उत्तर: सर्वप्रथम जिल्हाधिकारी यांचा स्थावर मालमत्ता ताब्यात घेणेबाबतचा आदेश प्राप्त झाल्यानंतर याबाबत कर्जदारास लेखी पत्र देऊन कळवावे. त्यानंतर मंडल अधिकारी यांना सदर मालमत्ता ताब्यात घेणेबाबत आणि बॅंकेस या मालमत्तेचा ताबा देण्यासाठी तहसीलदार यांनी प्राधिकृत करावे तसेच पोलीस निरीक्षक यांना सदर दिवशी सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणेबाबत कळवावे आणि याचा होणारा खर्च बँकेने भागवावा म्हणुन बॅंकेस पत्र द्यावे. तसेच तलाठी यांना मंडल अधिकारी यांच्या मदतीसाठी आदेशीत करावे.
ताबा घेण्याच्या दिवशी बँकेस आपला सक्षम अधिकारी ताबा घेणेसाठी उपस्थित ठेवाण्यासाठी पत्र द्यावे. ताब्याची कारवाई सुरू करण्यापूर्वी सदर स्थावर मालमत्ता ज्याच्या ताब्यात असेल त्या..किंवा कर्जदारास घरातील सर्व मौल्यवान व आवश्यक वस्तुची यादी करुन ताब्यात घेण्यास सांगावे. ताबा घेतांना सविस्तर पंचनामा व ताबे पावती तयार करावी. स्थावर मालमत्तेचा ताबा घेऊन ती सीलबंद करावी आणि ती मालमत्ता बँक अधिकार्यांच्या ताब्यात देऊन ताबे पावतीवर त्यांची स्वाक्षरी घ्यावी.
सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यावर मंडल अधिकारी यांनी तसा अहवाल तहसीलदार यांना सादर करावा आणि बॅंकेने सुध्दा मालमत्ता ताब्यात मिळालेबाबत आपले पत्र द्यावे. त्यानंतर तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना कार्यवाही पुर्ण झालेबाबत अहवाल सादर करावा.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला एखाद्या स्थावर मालमत्तेचा ताबा बॅकेला देतांना काय प्रक्रिया करणे अपेक्षीत आहे ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !