आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

रस्‍ता प्रकरणे आणि मंडळ अधिकारी मार्फत पंचनामा

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

रस्‍ता प्रकरणे आणि मंडळ अधिकारी मार्फत पंचनामा 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्‍वये सरबांधावरून नवीन रस्ता मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केला जातो तसेच मामलतदार न्‍यायालय अधिनियम १९०६, कलम ५ अन्‍वये अस्तित्‍वात असलेला रस्‍ता अडवला असेल तर मामलतदार (तहसिलदार) समोर दावा दाखल केला जातो.

 अनेक प्रकरणात, उक्‍त दोन्‍ही तरतुदीन्‍वये दाखल प्रकरणात, तहसिलदार, मंडळ अधिकारी यांच्‍या मार्फत ‘स्‍थळ पहाणी पंचनामा’ करून घेतात. सदर बाब कायदेशीर आहे काय?

 वरील प्रश्‍नाच्‍या उत्तरासाठी उक्‍त कायद्‍यांच्‍या तरतुदी खालील प्रमाणे आहेत.

l मामलतदार न्‍यायालय अधिनियम १९०६, कलम १९ पोट-कलम (२) अन्‍वये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

w कलम १९(२): मामलेदारास, न्यायदानाच्या कामी मदत व्हावी म्हणून, योग्य ती नोटीस दिल्यानंतर ज्या व्यक्तीस समन्स काढून बोलावले नसेल किंवा हजर केले नसेल अशा कोणत्याही व्यक्तीस, पक्षकार हजर असताना समन्स काढून बोलावता किंवा त्याची साक्षीदार म्हणून तपासणी करता येईल आणि जो कोणताही दस्तऐवज कोणत्याही पक्षकाराने मागितलेला किंवा हजर केलेला नसेल तो, दस्तऐवज मागविता आणि सिद्ध करून दाखविण्यास सांगता येईल. आणि योग्य वाटल्यास, त्यास पक्षकाराच्या समक्ष किंवा त्यांना योग्य नोटीस देऊन, वादग्रस्त मालमत्तेची जातीने तपासणी करता येईल.

तो अशा तपासणीच्या वेळी दिसून आलेल्या संबद्ध मुद्यांचे टाचण, पक्षकार हजर असल्यास त्यांचे म्हणणे त्याच जागी ऐकून घेतल्यानंतर, अनावश्यक विलंब न लावता नमूद करील.

 ते टाचण त्या दाव्याच्या अभिलेखाचा भाग म्हणून समजण्यात येईल.

 w Section 19 (2): Power of Mamlatdar to examine other witnesses and inspect property in dispute.

The Mamlatdar may, after due notice to, and in the presence of, the parties summon and examine as a witness any person who has not been summoned or produced, and may call for and cause to be proved any document which has not been applied for or produced, by either of the parties, where he considers it expedient in the interest of justice so to do, and may,

if he thinks fit, make a personal inspection of the property in dispute in the presence of, or after due notice to, the parties.

He shall without unnecessary delay record a memorandum after hearing the parties on the spot, if present, of any relevant facts observed at such inspection. The memorandum shall form part of the record of the case.

 वरील तरतुदीत ‘जातीने तपासणी करता येईल’ ‘make a personal inspection of the property’ हे शब्‍द  स्‍पष्‍टपणे नमूद आहेत. त्‍यामुळे मंडळ अधिकार्‍यांकडून उक्‍त प्रकरणी ‘स्‍थळ पहाणी पंचनामा’ करता येणार नाही.

 l महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्‍वये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

कलम १४३. (१): एखाद्या भू-मापन क्रमांकात जमीन धारण करणाऱ्या व्यक्ती इतर भू-मापन क्रमांकाच्या सीमांवरून रस्त्याबाबतच्या हक्काची मागणी करीत असतील तर तहसीलदारास त्यांची चौकशी करता येईल आणि त्यांचा निर्णय करता येईल.

 (२) अशा मागण्यांचा निर्णय करताना शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी योग्य मार्गाची किती जरुरी आहे याकडे तहसीलदार लक्ष देईल.

 (३) या कलमान्वये तहसीलदाराने दिलेला निर्णय हा पोट-कलमे (४) आणि (५) यांच्या तरतुदींना अधीन राहून, या अधिनियमाच्या तरतुदींनुसार अपिलास किंवा फेरतपासणीस अधीन असेल.

 (४) या कलमान्वये तहसीलदाराने दिलेल्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला तो निर्णय रद्द केला जाण्यासाठी किंवा त्यात सुधारणा केली जाण्यासाठी अशा निर्णयाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत दिवाणी दावा दाखल करता येईल.

 (५) जेव्हा पोट-कलम (४) अन्वये तहसिलदाराच्या निर्णयाविरूद्ध दिवाणी दावा दाखल करण्यात आला असेल तेव्हा असा निर्णय अपिलास किंवा फेरतपासणीस अधीन असणार नाही.

 w Section 143 - Right of way over boundaries:

(1) The Tahsildar may inquire into and decide claims by persons holding land in a survey number to a right of way over the boundaries of other survey numbers.

(2) In deciding such claims, the Tahsildar shall have regard to the needs of cultivators for reasonable access to their fields.

 (3) The Tahsildar's decision under this section shall, subject to the provisions of sub-sections (4) and (5), be subject to appeal and revision in accordance with the provisions of this Code.

 (4) Any person who is aggrieved by a decision of the Tahsildar under this section may, within a period of one year from the date of such decision, institute a civil suit to have it set aside or modified.

 (5) Where a civil suit has been instituted under sub-section (4) against the Tahsildar's decision, such decision shall not be subject to appeal or revision.

 वरील तरतुदीत, कुठेही मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार यांच्यामार्फत पंचनामा करून घेण्याची किंवा उक्‍त कायद्‍यांन्‍वये तहसिलदारला असलेले अधिकार मंडल अधिकारी यांना प्रदान करण्याची तरतूद आढळून येत नाही.

त्‍यामुळे मंडळ अधिकार्‍यांकडून उक्‍त प्रकरणी ‘स्‍थळ पहाणी पंचनामा’ करता येणार नाही.

  ज्या ठिकाणी अधिनस्त अधिकाऱ्यांनामार्फत कार्यवाही करण्‍याची स्पष्ट तरतूद आहे त्याच ठिकाणी त्‍यांच्‍याकडून पंचनामे इत्‍यादी  कार्यवाही करून घेणे उचित ठरते.

उदाहरणार्थ वाटप दरखास्त प्रकरणात हिश्‍शांचा ताबा अधिनस्त अधिकाऱ्यांमार्फत देण्याची स्पष्ट तरतूद आहे.

  खरं तर, निवासी नायब तहसिलदार (Resident Nayab Tahsildar) हे पदच निवासी (Resident) असल्यामुळे त्यांनी, अत्यंत तातडीचे प्रसंग वगळता कार्यालयाच्‍या बाहेर जाऊन कोणतीही कार्यवाही करणे अपेक्षितच नाही. ज्‍याप्रमाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्‍हाधिकारी (Resident Deputy Collector -RDC) जिल्‍हाधिकारी कार्यालयात काम करतात त्‍याच प्रकारे निवासी नायब तहसिलदार यांनी तहसिलदार कार्यालयात काम करणे अपेक्षीत आहे. 

lœ

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला रस्‍ता प्रकरणे आणि मंडळ अधिकारी मार्फत पंचनामा. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.