प्रतिजैविक (Antibiotics)
प्रतिजैविक (Antibiotics) औषधांचा
शोध 1940 मध्ये लागला तेव्हा त्यांना ‘चमत्कारी औषधी द्रव्य’ (Wonder Drugs) अशी पदवी बहाल करण्यात आली होती. यांचे मुख्य काम रोगांच्या सूक्ष्म जंतूंमुळे (Bacteria) जे आजार
होतात त्यांचा सामना करणे हे होते.
परंतु
आज अवयवयुक्त परिपूर्ण जंतूंची (Microorganisms)
प्रतिकारक शक्ती (Immunity) वाढल्याने हे ‘चमत्कारी औषधी
द्रव्य’ त्यांचा सामना करण्यास निष्प्रभ ठरत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे प्रतिजैविक (Antibiotics) औषधांचा
अतिरेकी वापर हेच आहे. संशोधकांच्या मते अवयवयुक्त परिपूर्ण जंतूंची
(Microorganisms) प्रतिकारक शक्ती (Immunity) प्रतिजैविक (Antibiotics) औषधांच्या विरुद्ध झपाट्याने वाढत आहे.
W.H.O. च्या सल्ल्यानुसार या विरुद्ध आज जर काहीच योजना केली नाही तर
उद्या याचे निदान करता येणार नाही. W.H.O. च्या या सल्ल्यानुसार प्रतिजैविक
(Antibiotics) औषधांचा
अतिरेकी वापर टाळण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोठ्या योजना तयार करण्याचे प्रयत्न होत
आहेत. या योजनांनुसार दुय्यम दर्जाच्या (Junior) डॉक्टरांना प्रतिजैविक
(Antibiotics) औषधे रोग्याला सुचवतांना विभाग प्रमुखाची परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. काही वरिष्ठ डॉक्टरांच्या मते रोगाचे अचूक निदान न करता किंवा सुरक्षीततेच्या दृष्टीने (to be on the safer side) व कोणाचेही
नियंत्रण नसल्याने डॉक्टरांची प्रतिजैविक (Antibiotics) औषधे सुचवण्याची वृत्ती वाढत गेली व त्यातून हा अनर्थ ओढवला
आहे. ही औषधे सर्रासपणे लहान मुलांनाही देण्यात येतात.
ह्यामुळे जर एखादा रोगी गंभीररित्या आजारी असला तरी प्रतिजैविक (Antibiotics) औषधे त्यांचा परिणाम दाखवण्यास अकार्यक्षम
ठरतात. खरे तर काही रोग्यांना प्रतिजैविक (Antibiotics) औषधांचा
एक किंवा दोन डोस दणे गरजेचे असते, परंतु
‘कोर्स’ च्या नावाखाली डॉक्टरस् पाच/सात दिवस
ही औषधे घेणे भाग पाडतात. या ‘कोर्स’
चा पश्चात परिणाम काही वर्षांनी निश्चितच दिसून येतो. त्यामुळे फारच गरज असेल तेव्हाच आणि गरजेपुरतेच प्रतिजैविक (Antibiotics) औषधे
वापरण्याची खबरदारी घ्यावी.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला प्रतिजैविक (Antibiotics). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !