल; आणि

 (दोन) (अ) जर अशा प्रकारे हस्तांतरित केलेली जमीन ही केवळ शेतीविषयक प्रयोजनांसाठीच वापरण्यात येत असेल आणि हस्तांतरितीने (कूळ वगळून) वार्षिक दर विवरणपत्रानुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पन्नास टक्के एवढी रक्कम प्रदान केली असेल; किंवा

 (ब) जर अशी हस्तांतरित केलेली जमीन ही शेतीविषयक प्रयोजनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रयोजनांसाठी वापरण्यात येत असेल व हस्तांतरितीने वार्षिक दर विवरणपत्रानुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पंचाहत्तर टक्के एवढी रक्कम प्रदान केली असेल, -

तर, जिल्हाधिकारी अशा कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण विधिअग्राह्य आहे असे घोषित करणार नाहीत.

 Section 84CC (4): Notwithstanding anything contained in sub-sections (1) to (3), the transfer of land shall not be declared invalid by the Collector, where the transferee fulfils the requirements under sub-section (1) of section 63,

if, ––

(i) the proceedings under sub-section (1) are initiated after the date of commencement of the Maharashtra Tenancy and Agricultural Lands, the Hyderabad Tenancy and Agricultural Lands and the Maharashtra Tenancy and Agricultural Lands (Vidarbha Region) (Second Amendment) Act, 2016 (Max. 20 of 2016) or such proceedings had been initiated prior to the commencement date, but no order under the said sub-section (1) had been made on or before such commencement date, for breach of any conditions, subject to which permission to transfer such land was granted under section 63; and

 (ii) (a) the land so transferred is being used for agricultural purposes only and the transferee (other than tenant) pays an amount equal to fifty per cent. of the market value of such land as per the Annual Statement of Rates; or

 (b) the land so transferred is being put to use for any purpose other than agricultural purposes and the transferee pays an amount equal to seventy-five per cent. of the market value of such land as per the Annual Statement of Rates.

 

lœ

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कुळ कायदा कलम ८४ क आणि ८४ कक मधील सुधारणा. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.