उत्तराधिकार कायदे
एका
वयोवृध्द व्यक्तीचे, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांशी
असलेले संबंध
अतिशय ताणलेले होते. त्यांच्या मृत्युनंतर
त्यांच्या
मालमत्तेचे काय होईल हे विचारण्यासाठी ते एका वकीलांकडे गेले. प्रश्न
विचारल्यानंतर वकीलांनी उत्तर दिले की, तुमची
संपत्ती, तुमच्या मृत्युनंतर तुमच्या कायदेशीर वारसांकडे जाईल.
परंतु त्यांचा हट्ट होता की, त्यांच्या मृत्युनंतरही
त्यांची मालमत्ता
त्यांच्याच
नावावर
ठेवण्यात
यावी.
मृत्युनंतरही
आपल्या नावावर संपत्ती असावी अशी इच्छा असणारी व्यक्ती वकीलांना कधीच
भेटली नसावी.
जगातील
प्रत्येकजण असा विचार करू लागला तर काय होईल? या प्रश्नाने
वकीलांना
काळजीत
टाकले. वकीलांनी त्यांना समजावले की, भारतात जे उत्तराधिकार कायदे
आहेत ते
कोणत्याही
परिस्थितीत असे
होण्यापासून
प्रतिबंध करतात,
अगदी मयत व्यक्ती
कोणत्याही कायदेशीर वारसांशिवाय मरण पावली तरीही.
उत्तराधिकार
म्हणजे अशी
प्रक्रिया
ज्याद्वारे मयत (मृत)
व्यक्तीची मालमत्ता, त्याच्या मृत्युनंतर कायदेशीर
वारसांकडे प्रक्रांत
होणे.
दोन
प्रमुख कारणांमुळे
उत्तराधिकार अनिवार्य आहे:
१) कोणतीही मालमत्ता
कोणत्याही वेळी मालकहीन (ownerless) राहू
शकत नाही.
२) मालमत्ता परिभ्रमणात
(circulation) राहिली पाहिजे.
एखाद्या
व्यक्तीच्या मालकीची मालमत्ता, जरी त्याची वैयक्तिक मालमत्ता असली तरी, राज्यालाही
त्या
मालमत्तेत
आर्थिक कारणांसाठी स्वारस्य असते आणि म्हणून मालमत्तेसाठी
मालक असणे नेहमीच अभिप्रेत
आहे.
परिभ्रमणात
असलेली
मालमत्ताच अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकते.
¡ उत्तराधिकार कधी उघडतो (अंमलात येतो)?
उत्तराधिकार
उघडण्याची (अंमलात
येण्याची) वेळ
ही मयत व्यक्तीच्या
मृत्युनंतर
लगेचच असते. त्यामुळे, मयत व्यक्तीच्या मालमत्तेचा वारस कसा असेल
हे
ठरवण्यासाठी मयत व्यक्तीच्या
मृत्युसमयी
अस्तित्वात
असलेली परिस्थिती कारणीभूत
ठरते.
उत्तराधिकाराचे
दोन प्रकार आहेत.
१) अकृतमृत्युपत्र (मृत्युपत्र
न करता) (intestate): जेव्हा
एखादी व्यक्ती,
उत्तराधिकार प्रदान करणारे मृत्युपत्र न बनवता मरण पावते तेव्हा अकृतमृत्युपत्र
उत्तराधिकार लागू
होतो.
२) मृत्युपत्राने
प्राप्त होऊ शकणारा (testamentary): जर
एखाद्या व्यक्तीने आपल्या मालमत्तेबाबत मृत्युपत्र केले
असेल
तर ते मृत्युपत्र उत्तराधिकार देण्यास सक्षम असेल, त्याला
मृत्युपत्रान्वये उत्तराधिकार असे म्हटले जाते.
एखाद्या
व्यक्तीने केवळ
त्याच्या मालमत्तेच्या काही भागासाठी मृत्युपत्र केले असल्यास, ज्या
मालमत्तेसाठी मृत्युपत्र केले आहे त्या भागासाठी मृत्युपत्रान्वये
उत्तराधिकार
लागू होईल आणि उर्वरित मालमत्ता अकृतमृत्यपत्र उत्तराधिकाराने
प्रक्रांत
होईल.
एखाद्या
व्यक्तीने केलेले
मृत्युपत्र अवैध
ठरल्यास,
अकृतमृत्यपत्र
उत्तराधिकार
लागू होईल.
अकृतमृत्युपत्र
प्रकरणांमध्ये, मयत व्यक्तीची
मालमत्ता,
त्याला
लागू असलेल्या वैयक्तिक
कायद्यानुसार
त्याच्या कायदेशीर वारसांना वितरीत केली जाते.
भारतातील
धर्म
आणि संस्कृतीतील विविधतेमुळे, सर्व व्यक्तींच्या उत्तराधिकारावर अनेक कायदे लागू
आहेत.
मयत व्यक्तीच्या
धर्मानुसार कायदे भिन्न
असतात.
मयत व्यक्तीचा
त्याच्या मृत्युसमयी असलेला
धर्म त्याच्या मालमत्तेच्या उत्तराधिकारासाठी लागू असलेला कायदा निर्धारित करतो.
हिदू
धर्मियांसाठी - हिंदू
उत्तराधिकार कायदा, १९५६ आणि असंहिताबध्द हिंदू
कायदा
मुस्लिम
धर्मियांसाठी - असंहिताबध्द
मुस्लिम
कायदा/ शरियत
कायदा
ख्रिश्चन
धर्मियांसाठी
-
भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५(भाग पाचवा, प्रकरण II)
विशेष
विवाह कायदा, १९५४ अंतर्गत विवाहित
व्यक्तींसाठी
(विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह केलेले दोन हिंदू वगळता) -भारतीय उत्तराधिकार कायदा,
१९२५ (भाग
पाचवा, प्रकरण II)
पारशी
धर्मियांसाठी
-
भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ (भाग पाचवा,
प्रकरण
III)
íहिंदूंसाठी,
संयुक्त हिंदू कुटुंब, सहदायकी आणि त्याची मालमत्ता
ही संकल्पना मुख्यत्वे असंहिताबध्द कायद्याद्वारे
हाताळली जाते.
íमुस्लिम
धर्मिय उत्तराधिकाराशी
संबंधित संपूर्ण कायदा असंहिताबध्द आहे.
í विशेष
विवाह कायदा, १९५४ हा एक विशेष कायदा
आहे जो कोणत्याही दोन व्यक्तींना त्यांचा धर्म,
जात, पंथ इत्यादी विचारात न घेता विवाह करण्याची परवानगी देतो. या कायद्यानुसार विवाह
करणार्या दोन व्यक्तींच्या मालमत्तेचा वारसा भारतीय उत्तराधिकार कायदा
१९२५ अन्वये नियंत्रित केला जातो त्यांच्या
संबंधित
धार्मिक / वैयक्तिक कायद्यान्वये नाही. तथापि,
जेव्हा दोन हिंदू व्यक्ती विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह करतात, तेव्हा ते हिंदू
उत्तराधिकार कायदा, १९५६ अन्वये नियंत्रित
केले जातात,
भारतीय
उत्तराधिकार कायदा, १९२५ अन्वये नाही.
(विशेष विवाह कायदा १९५४, कलम २१ आणि २१-अ)
दरडोई
वितरण (Per capita
distribution):-
मालमत्ता सर्व वारसांमध्ये समान रीतीने वितरीत केली जाते.
शाखानिहाय
वितरण
(Per stirpes
distribution):- वारस ज्या शाखांशी संबंधित आहेत त्यांनुसार
त्यांच्यामध्ये
समान वितरण केले जाते.
पूर्ण
रक्त आणि अर्ध रक्त नातेवाईक (Full Blood
and Half Blood Relatives):-
पूर्ण
रक्त नातेवाईक (Full blood
relatives) म्हणजे,
ज्यांचे
वडील आणि आई एकच आहे.
अर्ध रक्त
नातेवाईक (Half blood
relatives) म्हणजे
ज्यांचे
वडील
समान आहेत परंतु आई भिन्न आहे.
कालांतराने
अनिल आणि लता यांचा घटस्फोट झाला. नंतर
अनिलने वंदना सोबत लग्न केले. अनिल आणि वंदनाला शंतनु हा मुलगा झाला.
कालांतराने
वंदनाने अनिल पासून
घटस्फोट घेऊन
अशोक सोबत लग्न केले.
पुढे अशोक आणि वंदना यांना सुनिल नावाचा मुलगा झाला.
यात
सुरेश आणि
रमेश
हे पूर्ण
रक्ताचे
नातेवाईक आहेत
कारण त्यांची आई आणि
वडील
एकच
आहेत.
सुरेश,
रमेश आणि
शंतनु
अर्ध रक्त
नातेवाईक आहेत कारण त्यांचे वडील समान आहेत परंतु माता
भिन्न
आहेत. (यांना
एकरक्त संबंधी नातेवाईक
(consanguine blood
relatives) म्हणूनही ओळखले जाते)
रमेश,
सुरेश आणि
सुनिल
सुद्धा
अर्ध
रक्त नातेवाईक
आहेत कारण त्यांची आई एकच आहे परंतु वडील भिन्न आहेत. (सहोदर
नातेवाईक
(Uterine
blood relatives) म्हणूनही ओळखले
जाते.)
मृत्युच्या
वेळी हिंदू धर्मिय
असलेल्या
कोणत्याही
व्यक्तीला
हा कायदा
लागू होईल.
तो
याद्वारे-
जन्म,
किंवा धर्मांतरामुळे
हिंदू
असू शकतो.
बौध्द,
शीख
आणि जैन यांनाही हा
कायदा लागू
होतो.
अनुसूचित
जमाती या कायद्याद्वारे शासित नाहीत. प्रचलित पद्धती अनुसूचित जमातीच्या उत्तराधिकाराचे
नियमन करतात.
एखादी व्यक्ती
जन्माने
हिंदू
असली तरी,
जर त्याने
धर्मांतर केले असल्यास;
किंवा
त्याने विशेष
विवाह कायदा, १९५४
अन्वये बिगर
हिंदूसोबत विवाह केला असल्यास;
[विशेष
विवाह कायदा, १९५४,
कलम २१ आणि
२१
अ]
[कलम
५(१)]
भारतीय
रहिवासी नसल्यास, त्याला हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६
लागू
होणार
नाही.
¡ हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ अन्वये हिंदू व्यक्तीची कोणती मालमत्ता नियंत्रित केली जाते?
एखाद्या
हिंदू पुरुष किंवा स्त्रीची विना मृत्युपत्र असणारी कोणतीही
मालमत्ता या कायद्याद्वारे नियंत्रित केली जाते.
बिगर-हिंदूशी
विवाह करणार्या हिंदू व्यक्ती मालमत्ता
हिंदू उत्तराधिकार कायद्याद्वारे नियंत्रित केली न जाता भारतीय
उत्तराधिकार कायदा, १९२५, भाग V, प्रकरण II द्वारे
नियंत्रित केली जाते.
कलम
३(जे) कायदेशीर नातेसंबंधाने 'संबंधित' या शब्दाची
व्याख्या
करते.
परंतु, अवैध मुले
त्यांच्या आईशी आणि एकमेकांशी संबंधित असल्याचे मानले जाईल आणि त्यांचे वैध वंशज त्यांच्याशी
आणि एकमेकांशी संबंधित असल्याचे मानले जाईल; आणि नातेसंबंध व्यक्त करणारा किंवा सूचित
करणारा कोणताही शब्द, नातेवाईकाचा अर्थ त्यानुसार लावला जाईल.
कायदेशीर/
औरस मुलांना
त्याच्या
वडिलांच्या आणि आईच्या मालमत्तेत वारसा मिळू शकतो
परंतु अनौरस
मुलांना
फक्त
त्याच्या आई आणि तिच्या नातेसंबंधांच्या मालमत्तेचा वारसा मिळू शकतो.
¡ हिंदू पुरुष आणि महिला लागू होणार्या हिंदू उत्तराधिकाराच्या सामान्य तरतुदी:
१) अर्ध रक्त नातेवाईकांपेक्षा
पूर्ण रक्त नातेवाईकांना प्राधान्य दिले जाते.
(हिंदू वारसा कायदा १९५६, क.१८)
२) खातेदाराच्या मृत्युच्या
वेळी गर्भात
असलेले आणि नंतर जीवंत जन्मलेले आपत्यही, जन्मलेल्या मुलाच्या
प्रमाणेच मालमत्तेचे हक्कदार असेल. (हिंदू वारसा
कायदा १९५६, क.२०)
३) दोन व्यक्तींचा एकाचवेळी मृत्यू
झाल्यास,
असे
गृहीत धरले जाते की वयाने लहान व्यक्ती वयाने मोठी असलेल्या व्यक्तीमागे हयात
होती. (हिंदू वारसा कायदा १९५६, क. २१)
४) वर्ग
एकच्या वारसांना अग्रहक्काचा अधिकार आहे. जेव्हा इतर कोणत्याही वर्ग
एकच्या वारसाला
मिळालेल्या मालमत्तेतील त्याच्या/तिच्या स्वारस्याची विल्हेवाट लावायची असेल, तेव्हा
इतर वर्ग एक च्या वारसांना ती खरेदी करण्याचा अग्रहक्क असेल. (हिंदू वारसा कायदा १९५६, क.२२)
अकृतमृत्युपत्र मयत हिंदू पुरुषाची
संपत्ती खालील उत्तराधिकार्यांकडे वितरीत होते:
१) वर्ग एकचे
वारस
(एकूण १६)
२) वर्ग दोनचे
वारस गट
(एकूण ९ गट)
३)
सगोत्र वारस (Agnates)
४)
भिन्न गोत्र (Cognates)
५) सरकार (हिंदू
वारसा कायदा १९५६, क.२९)
वरील
क्रमाने वारसांना प्राधान्य दिले आहे. वर्ग एकच्या वारसांना
वर्ग दोनच्या
पेक्षा
प्राधान्य दिले जाते, वर्ग दोनच्या वारसांना सगोत्र
वारसांपेक्षा प्राधान्य
दिले जाते, सगोत्र
वारसांना भिन्न गोत्र वारसांपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाते आणि जर त्यापैकी
कोणीही उपस्थित नसेल तर मयताची मालमत्ता सरकारकडे हस्तांतरित
होते.
¡ वर्ग एकच्या उत्तराधिकार्यांमध्ये वितरणाचे नियम
मयताचा प्रत्येक
मुलगा आणि मुलगी, विधवा आणि मयत व्यक्तीची आई
यांचा समान
हिस्सा असेल. प्रत्येकजण
एक एक हिस्सा
घेतील.
पूर्वमृत
मुलाचा
मुलगा,
मुलगी आणि
विधवा
यांना
जीवंत
मुलाच्या हिश्शाइतका
वाटा दिला जाईल.
या
पूर्वमृत मुलाच्या शाखेला वाटप केलेल्या अशा हिश्श्यापैकी, त्याची विधवा आणि प्रत्येक
जीवंत मुलगा
आणि मुलगी समान हिस्सा
घेतील
आणि कोणत्याही पूर्वमृत मुलाच्या शाखेलाही समान हिस्सा मिळेल.
पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीच्या शाखेला लागू
असलेले नियम सारखेच आहेत.
मुलगा
किंवा मुलगी यांच्या पश्चात मयत मुलीला जीवंत मुलीच्या
बरोबरीचा हिस्सा
दिला
जाईल.
असा
हिस्सा
पूर्वाश्रमीच्या
मुलीच्या मुला-मुलींकडून समान प्रमाणात घेतला जाईल.
¡ वर्ग दोनचे वारस: (कलम ८ ते १३)
हिंदू
कायदा,
वर्ग दोनच्या नऊ गटातील उत्तराधिकार्यांना मान्यता देतो :
वर्ग
एकचे कोणतेही वारस उपलब्ध नसतील तरच वर्ग दोन मधील वारस लागू होतील.
वर्ग
दोनच्या वारसांमध्ये नऊ गट आहेत.
वर्ग
दोनच्या गट एकमधील वारस उपलब्ध नसतील तरच गट दोनमधील वारसांना प्राधान्य
दिले जाईल, त्याचप्रमाणे इतर गटांसाठी पालन केले जाईल.
परंतु
कोणत्याही एका
गटातील एकापेक्षा
जास्त वारसांना
सम
प्रमाणात मालमत्ता
मिळेल.
वर्ग एक आणि वर्ग दोन
वारसांच्या अनुपस्थितीत
मयताची मालमत्ता त्याच्या
सगोत्र वारसांकडे प्रक्रांत होईल. यांना इंग्रजीत ऍग्नेट्स
(Agnates) म्हणतात.
मयताशी
रक्ताने
किंवा पूर्णपणे पुरुषांद्वारे, दत्तक विधान
संबंधित
असतील तर एखादी व्यक्ती दुसर्याची गोत्रज आहे असे म्हटले
जाते. [क.३(१)(अ)].
अशा प्रकारे जेव्हा मयत व्यक्ती आणि संबंधित नातेवाईक यांच्यामध्ये
एखादी रेषा शोधली आणि
जर
त्या ओळीत फक्त पुरुष दिसले तर त्या नातेवाईकाला मयत व्यक्तीचे
गोत्रज
मानले जाते. मयत व्यक्तीचे किंवा संबंधित नातेवाईकाचे लिंग (Gender) असंबद्ध (irrelevant) आहे.
¡ गोत्रज
तीन प्रकारचे
असू शकतात:
१) वंशज गोत्रज (Descendant
Agnates): पुत्राचा पुत्र, पुत्राच्या
पुत्राचा पुत्र,
पुत्राच्या
पुत्राची मुलगी. इ.
२) वर्चस्व असणारे गोत्रज
(Ascendant Agnates): वडिलांचे वडील,
वडिलांच्या
वडिलांचे
वडील, वडिलांच्या वडिलांची
आई. इ.
३) संपार्श्विक/समस्तर गोत्रज
(Collateral Agnates): भावाचा
मुलगा, भावाच्या मुलाचा मुलगा, भावाच्या मुलाची मुलगी इ.
बर्याच
गोत्रजांचा
आधीच
वर्ग एक
किंवा
वर्ग दोन
च्या वारसांमध्ये
समावेश
आहे. ज्यांचा वर्ग एक किंवा वर्ग दोनच्या
वारसांमध्ये समावेश
नाही ते वर्ग एक
आणि
वर्ग दोनच्या
वारसांच्या अनुपस्थितीत
मालमत्ता ग्रहण करतील.
वर्ग
एक,
वर्ग दोन आणि गोत्रज यांच्या अनुपस्थितीत, मयताची
मालमत्ता, त्याच्या भिन्न गोत्रज वारसांकडे प्रक्रांत होईल. जेव्हा
मयत व्यक्ती
आणि संबंधित नातेवाईक यांच्यामध्ये एक रेषा शोधली जाते आणि त्या ओळीत एक स्त्री दिसली
तर
संबंधित
नातेवाईक मयत व्यक्तीचा
भिन्न
गोत्रज समजला
जातो.
मयताचे मातृबंधू, म्हणजेच रक्ताच्या नात्यामुळे किंवा दत्तकग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध नसलेल्या, भिन्न गोत्र असलेल्या व्यक्ती.
१) वंशज भिन्न
गोत्रज
(Descendant Cognates): मुलीचा
मुलगा, मुलाच्या मुलीचा मुलगा, मुलीची मुलगी इ.
२) वर्चस्व असणारे भिन्न गोत्रज
(Ascendant Cognates): आईचे
वडील, वडिलांच्या
आईचे
वडील, आईचे आई
इ.
३) संपार्श्विक भिन्न गोत्रज
(Collateral Cognates): बहिणीचा
मुलगा, भावाच्या मुलीचा मुलगा, बहिणीची मुलगी इ. (Cognates) भिन्न
गोत्रज
¡ गोत्रज आणि भिन्न गोत्रज यांमध्ये वितरणाचे नियम
१) भिन्न गोत्रजांपेक्षा
गोत्रजांना प्राधान्य
दिले
जाते.
२) गोत्रजांमध्ये,
वंशज गोत्रजांना
वर्चस्व असणार्या गोत्रजांपेक्षा प्राधान्य दिले जाते आणि वर्चस्व
असणार्या गोत्रजांपेक्षा संपार्श्विक गोत्रजांपेक्षा
प्राधान्य दिले जाते.
३) वंशज गोत्रजांमध्ये,
वंशाचा
अधिक
अंश असलेल्यांपेक्षा कमी अंश असलेल्याला प्राधान्य दिले जाते.
४) जर वंशज गोत्रज
नसतील,
तर वर्चस्व
असणार्या गोत्रजांना मालमत्ता दिली जाऊ शकते.
५) वर्चस्व प्रमाण
कमी असलेल्यांना जास्त वर्चस्व असलेल्यांपेक्षा प्राधान्य दिले
जाते.
६)
जर
वंशज गोत्रज आणि वर्चस्व
असणारे गोत्रज दोन्ही अनुपस्थित असतील, तर मालमत्ता संपार्श्विक
गोत्रजांकडे
प्रक्रांत होईल. संपार्श्विकांमध्ये, वर्चस्वाचे
प्रमाण
कमी असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. आरोहण समान असल्यास, प्रभाव
कमी
असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. जर आरोहण आणि उतरण या दोन्ही अंश समान असतील तर त्या
सर्वांवर मालमत्ता समान रीतीने प्रक्रांत होईल.
उत्तराधिकाराच्या
उद्देशाने, हिंदू स्त्रीच्या मालमत्तेची तीन मुख्य श्रेणींमध्ये
विभागणी केली जाते:
१) पती किंवा सासऱ्याकडून वारसहक्काने
मिळालेली
मालमत्ता
जर
हिंदू स्त्रीला,
तिच्या तिच्या पतीच्या
किंवा
सासऱ्याच्या
मृत्युनंतर
कोणतीही मालमत्ता वारसाहक्काने मिळाली असेल तर, अशा हिंदू
स्त्रीच्या मृत्युनंतर
ती
मालमत्ता पुढील
वारसांना
वितरीत
होईल (हिंदू
वारसा कायदा १९५६, क. १५(१)
अ) मयत हिंदू स्त्रीचा
मुलगा आणि मुलगी, (यात
पूर्वमृत
मुलाच्या किंवा मुलीच्या मुलांचा समावेश असेल) आणि पतीकडे,
ब) उक्त वारस नसतील तर पतीच्या
वारसांकडे.
वडिलांच्या
किंवा आईच्या मृत्युनंतर
हिंदू
स्त्रीला
उत्तराधिकाराने
मिळालेल्या
संपत्तीचा समावेश होतो. ही मालमत्ता क. १५(१) मध्ये
काहीही नमूद असले तरी,
पुढील
वारसांना
वितरीत होईल. (हिंदू
वारसा कायदा १९५६, क. १५(२)
अ) मयत हिंदू स्त्रीचा
मुलगा व मुलगी यांच्यावर, (यात पूर्वमृत मुलाच्या
किंवा मुलीच्या मुलांचा समावेश असेल)
तथापि, जर मयत हिंदू
स्त्रीला
उक्त वारस नसतील तर, वडिलांकडून किंवा आईकडून वारस हक्काने मिळालेली
मालमत्ता,
थेट
वडिलांच्या वारसांकडे
प्रक्रांत होईल.
íमयत हिंदू
स्त्रीचा पती जिवंत असला तरीही, वडिलांकडून किंवा आईकडून वारस हक्काने
तिला मिळालेली
मालमत्ता,
पतीला वारहक्काने
मिळणार नाही.
मयत
हिंदू
स्त्रीने,
स्वतःच्या
प्रयत्नाने मिळवलेली संपत्ती,
तिला इतरांकडून
भेट म्हणून प्राप्त संपत्ती, (वडील, आई, पती
किंवा सासरे यांच्याकडून मिळालेल्या संपत्तीसह).
इतरांकडून मृत्युपत्राने मिळालेली संपत्ती, (वडील, आई,
पती किंवा सासरे यांच्याकडून मृत्युपत्राने
मिळालेली संपत्तीसह).
इतर नातेवाईकांकडून वारसहक्काने मिळालेली संपत्ती, (वडील,
आई, पती आणि सासरे यांच्या व्यतिरिक्त इतर नातेवाईकांकडून).
तिने खरेदी
केलेली मालमत्ता.
विभाजन, वाटप,
संपादन, दान, न्यायलयीन आदेशान्वये तिला मिळालेली मालमत्ता.
मयत
हिंदू
स्त्रीची
उक्त ही
मालमत्ता पुढील वारसांकडे प्रक्रांत होईल.
अ) प्रथमतः मयत
हिंदू
स्त्रीचा मुलगा आणि मुलगी, (यात पूर्वमृत मुलाच्या
किंवा मुलीच्या मुलांचा समावेश असेल) आणि पतिकडे,
ब) उक्त वारस नसतील तर पतीच्या
वारसांकडे.
क) उक्त वारस नसतील तर तिच्या माता-पित्याकडे.
ड) उक्त वारस नसतील तर तिच्या
पित्याच्या वारसांकडे.
इ) उक्त वारस नसतील तर शेवटी
तिच्या मातेच्या वारसांकडे, कलम १६ मधील तरतुदीन्वये.
फ) उक्त कोणीही वारस नसतील तर शेवटी,
कलम २९
अन्वये, शासनजमा होईल.
१) ज्याच्या मालमत्तेत उत्तराधिकार
मिळणार आहे त्याचा खून करणार्या किंवा त्याच्या खुनाला
अपप्रेरणा/प्रोत्साहन
देणार्या व्यक्तीला, खून झालेल्या व्यक्तीच्या मालमत्तेत वारसाहक्क मिळणार
नाही. (हिंदू
वारसा कायदा १९५६, क. २५)
२) जी हिंदू व्यक्ती
धर्मांतर
करते
आणि
हिंदू असण्याचे
सोडून देते
ती वारसाहक्काला अपात्र
ठरत नाही. परंतु अशा
धर्मांतरानंतर
त्याला जन्मलेली मुले आणि त्याचे वंशज हे उत्तराधिकार/ वारसाहक्क
अंमलात
येण्याच्या
वेळी हिंदू नसल्यास, हिंदू नातेवाईकांच्या मालमत्तेत वारस
ठरण्यास अपात्र
ठरवले जातील.
(हिंदू
वारसा कायदा १९५६, क. २६)
उदा. सुरेश या हिंदू
व्यक्तीच्या
अनिल
या मुलाने ख्रिश्चन
धर्म स्वीकारला असेल
आणि अनिलला धर्मांतरानंतर
बबन
हा मुलगा
झाला
असेल तर सुरेशच्या मृत्युनंतर अनिलला वारसाहक्काने सुरेशच्या मालमत्तेत हिस्सा
मिळेल परंतु बबन हा
सुरेशचा वारस ठरणार नाही.
¡ ख्रिश्चन
उत्तराधिकारासाठी कोणता कायदा लागू होतो?
ख्रिश्चन
धर्मियांना भारतीय
उत्तराधिकार कायदा, १९२५, भाग V, प्रकरण II (कलम - २७ ते ४९) लागू
होतात. विशेष
विवाह कायदा, १९५४
अंतर्गत
विवाह करणाऱ्यांनासुध्दा
या
तरतुदी लागू होतात. (विशेष विवाह कायदा, १९५४, क. २१)
(अपवाद- दोन हिंदूंनी
विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह केल्यास. - कलम २१-अ).
१) ख्रिश्चन महिला
आणि पुरुष यांना
लागू
असलेल्या नियमांमध्ये कोणताही फरक नाही.
२) वडिलांशी संबंधित
व्यक्ती आणि आईच्या माध्यमातून संबंधित व्यक्तींमध्ये फरक नाही.
(उदा.
वडिलांच्या वडिलांमध्ये आणि आईच्या वडिलांमध्ये फरक नाही)
३) पूर्ण रक्ताचे
आणि
अर्ध रक्ताचे
नातेवाईक यांमध्ये
फरक नाही.
४) पुरुष किंवा स्त्री
जोडीदाराच्या अधिकारांमध्ये कोणताही फरक नाही. म्हणजेच, मयत ख्रिश्चन
पुरुषाच्या पत्नीचे आणि मयत ख्रिश्चन स्त्रीच्या
पतीचे हक्क समान आहेत.
¡ ख्रिश्चन धर्मिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मालमत्तेचे वितरण कसे केले जाते ?
ख्रिश्चन
धर्मियांच्या वारसांचे तीन मुख्य गट
आहेत:
मयताचा
जोडीदार (Spouse)
मयत व्यक्तीचे
रेषीय वंशज (Lineal descendants) (
वंशाच्या थेट रेषेतील एक रक्त नातेवाईक - मुले, नातवंडे, पतवंडे इ.)
मयत व्यक्तीचे
नातलग (रेषीय
वंशज सोडून इतर सर्व रक्त किंवा विवाहाशी संबंधित
लोकांचा समूह - (kindred)
जोडीदार,
उपलब्ध
असल्यास
त्याला
नेहमी
वाटा मिळतो. तो
कधीही
वगळला जात नाही.
रेषीय
वंशजांच्या उपस्थितीत, नातलग वगळण्यात येतात.
१. जोडीदारासह
रेषीय
वंशज (Spouse with lineal
descendants): जोडीदाराला
१/३
आणि
रेषीय वंशजांना सामाईकपणे
२/३ हिस्सा मिळतो.
२. जोडीदारासह
नातेवाइक
(Spouse with
Kindred): जोडीदारास
१/२
आणि
नातेवाईकास १/२
हिस्सा मिळतो.
३. फक्त जोडीदार, रेषीय वंशज किंवा
नातेवाईक नसतांना (Only
Spouse without lineal descendants or kindred): फक्त
पती/पत्नीला संपूर्ण मालमत्ता मिळेल.
४. जोडीदारासह
रेषीय
वंशज आणि
नातेवाईक
(Spouse with lineal
descendants and kindred): जोडीदाराला १/३, रेषीय
वंशजांना
२/३
हिस्सा मिळतो आणि
नातेवाईक वगळण्यात येतात.
५. पती/पत्नी नसतांना
रेषीय
वंशज आणि
नातेवाईक
(Lineal descendants
with kindred, but no spouse): रेषीय
वंशजांना
संपूर्ण मालमत्ता मिळेल, नातेवाईक वगळले जातील.
६. फक्त नातेवाईक
(Only Kindred): नातेवाईकांना संपूर्ण मालमत्ता
मिळेल.
७. फक्त रेषीय वंशज (Only Lineal Descendants): रेषीय वंशजांना
संपूर्ण
मालमत्ता मिळेल.
१. एका शाखेच्या
जवळच्या
रेषीय वंशजाचे अस्तित्व त्याच शाखेतील दूरस्थ रेषीय वंशजाला वगळेल.
उदा.
मुलगा आणि त्याच मुलाचा मुलगा असेल तर फक्त मुलगाच वडिलांच्या मालमत्तेचा वारसा घेईल
आणि मुलाचा मुलगा वगळला जाईल.
परंतु
एडिसन
जिवंत
असल्याने, अल्बर्टला
जॉनच्या मालमत्तेत
हिस्सा मिळणार
नाही.
कारण
एडिसन
हा पूर्वमृत आहे
आणि त्याचा अल्बर्ट
हा प्रतिनिधी
उपलब्ध
आहे.
उदा. मयत जॉनला अब्राहम, एडिसन आणि
एन्थोनी ही मुले आहेत. जॉनच्या पश्चात या सर्व रेषीय वंशजांना,
ते समान
दर्जाचे (मुले)
असल्यामुळे समान
रीतीने मालमत्ता मिळेल, म्हणजे प्रत्येकाला १/३ वाटा
मिळेल.
जॉनच्या
पश्चात त्याचे येथे
चार
रेषीय
वंशज आहेत - दोन
मुले
- अब्राहम
आणि
एन्थोनी
आणि
दोन
नातवंडे
– बेंजामीन आणि ब्रेडन.
रेषीय
वंशज भिन्न
शाखेचे असल्याने
त्यांना शाखानिहाय
वाटा मिळेल.
त्यामुळे प्रत्येक मुलाच्या शाखेला समान
प्रमाणात वाटा
मिळेल
-
अब्राहम
- १/३
एडिसन
- १/३
एन्थोनी
- १/३
मयत
एडिसनचा
एक तृतीयांश हिस्सा नंतर त्याच्या बेंजामीन आणि ब्रेडन या मुलांमध्ये
समान प्रमाणात वितरित केला जाईल:
बेंजामीन
- १/६
ब्रेडन
- १/६
अंतिम
हिस्सा
खालीलप्रमाणे
असेल:
अब्राहम
- १/३
एन्थोनी
- १/३
बेंजामीन
- १/६
ब्रेडन
- १/६
१. नातेवाईक म्हणून,
मयताच्या
वडिलांना इतर सर्वांना
वगळून
मालमत्ता मिळते.
२. वडिलांच्या अनुपस्थितीत,
मयत व्यक्तीची
आई, भाऊ आणि बहिणीला मालमत्ता दिली जाते. मयत व्यक्तीच्या
भावाचा किंवा बहिणीचा संबंधित मयत व्यक्तीच्या मृत्युपूर्वी
मृत्यू झाला
असल्यास, त्यांचा
हिस्सा त्यांच्या मुलांमध्ये वाटला जातो.
३. आईच्या अनुपस्थितीत,
मयताचा
भाऊ आणि बहीण कोणत्याही पूर्वमृत भावाच्या किंवा बहिणीच्या मुलांसह
मालमत्ता घेतात.
४. कोणताही भाऊ किंवा
बहीण किंवा पूर्वमृत
भाऊ
किंवा बहिणीची मुले नसताना आईला मालमत्ता मिळते.
५. जेव्हा मयत व्यक्तीची
आई, भाऊ किंवा बहीण उपलब्ध नसतात, तेव्हा खालील नियमांच्या
अधीन राहून मालमत्ता मयत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये
वाटली जाऊ शकते:
अ. जवळच्या नातेवाईकांची
उपलब्धता
दूरस्थ
व्यक्तीला वगळते.
ब. समान दर्जा
असलेल्या
सर्व नातेवाईकांना समान प्रमाणात हिस्सा मिळतो.
¡ भारतीय
उत्तराधिकार कायदा, १९२५ - भाग पाच, प्रकरण
तीन, कलम
५०
ते
५६
मध्ये
अकृतमृत्युपत्र
पारसी उत्तराधिकाराचे
नियम समाविष्ट आहेत.
१. अकृतमृत्युपत्र पारसी पुरूष
किंवा महिला यांच्या
वारसाहक्काच्या
तरतुदींमध्ये कोणताही फरक नाही.
२. मृत्युच्या
वेळी मातेच्या पोटात असलेल्या मुलास जीवंत मुलाप्रमाणे
हिस्सा
मिळण्याचा
हक्क असतो.
३. अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या
हयातीत, पुनर्विवाह केलेला कोणताही पती/पत्नी किंवा नातेवाइक, अकृतमृत्युपत्र
व्यक्तीच्या मालमत्तेचा वारसा घेण्यास पात्र नसतात.
ज्युलीने
सन २०१९ मध्ये बेहरामसह पुनर्विवाह केला.
ज्युलीने
सन २०१७ मध्ये
पुनर्विवाह केल्यास ज्युली वगळण्यात येईल.
कारण सन २०१८ मध्ये
ती अब्बासची पत्नी
नाही, म्हणूनच तिला काहीही मिळणार नाही.
ज्युलीने सन
२०१९ मध्ये
पुनर्विवाह केला
तर काही
फरक पडत नाही, कारण
अब्बासच्या मृत्युनंतर तिने विवाह केला आहे, ज्युली अब्बासची मालमत्ता
घेईल.
अ) जेव्हा
मयत व्यक्तीची मुले
किंवा रेषीय
वंशज
(children or lineal
descendants) उपलब्ध
आहेत:
ए) जिथे मयत व्यक्तीची फक्त
मुले उपलब्ध
आहेत -
सर्व मुलांना
मालमत्तेत
समान
हिस्सा
मिळेल. (कलम
५१)
बी) जिथे मयत व्यक्तीची मुले
आणि विधवा उपलब्ध
आहेत
- सर्व मुलांना
आणि
विधवेला
मालमत्तेत
समान
हिस्सा
मिळेल. (कलम
५१)
सी) जिथे मयत व्यक्तीची मुले, विधवा
आणि पालक (children, spouse
and parents) उपलब्ध
आहेत
- मुले आणि विधवा मालमत्तेत समान वाटा घेतात आणि प्रत्येक पालकाला एका मुलाला
मिळणाऱ्या हिश्शाच्या
निम्मा
हिस्सा मिळेल. (कलम ५१)
उदाहरण : एका मयत पारशी
व्यक्तीचे
वडील,
विधवा आणि दोन
मुले
उपलब्ध
आहेत.
तर
वडील- १/७; विधवा
आणि दोन
मुले
प्रत्येकी-
२/७ हिस्सा घेतील.
डी) वरीलपैकी कोणत्याही
प्रकरणात, जर मुलाचा मृत्यू आधी झाला असेल तर,
i) पूर्वमृत रेषीय
वंशज हा एक पुत्र
असेल तर- तो मयत व्यक्तीच्या मृत्युच्या
वेळी जिवंत होता
असे गृहीत
धरण्यात
येईल.
तो जिवंत असल्याप्रमाणे त्याचा हिस्सा त्याला देण्यात
येईल आणि
नंतर पारसी
नियमांनुसार
त्याचा
हिस्सा वाटून घेण्यात
येईल. (क. ५३)
ii) परंतु
जर अशा पूर्वमृत पुत्राचा कोणताही रेषीय वंशज
उपलब्ध
नसेल तथापि,
(१)
त्याची
विधवा किंवा
(२)
रेषीय
वंशजाची
विधवा किंवा विधूर उपलब्ध
असेल तर,
पूर्वमृत
पुत्राला
त्याचा
हिस्सा
मिळेल आणि
हा हिस्सा आता कलम ५४ अन्वये वितरित केला जाईल. (रेषीय
वंशज उपलब्ध नसल्यामुळे
आणि रेषीय
वंशजाची
विधवा/विधूर
यांच्या
उपलब्धतेमुळे,
असे वाटप
करत असताना, सामान्यत: कलम ५४ अन्वये नातलगांकडे जाणारी
शिल्लक रक्कम ही अकृतमृत्युपत्र
व्यक्तीची मालमत्ता
होईल आणि पूर्वमृत
मुलाच्या
संपूर्ण शाखेकडे दुर्लक्ष करून त्यानुसार वितरित केली जाईल.
iii) पूर्वमृत रेषीय
वंशज ही
मुलगी असेल
तर -
तिचा हिस्सा
तिच्या
मुलांमध्ये समान रीतीने वितरित केली जाईल. (क. ५३)
ए) जिथे मयत व्यक्तीच्या
पश्चात त्याचा/तिचा जोडीदाराला उपलब्ध आहे
- जोडीदाराला
– १/२ हिस्सा आणि उर्वरित जवळच्या
नातेवाईकांना
१/२ हिस्सा.
बी) जेथे मयत व्यक्तीच्या
रेषीय वंशज वंशाचा
जोडीदार
उपलब्ध
आहे
-
i) जर वंशजांचा
एकच जोडीदार असेल तर
-
अशा जोडीदाराला १/३
वाटा
मिळेल आणि उर्वरीत
जवळच्या
नातेवाईकांना २/३
हिस्सा देण्यात
येईल.
ii) जर त्याच्या/तिच्या
रेषीय
वंशाच्या
एका
जोडीदारापेक्षा
जास्त असतील उपलब्ध
असतील - तर
- अशा त्याच्या जोडीदारास मिळून २/३ हिस्सा मिळेल आणि शिल्लक
१/३
हिस्सा जवळच्या
नातेवाईकांना दिला
जाईल.
सी) जिथे मयत व्यक्तीचा जोडीदार उपलब्ध
आहे आणि तो रेषीय वंशातील असेल तर - त्याच्या/तिच्या जोडीदाराला १/३ हिस्सा मिळेल, रेषीय
वंशाच्या पती-पत्नीला १/३ हिस्सा मिळेल आणि नातेवाईकांना १/३ हिस्सा मिळेल.
डी) नातेवाईकांमध्ये
प्राधान्य क्रमानुसार खालील व्यक्तींचा होतो:
(अनुसूची II - भाग I)
i) मयताचे
पालक
ii) मयताचे
पूर्ण रक्ताचे
भाऊ,
बहिणी आणि पूर्वमृत
भाऊ
किंवा बहिणींची मुले.
iii) मयताचे
आजी-आजोबा
iv) मयताचे
काका, काकु
आणि
मयताच्या
पूर्वमृत
काका आणि काकूंची मुले
v) मयताचे
पणजोबा
आणि आजी
vi) आजोबाचे
भाऊ,
आजोबांच्या
भावाची पत्नी, आणि त्यांची
पूर्वमृत मुले.
इ) नातेवाईक अनुपस्थित
असल्यास, संपूर्ण संपत्ती पती-पत्नींमध्ये त्यांच्या संबंधित प्रमाणात वितरीत केली
जाते.
तेथे
मालमत्ता
पुढील नातेवाईकांमध्ये वितरीत केली जाते (अनुसूची II - भाग II)
ए) मयताचे
पालक
बी) पूर्ण रक्ताचा
भाऊ, बहिणी आणि पूर्वमृत भाऊ किंवा बहिणींची मुले
सी) मयताचे
आजी-आजोबा
डी) मयताचे
काका, मावशी आणि पूर्वमृत काच्या
काका आणि काकुंची मुले
इ) मयताच्या
आजी-आजोबांचे
आजी-आजोबा
एफ) मयताच्या वडिलांचे काका आणि
काकु, आणि
मयताच्या
वडिलांचे पूर्वमृत
काका आणि काकु यांची मुले
जी) मयताचे अर्ध रक्त भाऊ,
बहिणी आणि पूर्वमृत भाऊ किंवा बहिणींची मुले
एच) मयच्या
पूर्वमृत भाऊ किंवा
बहिणींचे जोडीदार
आय) मयत व्यक्तीच्या
पूर्वमृत
काका/काकूचे
जोडीदार
जे) दहावी बाब चुकीची
असून दुर्लक्षीत
करण्यात यावी.
तेथे
मालमत्ता जवळच्या नातेवाईकांमध्ये वाटली जाईल. जर एकाच दर्जाचे
एकापेक्षा जास्त नातेवाईक असतील तर, त्यांच्यात समान प्रमाणात मालमत्ता वितरीत होईल.
¡ मुस्लिम
वारसाहक्काचे सामान्य नियम:
१) अकृतमृत्युपत्र पुरूष
किंवा
स्त्री
यांच्यात
भेद
नाही.
२) वडिलोपार्जित
संपत्ती, स्वकष्टार्जित
संपत्ती, स्वतंत्र
संपत्ती,
जंगम आणि स्थावर
मालमत्ता, भौतिक आणि अभौतिक
किंवा
मूर्त आणि अमूर्त मालमत्ता असे भेद नाहीत.
३) मुस्लिम कायद्यात कोणत्याही
मालमत्तेतील
जन्मत: हक्क
ही
संकल्पना अमान्य
आहे.
४) फक्त रक्तसंबंधी
नात्यालाच
वारस म्हणून मान्यता दिली जाते. तथापि, रक्तसंबंधी
नाते
नसलेला एकमेव वारस म्हणजे मयत व्यक्तीचा
जोडीदार (spouse) आहे.
५) जवळचे वंशज उपलब्ध असल्यास
दुरचे वंशज वगळणे हा
नियम मुस्लिम कायद्यात काटेकोरपणे पाळला जातो.
ए) जोडीदार (Spouse)
बी)
कन्या (Daughter)
सी)
पुत्र (Son)
डी)
वडील (Father)
इ) आई (Mother)
९) सावत्र आई-वडील आणि सावत्र मुले एकमेकांच्या मालमत्तेचा वारसा घेऊ शकत नाहीत. अनौरस मुलांना वडिलांच्या आणि वडिलांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेत हिस्सा मिळत नाही. आणि या उलट (vice- a- versa). (सुन्नी आणि शिया दोन्ही पंथीयांमध्ये याचे अनुसरण होते). तथापि, अनौरस मुलांना त्यांच्या आईच्या आणि तिच्या नातेसंबंधीतांच्या मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो. या उलट (सुन्नी).
उदा. अ च्या मृत्युपश्चात त्याची
विधवा, काका आणि मुलगी
वारस
असेल तर,
तर काकाला ३/४, विधवेला
१/४ हिस्सा मिळेल, मुलीला काहीही मिळणार नाही.
- - -
¡ एकापेक्षा जास्त पत्नी
असतांना एखादी
व्यक्ती मरण पावते तेव्हा काय होते?
मुस्लिम
कायदा वगळता सर्व कायदे एकपत्नीत्वाची अंमलबजावणी करतात. म्हणून, एखादी व्यक्ती एकावेळी
एकच विवाह करू शकते. त्यामुळे त्याला एकावेळी एकच पत्नी असू शकते. जर त्याने अनेक विवाह
केले असतील, तर पहिला विवाह वगळता सर्व विवाह अवैध आणि रद्दबातल
ठरतात.
आणि
त्यामुळे असा
अवैध विवाह
करणाऱ्या स्त्रीयांना
'पत्नी'चा
दर्जा मिळत नाही. असा
निरर्थक
विवाह करणाऱ्या स्त्रीयांना
मयत व्यक्तीच्या
मालमत्तेचा वारसा मिळू शकत नाही. याला खालील अपवाद आहेत:
अ) सन १९५५ पूर्वी
झालेले
असे अनेक
विवाह विवाह वैध आहेत आणि त्यामुळे अशा सर्व पत्नी वारस ठरतात.
ब) मुस्लिम कायदा
मुस्लिम
धर्मियांना
एका वेळी चार पत्नी
असण्याची
परवानगी देतो. त्यामुळे मुस्लिम धर्मिय व्यक्तीच्या अशा
सर्व पत्नींना वारसाधिकार
मिळू
शकतो आणि मयत
पतीच्या मालमत्तेतील हिस्सा त्यांच्यामध्ये समान प्रमाणात वाटला जातो.
ही
बाब, मयत व्यक्तीच्या
मृत्यूच्यावेळी मयत व्यक्तीची
आणि त्याच्या नातेवाईकांची स्थिती यावर अवलंबून आहे. जर एखाद्या
व्यक्तीचा विवाह त्याच्या मृत्यूपूर्वी, न्यायालयाच्या कायदेशीर घटस्फोट
आदेशामुळे
विच्छेदीत
झाला असेल
तर, त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचा जोडीदार हा त्याचा कायदेशीर जोडीदार
नसतो.
त्यामुळे
त्याच्या मालमत्तेवर
त्याला वारसाधिकार
मिळणार नाही.
हिंदू
सहदायकीमध्ये
सध्या हयात
असलेल्या
सर्वात ज्येष्ठ पूर्वजापासून चार पिढीच्या आत, त्या
एकत्र कुटुंबात
जन्मलेले किंवा दत्तक घेतलेले पुरुष सदस्य यांचा समावेश होतो. अशा रीतीने,
पिता, पुत्र, पुत्राचा पुत्र, पुत्राच्या पुत्राचा पुत्र हे सहदायकाचे भाग
बनतात. हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ अन्वये, सहदायकांच्या
मुलींनाही सहदायक
बनण्याची
परवानगी आहे. सहदायकीच्या
अस्तित्वासाठी, वडिलोपार्जित मालमत्तेचे अस्तित्व आवश्यक आहे. वडिलोपार्जित मालमत्ता
ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून वारसाने मिळालेली
मालमत्ता असते.
वडिलांच्या
वडिलांकडून किंवा वडिलांच्या वडिलांच्या वडिलांची मालमत्ता वडिलोपार्जित आहे. वडिलोपार्जित
मालमत्तेमध्ये प्रत्येक हिंदू सहदायकाला जन्मतः हक्क
प्राप्त होतो.
hf
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उत्तराधिकार कायदे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !