आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

कुळकायदा विषयक प्रश्‍नोत्तरे" 1 to 25


· प्रश्‍न १: शेत जमिनीत वहिवाट करण्‍याच्‍या रीत कोणत्‍या होत्‍या?
F उत्तर: सन १९३२ ते १९७३ पर्यंत शेतजमिनीत वहिवाट करण्‍याच्‍या सहा रीत खालील प्रमाणे होत्या:
ñ रीत-:- शेतजमिनीत स्वत: वहिवाट करणे, याला 'खुद्द' जमीन कसणे असे म्‍हणत.
ñ रीत-:- शेतजमीन स्वत:च्या देखरेखीखाली मजुरांकडून कसुन घेणे.
ñ रीत-:- शेतजमीन खंडाने (रोख) कसावयास देणे व शेत जमीन कसल्‍याचा मोबदला म्‍हणून रोख रक्‍कम देणे.
ñ रीत-:- शेतजमीन कसल्‍याचा मोबदला म्‍हणून पिकातील वाटा खंड म्हणून घेणे. याला 'बराईने' जमीन कसणे म्‍हणत असत.
ñ रीत-:- शेतजमीन कसल्‍याचा मोबदला म्‍हणून पिकातील निश्‍चित वाटा घेणे याला 'अर्धेलीने' जमीन कसणे म्‍हणत.
ñ रीत-:- शेतजमीन कसल्‍याचा मोबदला म्‍हणून रोख रक्‍कम आणि पीक असा एकत्रित मोबदला घेणे.
ज्‍या प्रकारच्‍या रीतने जमीन कसली जात असे त्‍याचा उल्‍लेख जुन्‍या गाव नमुना बारा सदरी 'रीत' या स्‍तंभात केला जात असे. याचा उपयोग कुळ हक्‍क ठरविण्‍यासाठी होत असे. सध्‍या हा प्रकार अस्‍तित्‍वात नाही.

· प्रश्‍न २: शेतकरी म्हणजे कोण?  
F उत्तर: महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(२) अन्‍वये, शेतकरीची व्‍याख्‍या दिलेली आहे.
कोणत्‍याही व्‍यक्‍तीने शेतीची जमीन नोंदणीकृत कागदपत्रान्‍वये विकत घेतली असल्‍यास ती व्‍यक्‍ती शेतकरी आहे की नाही हे ठरविण्‍याचा अधिकार दिवाणी न्‍यायालयाला नसून तो योग्‍य त्‍या अधिकार्‍याचा आहे. (हौसाबाई पां. झवर वि. सुभाष श्री. पाटील, २००६(५), महा. लॉ जर्नल ७६५ ; २००६(६) ऑल महा. रिपो.(ए.ओ.सी.)    

· प्रश्‍न ३: शेतमजूर म्‍हणजे कोण?
F उत्तर: महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(१-अ) अन्‍वये, अशी व्‍यक्‍ती जी कोणत्‍याही प्रकारची स्‍वत:ची शेत जमीन धारण करत नाही आणि कसत नाही परंतु राहते घर धारण करते आणि तिचे एकूण ५०% उत्‍पन्‍न शेत मजुरीपासून मिळते त्‍याला शेतमजूर म्‍हणतात.

· प्रश्‍न ४: कुळ म्हणजे कोण?  
F उत्तर: महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम १८ अन्‍वये, पट्‍ट्‍याने जमीन धारण करणारी व्‍यक्‍ती, जिला,
ñ कलम ४ अन्‍वये कुळ मानले गेले आहे.
ñ कलम ४-अ अन्‍वये संरक्षीत कुळ मानले गेले आहे किंवा
ñ कलम २ (१०-अ) अन्‍वये कायम कुळ मानले गेले आहे.


· प्रश्‍न ५: कायदेशीर कुळ म्हणजे कोण?  
F उत्तर: कुळांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचे शोषण थांबविण्यासाठी मुंबई कुळ वहिवाट अधिनियम, १९३९ आणि मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ हे दोन महत्वाचे कायदे करण्यात आले. महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, (पूर्वीचा मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८) कलम ४ अन्‍वये कुळ म्‍हणून मानावयाच्‍या व्‍यक्‍तींची व्‍याख्‍या दिलेली आहे. त्‍याप्रमाणे: 
१. जो इसम दुसर्‍याच्या मालकीची जमीन वैध किंवा कायदेशीररित्या कुळ या नात्‍याने कसत असेल आणि
. जमीन मालक आणि अशा कुळात करार झाला असेल, तथापि, जर असा करार तोंडी असेल तर तो न्यायालयात सिध्द होण्‍यास पात्र असेल आणि
. असा कुळ जमीन प्रत्यक्षात स्वत: कसत असेल आणि
. जमीन कसण्याच्या बदल्यात असा कुळ, जमीन मालकास नियमितपणे खंड देत असेल आणि जमीन मालकाने तो खंड स्वीकारत असेल आणि
. अशी व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील नसेल आणि
. अशा व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसेल आणि  
. अशी व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसेल आणि
. अशी व्यक्ती जमीन मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्‍यक्ष  किंवा अप्रत्‍यक्ष देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर अशी व्‍यक्‍ती कायदेशीर कुळ आहे.

· प्रश्‍न ६: 'संरक्षित कुळ म्‍हणजे कोण?    
F उत्तर: महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, (पूर्वीचा मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८) कलम ४-अ अन्‍वये संरक्षित कुळची व्‍याख्‍या दिलेली आहे. त्‍याप्रमाणे: सन १९३९ च्या कुळ कायद्यानुसार, दिनांक ०१/०१/१९३८ पूर्वी सतत ६ वर्षे कुळ म्हणून जमीन कसणार्‍या व्यक्तीची किंवा दिनांक ०१/०१/१९४५ पूर्वी सतत ६ वर्षे कुळ म्हणून जमीन कसणार्‍या व्यक्तीची आणि दिनांक ०१/११/१९४७ रोजी कुळ म्हणून जमीन कसणार्‍या व्यक्तीला संरक्षित कुळम्‍हटले गेले आहे. अशा व्‍यक्‍तीची नोंद अधिकार अभिलेखातइतर हक्कसदरीसंरक्षित कुळम्हणून केली गेली आहे.


· प्रश्‍न ७: 'कायम कुळ म्‍हणजे कोण?    
F उत्तर: महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, (पूर्वीचा मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८) कलम २ (१०-अ) अन्‍वये 'कायम कुळ ची व्‍याख्‍या दिलेली आहे. त्‍याप्रमाणे: मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (सुधारणा) अधिनियम १९५५ अंमलात येण्याच्‍या निकटपूर्वी ज्या व्यक्तींना वहिवाटीमुळे, रुढीमुळे किंवा न्यायालयीन निकालामुळे कायम कुळ ठरविले गेले त्यांची तसेच जे मूळगेणीदार किंवा मिरासदार म्हणून जमीन धारण करीत होते आणि ज्‍यांच्‍या कुळवहिवाटीसा प्रारंभ किंवा अवधी तिच्‍या प्राचिनत्‍वामुळे समाधानकारक रीतीने सिध्‍द करता येत नसेल आणि ज्‍यांच्‍या पूर्वहक्‍काधिकार्‍याचे नाव कोणत्‍याही अधिकार अभिलेखात किंवा सार्वजनिक अभिलेखात उपरोक्‍त सन १९५५ चा अधिनियम अंमलात येण्याच्‍या निकटपूर्वी कायम कुळ म्‍हणून दाखल होते, त्यांची नोंद अधिकार अभिलेखातइतर हक्कसदरीकायम कुळम्हणून केली गेली.

· प्रश्‍न ८: बेदखल कुळ म्‍हणजे कोण?    
F उत्तर: महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, २०११ च्‍या कलम १४ अन्‍वये कुळांच्‍या कसुरीमुळे कुळवहिवाट समाप्‍त करण्‍याची तरतूद आहे. कुळांचा कसूर म्‍हणजे:
अ) कोणत्‍याही महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्‍या त्‍या वर्षांच्‍या ३१ मे पूर्वी न भरणे.
ब) जमिनीची खराबी अथवा कायम स्‍वरुपी नुकसान होईल असे कृत्‍य जाणूनबुजून करणे.
क) जाणूनबुजून महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्‍या कलम २७ चे उल्‍लंघन करुन जमिनीची पोट विभागणी, पोटपट्‍टा किंवा अभिहस्‍तांतरण करणे.
ड) व्‍यक्‍तीश: जमीन न कसणे.
इ) जमिनीचा उपयोग शेती किंवा शेतीसंलग्‍न जोडधंद्‍यासाठी न करता इतर प्रयोजनांसाठी करणे.
उपरोक्‍त पध्‍दतीने कुळांनी कसूर केला असता जमीन मालकाने कुळास तीन महिन्‍यांची लेखी नोटीस दिली असल्‍यास कुळवहिवाट समाप्‍त करण्‍याची तरतूद आहे. अशा कुळास बेदखल कुळ म्‍हणतात.  

· प्रश्‍न ९: शेतजमिनीवर जमीन मालकाचा 'प्रत्‍यक्ष ताबा' आहे असे कायद्‍याने केव्‍हा मानले जाते?
F उत्तर: जर एखाद्‍या शेत जमिनीची वहिवाट-
अ. जमिनीचा मालक किंवा त्‍याचे कुटुंबीय करीत असतील किंवा
आ. कुळ कायद्‍यानुसार असलेले कुळ करीत असेल किंवा
इ. उपरोक्‍त व्‍यक्‍तीशिवाय अशी इतर व्‍यक्‍ती करीत असेल, जी कायदेशीर कागदोपत्री पुराव्‍याद्वारे स्‍वत:च्‍या वहिवाटीचे समर्थन करू शकेल तर अशा शेतजमिनीवर जमीन मालकाचा 'प्रत्‍यक्ष ताबा' आहे असे कायदा मानतो.    
अनाधिकाराने अथवा दंडेलशाहीने जमिनीचा कब्‍जा घेणार्‍या इसमाविरूध्‍द महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ५९ आणि कलम २४२ अन्‍वये कारवाई करता येते.


· प्रश्‍न १०: 'व्यक्ति: जमीन कसणे म्‍हणजे काय?
F उत्तर:  व्यक्ति: जमीन कसणेयाची व्‍याख्‍या महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(६) मध्ये दिलेली आहे. त्‍यानुसार: जी व्‍यक्‍ती ‘‘स्वत:साठी
(एक) स्वत:च्या मेहनतीने, अथवा
(दोन) स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या कष्टाने अथवा
(तीन) स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली, मजुरीने कामावर लावलेल्या मजुरांकडून, त्यांना पिकाच्या हिश्श्याच्या स्वरूपात मोबदला न देता रोख रक्कम अथवा वस्तूंच्या रूपात वेतन/मोबदला देऊन जमीन कसून घेते’’ त्‍याला व्यक्ति: जमीन कसणेअसे म्‍हणतात.
तथापि, विधवा, अज्ञान, शारीरिक किवा मानसिकदृष्‍या  अपंग आणि सशस्‍त्र दलात नोकरी करणारी व्‍यक्‍ती जरी नोकरामार्फत, मजुरामार्फत किंवा कुळामार्फत जमीन कसवून घेत असली तरी अशी व्‍यक्‍ती व्यक्ति: जमीन कसते असे मानण्‍यात येते.     
याचाच अर्थ अधिकृत अधिकाराशिवाय कोणालाही कोणाचीही जमीन वहिवाटता येत नाही.

· प्रश्‍न ११: कुळाने खरेदी करावयाच्‍या जमिनीची किंमत कशी ठरविली जाते?
F उत्तर: जर एखादी व्‍यक्‍ती कायदेशीर कुळ आहे असे शेतजमीन न्‍यायाधिकरणाने जाहीर केल्‍यानंतर महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ३२-ग अन्‍वये कुळाने द्‍यावयाची जमिनींची किंमत ठरविण्‍यात येते.
कलम ३२-ह अन्‍वये अशा खरेदीची किमान किंमत व कमाल किंमत काय असावी याची तरतुद आहे. अशी किंमत कायम कुळ व संरक्षीत आणि साधे कुळ यांबाबत वेगवेगळी असु शकते.
æ कायम कुळांच्‍या बाबतीत:
१) शेतजमिनीच्‍या खंडाच्‍या सहापट रक्‍कम अधिक
२) कृषकदिनी येणे असलेल्‍या खंडाची रक्‍कम (असल्‍यास) अधिक
३) कुळाने न भरलेल्‍या परंतु जमीन मालकास भरावयास लागणार्‍या जमीन महसूल उपकराच्‍या रकमा अधिक
४) कृषकदिनापासून कलम ३२-ग अन्‍वये जमीन खरेदीची किंमत ठरविण्‍यात येण्‍याच्‍या दिनांकापर्यंतच्‍या कालावधीसाठी, खरेदी किंमतीवर द.सा.द.शे. ४.५% यादराने होणारे व्‍याज.
वरील सर्वांची बेरीज.
æ संरक्षित आणि साध्‍या कुळांच्‍या बाबतीत:
१) शेतजमिनीच्‍या आकारणीच्‍या वीस पटीहून कमी नाही आणि २०० पटीहून जास्‍त नाही अशी रक्‍कम अधिक
२) जमीन मालकाने बांधलेल्‍या वास्‍तू, विहिरी, बांधारे, लावलेली झाडे यांचे मूल्‍य अधिक
३) कुळाने न भरलेल्‍या परंतु जमीन मालकास भरावयास लागणार्‍या जमीन महसूल उपकराच्‍या रकमा अधिक
४) कृषकदिनापासून कलम ३२-ग अन्‍वये जमीन खरेदीची किंमत ठरविण्‍यात येण्‍याच्‍या दिनांकापर्यंतच्‍या कालावधीसाठी, खरेदी किंमतीवर द.सा.द.शे. ४.५% यादराने होणारे व्‍याज.
वरील सर्वांची बेरीज.
कुळाने जर जमीन मालकास जमिनीच्‍या भरपाईपोटी काही रक्‍कम दिली असल्‍यास अशी रक्‍कम तसेच त्‍या जमिनीत जर काही झाडे असतील आणि जमीन मालकाने त्‍या झाडांचे काही उत्‍पन्‍न घेतले असेल तर ती रक्‍कम खरेदी किंमतीतून वजा करण्‍यात येईल.   

 
· प्रश्‍न १२: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ३२ ते ३२-र बाबतची माहिती थोडक्‍यात सांगा.
F उत्तर: æ कलम-३२: यात दिनांक १/४/१९५७ हा कृषकदिन ठरविण्‍यात आला आहे. या दिनांकास जर कुळाने कायदेशीर कुळ म्‍हणून जमीन धारण केली असेल तर त्‍या कुळाने ती जमीन सर्व बोजांपासून मुक्‍त अशी आपल्‍या जमीन मालकाकडून खरेदी केली आहे असे मानण्‍यात येईल.
æ कलम-३२-अ: कुळाने कमाल क्षेत्रापर्यंत जमीन खरेदी केली आहे असे मानण्‍यात येईल. कमाल क्षेत्रापेक्षा जास्‍त जमीन कुळाला खरेदी करता येणार नाही.
æ कलम-३२-ब: कुळाने अंशत: मालक आणि अंशत: कुळ म्‍हणून जमीन धारण केली असेल आणि त्‍याने अंशत: मालक म्‍हणून जमीन धारण केलेल्‍या जमिनीचे क्षेत्र कमाल धारण क्षेत्राइतके किंवा त्‍याहून जास्‍त असेल तर कुळाने जमीन खरेदी केली आहे असे मानण्‍यात येणार नाही.
æ कलम-३२-क: जेव्‍हा कुळाकडे एकापेक्षा अधिक जमीन मालकांकडील जमिनी स्‍वतंत्रपणे कसण्‍यासाठी ताब्‍यात असतील तेव्‍हा कुळाला प्रत्‍येक जमीन मालकाकडून खरेदी करावयाचे क्षेत्र व ठिकाण पसंत करण्‍याचा अधिकार असेल.
æ कलम-३२-ड: कुळाच्‍या ताब्‍यात कुळ म्‍हणून असणारी एखादी जमीन मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्‍यास प्रतिबंध व त्‍यांचे एकत्रीकरण करण्‍याबाबत अधिनियम १९४७ अन्‍वये तुकडा असेल तरीही कुळाला तो तुकडा खरेदी करण्‍याचा अधिकार असेल.
æ कलम-३२-इ: कुळाने जमीन खरेदी केल्‍यानंतर शिल्‍लक राहिलेल्‍या जमिनींची विल्‍हेवाट कलम १५ अन्‍वये लावता येईल.
æ कलम-३२-फ: जर जमीन मालक अज्ञान, विधवा, सशस्‍त्र सैन्‍य दलात नोकरीस असेल किंवा शारीरिक अथवा मानसिकदृष्‍ट्‍या अपंग असेल तर अशा जमीन मालकास कलम ३१ मध्‍ये नमुद केलेल्‍या अवधीत कुळ वहिवाट समाप्‍त करण्‍याचा हक्‍क असतो. अज्ञान व्‍यक्‍ती सज्ञान झाल्‍यानंतर, विधवा स्‍त्रीचे हितसंबंध नष्‍ट झाल्‍यानंतर, सशस्‍त्र सैन्‍य दलातील नोकरी संपुष्‍टात आल्‍यानंतर किंवा शारीरिक अथवा मानसिकदृष्‍ट्‍या अपंग व्‍यक्‍ती बरा झाल्‍यानंतर एक वर्षाच्‍या काळात कुळाला आपला जमीन खरेदीचा हक्‍क बजावता येईल.
हा एक वर्षाचा काळ, वर नमूद घटना पूर्ण झाल्‍यापासून मोजण्‍यात येईल, कुळाला माहिती मिळाल्‍यापासून नाही. (अप्‍पा न. मगदुम वि. अकुबाई ग. निंबाळकर, ८९९३/१९९४- ए.सी. ए.आय.आर. १९९९)  
æ कलम-३२-ग: यानुसार शेतजमीन न्‍यायाधिकरणाने, कुळाने द्‍यावयाची जमिनींच्‍या खरेदीची किंमत ठरविण्‍यात येते.


æ कलम-३२-ह: यानुसार कुळाने खरेदी करावयाच्‍या जमिनीची किमान किंमत व कमाल किंमत ठरविली जाते.
æ कलम-३२-आय: यानुसार कायम कुळाने धारण केलेली जमीन जर पोटकुळाला पोट-पट्‍ट्‍याने दिली असेल तर अशा पोटकुळाने विहित मर्यादेपर्यंत कृषकदिनी जमीन खरेदी केली आहे असे मानण्‍यात येते. पोटकुळाने द्‍यावयाच्‍या खरेदीच्‍या किंमतीतून सहापट रक्‍कम जमीन मालकास व उर्वरीत रक्‍कम कायम कुळास द्‍यावी लागते.
æ कलम-३२-जे: वगळण्‍यात आले आहे.
æ कलम-३२-के: यानुसार खरेदीदार कुळाने जमीन खरेदीची रक्‍कम एक वर्ष कालावधीच्‍या आत एक रकमी किंवा द.सा.द.शे. ४.५% व्‍याजासह, बारापेक्षा जास्‍त नाही इतक्‍या वार्षिक हप्‍त्‍यांनी वसूल करण्‍याचा न्‍यायाधिकरणाला अधिकार आहे.
æ कलम-३२-ल: निरसित करण्‍यात आला.
æ कलम-३२-म: यानुसार कुळाने जमीन खरेदीची संपूर्ण रक्‍कम शासकीय तिजोरीत जमा केल्‍यानंतर कुळाला न्‍यायाधिकरणामार्फत जमीन खरेदीचे प्रमाणपत्र देण्‍यात येते. जर अशी रक्‍कम कुळाने जमा करण्‍यात कसूर केला आणि ती रक्‍कम जमीन महसूलाच्‍या थकबाकीप्रमाणे वसूल केली गेली तर खरेदी परिणामशून्‍य होईल.
æ कलम-३२-मम: यानुसार जर वर नमूद केल्‍यानुसार खरेदी परिणामशून्‍य झाली असेल परंतु जमीन खरेदीदार कुळाच्‍या कब्‍जात असेल तर सदर खरेदी रक्‍कम एक रकमी भरण्‍यासाठी न्‍यायाधिकरण चौकशीअंती कुळाला आणखी एक वर्षाचा अवधी देऊ शकेल.
æ कलम-३२-न: यानुसार खरेदी परिणामशून्‍य झाली असेल तर जमीन मालकाला कुळाकडून खंड वसूल करण्‍याचा अधिकार आहे.
æ कलम-३२-ओ: यानुसार जर कृषकदिनानंतर कुळवहिवाट निर्माण झाली असेल तर, कुळवहिवाट निर्माण झाल्‍यापासून एका वर्षाच्‍या आत कुळाने जमीन खरेदीसाठी न्‍यायाधिकरणाकडे अर्ज करण्‍याची तरतुद आहे.
æ कलम-३२- पी: यानुसार कुळाने जमीन खरेदीचा हक्‍क मुदतीत बजावला नसेल तर जमिनी परत घेण्‍याचा व त्‍यांची विल्‍हेवाट लावण्‍याचा हक्‍क न्‍यायाधिकरणाला आहे.
æ कलम-३२- क्‍यू: यानुसार कलम ३२-ग ची प्रक्रिया चालू असतांना न्‍यायाधिकरण जमिनीवर असलेल्‍या बोज्‍यांची निश्‍चिती करते.
æ कलम-३२- आर: यानुसार जमीन खरेदीदाराने, खरेदीनंतर अशी जमीन व्‍यक्‍तीश: कसण्‍यात कसूर केल्‍यास त्‍याला जमिनीतून काढून टाकून त्‍या जमिनीची विल्‍हेवाट लावण्‍याचा हक्‍क न्‍यायाधिकरणाला आहे.


· प्रश्‍न १३: काही ठिकाणी सात-बारा उतार्‍याच्‍या इतर हक्‍कात 'कु.का. ४३ च्‍या बंधनास पात्र' असा शेरा लिहिलेला असतो. त्‍याचा नेमका अर्थ काय?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ४३ अन्‍वये, कुळाने कलम ३२, ३२-फ, ३२-आय, ३२-ओ, ३३-क किंवा ४३-१-ड अन्‍वये खरेदी केलेली तसेच कलम ३२-प किंवा ६४ अन्‍वये विक्री केलेली जमीन जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या पूर्वपरवानगीशिवाय हस्‍तांतरित करता येणार नाही, गहाण, बक्षीस किंवा पट्‍ट्‍याने देता येत नाही.
तथापि, महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्‍ये या कलमात सुधारणा केली आहे. त्‍यान्‍वये, ज्‍या कुळांना, कुळ कायदा कलम ३२-म चे प्रमाणपत्र मिळून १० वर्षाचा कालावधी लोटला आहे अशा जमिनींची खरेदी/ विक्री/ देणगी/ अदलाबदल/ गहाण/ पट्टा/ अभिहस्तांतरण करण्यासाठी शासनाच्‍या परवानगीची आवश्यकता असणार नाही अशी तरतुद केली आहे. ज्‍याला कलम ३२-म चे प्रमाणपत्र मिळून १० वर्षाचा कालावधी लोटला आहे आणि त्‍याला सदर जमीन विकण्‍याची इच्‍छा आहे त्‍याने शेतजमीन विक्री करण्यापूर्वी, त्याचा शेतजमीन विक्रीचा इरादा तहसिल कार्यालयास लेखी कळवावा लागतो. असा अर्ज मिळाल्यानंतर दोन दिवसात तहसिल कार्यालय, त्‍या अर्जदारास, तो विक्री करणार असलेल्या शेतजमिनीची महसूल आकारणीच्या चाळीस पट नजराणा रकमेचे, लेखाशिर्ष नमुद असलेले चलन तयार करुन देते. ही चाळीस पट नजराणा रक्कम संबंधीत शेतकर्‍याने, चलनाव्दारे शासकीय कोषागारात जमा करावी. त्यानंतर तो विक्री व्यवहार करू शकतो.  
हे चलन आणि खरेदीची कागदपत्रे पाहून, तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद करायची असते. या चलनाशिवाय इतर कोणत्याही आदेशाची आता आवश्यकता असणार नाही.  
जर संबंधीत शेतकर्‍याला त्‍याच्‍या सात-बारावर असलेला 'कु.का.कलम ४३ च्या बंधनास पात्र' हा शेरा जरी रद्‍द करायचा असेल तरी वरील प्रमाणे चलन आणि अर्ज हजर केल्यास असा शेरा रद्द करता येतो.
परंतु महत्वाचे म्‍हणजे, ही तरतुद फक्त कुळ कायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र असलेल्‍या जमिनींनाच लागू असेल. वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील शासकीय जमीनी, कु.का.कलम ८४ क अन्वये वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील जमीनी, वतन/इनाम जमीनी, सिलींग कायद्याखाली वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील जमिनींना ही तरतुद लागू होणार नाही.
जर कुळ कायदा कलम ३२-म प्रमाणपत्राला १० वर्षाचा कालावधी लोटला नसेल तर सक्षम अधिकार्‍याकडून कुळ कायदा कलम ४३ अन्वये परवानगी घेणे बंधनकारक आहे.
कुळ कायदा कलम ४३ अन्वये परवानगी न घेता जमिनीचा विक्री व्‍यवहार करून ताबा दिल्‍यास असा ताबा अवैध असेल तसेच अशा जमिनीचा विक्री व्‍यवहार करतांना, कलम ४३ अन्वये परवानगी नसेल तर विक्रीची सर्व कागदपत्रे अवैध ठरतील. कोणतेही न्‍यायालय असा व्‍यवहार वैध ठरविण्‍यास असमर्थ असेल. (लोतन रामचंद्र शिंपी वि. शंकर ग. कश्‍यप- १९९५(१)- महा. लॉ जर्नल ८०: १९९४(४) बॉम्‍वे केसेस रिपोर्ट-५७५)  


· प्रश्‍न १४: एखाद्‍या जमीन मालकाने, थेट त्‍याच्‍याच कुळाला जमिनीची विक्री केली तर ते विधीग्राह्‍य ठरेल काय?
F उत्तर: नाही, कुळवहिवाट अधिनियम हा कुळांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करण्‍यासाठी, त्‍यांची पिळवणूक होऊ नये आणि त्‍यांना कोणी फसवू नये या उद्‍देशाने तयार करण्‍यात आला आहे. जमीनमालकाला, कुळ कसत असलेली जमीन, त्‍यालाच विकत देण्‍याची इच्‍छा असल्‍यास कलम ६४ अन्‍वये त्‍याची पध्‍दत विहित केलेली आहे. कुळवहिवाट अधिनियमाखालील कोणत्‍याही जमिनीची खरेदी किंवा विक्री शेत जमीन न्‍यायाधिकरणाच्‍या परवानगीशिवाय होऊ शकत नाही.

· प्रश्‍न १५: शेतजमीन मालकाव्यतिरिक्त अन्‍य व्‍यक्‍तीचे नाव वर्षभर वहिवाट सदरी लागले म्हणजे तो आपोआप कुळ बनतो हा समज योग्‍य आहे काय?  
F उत्तर: नाही, हा फार मोठा गैरसमज आहे. कुळ कायदा कलम ४ मध्‍ये 'कुळ म्‍हणून मानावयाच्‍या व्‍यक्‍ती' ची व्‍याख्‍या नमूद आहे.
कुळ कायदा कलम '३२ ओ' मध्‍ये कुळ कायदा कलम '३२ ओ' मध्‍ये 'जमीन मालकाने दिनांक ०१/०४/१९५७ नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कुळवहिवाटीच्याबाबतीत, जातीने जमीन कसणार्‍या कुळास अशी कुळवहिवाट सुरु झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आंत, त्याने धारण केलेली जमीन मालकांकडून खरेदी करण्याचा हक्क असतो.' असे नमुद असले तरीही कुळ कायदा कलम '३२ ओ' अन्वये कुळ जाहिर करणेसाठी खालील पात्रता अत्‍यावश्‍यक आहे. 
१) कुळकायद्याने कुळास दिलेला हक्क बजावण्याची ज्याची इच्छा असेल त्याने एक वर्षाच्या आंत, त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) विहीत रितीने कळविले पाहिजे.
२) अशा प्रकारे कळविल्यानंतर शेतजमीन न्यायाधिकरण (तहसिलदार) याप्रकरणी नोटीस बजावून चौकशी करतात. या चौकशीच्यावेळी खालील मुद्दे स्पष्टपणे/निसंदिग्धापणे सिध्द होणे अत्यावश्यक असते.
अ) अर्जदार कुळ आणि जमीन मालक यांच्‍यात 'कुळ व मालक' असे नाते सिध्द होत आहे काय?
ब) कुळ आणि मालक यांच्यात 'कुळ व मालक' नाते सिध्द करणारा आणि न्यायालयात निसंदिग्धपणे सिध्द होणारा करार झाला आहे काय?
क) कुळ मालकाला रोखीने खंड देत आहे काय?
ड) कुळ देत असलेला रोख खंड मालक स्वीकारत आहे काय आणि त्याबाबत पावती देत आहे काय?
वरील बाबी सिध्‍द झाल्‍या तरच वहिवाटदार कुळ ठरू शकतो.
जोपर्यंत जमीनमालक कुळाचा कायदेशीर कुळ म्‍हणून स्‍वीकार करत नाही किंवा ती व्‍यक्‍ती कुळ नाही हे विधान कायदेशीररीत्‍या फेटाळले जात नाही तो पर्यंत कुळाचा, कुळकायदा कलम ३१-ओ नुसार दिलेला एक वर्षाचा कालावधी सुरू होत नाही. (लक्ष्‍मण धोंडी झुरळे वि. यशोदाबाई, २००५(२)- ऑल महा. रिपो.-८१२)


· प्रश्‍न १६: एखाद्‍या जमीन मालकाने, कुळाव्यतिरिक्त अन्‍य व्यक्तीला शेतजमिनीची विक्री केली तर ते विधीग्राह्‍य ठरेल काय?
F उत्तर: नाही, कुळवहिवाट अधिनियम हा कुळांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या ताब्‍यात असलेली जमीन कोणी बेकायदेशीरपणे हिरावून घेऊ नये या उद्‍देशाने तयार करण्‍यात आला आहे. जमीनमालकाने, कुळ कसत असलेली जमीन, कुळाने खरेदी करण्‍यास नकार दिला तरीही कलम ६४ अन्‍वये त्‍याला शेतजमीन न्‍यायाधिकरणाच्‍या परवानगीशिवाय अन्‍य व्‍यक्‍तीला विकत देण्‍यास कायद्‍याने मनाई केली आहे. अशी विक्री बेकायदेशीर ठरून कलम ८४ क अन्वये कारवाई होणेसाठी पात्र ठरेल.

· प्रश्‍न १७: एखाद्‍या सहकारी संस्‍थेने अथवा सहकारी संस्‍थेमार्फत शेतजमिनीची खरेदी विधीग्राह्‍य ठरेल काय?
F उत्तर: होय, कुळवहिवाट अधिनियम, कलम ६४-अ अन्‍वये, सहकारी संस्‍थेस अथवा अशा सहकारी संस्‍थेमार्फत शेतजमिनीची खरेदी विधीग्राह्‍य ठरेल. अशा व्‍यवहारास कुळकायद्‍याची कलमे ६३ व ६४ लागू होणार नाहीत. तथापि, अशी सहकारी संस्‍थेची नोंदणी, खरेदी दिनांकाच्‍या आधी, मुंबई सहकारी संस्‍था अधिनियम, १९२५ अन्‍वये  झालेली असावी अन्‍यथा असा व्‍यवहार अवैध ठरून कुळ कायदा कलम ८४-क अन्‍वये कारवाईस पात्र ठरेल. (विनायक रत्‍नागिरी वि. राज्‍य, २०११(२), महा. लॉ जर्नल-७४०) 

· प्रश्‍न १८: नगरपालिका क्षेत्रात कुळवहिवाट अधिनियम लागू असतो काय?
F उत्तर: नाही, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ४३-क अन्‍वये बृहन्‍मुंबई, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९, मुंबई बरो नगरपालिका अधिनियम १९२५, मुंबई जिल्‍हा नगरपालिका अधिनियम १९०१ अन्‍वये स्‍थापित नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रे, कटक क्षेत्रे, मुंबई नगररचना अधिनियम १९५४ अन्‍वये नगररचना योजनेत समाविष्‍ट क्षेत्रे यांना महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील कलम ३१ ते ३२-र, ३३-अ,ब,क आणि ४३ च्‍या तरतुदी लागू होत नाहीत.


· प्रश्‍न १९: शेतकरी नसलेल्‍या व्‍यक्‍तीने महाराष्‍ट्र राज्‍यात शेतजमीन खरेदी करणे विधीग्राह्‍य ठरेल काय? 
F उत्तर: नाही, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३ अन्‍वये, शेतकरी नसलेल्‍या व्‍यक्‍तीला महाराष्‍ट्र राज्‍यात शेतजमीन खरेदी खरेदी करता येत नाही. असा व्‍यवहार बेकायदेशीर ठरून कलम ८४ क अन्वये कारवाई होणेसाठी पात्र ठरेल.
तथापि, ज्‍या व्‍यक्‍तीची शेतजमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्‍यात आली आहे, त्‍याने त्‍याबाबत पुरावा सादर केल्‍यास, त्‍याला शेतकरी मानण्‍यात येईल.

· प्रश्‍न २०: शेतकरी नसलेली व्‍यक्‍ती खर्‍याखुर्‍या औद्‍योगिक वापरासाठी जमीन खरेदी करू शकते काय?
F उत्तर: होय, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३-एक-अ अन्‍वये, खर्‍याखुर्‍या औद्‍योगिक वापरासाठी शेतकरी नसलेली व्‍यक्‍ती, प्रारूप किंवा अतिम प्रादेशिक विकास योजनेतंर्गत असलेल्‍या औद्‍योगिक किंवा शेतकी क्षेत्रामध्‍ये स्‍थित शेतजमीन, दहा हेक्‍टर मर्यादेस आधिन राहून खरेदी करू शकते. परंतु, खरेदीच्‍या दिनांकापासून पंधरा वर्षाच्‍या कालावधीत त्‍या जमिनीचा औद्‍योगिक वापर सुरु करणे बंधनकारक असेल अन्‍यथा ती जमीन, मूळ खरेदी किंमतीस परत घेण्‍याचा हक्‍क मूळ जमीन मालकास असेल.


· प्रश्‍न २: अल्‍पभूधारक शेतकरी म्‍हणजे कोण?
F उत्तर: जो शेतकरी मालक व/किंवा कुळ म्‍हणून एक हेक्‍टर पर्यंत (२.५ एकर) शेत जमीन वहिवाटतो त्‍याला अल्‍पभूधारक शेतकरी म्‍हणतात.

· प्रश्‍न २२: लहान शेतकरी म्‍हणजे कोण?
F उत्तर: जो शेतकरी मालक व/किंवा कुळ म्‍हणून एक हेक्‍टर (२.५ एकर) पेक्षा जास्‍त शेत जमीन वहिवाटतो त्‍याला लहान शेतकरी म्‍हणतात.

· प्रश्‍न २३: दूर्बल घटक म्‍हणजे कोण?
F उत्तर: दोन हेक्‍टरपेक्षा जास्‍त नाही अशी कोरडवाहू जमीन धारण करणारा (दुष्‍काळ प्रवण म्‍हणून जाहीर क्षेत्रात तीन हेक्‍टर) लहान शेतकरी आणि ज्‍याचे बिगर शेती वार्षिक उत्‍पन्‍न रु. १३,५००/- पेक्षा जास्‍त नाही त्‍याला दूर्बल घटक म्‍हणतात. 

 · प्रश्‍न २४: दारिद्र रेषेखालील व्‍यक्‍ती म्‍हणजे कोण?
F उत्तर: ज्‍याचे पैसा अथवा माल किंवा अंशत: पैसा आणि अंशत: माल अशा सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्‍पन्‍न ग्रामिण भागात रु. २०,०००/- पेक्षा आणि शहरी भागात रु. २५,२००/- पेक्षा जास्‍त नाही त्‍याला दारिद्र रेषेखालील व्‍यक्‍ती म्‍हणतात.

· प्रश्‍न २५: शेतकरी नसलेली एखादी व्‍यक्‍ती, सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगीने महाराष्‍ट्र राज्‍यात शेतजमीन खरेदी करू शकते? 
F उत्तर: होय, ज्‍या व्‍यक्‍तीचे वार्षिक उत्‍पन्‍न रु. बारा हजार पेक्षा जास्‍त नसेल अशा बिगर शेतकरी व्‍यक्‍तीला महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३(१)(ब) अन्‍वये शेतजमीन विकत घेण्‍याची परवानगी जिल्‍हाधिकारी देऊ शकतात.

Comments

  1. देवस्थान इनाम जमीनीला कुळ लागते का? १९५७ च्या अगोदर, प्रकरण विदर्भातील विनंती कळवावे

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. देवस्थान जमीनीला कूळ कायदा लागत नाही.

      Delete
    2. Q.12 sec 32 F , SC in 2019 overruled अप्‍पा न. मगदुम वि. अकुबाई ग. निंबाळकर, ८९९३/१९९४- ए.सी. ए.आय.आर. १९९९) .for protecting tenants.

      Delete
    3. नमस्कार माझा प्रश्न असा आहे की प्रांतने 1942 सालि एक साल लागवड पद्धतीने दिलेल्या जमिनीमध्ये वारसांची नोंद करण्याची पद्धत सांगा

      Delete
  2. नमस्कार सर,७/१२ वर कुळाचे अधिकार म्हणून माझ्या आजोबांचे नाव आहे व७/१२ देवस्थान चे नाव आहे तर सदर जमीन कुळाचे वारस म्हणून आम्हाला खरेदी करता येईल का? असल्यास कार्यपद्धती सांगा..

    ReplyDelete
  3. आदिवासींना इनामी जमिनी बाबत माहिती सांगा

    ReplyDelete
  4. कुळाचे दोन वर्षात(१९७२-७३) पैसे भरावेत असा आदेश झाला होता. पैसे न भरले मुळे व वहिवाट नसले मुळे कुळाचे नाव कमी झाले.जमीन मालकाच्या ताब्यात आहे. कुळाच्या नातवाला जमीन ४८ वर्षानंतर खरेदी करता येईल का ?

    ReplyDelete
  5. कुळाचे दोन वर्षात(१९७२-७३) पैसे भरावेत असा आदेश झाला होता. पैसे न भरले मुळे व वहिवाट नसले मुळे कुळाचे नाव कमी झाले.जमीन मालकाच्या ताब्यात आहे. कुळाच्या नातवाला जमीन ४८ वर्षानंतर खरेदी करता येईल का ?

    ReplyDelete
  6. 11 गुंठा पेक्षा कमी शेतजमीन क्षेत्र कोणत्या कोणत्या करणासाठी खरेदी करू शकतो?

    ReplyDelete
  7. देवस्थान चे नाव सातबारा वर आहे. कुळ म्हणून आजोबा चे नाव आहे. (1958) तर कुटुंब तील काका जमिन पेरते.तर कुळ म्हणून नाव असलेल्या व्यक्तीच्या सर्व मुलांना जमिन वाटप करता येईल का? एकच जण त्याचा फायदा घेत आहेत. कायदेशीर कारवाई करता येईल काय?

    ReplyDelete
  8. सर‌ पाटील मुलकी वतन जमीनीला कुळ लागु होते का?
    इनामी जमीन आहे

    ReplyDelete
    Replies
    1. @drdcsanjayk प्लीज सांगा 🙏🙏
      9049263642
      तुमचा mobile number सांगा मला भेटायचे आहे

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  9. भोगवटादार वर्ग १ च्या जमिनीला कुळाची नोंद होऊ शकते का...?

    ReplyDelete
  10. सतत दोन वर्षे पिकपाहणी सदरी खुदद पिकपाहणी दाखल असेल तर 30-35 वर्षापासून असलेले कुळाचे नाव कमी होते का ?

    ReplyDelete
  11. 84 क स पात्र जमीनाच व्यवहार झाला आहे दाद कोणाकडे मागावी

    ReplyDelete
  12. कुला चे सख्ये वारस कोणी नाही .कुल मृत्यु पत्राने आपले जुलत भाऊ ला कुलाची जमीन देऊ शकतो का ?

    ReplyDelete
  13. मालकीची सहा एकर जमीन आहै काही जमीनीत शेती लागवडीत होती आणी काही जमीन गवती होती ।
    तरी पुर्ण जमीन कुलात जाऊ शकते का ?

    ReplyDelete
  14. कुलाच्या लग्न झालेला नाही आणी त्याचे कोणी सख्ये नाते वाईक हयातीत नाही। असे कुलाचे मृत्यु नंतर त्याची कुलाची जमीनीच्या काय होणार ?

    ReplyDelete
  15. मातंग समाजाची सरमजम इनामी जमीन आहे कुळकायदा लागतो का

    ReplyDelete
  16. 84 क जमिनी मधील बांधकाम झाले आहे खरेदी केले तर काय अडचण येते

    ReplyDelete
  17. सर, माझ्या 7/12वर सरंक्षित कुळ लागले आहे. ते कुळाचे नाव कमी करण्यासाठी उपाययोजना काय आहे ?

    ReplyDelete
  18. माझे वडील संरसित कुळ आहेत परंतु मुळमालकाने स् कुळाचे नाव कमी करून जमीन विकरिकलि आहे तर ती मिऴवण्या साठि मला मिऴेलका?

    ReplyDelete
  19. Mala questions number 13 sandy_gore85@rediffmail.com la mail karu shakata .aani jar GR asel tari pls it's a request for you

    ReplyDelete
  20. तुकडे बिलात/बंदी मध्ये अधिकारी यांनी केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी कोणाकडे अर्ज दाखल करायचा आणि कसा?

    ReplyDelete
  21. मला वडीलांच्या 7/12,वर माझ्या नावाने बंगल्याची नोंद करायची आहे काय करावे लागेल

    ReplyDelete
    Replies
    1. ७/१२ वर तशी नोंद होणार नाही वडिलांच्या नंतर वारस तपास झाल्यावर नोंद वारसांचे ना हरकत पत्र घेऊन तशी नोंद होऊ शकते अन्यथा सदर मिळकत बक्षिसपत्राने अथवा खरेदी करुन ७/१२ वर फेरफार नोंद झाल्यावर बंगला नोंद करता येईल

      Delete
  22. कोषागार पैसे भरावयाचे चलन नमुना सुधारित 2019

    ReplyDelete
  23. सर रक्त नाते संबद्ध मधे कुळ लागते का असेल किवा नसेल तर संदर्भ कलम द्वारे सांगणे

    ReplyDelete
  24. Majhi jamin mudat kharedi dili hoti pan paise deu shaklo nahi pan Aata dean jamin milel ka

    ReplyDelete
  25. Sir 84 क स पात्र काय आहे
    Mail वर पाठवा
    Shaikh778677@gmail.com

    ReplyDelete
  26. mijaminicha malak asun, kul kaydyane jamin kulachya nave lagli aahe, parantu kul geli 30 varsha ti jamin kasat nasun, padik aahe. mi tya sambandhi kahi karyvahi karu shakto ka?

    ReplyDelete
  27. SIR Not a single person of the sanrakshit kul is live. All are died but their successors are using the land without name on 7/12. They give sugar cane to
    factory on their name. How can I remove their names from 7/12. On 7/12 it is clearly written as 'Hi Jamin 32 g mathun vagali aahe'. Sir please guide me. Please answer as early as possible. 13joshivinayak@gmail.com

    ReplyDelete
  28. Kulache nav 7/12 nodanicha aaraj koakade karaycha and tyacha format Kay ahe

    ReplyDelete
  29. After 1973 till today which were provisions and amendments regarding above topic

    ReplyDelete
  30. साधे कुळ म्हणजे काय?

    ReplyDelete
  31. Kul kayda nusar, kul juna cement patryacha ghar todun slap cha ghar bandhu sakto ka ???

    ReplyDelete
  32. देवस्थान ईनाम वर्ग 3 चा मिराशी हक्काचे खरेदीपत्र करता येते का ?
    पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान ईनाम वर्ग 3 चा मिराशी हक्क हस्तांतर करता येतो का जर करता येत असेल तर कायदेशीर तरतुदी काय आहेत जर कायदेशीर तरतूदी असतील तर माझ्या mail id ला पाठवा माझा mail id - shreekantpisal1@gmail.com

    ReplyDelete
  33. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  34. कुळाने वाजवीपेक्षा जास्त जमीन खरेदी केली असल्यामुळे खरेदी निरर्थक असा इतर हक्कात शेरा आलेला आहे, कुळाचाच आजपर्यंत ताबा आहे व शेतीची कामे चालू आहेत. मूळ मालकाच्या वारसांनी कुळाचे नाव इतर हक्कातून काढून टाकावे असा तहसीलदार कडे अर्ज दिला आहे. कुळास त्याचा बचाव कसा करता येईल.

    ReplyDelete
  35. सरजी माझ्या वडिलांच्या नावे सातबारा असून 38इ चे प्रमानपत्र आहे भोगवटदार 2 असून प्रतिबंधित सत्ता प्रकार असा शेरा आहे तर तो शेरा कमी कसा होईल

    ReplyDelete
  36. सन1918मधे आदिवासी जमीन बिगर आदिवासी ला खरेदी दिली आहे तरी ती जमीन परत मिळणार का

    ReplyDelete
  37. कुलकायद्याची जमीन विक्रीमध्ये जमिनीच्या मालकाला पैश्यामध्ये कायद्यानुसार हिस्सा मिळतो का ?

    ReplyDelete
  38. होय मिळतो तुमचं नाव मालकी हक्काची असेल आणि समोरच्या व्यक्तीला जर ते क्षेत्र विकायचे असेल तर तो तुमच्या सही शिवाय विकुच शकत नाही

    ReplyDelete
  39. सर आमच्या जमिनीवर समक्ष प्राधिकार्याच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी - कूळ कायद्याने प्राप्त जमीन तसेच इतर- ज. मा. विधवा कृषिदिन(3197) पुढे ढकलण्यात आला(3197) असे लिहिले आहे याचा काय अर्थ होतो. आणि ते काढता येते का प्लिज सांगा

    ReplyDelete
  40. माझ्या वडिलांच्या शेत जमिनी मध्ये चुलत भावांची नावे आहेत तर आम्हा भावांची वाटणी करताना चुलत भावांचा सुद्धा हिस्सा बसतो का किंवा कुल कायद्यानंतरंगात ती जमीन आपल्या नावावर करता येते का चुलत भावना हिस्सा न देता ?

    ReplyDelete
  41. बागायत व‍िक्री तहकूब असा शेरा 7/12 सदरी नमूद अाहे. मालक कूळालाच जम‍िन व‍िकू इच्छीत ेा.त्या बाबतची प्राेसीजर काय अ ाहे

    ReplyDelete
  42. If protected tenant name shows In other rights column but illegal deleted in 1958/1959
    But dairy shows always tenant cultivates
    Land is originally regarnted by landlords , if patilki watan abolition and after abolition of patilki watan tenant is continuing cultivation for 6 years
    Pl suggest me what is judgements
    Pl suggest me

    ReplyDelete
  43. कुळाच्या वारसाची नोंद इतर हक्कात घेणे बाबतची कार्यपध्दती

    ReplyDelete
  44. कुल मिळाले ले जमीणीचे मृत्यू पञ करता येते का?

    ReplyDelete
  45. जर एका व्यक्तीची वर्ग-२ ची जमीन शासनाने संपादीत केली असेल आणि त्याने त्याबाबत मोबदला स्वीकारला असेल आणि त्याने वाढीव नुकसान भरपाई मोबदल्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये निर्देशन अर्ज दाखल केला असेल तर त्याच्याकडून न्यायालयाने नजराणा किंवा तत्सम रक्कम भरुन घेतली पाहिजे काय किंवा त्याबाबत भूसंपादन अधिकारी यांना त्याबाबत पत्र्व्यवहार करावे का

    ReplyDelete
  46. सावकार म्हणजे जमिन मालक व संरक्षित कुळ ३२ ग किमंत ठरविण्यापुर्वीच एकत्रित पणे जमीन त्रयस्थाला विकु शकतात का?

    ReplyDelete
  47. जेव्हा Online सिसिस्टम नव्हती तेव्हा भोगधारकाने कुळाला जमीन विकली, तेव्हा मोडी लीपी होती आणि जमीन खरेदी केल्याची कागद पत्रे आमच्या कडे आहेत, परंतु भोगधारका चे नाव ७अ मध्ये Online दिसत आहे तर काय करावे.

    ReplyDelete
  48. कुळ कायदा लागू होण्या अगोदर संबंधित मालमत्ते ची कुठल्याही प्रकारची न्यायलिन प्रकरण चालू होते अश्या मालमत्ते ला कुळ कायदा लागू होते काय?

    कुळ कायदा लागू झाल्यानंतर नंतर न्यायलायाच्या निदर्शनात आले की सदरहू मिळकतीचा अगोदर दावा चालू होता त्या मुळे. कुळ रद्द करण्यात येते ही बाब खरी की खोटी?

    ReplyDelete
  49. कोणतीही मालमत्ते वर नेमणूक असलेले reciever हा मालक असू शकते का?

    ReplyDelete
  50. Daptar dirangai babat niyam

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel