उत्तर: 'भोगवटादार वर्ग-२' ही संकल्पना बरीच व्यापक आहे. वेगवेगळ्या कारणांनी "भोगवटादार वर्ग-२" हा शेरा दाखल केला जातो तसेच अशा जमिनींना हस्तांतरणासाठी पूर्वपरवानगी देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सक्षम प्राधिकारी नेमलेले आहेत. उदा- देवस्थान इनाम जमिनींचे अधिकार शासनास, नवीन शर्तीच्या (पूर्वाश्रमीच्या शासन जमिनी) चे अधिकार विभागीय आयुक्तांना, "इनाम वर्ग ६- ब" चे अधिकार जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी यांना आहेत, तर पाटील, कुलकर्णी यांसारख्या इनाम जमिनी, आहे त्याच न.अ.श. वर खरेदी द्यावयाच्या असतील तर त्यासाठी दि. ९ जुलै २००२ रोजीच्या शा.नि.नुसार पूर्वपरवनगीची गरज नाही. कुळकायदा, पुनर्वसन, सिलिंग इत्यादी जमिनींबाबत देखील सक्षम प्राधिकारी निश्चित करणेत आलेले आहेत. त्यामुळे अशा जमिनीच्या सर्व नोंदी, इनाम रजिस्टर, इत्यादी तपासल्याशिवाय कोणत्या टप्प्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे ते निश्चित करता येत नाही.
एखादी 'वर्ग २' च्या जमिनीचे मृत्युपत्र करता येईल, परंतु त्या जमिनीची विक्री करावयाची झाल्यास सक्षम अधिकार्याची परवानगी घ्यावी अशी अट नमुद करावी लागेल.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला भोगवटादार वर्ग-२ ही संकल्पना स्पष्ट करा.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !