फेरफार प्रमाणन अधिकार्‍यांसाठी तपासणी सूची

 

फेरफार प्रमाणन अधिकार्‍यांसाठी तपासणी सूची

नोंदविण्‍यात आलेल्या फेरफार नोंदी संदर्भात सर्व हितसंबंधीतांवर नोटीस बजावण्यात आली काय?

होय/ नाही

 

चावडी/नोटीस बोर्डवर नोटीस प्रसिध्द करण्यात आलेली आहे काय?

होय/ नाही

विहित कालावधी संपुष्‍टात आहे काय?

होय/ नाही

शेतजमीन खरेदी घेणारी व्‍यक्‍तीने शेतकरी पुरावा सादर केला आहे काय? (अपवाद वगळता)

होय/ नाही

प्रतिबंधीत सत्ता प्रकारच्या जमिनीच्या बाबतीत सक्षम अधिकार्‍यांची परवानगी आहे काय?

होय/ नाही

कुळ, इनाम, सिलींग, देवस्थान, सरकारी गायरान इत्यादी जमिनीच्या बाबतीत सक्षम अधिकार्‍याचा आदेश आहे काय?

होय/ नाही

तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन होत आहे काय?

होय/ नाही

आदेशान्‍वये नोंदविण्‍यात आलेली फेरफार नोंद सक्षम अधिकार्‍यांच्‍या आदेशाप्रमाणेच नोंदविण्‍यात आली आहे काय?

होय/ नाही

व्‍यवहारात किंवा आदेशात अटी व शर्ती नमुद असल्‍यास त्‍यांची नोंद फेरफार नोंदीत नमुद करण्यात आली आहे काय ?

होय/ नाही

१०

नोंदविलेली परवानगी/आदेश/निर्णय यावर सक्षम न्यायालयाने स्थगिती/जैसे थे आदेश पारीत केले आहे काय?

होय/ नाही

११

नोंदविलेल्‍या फेरफार नोंदीविरूध्‍द आक्षेप दाखल झाला आहे काय?

होय/ नाही

मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई- औरंगाबाद खंडपीठ, यांनी दिनांक १३.४.२०११ रोजी फौजदारी अर्ज क्र. ४९२४/२०१०, ४९२५/२०१०, (व्‍यंकट लिंबाजी कोळी वि. महाराष्‍ट्र शासन व इतर) या प्रकरणात निकाल देतांना स्‍पष्‍ट केले आहे की,

"फेरफार नोंद प्रमाणीत करणे हा न्यायिक अधिकार्‍याकडून न्यायिकरित्या घेण्‍यात आलेला निर्णय आहे आणि म्हणूनच अशी कृती भारतीय दंड विधानाच्‍या कलम ७७ च्‍या व्याप्तीमध्ये येते."

Comments

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel