आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

सहज सुचले म्हणून...

शासकीय नोकरीतील माझ्या मित्रांना व सहकार्यांना काही गोष्टी सांगाव्‍याशा वाटतात.

आपण शासकीय नोकरी आहोत. ह्या‍ नोकरीत येण्यासाठी शासनाने आपल्याला पालखी पाठवली नव्हती किंवा सस्नेह आमंत्रणही दिलेले नव्हते. आपण आपल्या इच्छेने, अभ्या्स करून, परीक्षा देऊन या नोकरीत आलो आहे. नोकरीसाठी निवड झाल्यावर, या नोकरीतील त्रासांची जाणिव नक्कीच आपल्याला होती. तरीही आपण या नोकरीचा स्वीकार केला. जसे "सर्वगुणसंपन्न" काहीच आणि कधीच प्राप्त होत नाही तसेच नोकरीतही मिळणार नाही याची सर्वांनाच जाणिव असते. नोकरीत येण्याची जशी जबरदस्ती नव्हती तशी नोकरीत राहण्याचीही नाही. ज्याला त्रास सोसवत नसेल त्याला नोकरी कधीही सोडण्याची मुभा आहेच. तरीही तक्रारी करूनही आपण टिकून आहोत. कां? या नोकरीत काहीतरी नक्कीच चांगले आहे जे आपल्या स्वाभिमानाला सुखावते. हाताची सर्वच बोटे सारखी नसतात त्याचप्रमाणे नोकरीतील सर्वच सहकारी/वरिष्ठ चांगले नसतीलही कदाचित. परंतु ते "आपले" आहेत ही जाणिव सर्व त्रास विसरून काम करायला भाग पाडते. रडतही काम करायचे आहे आणि हसतही काम करायचे आहे. मग रडका, तक्रारखोर चहेरा घेऊन काम करण्यापेक्षा हसत केलेले काम स्वत:ला आणि इतरांनासुध्दा सुखच देईल. आज आपण केलेले चांगले काम भविष्यात आपल्याच लोकांना आपल्याबाबत अभिमानास्पद चर्चा करायला भाग पाडेल. नोकरीत कोणाला त्रास नाही? कोणालाही विचारा, सर्वांनाच काही ना काही त्रास आहेच. परंतु यावर मात करून पुढे जाईल तोच टिकेल. बदली झाल्यावरही ज्याची स्तुती केली जाते तोच खरा अधिकारी/कर्मचारी. खुर्चीवर असतांना तर जुलमाचा मुजरा सर्वच करतात. परंतु तो मुजरा तुम्हाला नाही, तुमच्या खुर्चीला, पदाला असतो हे विसरू नका. आपण एक कुटुंब आहोत. स्वत:च्या कुटुंबात आपण एकमेकांशी जुळवून घेतोच ना?
छोटेसे आयुष्य , हसत-खेळत घालविण्यासाठी इतके पुरे!

                                                                                      डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्‍हाधिकारी

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel