जबाब
महसूल
खात्यात अनेक वेळा जबाब घ्यावा लागतो. जबाब घेतांना खालील गोष्टी
लक्षात ठेवाव्या.
१. ज्या कामासाठी जबाब घेतला जात आहे त्याबाबत जबाब देणार्यास पूर्व कल्पना द्यावी.
२. जबाब
हा जबाब देणारा हा स्वत: जबाब लिहीत
आहेत असे समजून तशा भाषेत जबाब लिहावा.
३. जबाबात
कधीही खाडाखोड करू नये. अनावधानाने खाडाखोड झाली तर, खाडाखोड झाली असेल त्या
ठिकाणी जबाब देणार्याने व जबाब घेणार्याने स्वाक्षरी करावी.
४. जबाब
एकाच रंगाच्या शाईने लिहावा. जबाब लिहितांना पेन/शाई बदलू
नये. पेन/शाई बदलणे अनिवार्य असल्यास पेन/शाई बदलण्याचे कारण जबाबात नमुद करावे.
५. जबाब सुवाच्य अक्षरातच लिहावा.
६. जबाब लिहून पूर्ण झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करु नये.
७. आधीच छापून/टंकलिखीत करून घेतलेल्या जबाबात शाईने रिकाम्या जागा भरू नयेत,
न्यायालयात असे जबाब ग्राह्य मानले जात नाहीत.
८. जबाब जर टंकलिखीत केला जात असेल तर जबाबाब तसे नमुद करावे.
९. जबाबावर
उजव्या बाजूला जबाब देणार्याची दिनांकित सही
घ्यावी.
१०. जबाबावर डाव्या बाजूला ज्याच्या समक्ष जबाब घेतला गेला
आहे त्या अधिकार्याने ‘समक्ष’
असे लिहून त्याखाली स्वत:ची
दिनांकित
स्वाक्षरी करावी आणि स्वत:चा शिक्का उमटवावा.
११. जबाब देणारी व्यक्ती अशिक्षीत/निरक्षर असल्याने स्वाक्षरी
म्हणून अंगठा उमवित असेल तर, त्याने स्वाक्षरी म्हणून उमटविलेल्या अंगठ्याखाली,
जबाब घेणार्या अधिकार्याने ‘सही निशाणी
अंगठा --- (जबाब देणार्याचे नाव) यांचा असे’ असे लिहून स्वत:ची सही करावी.
मी, खाली सही करणार, ----------- (नाव) वय-----, राहणार (पत्ता)------, मोबाईल
क्रमांक -----,
धंदा ----
आज दिनांक / /२०.. रोजी, -------( ठिकाण) येथे समक्ष हजर राहून किंवा ------- (ज्याने जबाबासाठी बोलविले आहे त्या अधिकार्याचे नाव) यांनी
बोलावले वरून समक्ष हजर राहून सत्यप्रतिज्ञेवर
जबाब देतो की,
----
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------
(ज्या कारणासाठी
जबाब घेतला जात आहे त्याचा सविस्तर तपशील
नमूद करावा)
सही/- सही/-
(ज्याच्या
समक्ष जबाब घेतला गेला आहे
जबाब देणार्याचे नाव आणि
दिनांकित
सही
त्या अधिकार्याची दिनांकित सही)
शिक्का (सील)
bb
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला जबाब. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !