आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!

टपाली मतदान

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

'टपाली मतदान'

टपाली मतदान म्‍हणजे, निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या मतदारांनी प्रत्‍यक्ष मतदान केंद्रावर न जाता, मतपत्रिका टपालामार्फत पाठवू आपले मत नोंदविणे.
टपाली मतदानाची तरतुद Conduct of Elections Rules, 1961, Part III मध्‍ये नमुद आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पुस्‍तिका, प्रकरण १० (Hand Book for Returning Officers) मध्‍ये त्‍याचे सविस्‍तर वर्णन दिलेले आहे.  
सन २००१ पासून जिल्‍हा परिषदा, पंचायत समित्‍या, ग्रामपंचायती महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्‍या निवडणूकांमध्‍ये टपालव्‍दारे मतदान नोंदविण्‍याची तरतुद करण्‍यात आली आहे. तसेच टपाली मतपत्रिका आदेश २००१, दिनांक १६ जानेवरी २००१ अन्‍वये टपाली मतदानाची कार्यपध्‍दती स्‍पष्‍ट करण्‍यात आली आहे.

निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त केलेला मतदार म्‍हणजे जी व्‍यक्‍ती स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था निवडणूकीसाठी मतदार असून, त्‍या व्‍यक्‍तीस निवडणूक कर्तव्‍यार्थ एखाद्या मतदार संघात मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी अथवा निवडणूकीच्‍या अन्‍य कोणत्‍याही कामासाठी ज्‍यामध्‍ये निवडणूक बंदोबस्‍तासाठी नेमण्‍यात आले असेल अशी व्‍यक्‍ती. यामध्‍ये निवडणूक कर्तव्‍यार्थ नेमलेल्‍या अधिकारी / कर्मचारी वर्गाचा समोवश होतो.

Ü टपालाव्‍दारे मतदान कोणाला करता येते?:  संबंधित मतदार संघातील मतदार यादीत मतदार म्‍हणून नावे असलेले भारतीय सेनादलातील अधिकारी/कर्मचारी आणि निवडणूक कर्तव्‍यार्थ नेमलेले सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच निवडणूक आयोगाने विशेषरित्‍या आदेशीत केले असल्‍यास अन्‍य व्‍यक्‍तींना टपालाव्‍दारे मतदान करता येते.   


टपाली मतदान करावयाचे असल्‍यास विहित नमुन्‍यात अर्ज करावा लागतो. टपाली मतदानासाठी आवश्‍यक विविध प्रपत्रांची (Forms) माहिती खालीलप्रमाणे:

Ü पीबी-१: निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त केलेल्‍या आणि टपालाने मतदान करु इच्छिणार्‍या मतदाराने, पीबी-१ या प्रपत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडे मतदानाच्‍या तारेखेपूर्वी कमीत कमी ७ दिवस अगोदर अथवा निवडणूक निर्णय अधिकारी कमी करतील अशा मुदतीपूर्वी त्‍यांच्‍याकडे पोहोचेल अशा बेताने अर्ज करणे आवश्‍यक असते. या प्रपत्रामध्ये अर्जदाराने स्वत:चे नाव असलेला मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार यादी क्रमांक टपाली मतपत्रिका पाठविण्याचा पत्ता व्यवस्थित नमूद करुन स्वाक्षरी करावी तसेच सोबत निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेल्या आदेशाची झेरॉक्स प्रत जोडावी. अर्जदार हा निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त केलेला मतदार आहे अशी खात्री झाल्‍यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यामार्फत अशा अर्जदारास टपाली मतपत्रिका देण्‍यात येते.        
प्रपत्र पीबी-१ (नमुना)
  (पहा नियम ३)
निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुचनापत्र
प्रति,
मा. निवडणूक निर्णय अधिकारी,
................................

महोदय,
मी...................... मतदार संघाच्‍या/गटाच्‍या/ मतदार गणाच्‍या/ प्रभागाच्‍या निवडणूकीमध्‍ये मतदान करु इच्छितो.

माझे नाव वर नमूद .....................  प्रभागातील मतदान केंद्र क्रमांक ........च्‍या मतदार यादीत अनुक्रमांक .............. येथे समाविष्‍ट आहे.

मी अशी विनंती करतो की, कृपया मला खालील पत्‍यावर टपाली मतपत्रिका पाठविण्‍यात यावी.  
......................................................................
......................................................................

स्‍थळ: .....................................................                                                           आपला विश्‍वासू,
दिनांक:                                                 

Ü पीबी-२: एखाद्‍या मतदाराची, तो मतदार असलेल्‍या मतदार संघात, निवडणूक कर्तव्‍यार्थ, मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी अथवा अन्‍य निवडणूक कामासाठी नियुक्‍ती करण्‍यात आली असेल आणि तो टपालव्‍दारे मतदान करण्‍याऐवजी ज्‍या मतदान केंद्रावर त्‍यास निवडणूक कर्तव्‍यार्थ नेमण्‍यात आले आहे त्‍याच मतदान केंद्रावर मतदान करु इच्छित असेल तर त्‍याला निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे पीबी-२ या प्रपत्रात, मतदानाच्‍या तारेखेपूर्वी कमीत कमी ४ दिवस अगोदर अथवा निवडणूक निर्णय अधिकारी कमी करतील अशा मुदतीपूर्वी पोहोचेल अशा बेताने अर्ज करावा लागेल. सोबत निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेल्या आदेशाची झेरॉक्स प्रत जोडावी.
प्रपत्र पीबी-२ (नमुना)
  (पहा नियम ३ (२))
निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुचनापत्र
प्रति,
मा. निवडणूक निर्णय अधिकारी,
................................
.................. 

महोदय,
मी...................... मतदार संघाच्‍या/गटाच्‍या/ मतदार गणाच्‍या/ प्रभागाच्‍या निवडणूकीमध्‍ये व्‍यक्‍तीश: मतदान करु इच्छितो.

मला .......................... निवडणूकीमध्‍ये ................................... मतदान केंद्र क्रमांक ........ येथे निवडणूक कामावर नियुक्‍त करण्‍यात आले आहे. तथापि माझे नाव वरील नमूद .....................  प्रभागातील मतदान केंद्र क्रमांक ........च्‍या मतदार यादीत अनुक्रमांक .............. येथे समाविष्‍ट आहे.

मी अशी विनंती करतो की, मला कृपया प्रपत्र पीबी-३ मध्‍ये निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्‍यात यावे, जेणेकरुन मला ज्‍या मतदान केंद्रावर संघात निवडणूक कामासाठी नियुक्‍त करण्‍यात आले आहे, त्‍या मतदान केंद्रावर मी मतदान करुन शकेन. निवडणूक कार्य प्रमाणपत्र मला खालील पत्‍यावर पाठविण्‍यात यावे ही विनंती.  
......................................................................
......................................................................

स्‍थळ: .....................................................                                                           आपला विश्‍वासू,
दिनांक:                                                 

Ü पीबी-३: निवडणूक कर्तव्‍यार्थ नेमण्‍यात आलेल्‍या मतदान अधिकारी/ कर्मचारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी, खात्रीअंती प्रपत्र पीबी-३ मध्‍ये 'निवडणूक कार्य प्रमाणपत्र' (E.D.C. Election Duty Certificate) देईल तसेच अर्जदारास निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्‍यात आले असल्‍याचे स्‍पष्‍ट होण्‍यासाठी चिन्‍हांकित मतदार यादीमध्‍ये अर्जदाराच्‍या नावासमोर 'ई.डी.सी.' असे लिहून ठेवील.
प्रपत्र पीबी-३
(पहा नियम ३ (२) )
निवडणूक कार्य प्रमाणपत्र

प्रमाणित करण्‍यात येते की, श्री/श्रीमती ................................................................................. हे ........................................ निवडणूकीतील ......................................... मतदार संघ/ गट/मतदार गण/ प्रभागातील मतदार असून, त्‍याचा मतदार यादीतील अनुक्रमांक ....................आहे. त्‍यांना निवडणूक कर्तव्‍यार्थ नेमण्‍यात आले असून त्‍यांना त्‍यांच्‍या मतदान केंद्रामध्‍ये मतदान करण्‍याचा हक्‍क आहे. तथापि, त्‍या मतदान केंद्रावर ते मतदान करण्‍यास असमर्थ असल्‍यामुळे त्‍यांना उपरोक्‍त नमूद मतदार गट/ मतदार गण/ प्रभागामधील मतदान केंद्रापैकी ते ज्‍या ठिकाणी मतदानाच्‍या दिवशी निवडणूक कामावर असतील त्‍या मतदान केंद्रावर त्‍यांना मतदान करण्‍यासाठी प्राधिकृत करण्‍यात येत आहे.

 ठिकाण :- .....................................................             मुद्रा                                    सही
दिनांक :- ..................................................                                                           निवडणूक निर्णय अधिकारी

मतदान केंद्रावर निवडणूक कार्य प्रमाणपत्र (प्रपत्र पीबी-) सादर केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी ते सादर करणार्‍या व्यक्तीची सही निवडणूक कार्य प्रमाणपत्रावर घ्‍यावी आणि चिन्हांकित मतदार यादीच्या शेवटी निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर करणार्‍या मतदार व्यक्तीचे नाव त्यावरील मतदार यादीतील त्याचा अनुक्रमांक नमूद करावा. त्यानंतर त्या मतदान केंद्रावरील अन्य मतदाराने ज्या प्रकारे मतदान केले असते त्याच प्रकारे निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर करणार्‍या व्यक्तीस मतदान करु द्‍यावे.
निवडणूक कार्य प्रमाणपत्र (प्रपत्र पीबी-) सादर करणार्‍या मतदाराला, त्‍याने अन्‍यथा ज्‍या मतदान केंद्रावर मतदान केले असते, त्‍या मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकार्‍याने याबाबत दक्षता घ्‍यायची असते.  
Ü टपाली मतपत्रिका: टपाली मतपत्रिका दोन भागात असून एक भाग काऊंटर फाईल व दुसर्‍या भागात मतपत्रिका अशी आणि निवडणुकीत वापरल्‍या जाणार्‍या मतपत्रिकेसारखीच असते. टपाली मतपत्रिकेवर मतपत्रिकेचा अनुक्रमांक, उमेदवारांची नावे, त्‍यांच्‍या पक्षाचे (मराठी व इंग्रजी भाषेत) नाव तसेच निवडणूक चिन्‍ह किंवा चिन्‍हाचे नाव नमुद केलेले असते. सदर मतपत्रिकेवर अगदी वरच्‍या बाजूस टपाली मतपत्रिका (Postal Ballot Paper) असे छापलेले असते.
टपाली मतपत्रिकेच्‍या माध्‍यमातून मतदान करणार्‍या मतदाराने त्‍याच्‍या पसंतीच्‍या उमेदवाराच्‍या निवडणूक चिन्‍हासमोर P खुण निळ्‍या किंवा काळ्‍या शाईच्‍या पेनने करावी.                                                       
                                                        टपाली मतपत्रिका नमुना
अनुक्रमांक
................... निवडणूक, ........................................                                
                                                                   टपाली मतपत्रिका
  मतदार यादीचा भाग क्र. ............................
  मतदाराचा अनुक्रमांक ...............................
.......................................................................CUT HERE..........................................................................
अनुक्रमांक
................... निवडणूक, ........................................                                 
                                                                  टपाली मतपत्रिका
अबक
ABC
(भारतीय राष्‍ट्रीय कॉंग्रेस)
(Indian National Congress)                                                                                           हात (Hand)
बडइ
BDE
(भारतीय जनता पक्ष )
(Indian Janata Paksh)                                                                                                  कमळ (Lotus)
करम
KRM
(शिवसेना)
(Shiv Sena)                                                                                                                            धनुष्‍यबाण (Bow & Arrow)
डइफ
DEF
(अपक्ष)
(Independent)                                                                                                             कपबशी (Cup-Saucer)                                                                                                                               
वरीलपैकी एकही नाही
None of the Above

Ü टपाली मतपत्रिका पाठविणे: निवडणूकीत कर्तव्‍यार्थ नेमण्‍यात आलेल्‍या मतदारास टपाली मतपत्रिका टपालाने पाठविण्‍यात येते. टपाली मतपत्रिकेसोबत खालील चार बाबी पाठविण्‍यात येतात.
अ) प्रपत्र पीबी-४ (मतदाराच्‍या घोषणापत्र नमुना)
ब) प्रपत्र पीबी-५ (मतपत्रिका सिलबंद करण्‍यासाठी असलेला छोटा लखोटा/लिफाफा)
क) प्रपत्र पीबी-६ (निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतपत्रिका परत पाठविण्‍यासाठीचा मोठा लखोटा/लिफाफा)
ड) प्रपत्र पीबी-७ (टपाली मतदान कसे करावे याबाबत मतदारांसाठी माहितीपत्रक/सूचना)

u पीबी-४: पीबी-४ म्‍हणजे टपाली मतपत्रिकेसोबत पाठविण्‍यात येणार्‍या बाबींमधील 'घोषणापत्र'
प्रपत्र पीबी-४
(पहा नियम ५)
मतदाराच्‍या घोषणापत्र नमुना
................................................................................................ निवडणूक,२०१-
       (ही बाजू मतदार जेव्‍हा घोषणापत्रावर स्‍वत: सही करणार असेल तेंव्‍हा उपयोगात आणावी)

मी, याव्‍दारे असे घोषित करतो की, मी असा मतदार आहे ज्‍याला उपरोक्‍त निवडणूकीतील ............... अनुक्रमांकाची टपाली मतपत्रिका मला पाठविण्‍यात आली आहे.
दिनांक:                                                                                                   मतदाराची सही.........................
                                                                                                            पत्‍ता.......................................

                                                                                                            सहीचे साक्षांकन

            श्री .................................... हे माझ्या वैयक्तिक ओळखीचे असून/ मला त्‍यांची ओळख पटवून देणारे माझ्या वैयक्तिक ओळखीचे श्री..................................... (ओळख पटवून देणारे)  यांनी समाधानकारकरित्‍या पटवून दिली असून, त्‍यांनी माझ्या उपस्थितीत वरील सही केली आहे.
                                                                                                               साक्षांकन करणार्‍या अधिकार्‍याची
                                                                                                            सही......................................
                                                                                                            पदनाम..................................
                                                                                                            पत्‍ता....................................
ओळख पटवून देणारे असल्‍यास                                                                        दिनांक
त्‍यांची सही
पत्‍ता....................................                                         
दिनांक

मतदाराने पीबी- या प्रपत्रातील घोषणापत्रावर राजपत्रित अधिकार्‍यासमोर अथवा त्यास ज्या मतदान केंद्रावर निवडणूक कामासाठी नेमण्यात आले असेल त्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्राध्यक्षासमोर सही केली पाहिजे ती सही त्यांचेकडून साक्षांकित करून घेतली पाहिजे.
राजपत्रित अधिकारी अथवा निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्ती मिळालेल्या मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष अशा टपाली मतपत्रिका वापरुन मत नोंदविणार्‍या मतदाराच्या सहीचे साक्षांकन करण्यास सक्षम आहेत. 
सर्वसाधारणपणे कार्यालयाचे प्रमुख हे राजपत्रित अधिकारीअसतात. तथापि, खालील अधिकारी हे सुध्दा राजपत्रित संवर्गामध्ये येतात. 
) सर्व शासकीय महाविद्यालये यांचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि प्राध्‍यापक तसेच सहाय्य)कनिष्ठ अधिव्याख्याता, वर्ग-२
) सर्व शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालये यांचे फक्त प्राचार्य / मुख्याध्यापक. 
) जिल्हा मुख्यालयातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षणसंस्‍था यांचे प्राचार्य, उपप्राचार्य प्रबंधक तसेच तालुका स्तरावरील ITI चे फक्त प्राचार्य. 
) शासकीय अध्यापक महाविद्‍यालयाचे (बी.एड डी.एड.) प्राचार्य, सहयोगी सहाय्यक प्राध्यापक सर्व प्रकारची (अनुदानीत विनाअनुदानीत) खाजगी महाविद्यालये यांचे प्राचार्य, उपप्राचार्य प्राध्यापक, खाजगी उच्च माध्यमिक, माध्यमिक प्राथमिक विद्यालये यांचे प्राचार्य / मुख्याध्यापक आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (ITI) यांचे प्राचार्य हे राजपत्रित अधिकारी संवर्गामध्ये येत नाही. तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी, राज्य विधानमंडळ संसदेचे सदस्य हे मतदाराच्या सहीचे साक्षांकन करण्यास सक्षम नाहीत. 

टपाली मतपत्रिका प्राप्त झालेला मतदार जर त्याच्या अशिक्षितपणामुळे टपाली मतपत्रिकेवर आपले मत नोंदविण्यास घोषणापत्रावर सही करण्यास असमर्थ असेल तर त्याने घोषणापत्रावरील सहीचे साक्षांकन करण्यास सक्षम असलेल्या राजपत्रित अधिकारी अथवा निवडणूक कर्तव्यर्थ नियुक्ती मिळालेल्या मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष यांच्याकडे जावे आणि सदर अधिकार्‍या आपल्यावतीने आपले मत नोंदविण्याची आपल्यावतीने घोषणापत्रावर सही करण्याची विनंती करावी. सदर अधिकार्‍याने  मतदाराच्या इच्छेनुसार त्याच्या उपस्थितीत त्याचे मत नोंदवावे त्याच्यावतीने घोषणापत्रावर सही करावी व त्यानंतर प्रपत्र पीबी- मध्ये योग्य तो दाखला द्यावा. 
घोषणापत्र साक्षांकीत करण्‍यात आले नसेल तर त्‍या मतदाराचे मत मतमोजणीच्‍यावेळी मोजले जाणार नाही याची नोंद घ्‍यावी.

u पीबी-५: पीबी-५ म्‍हणजे टपाली मतपत्रिकेसोबत पाठविण्‍यात येणार्‍या बाबींमधील मतपत्रिका सिलबंद करण्‍यासाठी असलेला छोटा लखोटा/लिफाफा.

u पीबी-६: पीबी-६ म्‍हणजे टपाली मतपत्रिकेवरील सर्व प्रकिया पूर्ण झाल्‍यानंतर ती निवडणूक निर्णय अधिकारी यांना उद्देशुन परत पाठविण्‍यासाठीचा मोठा लखोटा/लिफाफा.

u पीबी-७: पीबी-७ म्‍हणजे टपाली मतदान कसे करावे याबाबत मतदारांसाठी माहितीपत्रक/सूचना.

निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकावरील उपरोक्‍त प्रपत्रे निवडणूक कर्तव्‍यार्थ नेमलेल्‍या  मतदारास व्‍यक्‍तीश: देऊ शकेल. निवडणूक कर्तव्‍यार्थ नेमलेल्‍या मतदारास व्‍यक्‍तीश: उपरोक्‍त प्रपत्रे दिल्‍यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी चिन्‍हांकित मतदार यादीमधील निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त केलेल्‍या मतदारांचा अनुक्रमांक, त्‍याला देण्‍यात आलेल्‍या टपाली मतपत्रिकेच्‍या स्‍थळप्रतीवर (Counterfoil) नोंदवून ठेवील तसेच चिन्‍हांकित मतदार यादीमध्‍ये निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त केलेल्‍या व टपाली मतपत्रिका देण्‍यात आलेल्‍या मतदाराच्‍या नावासमोर खूण करेल व टपाली मतपत्रिका देण्‍यात आल्‍याबद्दल त्‍यांच्‍या नावासमोर पीबी असे लिहुन ठेवील. तथापि सदर मतदारास देण्‍यात आलेल्‍या टपाली मतपत्रिकेचा अनुक्रमांक चिन्‍हांकित मतदार यादीमध्‍ये नमूद करणार नाही आणि टपाली मतपत्रिका दिलेला मतदार मतदान केंद्रावर मतदान करणार नाही याची दक्षता घेर्इल.
निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त केलेल्‍या ज्‍या मतदाराने टपाली मतपत्रिकेच्‍या मागणीसाठी अर्ज केले आहेत त्‍यांना टपाली मतपत्रिका देण्‍याचे काम पूर्ण झाल्‍यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी चिन्‍हांकित मतदार याद्या लखोट्यात मोहोर बंद करुन त्‍या संबंधित मतदान केंद्राध्‍यक्षाकडे त्‍यांच्‍या नावासमोर खुणा करण्‍यासाठी पाठविल. तथापि, अशा मतदारांना दिलेल्‍या मतपत्रिकाचे अनुक्रमांक चिन्‍हांकित मतदार यादीमध्‍ये लिहीण्‍यात येणार नाहीत.
निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त केलेल्‍या मतदारांना टपाली मतपत्रिका देण्‍याचे काम पूर्ण झाल्‍यानंतर सदर मतपत्रिकांच्‍या स्‍थळप्रती एका लखोटयात मोहोरबंद करील व लखोटयामध्‍ये काय आहे त्‍याचे थोडक्‍यात वर्णन लखोटयावर लिहून लखोटा मोहोबंद केल्‍याची तारीख त्‍यावर नमूद करील.
Ü टपालाने पाठविण्‍यात येणार्‍या मतपत्रिकेवर मतदान नोंदविणे:
ß ज्‍या मतदारास टपाली मतपत्रिका देण्‍यात आली आहे अशा मतदाराने प्रपत्र पीबी-७ मधील सूचना काळजीपूर्वक वाचाव्‍या. टपाली मतपत्रिकेत नमुद त्‍याच्‍या पसंतीच्‍या उमेदवाराच्‍या निवडणूक चिन्‍हासमोर P खुण निळ्‍या किंवा काळ्‍या शाईच्‍या पेनने करून आपले मत नोंदवावे.                                                       त्‍यानंतर ही मतपत्रिका प्रपत्र पीबी-५ या लखोटयात टाकून पीबी-५ लखोटा सीलबंद करावा तसेच पीबी-५ या लखोट्‍यावर टपाली मतपत्रिकेचा अनुक्रमांक नोंदवावा.
त्‍यानंतर प्रपत्र पीबी-५ लखोटा, प्रपत्र पीबी-४ (मतदाराच्‍या घोषणापत्र) ही दोन्‍ही प्रपत्रे प्रपत्र पीबी-६ या मोठ्‍या  लखोट्‍यात घालून पीबी-६ लखोटा सीलबंद करावा आणि टपालाव्‍दारे निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे पाठवावा. यासाठी टपाल तिकिटाची आवश्‍यकता नसते.  

ß पीबी-२ मध्‍ये अर्ज केलेल्‍या व पीबी-३ प्राप्‍त मतदाराने पीबी-४ या प्रपत्रातील घोषणापत्रावर राजपत्रित अधिकार्‍यासमोर अथवा त्‍यास ज्‍या मतदान केंद्रावर निवडणूक कामासाठी नेमण्‍यात आले असेल त्‍या मतदान केंद्राच्‍या मतदान केंद्राध्‍यक्षासमोर सही केली पाहीजे व ती सही त्‍यांच्‍याकडून सां‍क्षाकित करुन घेतली पाहिजे.
ß निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त करण्‍यात आलेला एखादा मतदार त्‍यांच्‍या अशिक्षितपणामुळे टपाली मतपत्रिकेवर आपले मत नोंदविण्‍यास व घोषणापत्रावर सही करण्‍यास असमर्थ असल्‍यास त्‍याने त्‍यास मिळालेली टपाली मतपत्रिका त्‍या सोबतच्‍या घोषणापत्रासह व सक्षम असलेल्‍या अधिकार्‍याकडे घेऊन जावी व सदर अधिकार्‍यास आपल्‍यावतीने आपले मत नोंदविल्‍याची व आपल्‍यावतीने घोषणापत्रावर सही करण्‍याची विनंती करावी. सदर अधिकार्‍याने मतदाराच्‍या इच्छेनूसार त्‍यांच्‍या उपस्थितीत त्‍याचे मत नोंदवावे व त्‍याच्‍यावतीने घेाषणापत्रावर सही करावी व प्रपत्र पीबी-४ मध्‍ये योग्‍य तो दाखला द्यावा.
Ü टपाली मतपत्रिका पुन्‍हा देणे: काही कारणामुळे एकदा पाठविण्‍यात आलेली टपाली मतपत्रिका व त्‍यासोबतचे इतर कागदपत्रे मतदारास न मिळता परत आल्‍यास निवडणूक निर्णय अधिकारी अशी कागदपत्रे संबंधित मतदारास टपालाने पुन्‍हा पाठविण्‍याची किंवा त्‍याने विनंती केल्‍यास त्‍यास व्‍यक्‍तीश: देण्‍याची व्‍यवस्‍था करावी. एखाद्या मतदाराने त्‍यास देण्‍यात आलेली टपाली मतपत्रिका व इतर कागदपत्र चुकीने हाताळल्‍यास व परिणामी त्‍यांचा योग्‍य रितीने वापर करणे शक्‍य नसल्‍यास निवडणूक निर्णय अधिकारी अशा मतदारास टपाली मतपत्रिका व अन्‍य कागदपत्रांचा दुसरा संच देण्‍याबाबत विचार करु शकेल.
निवडणूक निर्णय अधिकारी अशा तर्‍हेने परत केलेली, वापरता न येण्‍याजोगी टपाली मतपत्रिका व अन्‍य कागदपत्र रद्द करून ती एका वेगळया लखोटयात ठेवून त्‍या लखोटयावर टपाली मतपत्रिका ज्‍या निवडणुकीतील आहे त्‍याचे विविरण व रद्द झालेल्‍या टपाली मतपत्रिकेचा अनुक्रमांक त्‍यावर नमूद करावा.
Ü टपाली मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे परत पाठविणे: मतदाराने टपाली मतपत्रिकेवर प्रपत्र पीबी-७ मध्‍ये नमूद केलेल्‍या सुचनांनूसार आपले मत नोंदविल्‍यानंतर तसेच प्रपत्र पीबी-४ मधील घोषणापत्रावर सही केल्‍यानंतर, मतपत्रिकेवर मत नोंदवून ती पीबी-५ या लखोट्‍यात टाकुन सीलबंद करेल. पीबी-५ या लखोट्‍यावर टपाली मतपत्रिकेचा अनुक्रमांक नमूद करणे आवश्यक असते. मतपत्रिकेचा पीबी-५ हा लखोटा आणि  प्रपत्र पीबी-४ मधील घोषणापत्र, पीबी-६ या मोठ्‍या लखोट्‍यात सीलबंद करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडे मतमोजणी सुरु करण्‍यासाठी निश्चित केलेल्‍या वेळेपूर्वी परत केले पाहीजे.
Ü निवडणूक निर्णय अधिकार्‍याने टपाली मतपत्रिका स्‍वीकारणे: निवडणूक निर्णय अधिकार्‍याने, परत येणार्‍या टपाली मतपत्रिकांचा लखोटा स्‍वीकारण्‍यासाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था करावी. लखोटा प्राप्‍त झाल्‍याची तारीख आणि वेळ नमूद करून त्‍यांचा दैनंदिन आवक हिशोब नोंदवून ठेवावा. मतमोजणी सुरु करण्‍यासाठी निश्चित केलेल्‍या वेळेपूर्वी प्राप्‍त होणारे टपाली मतपत्रिकांचे सर्व लखोटे स्‍वीकारण्‍यात येतील व सुरक्षित ठेवण्‍यात येतील. मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्‍यानंतर प्राप्‍त झालेले टपाली मतदान, मतमोजणीत समाविष्‍ट करता येणार नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी, असे विहित वेळेपेक्षा उशिरा प्राप्‍त झालेले लखोटे, न उघडताच, त्‍यावर लखोटा प्राप्‍त झाल्‍याची तारीख आणि वेळ नमूद करून एकत्र वेगळया पाकीटात ठेवील व त्‍या पाकिटावर 'उशिरा प्राप्‍त झालेले टपाली मतदानाचे लखोटे' असे लिहून त्‍याला सीलबंद करेल.


Ü टपाली मतपत्रिकांची मतमोजणी:
मतमोजणीमध्ये सर्वात प्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येते आणि त्यानंतर मशिनवरील मतमोजणीस सुरूवात करण्यात येते. टपाली मतपत्रिकांची मोजणीसाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था (शक्‍यतो निवडणूक निर्णय अधिकार्‍याच्‍या टेबलाजवळ) करण्‍यात यावी व यासाठी स्‍वतंत्र कर्मचारी वर्ग नेमण्‍यात यावा.
निवडणूक निर्णय अधिकार्‍याने प्रथम टपाली मतपत्रिकांच्‍या मतमोजणीसाठी खाली नमूद केलेली पध्‍दती अनुसरावी:
u मतमोजणी सुरु करण्‍यासाठी निश्चित केलेल्‍या वेळेनंतर प्राप्‍त झालेला प्रपत्र पीबी-६ मधील कोणताही लखोटा उघडता येणार नाही व त्‍यात असलेल्‍या मतपत्रिकेची मोजणी करण्‍यात येणार नाही.
u मतमोजणीसाठीच्‍या विहित वेळेत, विहित कालावधीत प्राप्‍त झालेल्‍या, टपाली मतपत्रिका असलेला मोठा लखोटा (पीबी-६) एका पाठोपाठ एक उघडण्‍यात येईल. प्रत्‍येक मोठा लखोटा (पीबी-६) उघडल्‍यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रथम त्‍यातील प्रपत्र पीबी-४ या घोषणापत्राची तपासणी करील. यावेळी पीबी-५ (मतपत्रिका असलेला लखोटा) उघडला जाणार नाही.
u मोठा लखोटा (पीबी-६) उघडल्‍यानंतर त्‍यामध्‍ये (पीबी-४) घोषणापत्र न आढळून आल्‍यास, अथवा त्‍यावर सही तसेच साक्षांकन नसल्‍यास, अथवा घोषणापत्र मोठ्या प्रमाणावर सदोष असल्‍यास, अथवा घोषणापत्रात नमूद केलेल्‍या टपाली मतपत्रिकेचा अनुक्रमांक व नमुना पीबी-५ मधील लखोटयावर नमूद केलेल्‍या टपाली मतपत्रिकेचा अनुक्रमांक यामध्‍ये फरक असल्‍यास मतपत्रिका असलेला पीबी-५ लखोटा उघडण्‍यात येणार नाही. त्‍यावर योग्‍य तो शेरा लिहून निवडणूक निर्णय अधिकारी ती मतपत्रिका बाद ठरवेल. अशा बाद केलेल्‍या लिफाफ्यांवर कारणांचे पृष्ठांकन करून ते वेगळे ठेवण्यातयेतील त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांची स्वाक्षरी करतील. 
असा शेरा लिहीलेले पीबी-५ लखोटे आणि त्‍यासोबत प्राप्‍त झालेली घोषणापत्रे पीबी-६ सह एका वेगळया पाकिटात मोहोरबंद करुन ठेवण्‍यात येतील. सदर लखोटयावर मतदार संघाचे नाव, निवडणुकीचा तपशील, मतमोजणीची तारीख व लखोटयामध्‍ये काय ठेवले आहे, त्‍याचा थोडक्‍यात तपशील लिहिण्‍यात येईल.
u प्रपत्र पीबी-५ मधील कोणताही लखोटा उघडण्‍यापूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी योग्‍य असलेली प्रपत्र पीबी-४ मधील सर्व घोषणापत्रे एका वेगळया पाकिटात ठेवेल व सदर पाकीट मोहोरबंद करण्‍यात येईल. तसेच त्‍यावर मतदार संघाचे नाव, निवडणुकीचा तपशील, मतमोजणीची तारीख व लखोटयामध्‍ये काय ठेवले आहे त्‍याचा थोडक्‍यात तपशील लिहिण्‍यात येईल.
u यानंतर वैध घोषणापत्र असलेले आणि आतापर्यंत न उघडण्‍यात आलेले मतपत्रिका असलेले पीबी-५ लखोटे एका पाठोपाठ एक उघडण्‍यात येतील आणि त्‍यातील प्रत्‍येक टपाली मतपत्रिकेची निवडणूक निर्णय अधिकारी तपासणी करील व त्‍यावर नोंदविलेल्‍या मताची वैधता ठरवील.
Ü टपाली मतपत्रिका रद्‍द/अवैध ठरविणे:
खालील कारणांमुळे टपाली मतपत्रिका रद्द/बाद ठरविण्‍यात येतात:-
ß टपाली मतपत्रिकेवर मत नोंदविण्‍याच्‍या खूणेव्‍यतिरिक्‍त एखादी अशी खूण करण्‍यात आली असेल ज्‍यावरुन मतदाराची ओळख पटू शकेल, अथवा
ß टपाली मतपत्रिकेवर मतदाराचे नाव, स्वा‍क्षरी अथवा अन्य मजकूर लिहिलेला असल्यास, अथवा
ß टपाली मतपत्रिकेवर मत नोंदविण्‍यात आले नसेल, अथवा
ß बहू मतदान अपेक्षित नसतांना एकापेक्षा जास्‍त उमेदवारांसमोर मत नोंदविण्‍यात आले असेल, अथवा
ß टपाली मतपत्रिका नकली/बनावट असेल तर, अथवा
ß टपाली मतपत्रिकेस इतक्‍या मोठया प्रमाणावर हानी पोहोचली असेल अथवा ती छिन्‍न विछिन्‍न झाली असेल की, ज्‍यायोगे मतपत्रिका खरी आहे किंवा कसे, हे ओळखता येत नाही, अथवा
ß निवडणूक निर्णय अधिकारी यांनी टपाली मतपत्रिकेसोबत जो लखोटा पाठविला असेल, त्‍या लखोटयात ती परत करण्‍यात आली नसेल, अथवा
ß टपाली मतपत्रिकेवर अशा रितीने मत नोंदविले असेल की ते कोणत्‍या उमेदवारास दिले आहे हे निर्विवादपणे ठरविता येत नसेल.
(उपरोक्‍त कारणे नमूद केलेला रबरी शिक्‍का तयार करून तो बाद मतपत्रिकेच्‍या मागील बाजुस उमटविण्‍यात येतो व योग्‍य त्‍या पर्यायासमोर खूण करण्‍यात येते.)
वरील कारणांसाठी मतपत्रिका बाद ठरविल्‍यास, मतपत्रिकेच्‍या मागील बाजूस तसे पृष्‍ठांकन करून निवडणूक निर्णय अधिकार्‍याने सही करावी.
टपाली मतपत्रिकेवर नोंदविलेले मत अस्‍पष्‍ट असेल अथवा मत नोंदविण्‍याची खूण एकापेक्षा जास्‍त वेळा केली असेल व जर त्‍यावरुन मतदाराची कोणत्‍या उमेदवारास मत देण्‍याची इच्‍छा आहे हे पुरेसे स्‍पष्‍ट होत असेल, तर केवळ त्‍या कारणासाठी मतपत्रिका रद्द करण्‍यात येणार नाही.
सर्व वैध टपाली मतपत्रिकांवरील मतांची मोजणी पूर्ण झाल्‍यानंतर, निवडणूक निर्णय अधिकारी वैध टपाली मतपत्रिकेवरील मते कोणत्‍या उमेदवारांना देण्‍यात आली आहेत त्‍याची मोजणी करील व त्‍यांची बेरीज संबंधित निवडणूकीसाठी विहित करण्‍यात आलेल्‍या प्रपत्रात नोंदविल व ती जाहीर करील.
यानंतर, सर्व वैध टपाली मतपत्रिका आणि अवैध ठरलेल्‍या मतपत्रिकांचे वेगवेगळे गठ्ठे बांधून एका पाकिटात ठेवण्‍यात येतील ती पाकीटे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या मोहरेने मोहोरबंद करण्‍यातयेतील. सदर पाकिटावर सही करण्‍याची ज्‍या उमेदवारांची, निवडणूक प्रतिनिधींची, मतमोजणी प्रतिनिधींची इच्‍छा असेल त्‍यांना सहया करण्‍याची अनुमती देऊन मतदार संघाचे नाव, निवडणूकीचा तपशील, मतमोजणीची तारीख व लखोटयामध्‍ये काय ठेवले आहे, त्‍याचा थोडक्‍यात तपशील नमूद करण्‍यात येईल.

Ü निवडणूक कार्य प्रमाणपत्राच्‍या आधारे निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या लोकसेवकांनी मतदान करणे :
निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त करण्‍यात आलेले मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी तसेच अन्‍य लोकसेवक यांचे नाव ज्‍या मतदार संघाच्‍या मतदार यादीत समाविष्‍ट आहे, त्‍याच मतदार संघात निवडणूक कामावर नियूक्‍त असल्‍यास ते ज्‍या मतदार केंद्रावर नियूक्‍त आहेत त्‍याच मतदान केंद्रात मतदान करु शकतात. अशा व्‍यक्‍तींना अशा प्रकारे मतदान करावयाचे असल्‍यास त्‍यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडे पीबी-२ या प्रपत्रात अर्ज केला पाहिजे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अशा अर्जदारांना प्रपत्र पीबी-३ मध्‍ये निवडणूक कार्य प्रमाणपत्र देतील.
असे निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर केल्‍यानंतर मतदान केंद्राध्‍यक्ष यांनी ते सादर करणार्‍या व्‍यक्‍तीची सही निवडणूक कार्य प्रमाणपत्रावर घ्‍यावी व ते विहित पाकीटात ठेवावे. चिन्‍हांकित मतदार यादीच्‍या शेवटी निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर करणार्‍या व्‍यक्‍तीचे नाव त्‍यावरील मतदार यादीतील त्‍याचा अनुक्रमांक नमूद करावा आणि अन्‍य मतदाराने ज्‍या प्रकारे मतदान केले असेल त्‍याचप्रकारे निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर करणार्‍या व्‍यक्‍तीस मतदान करु द्‍यावे.
Ü बाद मतपत्रिकेच्‍या मागील बाजुस उमटविण्‍यात येणार्‍या रबरी शिक्‍क्‍याचा नमूना :
सदर मतपत्रिका खालील कारणामूळे बाद ठरविण्‍यात आली आहे.
१. मतदाराची ओळख पटू शकते.
२. मतपत्रिकेवर वैध चिन्‍हाऐवजी अन्य मजकूर लिहिलेला आहे.
३. टपाली मतपत्रिकेवर मत नोंदविण्‍यात आलेले नाही.
४. एकापेक्षा जास्‍त उमेदवारांसमोर मत नोंदविण्‍यात आले आहे.
५. मतपत्रिका नकली/बनावट आहे.
६. मतपत्रिकेस मोठया प्रमाणावर हानी पोहोचली आहे.
७. विहित लखोटयात मतपत्रिका परत करण्‍यात आली नाही.
८. कोणत्‍या उमेदवारास दिले आहे हे निर्विवादपणे ठरविता येत नाही.

                                                     निवडणूक निर्णय अधिकारी
  ...........................

bßb        

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला टपाली मतदान. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

5 تعليقات

  1. धन्यवाद सर
  2. माहीतीचा चांगली आहे.निवणूकी कार्यात मदत होवू शकते.
  3. very good info for election duty nodal officer. Thank you very much. sende again details for the matter.

  4. सर ग्रामपंचायत निवडणूकीत कर्तव्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना E.D.C.मतदानाची सोय असते का ?
  5. सर एकदा निकाल जाहीर केल्यावर पुन्हा टपाल मतदान मोजणी करुन बदलता येतोका? कृपया मला या बद्दल माहीती द्या
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.