उपाय: डोळे
सुजणे/रांजणवाडी
* अपघातामुळे मार लागून, रक्त साकळून किंवा अन्य कारणाने
डोळे लाल झाले, सुजले तर लोखंडाच्या पळीमध्ये तुरटी,
थोडा लिंबाचा रस घालून तापवणे. हे मिश्रण काळे
झाले की काढून डोळ्यांना वरून लावावे. लाली कमी होते.
* डोळे सुजले, लाल झाले तर मेंदीच्या पाने पाण्यात कुटून
लगदा करावा, पातळ कापसावर तो लगदा ठेवून डोळ्यांवर ठेवावा.
* काकडीच्या चकत्या डोळ्यांवर अर्धातास ठेवाव्या.
* केळ्याची साल, चिकट भाग वरच्या बाजूला व पिवळा भाग डोळ्यावर अशी पंधरा मिनिटे ठेवावी.
* कोरफडीचे पान मधोमध चिरून गर असलेला भाग डोळ्यांवर अर्धा तास ठेवावा.
* ज्येष्ठमध पावडर पाण्यात कालवून, कापसाच्या बोळ्यावर
लावून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांची लाली कमी होते.
* दूर्वा (Conch grass) वाटून त्याचा लेप डोळ्यांवर करावा.
* उन्हाळ्याच्या दिवसात डोळे येणे इत्यादी विकार विषाणू संसर्गामुळे होत असतात. त्यासाठी डोळ्यात मलम लावणे, औषध टाकणे हे उपाय कधीकधी
फायदेशीर ठरत नाहीत. डोळ्यातील उष्णता कमी व्हावी यासाठी डोळ्यावर
थंड निरशा दुधाची पट्टी ठेवावी, केळीच्या सालीची पिवळी बाजू डोळ्यावर
ठेवणे, पांढर्या कांद्याचा रस डोळ्यात घालणे, कोरफडीचे पान मधोमध कापून त्याची चीक असलेली बाजू डोळ्यांवर ठेवणे असे उपाय
करावेत.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: डोळे सुजणे/रांजणवाडी. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !