* तोंडात/जिभेवर फोड येणे
* गरम, तेलकट, तिखट, मसालेदार
पदार्थ वर्ज्य करावेत.
* चमेलीच्या
फुलाच्या झाडाची पाच पाने चावुन खावीत.
* मधात वेलची
पावडर मिसळून ती पेस्ट फोडांना लावावी व लाळ गळू द्यावी.
* तोंडात
फोड आले असल्यास केळ्यात दही मिसळुन खावे.
* मेंदीची
पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी.
* कापूर तोंडात
ठेवून तोंडात फिरवावा, नंतर थुंकुन द्यावा.
* झेंडूच्या
फुलाची पाने तोंडात चघळून थुंकून द्यावी.
* अपचनामुळेही
तोंडात फोड येतात, यावर संत्री-मोसंबीचा
रस सेवन करणे गुणकारी आहे.
* कापसावर
ग्लिसरीन लावून तो बोळा तोंडात फिरववा.
* पिंपळाची
हिरवी पाने वाटून जिभेला लावावीत.
* पिवळा मोठा हरडा (त्रिफळा
मध्ये असतो तो) आणुन गरम पाण्यात उकळुन तो काढा प्यावा तसेच त्या पाण्याने गुळण्या
कराव्यात.
* पुदिन्याची
पाने साखरे बरोबर चघळावी.
* एक चमचा
चारोळी चावत चावत चघळावी.
* कधी कधी
जेवताना गालाच्या आतला भाग चावला जाऊन जखम होते, किंवा तोंडात
फोड येतात. यावर विड्याचे पान चुना न लावता फक्त कात लावून चावून
खावे.
* तोंड आले
असता तुतीचे फळ खावे.
* जांभळाची
ताजी, कोवळी पाने पाण्यात वाटून त्याने गुळण्या केल्यास तोंडातील
फोड बरे होतात.
* पिकलेल्या
बेलफळाचा गर, चार वाट्या पाण्यात विरघळवुन ते पाणी दोन वाट्या
राहील इतके उकळवावे. या काढ्याने दिवसातून 2-3 वेळा, चार दिवस गुळण्या केल्याने तोंडातील दुर्गंधी मिटते.
* बेलाच्या
झाडाच्या सालीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात.
* उंबराच्या
झाडाच्या सालीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात.
* पायरिया
हिरड्यांतुन रक्त येणे, तोंडातुन
घाण वास येणे यां विकारांवर
* तोंड धुतल्यानंतर
दोन चमचे मोहरीच्या तेलात एक चिमुट सैंधव मीठ टाकुन हिरड्यांवर हलका मसाज करावा.
* लिंबाची
साल हळुवार हिरड्यांवर घासावी.
* देशी तुपात,
कापूर टाकुन हिरड्यांवर हलका मसाज करावा.
* एक चमचा
तिळाचे तेल, तोंडात ठेऊन, पाच मिनिटे फिरवावे, नंतर
थुंकुन द्यावे.
* ‘इरमरदादि
तेल’ औषधाच्या दुकानात मिळते, ते एक चमचा
घेऊन, तोंडात ठेऊन, पाच मिनिटे फिरवावे, नंतर थुंकुन द्यावे.
* काळीमिरी
चूर्ण, मोहरीच्या तेलात कालवुन, दात व हिरड्यांना
लावावे.
* दंत व्याधी
* काळे मीठ
व त्याच्या चार पट मोहरीचे तेल ह्यामुळे दात व हिरड्याची मसाज करावी.
* झेंडूच्या
फुलाची पाने तोंडात चघळून थुंकून देणे.
* झेंडूच्या
फुलाच्या पानांचा रस, सैंधव मीठ, मोहरीच्या
तेलात कालवून त्याने दात घासणे.
* ताज्या
संत्र्याची साल दातांवर घासली असता दातांचा पिवळेपणा कमी होतो.
* मोहरीचे
तेल व मीठ एकत्र करून दातांवर घासले असता दातांचा पिवळेपणा कमी होतो.
* दात दुखत
असतील तर त्यावर उंबराचा चीक लावावा.
* दातांतून पू येत असेल तर मोहरीचे
तेल व हळद एकत्र करून दातांवर नियमीतपणे सात दिवस लावावी.
* खारे शेंगदाणे
चावून खावे. खारे शेंगदाणे दातांच्या इनॅमलसाठी उपयुक्त असतात.
* पेरुच्या पानांच्या एक ग्लास
रसात, पाव चमचा मीठ घालून गुळण्या कराव्या.
* हळद पूड
व ओवा भाजून एकत्र करून त्याची पूड करावी. ह्यामुळे दात घासावे.
* भाजलेला
हिंग पातळ कापसात गुंडाळून दुखत्या ठिकाणी ठेवावा.
* दालचिनीचे
तेल कापसात गुंडाळून दुखत्या ठिकाणी ठेवावे.
* दोन थेंब
लवंग तेल कापसावर टाकून दुखत्या ठिकाणी ठेवावे.
* सकाळी उठल्यानंतर
उपाशीपोटी एक चमचा पांढरे तीळ चावून खावेत. यामुळे दात मजबुत होतात. (बाजारातुन
आणलेल्या तीळाचा आहारात वापर करण्यापूर्वी तीळांवर गरम पाणी टाकुन ते चांगले
धुवून घ्यावेत. यामुळे तीळांवरील Oxalic Acid निघुन जाते. नंतर ते उन्हात चांगले सुकवू घ्यावेत.)
* हरबर्याच्या डाळीएवढे मेंथॉल कापसावर ठेवून
दुखत्या ठिकाणी ठेवावे.
* तुरडाळी इतके पोटॅशिअम परमँग्नेट
कापसावर टाकून दुखत्या ठिकाणी ठेवावे. लाळ थुंकावी.
* अर्धा चमचा
वावडिंग पूड कापसावर टाकून दुखत्या ठिकाणी ठेवावी.
* हरबर्याएवढी
तुरटीची पूड कापसावर ठेवून दुखत्या ठिकाणी ठेवावी.
* दात हलत असतील तर
दातांवर तीळाच्या तेलाने मसाज करावा. 15 मिनीटे तसेच ठेऊन नंतर तोंड धुवावे.
* तोतरेपणा/अडखळत बोलणे
* वेखंड व
अक्कलकाढा चूर्ण दिवसातून तीन वेळा मधातून देणे.
* पाच काळीमिरी
रोज चावून खाणे.
* पाच बदाम
रोज लोण्याबरोबर खाणे.
* पिंपळाची
पिकलेली चार ताजी फळे अथवा या फळांचे एक चमचा चूर्ण किंवा पिंपळाच्या सालीचे चूर्ण,
मधाबरोबर सलग सहा महिने घेतल्यास वाणी स्पष्ट होते व तोतरेपणा, बोबडेपणा जातो.
* दोन चमचे
अख्खे धणे रात्री काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात भिजवून ठेवावे, सकाळी ते पाणी धण्यासह अर्धे होईल इतपत उकळावे, कोमट
झाल्यावर गाळून या पाण्याने गुळण्या (Gargles) कराव्या.
* अंगठा व
तर्जनी यांना मध लावावे. जीभ बाहेर काढून अंगठा जिभेखाली व तर्जनी
जिभेवर ठेवून जिभेला आतून बाहेर अशी आठ-दहा वेळा मधाने मालीश
(मसाज) करावी, या वेळेस मनात
‘ॐ’ चा उच्चार करावा.
* वेखंडाचा
(Sweet flag root) एक ग्रॅम तुकडा दिवसातून
दोनदा एक महिना चोखल्याने हा विकार दूर होतो.
* पाच बदाम
रात्री पाण्यात भिजवुन ठेवावे, सकाळी त्याची साले काढुन पांढर्या
लोण्याबरोबर किंवा गायीच्या तुपाबरोबर चावुन खावीत.
* एक चमचा
ब्राम्ही चूर्ण, मधातून किंवा दुधातून, दोनवेळा
घ्यावे.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मुख विकार :. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !