गोत्र
सुष्टी निर्माण झाली तेव्हा
मानव रानटी अवस्थेत होता. त्या काळात त्याला धर्म, कर्म, देव याविषयी काहीच माहिती नव्हती. तो केवळ देहधर्म जाणत होता. देहाला आवश्यक अशी भूक, तहान, वासना, इच्छा यांची पूर्तता करून
जीवन व्यतीत करीत होता.
अशा मानव प्राण्याला विकसित करण्यासाठी परमेश्वराने स्वर्गलोकातून ऋषीजनांना या भूमीवर पाठवून वेदविद्या, यज्ञयाग, जप-तप याद्वारे या भूमीला पावित्रय प्राप्त करून दिले. ऋषीमुनींनी भिन्न भिन्न ठिकाणी आपली गुरूकुले स्थापन करून लोकांना सज्ञान केले. ज्या गुरूकुलातुन आपण ज्ञाते झालो त्याचे स्मरण म्हणून प्रत्येकाला आपल्या गोत्राचा उच्चार वेदोक्त, पुराणोक्त विधीच्या वेळी करावा लागतो. गोत्र हा प्राचीन समाजाने निर्माण केलेल्या चालीरीतींचा एक भाग मानला जातो.
गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून
सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने
संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "मुलाच्या मुलापासून सुरू
झालेल्या वंशावळीचा उगम" असे केले आहे. गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. गोत्रामुळे एखादी व्यक्ती कोणत्या पूर्वजांचे मूल
आहे हे ठरवता येतं.
एका सामाजिक मान्यतेनुसार वंशातील सर्वच पूर्वज एका पूर्वजाचं मूल असून एकमेकांशी संबंधीत आहेत, आपण सर्वच एका ऋषीमुनीची मुलं आहोत असं समजण्यात येतं. व्यवहारिक स्वरूपात गोत्र म्हणजे ओळख.
किती गोत्र आहेत?
¡ महाभारतातील
शांतीपर्वात एका श्लोकानुसार त्यावेळी मूळ रुपात प्रमुख चार गोत्र होती.
अंगिरा, कश्यप, वशिष्ठ आणि भृगु.
पण कालांतराने त्यात,
जमदग्नि, अत्रि, विश्वामित्र
आणि अगस्ती ऋषींची नावे जोडली गेल्याने त्यांची संख्या आठ झाली. जैन धर्मातही याचा
उल्लेख आहे.
¡ अन्य एका मान्यतेनुसार, ब्रम्हदेव यांना ५९ पुत्रे असल्याचे सांगितले जाते. सुरूवातीला गोत्र ही आठ प्रकारची होती त्यानंतर त्यात दोन गोत्रांची वाढ करण्यात आली होती. ही मुख्य गोत्रे ब्रह्मदेवाची मानसपुत्र मानली जातात.
ब्रम्हदेवाच्या मनापासून निर्माण
झालेल्या ऋषीला मरीची ऋषी म्हणून ओळखले जाते. मरीची ऋषीपासुन उत्पन्न झालेल्या वंशाला मरीची म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या नेत्रापासुन निर्माण
झालेल्या ऋषीला अत्री म्हणून ओळखले जाते. अत्री ऋषीपासुन उत्पन्न झालेल्या वंशाला अत्री म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या मुखापासून ऋषी अंगीरसाची निर्मिती झाली, अंगीरस ऋषीपासुन उत्पन्न झालेल्या वंशाला अंगीरस म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या कानापासून पुलस्य ऋषीची निर्मिती झाली, पुलस्य ऋषीपासुन पासुन उत्पन्न झालेल्या वंशाला पुलस्य म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या नाभीपासुन पुलह ऋषीची निर्मिती झाली, हातापासुन क्रतु त्रषींची
निर्मिती झाली, त्वचेपासुन भृगु त्रषींची निर्मिती झाली. ह्या सातही ऋषींना सप्तर्षी असे
म्हटले जाते.
ब्रम्हदेवाच्या प्राणापासुन वसिष्ठ ऋषींची निर्मिती
झाली, अंगठयापासुन दक्ष त्रषींची निर्मिती झाली, छायेपासुन कर्दम त्रषींची
निर्मिती झाली. वरील दहा ऋषींचे
पुर्वीच्या काळात दहा गोत्रात वर्णन केले गेले आहे.
बहुधायन सुत्रांनुसार ह्या नावांमध्ये
अगस्त्य, कांस्य,जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ
विश्वामित्र, गौतम, अत्री ह्या आठ
त्रषींपासुन प्राथामिक गोत्रांची निर्मिती झाली आहे.
एकाच गोत्रात लग्न केल्यास, मुलांमध्ये शारीरिक
किंवा मानसिक दोष निर्माण होण्याची भीती जास्त असते तसेच मुलांमध्ये नव्याने शारीरिक
गुण इत्यादी काहीही येत नाही असे मानले जाते.
स्त्रिया Y गुणसूत्र
धारण करत नाहीत आणि त्यांचे पुत्र वडिलांचे Y गुणसूत्र घेऊन जन्माला येतात. जातील आणि म्हणूनच
स्त्रीचे गोत्र हे लग्नानंतर तिच्या पतीचे गोत्र असे म्हटले जाते.
प्राचीन वैदिक ऋषींनी त्यांच्या पुरुष
वंशांची ओळख करण्यासाठी गोत्र प्रणाली तयार केली होती. उदाहरणार्थ भगवान बुद्ध
हे गौतम गोत्राचे होते म्हणजे बुद्ध हे ऋषी गौतमाचे थेट वंशज होते.
गोत्राचा मूळ उद्देश आपला वांशिक संबंध दर्शवणे असा होता. जैवशास्त्रानुसार
वडिलांकडून सात पिढ्यांपर्यंत आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्याशी काही अंशी का
होईना जनुकीय साधर्म्य असल्याने जर ह्या नात्यात विवाह झाला तर येणारी पिढी दुबळी
असते. त्यामुळे वांशिक साम्य-वैषम्य दर्शवण्यासाठी उपनाम किंवा गोत्र त्याकाळी
उपयुक्त ठरत होते.
गोत्र पद्धतीचा नियम असाही आहे की पुरुषांचे गोत्र तेच राहते, तर स्त्रीचे
गोत्र लग्नानंतर त्यांच्या पतीचे गोत्र बनते. एखाद्या व्यक्तीला फक्त मुली असून मुलगा नसेल तर त्यांचे गोत्र त्या वंशातच संपेल. कारण त्यांच्या मुली
त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या पतीच्या गोत्रातील मानल्या जातील.
प्राचीन वैदिक किंवा हिंदू समाजात
वडिलांचे गोत्र चालू राहावे म्हणून कितीही मुलींसह किमान एक पुत्र असणे हे बहुधा
हेच कारण असावे.
गोत्राचा वापर हा लग्नकार्यात, विशेष पूजा, हवन,
गृहप्रवेश इत्यादी वेळेस केला जातो. एखाद्या व्यक्तीला त्याच्या गोत्राची माहिती त्याच्या
कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळते किंवा आपल्या मूळ गावात जे कुलदैवत किंवा ग्रामदेवताच्या
मंदिरातील पुजाऱ्याकडून अशी माहिती मिळू शकते. तसेच मूळ गावात कुटुंब अहवाल, वंशावळ
बनवणार्या व्यक्तींचीही मदत घेता येऊ शकते.
साधारणपणे सर्वांनाच आपले गोत्र माहिती असते.
परंतु एखाद्याला जर आपले गोत्र माहिती नसेल तर त्याने आपले गोत्र कश्यप मानावे असं सांगितले गेले आहे. याचे कारण की, कश्यप ऋषींनी अनेक विवाह केले होते ज्यामुळे
त्यांना अनेक मुले झाली आणि ही मुले कोठे ना कोठे कश्यप गोत्राशीच जोडली गेली
होती.
याबाबत प्राचीन ग्रंथ हेमाद्रि चंद्रिकेतही
सांगितलेले आहे की, जर गोत्र ज्ञात नसेल तर काश्यप गोत्र मानावे.
भगवान सूर्यनारायण हे जगाचे पालक आहेत. ते
काश्यपेय अर्थात महर्षी कश्यप यांचे पुत्र आहेत. सूर्यनारायणामुळे आपण जीवन जगू
शकतो. म्हणून त्याचे कुळगोत्र तेच आपले कुळगोत्र मानावे अशीही मान्यता आहे.
माणसाच्या गुणांच्या आणि अनेक कर्तुत्वाच्या आधारे
चार वर्ण मानली गेली आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णांना प्रमुख
जाती असेही म्हणलं गेलं आहे. या सर्व वर्णनात गुणही समान प्रमाणात आढळतात.
ब्राह्मणांची गोत्रं, ते ज्या ऋषींच्या वंशातील आहेत त्यांच्या नावाने असत, परंतु क्षत्रिय, वैश्य या वर्णांमध्ये वंशपद्धती
पूर्वापार असल्याने त्यांना गोत्र संकल्पनेची ब्राह्मणांसदृश आवश्यकता नव्हती. इथे
गोत्र म्हणजे वंश हे समीकरण नव्हते आणि त्यामुळेच या वर्णद्वयींची गोत्रं
परिवर्तनीय होती. पूर्वीही हे लोक आपल्या कुलगुरू/कुलपुरोहिताचे नाव गोत्रनामार्थ
स्वीकारत, जसे श्रीकृष्णाचे गार्ग्य, श्रीरामाचे
वासिष्ठ, सीतेचे गौतम, पांडवांचे
वैयाघ्रपाद आदि होते.
hf
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला गोत्र. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !