* डोळे दुखणे
* पांढर्या
कांद्याचा रस, लिंबाचा रस, आल्याचा
रस- प्रत्येकी 10 मि.ली., 50 मि.ली. जुन्या मधात चांगले घोटून
मलम तयार करून काचेच्या निर्जंतुक बाटलीत भरून ठेवावे. डोळ्यांच्या
सर्व विकारांवर हे रामबाण औषध आहे.
* गाजराचा
रस नियमित सेवन करावा.
* डोळ्यात
फूल पडले असता वडाच्या पानाच्या चिकात कापूर खलून अंजन करावे.
* लिंबू रस
व डाळिंब रस पाण्यात टाकून त्या पाण्याने डोळे धुवावे.
* सहा भाग
गुलाबपाणी व एक भाग लिंबाचा रस पाण्यात टाकून त्या पाण्याने नियमित डोळे धुवावे.
भविष्यात होणारा मोतीबिंदूचा विकार टाळला जातो.
* सुती कापडाच्या
अथवा कापसाच्या पट्ट्या निरशा दुधात भिजवून तासभर डोळ्यावर ठेवाव्या.
* सुर्योदयाच्यावेळी
गवतावर अनवाणी चालावे.
* डोळ्यात
जळजळ होत असेल तर, रात्री एक चमचा अख्खे धणे (कोथिंबीर बी) पाण्यात
भिजवुन ठेवावे, सकाळी पाणी गाळून त्या पाण्याने डोळे धुवावे.
* डोळ्यांत
नियमित मध किंवा मधाबरोबर कांद्याचा रस टाकल्याने डोळे निरोगी राहतात,
भविष्यात होणारा मोतीबिंदूचा विकार टाळला जातो.
* सकाळी ताजे
गोमूत्र, दोन थेंब डोळ्यात टाकावे. हे गोमूत्र
गरोदर गाईचे नसावे. ताजे गोमूत्र
डोळ्यात टाकल्याने रातांधळेपणा, ग्लुकोमा,
कमी दिसणे इ. विकार नाहीसे होतात, चष्मा
निघून जातो. डोळ्यांच्या कुठल्याही असाध्य विकारातही
ताजे गोमूत्र रामबाण उपाय आहे.
* रात्री
वस्त्रगाळ त्रिफळा चूर्ण काचेच्या ग्लासात भिजवून ठेवावे. सकाळी
वर असलेले पाणी
पिऊन टाकावे, खाली उरलेल्या त्रिफळात मध मिसळून ते
डोळ्यात अंजनासारखे लावावे.
* सीताफळ
मिळत असेल तेव्हा त्याचा आहारात भरपूर वापर करावा. यात जीवनसत्त्व
‘अ’
असल्याने डोळ्यांचे आरोग्य राखले जाते.
* पापणीवर
आलेला फोड चिंचेचे बी (चिंचोका) (Tamarind seed) पाण्यात उगाळून लेप केल्याने
बरा होतो.
* पापणीवर
आलेला फोड काळीमिरी पाण्यात उगाळून लेप केल्याने बरा होतो.
* मोती बिंदू
* लिंबाचा
रस, पांढर्या कांद्याचा रस व मध समप्रमाणात घेऊन एकत्र करुन
रात्री ठेऊन द्यावे. सकाळी वर आलेले पाणी हलकेच काढुन एका बाटलीत
जमा करावे. हे पाणी डोळ्यांत घालावे.
* सकाळी ताजे गोमूत्र, दोन थेंब
डोळ्यात टाकावे. हे गोमूत्र गरोदर गाईचे नसावे. यामुळे मोती
बिंदूत आराम मिळतो.
* डोळ्याखाली काळे
होणे
* अति धुम्रपान, अति मद्यपान, अति झोप, अनिद्रा, शरीरात रक्ताची किंवा पाण्याची कमी,
कुपोषण, अति चहा/कॉफी सेवन,
श्वेतप्रदर, गर्भनिरोधक गोळ्यांचे अति सेवन,
अति चिंता ह्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तूळे निर्माण होतात. वरील
कुपथ्ये आधी बंद करावीत.
* रोज एक
चमचा हळद थोडी गरम करून मध व थोड्या गुलाबपाण्याबरोबर डोळ्याखाली लावून अर्धातास ठेवावी.
पंधरा दिवसांत निश्चित परिणाम दिसतो.
* डोळ्यांखाली
काळी वर्तुळे झाली असतील तर रोज रात्री बदामाच्या तेलाने डोळ्याखाली हलके मसाज करावा.
* डोळ्यांखाली
काळे झाले असेल तर त्या भागाला कच्चा बटाटा मधोमध कापून चोळावा व
बटाट्याचे काप अर्धातास डोळ्यांवर ठेवावे. असाच प्रयोग
गाजर व काकडी बरोबर करता येतो.
* डोळ्या
भोवती काळे झाले असेल तर प्रत्येकी पन्नास ग्रॅम आवळा चूर्ण, पुनर्नवा चूर्ण,
ज्येष्ठमध चूर्ण व दहा ग्रॅम आंबेहळद घेऊन एकत्र
करून ठेवावी. तुमची त्वचा रूक्ष असेल तर
दूध किंवा लिंबाच्या रसात मध्ये पेस्ट बनवून लावावी, जर त्वचा
तेलकट असेल तर
गुलाबपाण्यात पेस्ट बनवून पंधरा दिवस नियमीत चेहर्याला लावावी. ह्यामुळे
मृत त्वचा निघून
जाते व चेहर्यावर तकाकी येते.
* काकडीचा
रस, पुदिन्याचा रस, कोथींबिर रस सम प्रमाणात
घेऊन डोळ्याखाली हळुवार मसाज
करावा. अर्ध्या तासाने गुलाबपाण्याने चेहरा
धुवावा.
* चार चमचे
मसूरडाळ पीठ, तीन चमचे बेसन, दोन चमचे बदाम
चूर्ण, एक चमचा हळद,
लिंबाच्या रसात कालवुन ती पेस्ट डोळ्याखाली लावुन
अर्धा तास ठेऊन नंतर धुवावी.
* बटाट्याच्या
रसाने डोळ्याखाली हळुवार मसाज करावा. डोळ्यावर बटाट्याचे काप ठेवावे.
अर्ध्या तासाने गुलाबपाण्याने चेहरा धुवावा.
* बदाम चूर्ण
मधात कालवून डोळ्याखाली लावावे. अर्ध्या तासाने गुलाबपाण्याने चेहरा धुवावा.
* जीवनसत्व
‘ई’ युक्त गोळ्या घ्याव्या.
उपाय: डोळे सुजणे/रांजणवाडी
* अपघातामुळे
मार लागून, रक्त साकळून किंवा अन्य कारणाने डोळे लाल झाले,
सुजले तर लोखंडाच्या पळीमध्ये तुरटी, थोडा लिंबाचा
रस घालून तापवणे. हे मिश्रण काळे झाले की काढून डोळ्यांना वरून
लावावे. लाली कमी होते.
* डोळे सुजले,
लाल झाले तर मेंदीच्या पाने पाण्यात कुटून लगदा करावा, पातळ कापसावर तो लगदा ठेवून डोळ्यांवर ठेवावा.
* काकडीच्या
चकत्या डोळ्यांवर अर्धातास ठेवाव्या.
* केळ्याची
साल, चिकट भाग वरच्या बाजूला व पिवळा भाग डोळ्यावर अशी
पंधरा मिनिटे ठेवावी.
* कोरफडीचे
पान मधोमध चिरून गर असलेला भाग डोळ्यांवर अर्धा तास ठेवावा.
* ज्येष्ठमध
पावडर पाण्यात कालवून, कापसाच्या बोळ्यावर लावून डोळ्यांवर ठेवल्यास
डोळ्यांची लाली कमी होते.
* दूर्वा
(Conch grass) वाटून त्याचा लेप डोळ्यांवर
करावा.
* उन्हाळ्याच्या
दिवसात डोळे येणे इत्यादी विकार विषाणू संसर्गामुळे होत असतात. त्यासाठी
डोळ्यात मलम लावणे, औषध टाकणे हे उपाय कधीकधी फायदेशीर ठरत नाहीत.
डोळ्यातील उष्णता कमी व्हावी यासाठी डोळ्यावर थंड निरशा दुधाची पट्टी
ठेवावी, केळीच्या सालीची पिवळी बाजू डोळ्यावर ठेवणे, पांढर्या कांद्याचा रस डोळ्यात घालणे, कोरफडीचे पान
मधोमध कापून त्याची चीक असलेली बाजू डोळ्यांवर ठेवणे असे उपाय करावेत.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला डोळ्यांचे विकार :. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !