आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

हिंदू वारसा कायदा, कलम १५

 


हिंदू वारसा कायदा, कलम १५

(१) विनामृत्युपत्र, मयत हिंदू स्‍त्रिची मालमत्ता

विनामृत्युपत्र मयत झालेल्‍या हिंदू स्‍त्रिची कलम १४ अन्‍वये + सासरकडून मिळालेली संपत्ती पुढील प्रमाणे वारसाहक्काने जाईल.

                                      मयत हिंदू स्‍त्रिचे मुलगे व मुली

                          (कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्ये धरून)

                                                  आणि पती

.............................................................

(२) विनामृत्युपत्र मयत झालेल्‍या हिंदू स्‍त्रिची मुलगे व मुली आणि पती मयत असतील तर

                            तर पतीच्या वारसांकडे (सासरा/सासु/दिर इत्‍यादी)

...............................................................

(३) विनामृत्युपत्र मयत झालेल्‍या हिंदू स्‍त्रिची  मुलगे व मुली पती आणि पतीच्या वारस मयत असतील तर त्‍या मयत स्‍त्रिच्‍या माता आणि पिता यांच्याकडे.

.......................................................................................................................................................................................................................................................................  

 () हिंदू स्त्री जर विनामृत्युपत्र मरण पावली तर तिला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती मयत हिंदू स्‍त्रिचे मुलगे व मुली (कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल.

(ब) त्या मयत हिंदू स्‍त्रिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) मयत असतील तर अशी संपत्ती त्‍या मयत स्‍त्रिच्‍या माता आणि पिता यांच्याकडे जाईल.

वरील (१) व (२) अन्‍वये पती आणि पतीच्या वारसांकडे जाणार नाही.

                                                              

Comments

  1. हे चुकीचे आहे मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचेकडील न्यायनिर्णयानुसार हिंदु स्त्री ला तिच्या माता पिता किंवा पती ,सासू सासरा यांचेकडून मिळालेली मिळकत जर तिला मुलगा किंवा मुलगी नसेल तर ती तिच्या पती कडे जाते अन पती नंतर त्याच्या वारसाकडे जाते

    ReplyDelete
    Replies
    1. जयसिंग मांडे ९९२१३३०५५४

      Delete

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel