आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

तुकडेजोड – तुकडेबंदी कायद्‍यातील नवीन सुधारणेबाबत प्रक्रिया

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

तुकडेजोड – तुकडेबंदी कायद्‍यातील नवीन सुधारणेबाबत प्रक्रिया

 महाराष्‍ट्र शासन, महसूल व वन विभाग यांनी दिनांक ४.११.२०२५ रोजी, क्र. R&FD-31060(60)/13/ 2025 MRF (Desk- L1) (Comp. No. 1333447) अन्‍वये, महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यपध्दती खालीलप्रमाणे विहीत केली आहे.

 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम लागू असलेल्या क्षेत्रामध्ये त्या त्या वेळी स्थानिक क्षेत्राकरीता ठरवून दिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांच्या जमिनींची विविध हस्तांतरणे किंवा विभाजने करण्यात आलेली असून त्यामुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत.

अशी हस्तांतरणे किंवा विभाजने ही वरील अधिनियमाच्या तरतुदींविरुध्द करण्यात आलेली असल्याने त्यांच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेण्यात आलेल्या नाहीत किंवा घेतल्या असल्यास त्या इतर हक्कांमध्ये घेण्यात आलेल्या आहेत.

शासन अधिसूचना दिनांक ३ नोव्हेंबर, २०२५ रोजीच्या अध्यादेशान्वये उक्त अधिनियमाच्या तरतुदींविरूध्द झालेले सदरचे व्यवहार कोणतेही अधिमूल्य न आकारता, अशी हस्तांतरणे कोणतेही अधिमूल्‍य न स्‍वीकारता  मानीव नियमाधीनकरण करण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी अशा नोंदी अधिकार अभिलेखात नोंदविण्‍यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

 ¡ कार्यवाही:

१) दिनांक १५ नोव्हेंबर, १९६५ पासून दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत जे हस्तांतरण किंवा विभाजन  त्या त्या वेळी ठरवून दिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांचे झाले आहेत आणि अशा जमिनी  सध्या खालील क्षेत्रांत समाविष्‍ठ आहेत आणि अशा जमिनी कोणत्याही अकृषिक वापराकरिता वापरल्‍या जात असतील किंवा अकृषिक वापरण्याचे उद्देशित असेल तर, अशा जमिनीचे वरील प्रमाणे झालेले हस्तांतरण किंवा विभाजन कोणतेही अधिमूल्य न आकारता नियमाधीन करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल.

 (अ) महानगरपालिकांच्या, नगरपरिषदांच्या व नगर पंचायतींच्या हद्दीतील क्षेत्रातील जमिनी,

(ब) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ अन्वये स्थापन केलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ अन्वये स्थापन केलेल्या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये अधिसूचित केलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अधिकारक्षेत्रांतर्गत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापराकरिता नेमून दिलेल्या क्षेत्रांतील जमिनी,

 (क) छावणी अधिनियम, २००६ अन्वये छावणी घटित केलेली आहे त्या क्षेत्रातील जमिनी; किंवा

 (ड) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये, किंवा त्या त्या वेळी अंमलात

असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापराकरिता नेमून दिलेल्या क्षेत्रांतील आणि वृद्धी केंद्रांमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रांतील जमिनी,

 

(इ) प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापराकरिता नेमून दिलेल्या आणि ज्यास एकीकृत विकास नियंत्रण व प्रचालन विनियम लागू होतात अशा कोणत्याही गावाच्या, शहराच्या किंवा नगराच्या सीमांच्या परिघीय क्षेत्रातील' जमिनी.

दिनांक ३ नोव्हेंबर, २०२५ च्या अध्यादेशातील सुधारणांमुळे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या तरतुदींविरुध्द झालेल्या जमिनींच्या हस्तांतरणाचे मानीव नियमितीकरण करण्यात येत आहे जेणेकरुन अशा खरेदीदारांना त्यांनी खरेदी केलेल्या तुकड्यांचे अधिकार अभिलेखात मालकी हक्क प्राप्त होतील.

 ¡ नोंदणीकृत दस्तऐवजाने झालेले व्‍यवहार:

 प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांची झालेली हस्तांतरणे किंवा विभाजनांबाबतचे दस्तऐवज जर नोंदणीकृत दस्‍तऐवजाने झालेले असल्यास त्‍याबाबतच्या खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना आहेत:

 १) तुकड्याच्या नोंदणीकृत दस्तांच्या आधारावर झालेली फेरफार नोंद रद्द करण्यात आली असेल तर अशा प्रकारच्या फेरफार नोंदींचा शोध अधिकार अभिलेखातून घेऊन या नोंदी नोंदणीकृत दस्ताच्या आधारावरच झाल्याची खात्री करावी.

१.१) अशा फेरफार नोंदी पुनरुज्जीवित करण्यासाठी नव्याने फेरफार नोंद नोंदविण्‍यात यावी. अशी नोंद प्रमाणित करण्यापूर्वी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १४९- १५० मधील विहीत प्रक्रियेचा अवलंब करुन अशी नव्‍याने नोंदविलेली फेरफार नोंद सक्षम अधिकार्‍याने प्रमाणित करावी आणि गाव नमुना ७/१२ मध्ये कब्जेदार सदरी खरेदीदाराचे नाव दाखल करावे.

 ¡ इतर हक्‍कात नमूद नावांबाबत:

 तुकड्याच्या नोंदणीकृत दस्तांच्या आधारावर झालेली फेरफार नोंद प्रमाणित/ मंजूर करण्यात आली असेल परंतु

खरेदीदाराचे नाव इतर हक्कामध्ये नमूद केले असेल तर:

२)  दि. ३.११.२०२५ च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने अशा खरेदीदाराचे नाव कब्जेदार सदरी घेण्यापुर्वी ज्या फेरफार नोंदीने त्याचे नाव इतर हक्कामध्ये नोंदविण्यात आले आहे अशा नोंदीचा अभ्यास करुन केवळ तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाले म्हणून खरेदीदाराचे नाव इतर हक्कात नोंदविण्यात आले आहे याची खात्री करुन अशा खरेदीदाराचे नाव इतर हक्कातून कब्जेदार सदरी घेण्यासाठी अधिकार अभिलेखात नव्‍याने फेरफार नोंद घेण्यात यावी.

२.२) अशा फेरफार नोंदीमुळे कब्जेदार सदरी असलेल्या व्यक्तिंच्या हितसंबंधांवर परिणाम होत असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १४९-१५० मधील विहीत प्रक्रियेचा अवलंब करुन सदर फेरफार नोंद प्रमाणित करण्यात यावी आणि त्यानंतर गाव नमुना ७/१२ मध्ये कब्जेदार सदरी खरेदीदाराचे नाव दाखल करण्यात यावे.

¡ इतर हक्‍कात नमूद शेर्‍यांबाबत:

तुकड्याच्या नोंदणीकृत दस्तांच्या आधारावर झालेली फेरफार नोंद मंजूर करण्यात आली असेल परंतु

खरेदीदाराचे नाव इतर हक्कामध्ये नमूद केले असेल आणि/किंवा इतर हक्कामध्येतुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार किंवा तत्सम असा शेरा घेण्यात आला असेल तर

३) दि.३.११.२०२५ च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने इतर हक्कातील असे शेरे कमी करण्यासाठी आणि इतर हक्कातील खरेदीदाराचे नाव कब्जेदार सदरी घेण्यासाठी नव्याने फेरफार घेण्यात यावा. या नोंदीमुळे कब्जेदार सदरी असलेल्या व्यक्तिंच्या हितसंबंधांवर परिणाम होत असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम १४९- १५० मधील विहीत प्रक्रियेचा अवलंब करुन फेरफार नोंद प्रमाणित करण्यात यावी व त्यानंतर गाव नमुना ७/१२ मध्ये कब्जेदार सदरी खरेदीदाराचे नाव नमूद करण्यात यावे.

 ¡ नोंदणीकृत व्‍यवहार झाला आहे परंतु अधिकार अभिलेखात नोंद नाही:

तुकड्याचा व्यवहार नोंदणीकृत दस्‍तऐवजाने झाला आहे परंतु त्याची नोंद अधिकार अभिलेखात यापूर्वी नोंदविण्‍यात आलेली नाही तर

४) अशा तुकड्यांच्या खरेदीदारांची नावे दि.३.११.२०२५ च्या अध्यादेशानुसार अधिकार अभिलेखात घेण्यासाठी तहसिलदार यांनी या सुधारणेस पुरेशी प्रसिध्दी द्यावी व अशा खरेदीदारांकडून नोंदणीकृत दस्ताच्या प्रतीसह अर्ज घ्यावा.

४.१) या अर्जाच्या आधारावर फेरफार नोंद नोंदविण्‍यात यावी व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६,  कलम १४९-१५० मधील विहीत प्रक्रियेचा अवलंब करुन सदर फेरफार नोंद प्रमाणित करण्यात यावी व त्यानंतर गाव नमुना ७/१२ मध्ये कब्जेदार सदरी खरेदीदाराचे नाव नमूद करण्यात यावे.

 ¡ अनोंदणीकृत दस्तऐवजाने झालेले व्‍यवहार:

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध घालणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या तरतुदींविरुद्धच्या हस्तांतरणांचे दस्त नोंदणी विभागाने नोंदविणे बंद केल्यानंतर गरजेपोटी अनेक खरेदीदारांनी अनोंदणीकृत दस्तऐवजाच्या आधारे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केलेले आहेत. अशा प्रकरणांमध्ये पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी:

५) प्रत्येक ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या त्यांच्या साझा / मंडळामध्ये आवाहन करुन दि. १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंतचे असे खरेदी-विक्री व्यवहार झाले असल्यास त्याबाबतची माहिती संकलित करावी व संबंधित खरेदी घेणार आणि खरेदी देणार यांना त्यांचे सदर व्यवहार नोंदणीकृत करण्यास प्रवृत्त करुन त्यांना नोंदणी विभागाच्या अधिकार्‍यांकडे पाठवावे.

 ५.१) असे व्यवहार नोंदणीकृत करण्यास संबंधित खरेदी घेणार आणि खरेदी देणार पुढे आल्यास नोंदणी विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी योग्य ते मुद्रांक शुल्क आकारुन सदर दस्तऐवजांची नोंदणी करुन उक्त खरेदीदाराच्या नावाची अधिकार अभिलेखामध्ये नोंद घेण्याच्या अनुषंगाने सदरचे नोंदणीकृत दस्तऐवज महसूल विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांकडे फेरफार नोंद नोंदविण्‍याकामी ऑनलाईन पाठवावेत.

संबंधित अधिकार्‍यांनी अशा ऑनलाईन दस्‍तऐवजाच्‍या आधारे फेरफार नोंद नोदवून त्‍या फेरफार नोंदी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६,  कलम १४९-१५० मधील विहीत प्रक्रियेचा अवलंब करुन मंजूर करुन उक्त खरेदीदारांच्या नोंदी त्यांच्या अधिकार अभिलेखात विनाविलंब घ्याव्यात.

 ¡ उक्‍त जमिनींचे पुन्हा हस्तांतरण:

वरीलप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे नोंदणीकृत दस्ताऐवजाद्वारे झालेले हस्तांतरण मानीव नियमित केल्यानंतर संबंधित खरेदीदाराचे नाव अधिकार अभिलेखात नोंदविल्यानंतर सदर जमिनीचे पुन्हा हस्तांतरण करण्यास कोणतेही प्रतिबंध राहणार नाही.

n

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला तुकडेजोड – तुकडेबंदी कायद्‍यातील नवीन सुधारणेबाबत प्रक्रिया. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.