- (एक) ठपका ठेवणे
- (दोन) पदोन्नती राखून ठेणे
- (तीन) कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्याने आदेशाचा भंग केल्यामुळे शासनाला झालेल्या कोणत्याही आर्थिक स्वरूपाच्या आणि ची संपूर्ण रक्कम किंवा तिचा भाग त्याच्या वेदना मधून वसूल करणे
- (चार) वेतनवाढी रोखून ठेवणे
- (पाच) विनिर्दिष्ट कालावधीकरिता वेतन समय श्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणण्यात येईल येईल आणि अशा पदावनती च्या काळात शासकीय कर्मचाऱ्याला वेतनवाढी मिळतील किंवा मिळणार नाही याबाबत आणि असा कालावधी समाप्त झाल्यानंतर या पदावनती च्या परिणामी त्याच्या भावी वेतनवाढी पुढे ढकलल्या जातील किंवा नाही याबाबतही ही निर्देश दिले जातील. अशी शिक्षा करणारे प्राधिकरण, ज्या कालावधीसाठी कर्मचाऱ्यास पदावनत करण्यात आले असेल, तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी कर्मचाऱ्याने रजेवर व्यतीत केलेला कोणत्याही ही मध्यंतरीचा कालावधी त्या पदावनतीच्या कालावधीमध्ये धरला जाणार नाही असे त्या शिक्षेच्या आदेशामध्ये स्पष्ट करेल.
- (सहा) शासकीय कर्मचाऱ्यास तो ज्या वेतन श्रेणीमध्ये समय श्रेणीमध्ये, पदावर, श्रेणीमध्ये किंवा सेवेमध्ये असेल त्यापेक्षा खालच्या वेतन श्रेणीमध्ये समय श्रेणीमध्ये, पदावर, श्रेणीमध्ये किंवा सेवेमध्ये आणणे किंवा ज्या वेतन श्रेणीमध्ये समय श्रेणीमध्ये, पदावर, श्रेणीमध्ये किंवा सेवेतून शासकीय कर्मचाऱ्यास अशाप्रकारे पदावनत करण्यात आले असेल त्या वेतन श्रेणीमधील समय श्रेणीमधील, पदावरील, श्रेणीमधील किंवा सेवेतील बढतीस अशी पदावनती सर्वसाधारणपणे रोधक ठरेल. मग अशा देशांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यास पूर्वीच्या वेतन श्रेणीत, समय श्रेणीत, पदावर, श्रेणीमध्ये किंवा सेवेमध्ये परत आणण्या संबंधीच्या अटी, शासकीय कर्मचाऱ्यांची जेष्ठता व त्याचे वेतन यासंबंधीच्या निर्देशांचा उल्लेख केलेला असो किंवा नसो. अशी शिक्षा करणारे प्राधिकरण, ज्या कालावधीसाठी कर्मचाऱ्यास पदावनत करण्यात आले असेल, तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी कर्मचाऱ्याने रजेवर व्यतीत केलेला कोणत्याही ही मध्यंतरीचा कालावधी त्या पदावनतीच्या कालावधीमध्ये धरला जाणार नाही असे त्या शिक्षेच्या आदेशामध्ये स्पष्ट करेल.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला किरकोळ शिक्षा (विभागीय चौकशी). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !