आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

राजदंड (Sceptre)

 

‘राजदंड’  (Scepter)

 वर्तमानपत्रात आपण राजदंडाबाबत बरीच चर्चा ऐकत आहोत. त्‍यातील राजकीय चर्चा वगळता राजदंडाबद्‍दल माहिती करून घ्‍यावी या दृष्‍टीकोनातून हा लेख लिहिला आहे.

 ‘राजदंड’  म्‍हणजे राजाच्या हातातील अधिकारदर्शक काठी, इंग्रजी भाषेत राजदंडाला Scepter म्‍हणतात.

 भारतात, संसदेत आणि विधी मंडळातील सभागृहात सभेच्या वेळी पीठासीन अधिकाऱ्यांसमोर हा राजदंड’  ठेवण्यात येतो. ही पद्धत ब्रिटीश संसदेकडून प्रेरणा घेऊन सुरु झाली आहे. विधानसभेमध्ये अधिवेशनादरम्यान अध्यक्षांच्या आसनासमोर राजदंड’  ठेवला जातो. राजदंड’  हा सभागृहाचा सर्वोच्च सन्मान म्हणून ठेवण्यात येतो.

 विधानसभेप्रमाणे महानगरपालिकांच्या सभागृहाच्या बैठकींच्या वेळीही अध्यक्षांच्या आसनासमोर ‘राजदंड’  ठेवला जातो. सभा संपेपर्यंत ‘राजदंड’  तिथेच ठेवला जातो. सभागृहाच्‍या एखाद्‍या सदस्‍याने, त्‍याचं म्हणणं मांडण्यासाठी किंवा सभागृहाने ऐकून घ्यावं या हेतूने अथवा एखादा ठराव किंवा निर्णय न पटल्यास ‘राजदंड’  पळवून सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न केल्‍याच्‍या घटनाही आपण ऐकल्‍या असतील. ‘राजदंड’  हा सभागृहातील सर्वोच्च सन्मानाचे प्रतिक असल्याने तो उचलून सभागृहाबाहेर नेल्यास सभागृहाचं कामकाज थांबवावं लागतं. तथापि, ‘राजदंड’ थेट सभागृहाबाहेर नेण्याची घटना फारच क्वचित घडते.

 दिनांक २८ मे २०२३ रोजी दिल्‍लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. वीन संसद भवनात ऐतिहासिक परंपरेला पुन्हा जिवंत केले जाणार आहे. याप्रसंगी वीन संसद भवना राजदंड’ (सेंगोल- Sengol) बसवला जाणार आहे. हा राजदंड’  लोकसभाध्यक्षांच्या खुर्चीजवळ ठेवण्यात येईल.

 तामिळनाडूतील विद्वान हा '‘राजदंड’ ' भेट देतील, सन १९४७ मध्ये स्‍वातंत्र सोहळा समयी उपस्थित असलेले ९६ वर्षीय तमिळ विद्वानही त्या दिवशी उपस्थित असतील. त्यानंतर संसदेत राजदंड’  कायम स्‍वरूपी स्थापित केले जाईल.

 œ राजदंड’ (सेंगोल) चा इतिहास: ‘सेंगोल हा शब्द संस्कृत शब्‍द "संकु" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "शंख (Conch)" असा होतो. हिंदू धर्मात शंख ही एक पवित्र वस्तू मानली जाते आणि ती बहुधा सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून वापरली जात असे. जो राजदंड’ (सेंगोल) प्राप्त करतो त्याच्याकडे न्याय्य शासन असणे अपेक्षित असते.

 राजदंड’ (सेंगोल) हे भारतीय सम्राटांच्या सामर्थ्याचे आणि अधिकाराचे प्रतीक होते. हे सोन्याचे किंवा चांदीचे बनले जात असे आणि मौल्यवान रत्‍नांनी सजवले जात असे. सम्राट, औपचारिक प्रसंगी राजदंड’ (सेंगोल) घेऊन जात आणि त्याचा वापर त्‍यांच्या अधिकाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केला जात असे.

भारतातील राजदंड’ (सेंगोल) इतिहास प्राचीन काळापासून शोधला जाऊ शकतो. राजदंड’ (सेंगोल) चा पहिला ज्ञात वापर मौर्य साम्राज्याने (३२२-१८५ बी.सी.) केला होता. मौर्य सम्राटांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावर त्यांचा अधिकार दर्शविण्यासाठी राजदंड’ (सेंगोल) चा  वापर केला. राजदंड’ (सेंगोल) चा वापर गुप्त साम्राज्य (३२०-५५० ए.डी.),

चोल साम्राज्य (९०७-१३१० ए.डी.) आणि विजयनगर साम्राज्य (१३३६-१६४६ए.डी.) यांनी देखील केला होता.

 चोल साम्राज्य हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचं साम्राज्य होतं. नवव्या शतकात चोल साम्राज्याचा उदय झाला. पुढे तेराव्या शतकापर्यंत हे साम्राज्य तत्‍कालीन ११ देशांमध्ये पोहोचलं होतं. दक्षिण भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलँड, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हीएतनाम, सिंगापूर आणि मालदीव या सगळ्या देशांमध्ये चोल साम्राज्याची पताका फडकत होती. (अर्थात तेव्हा यातल्या अनेक देशांची नाव वेगळी होती). या ठिकाणी चार शतकांपेक्षा जास्त काळ चोल साम्राज्याचीच सत्ता होती.  

 दक्षिणेतल्या ऐतिहासिक चोल साम्राज्यात नव्या राजाची निवड होत असताना, पदावरुन दूर जाणारा राजा आपल्या हाताने सेंगोल म्हणजेच राजदंड’  पुढच्या राजाच्या हातात देत असे आणि अशा पद्धतीनं चोल साम्राज्यात शतकानुशतकं सत्तेचं हस्तांतर होत असे. 

 सोनेरी राजदंड’ (सेंगोल) अतिशय भक्कम होता, त्‍यावर सुंदर कोरीव काम केलेले असे.

यावर भगवान शिवाचे वाहन नंदी देखील कोरले होते, इतिहासकारांच्या मते चोल हे भगवान शिवाचे महान भक्त होते, म्हणूनच 'राजदंड' वर त्यांचा परम भक्त नंदीची आकृती होती.

 मुघल साम्राज्याने (१५२६-१८५७) राजदंड’ (सेंगोल) शेवटचा वापर केला होता.

त्‍यांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावर त्यांचा अधिकार दर्शविण्यासाठी राजदंड’ (सेंगोल) चा वापर केला होता.

 ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने (१६००१८५८) भारतावरील अधिकाराचे प्रतीक म्हणून राजदंड’ (सेंगोल) वापरला होता.

 œ भारताच्या स्वातंत्र्यानंतर: भारताच्या स्वातंत्र्यानंतर (१९४७), भारत सरकारने राजदंड’ (सेंगोल) वापरला नाही. तथापि, राजदंड’ (सेंगोल) अजूनही भारतीय राजांच्या सामर्थ्याचे आणि अधिकाराचे प्रतीक आहे. हे भारताच्या समृद्ध इतिहासाची आठवण करून देणारे आणि देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

 अलाहाबाद संग्रहालयात, दुर्मिळ कला संग्रह म्हणून ठेवलेली ही ‘सोन्याची काठी आत्तापर्यंत नेहरूंची सोन्याची काठी म्हणून ओळखली जात होती. अलीकडेच चेन्नईच्या एका गोल्डन कोटिंग कंपनीने, अलाहाबाद संग्रहालय प्रशासनाला या सोन्याच्‍या काठी’ बाबत महत्त्वाची माहिती दिली होती. ही सोन्याची काठी नसून, सत्ता हस्तांतरणाचा दंड असल्याचा दावा Voommidi Bangaru Jewellers (VBJ) कंपनीने केला आहे. या गोल्डन ज्वेलरी कंपनीच्‍या दाव्‍यानुसार,  त्यांच्या वंशजांनी हा राजदंड’ सन १९४७ साली, शेवटच्या व्हाईसरॉयच्या विनंतीवरून बनवला होता.

 ‘सेंगोल’ हा शब्द तमिळ शब्द सेम्माई या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ नैतिकता आहे. हा सेंगोल विद्वानांनी गंगेच्या पाण्याने पवित्र करून पूजलेला आहे. त्यावर पवित्र नंदी विराजमान आहे. सेंगोलची ही परंपरा आठव्‍या शतकापासून चौल साम्राज्याच्या काळापासून आहे.

 œराजदंडचा अर्थ काय?

प्राणिमात्रांच्या संरक्षणासाठी ईश्वराने धर्मस्वरूपी तेजोमय दंड निर्माण केला, अशी समजूत आहे. साम, दाम, भेद, दंड या उपायांपैकी दंड हा शेवटचा उपाय. त्या दंडाचे म्हणजेच शासनाचे प्रतीक म्हणून राजदंड’  स्वीकारला गेला. हा दंड प्रजेचे शासन व रक्षण करतो.

 œ स्वातंत्र्याच्या वेळी: जेव्हा १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय झाला तेव्हा सत्ता हस्‍तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून पाठवण्यात आले होते. माउंटबॅटन यांना भारतीय संस्कृती आणि चालीरीतींची माहिती नव्हती, म्हणून त्यांनी पंडीत नेहरूंना विचारले की, सत्ता हस्तांतरणासाठी कोणता समारंभ आयोजित करावा? जवाहरलाल नेहरूंनी त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक सी. राजगोपालाचारी यांच्‍याशी या विषयावर चर्चा केली, सी. राजगोपालाचारी यांनी अनेक पुस्तके, अनेक राज्यांच्या कथा वाचून ऐतिहासिक परंपरा जाणून आणि समजून घेतल्या आणि राजदंड’ च्या माध्यमातून सत्तांतराच्या प्रक्रियेची माहिती घेतली. त्यांनी पंडीत नेहरूंना सांगितले की, भारतात राजदंडाद्वारे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया अधिकृत मानण्यात आली आहे.

 पंडीत नेहरूंच्‍या संमतीने सी. राजगोपालचारींनी एक समिती स्थापन केली. त्यामध्ये दक्षिणेतील काही महंताचा समावेश केला. सी. राजगोपालचारींनी तामिळनाडूंच्या महंतांना आपला हेतू सांगितला. तेव्हाच्या मठाधीशांनीही राजगोपालचारींच्या विनंतीला होकार दिला आणि १९४७ साली वुम्मिदी बंगारु ज्‍वेलर्सकडून नव्या राजदंडाची निर्मिती केली गेली. या राजदंडावर नंदीची मूर्तीही स्थापित केली गेली. हाच राजदंड’ पुढे दिल्लीत आणण्‍यात आला, त्याची विधिवत पूजा करण्यात आली.  

 दिनांक १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री १०.४५ वाजता, हाच राजदंड’ लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंकडे सोपवला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा राजदंड’, इंग्रजांकडून सत्ता मिळवल्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण विधींसह स्वीकारून सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती. स्वातंत्र्याच्या वेळी नेहरूजींच्या हाती राजदंड’ (सेंगोल) सोपवण्यात आला. तेव्हा प्रसार माध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली होती. या कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र प्रसाद देखील उपस्थित होते, जे देशाचे पहिले राष्ट्रपती बनले.

 सन १९४७ नंतर राजदंड’ चा विसर पडला. त्यानंतर सन १९७१ मध्ये, तमिळ विद्वानांनी राजदंड’ (सेंगोल) चा उल्लेख पुस्तकात केला. भारत सरकारने सन २०२१-२०२२ मध्ये त्याचा उल्लेख केला.

 œ कसा आहे राजदंड’ (सेंगोल):

'सेंगोल' हा शब्द तामिळ शब्द 'सेम्माई' वरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ नीतिपरायणता असा आहे. तामिळनाडूतील एका प्रमुख धार्मिक मठातील मुख्य मठाधीपती यांचा आशीर्वाद असल्याचं सांगितलं जातं.

 राजदंड’ (सेंगोल) ची लांबी पाच फूट असून तो कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. ते चांदीचे बनलेले असून त्यावर सोन्याचा थर लावला आहे.

अगदी वर टोकाशी, न्यायाचा रक्षक म्हणून त्यावर भगवान शिवाचे वाहन असलेला, हाताने सुंदर कोरीवकाम केलेला नंदी बसवण्यात आला आहे. नंदी हा सर्वव्यापी, धर्म आणि न्यायाचे रक्षण करणार्‍या भगवान शिवाचे वाहन मानले जाते.

 सेंगोलची निर्मिती तामिळनाडूतील तत्‍कालीन प्रसिद्ध सोनार, वुम्मीदी इथिराजुलू आणि वुम्मीदी सुधाकर यांनी १० कारागिरांसह केली आहे. या कामाला त्‍यांना१० ते १५ दिवस लागले होते. सेंगोल बनवणाऱ्या वुम्मीदी बंधूंच्या मते ही खूप अभिमानाची गोष्ट होती.

 सेंगोल धारण करणार्‍या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. लोकांच्या सेवेसाठी आपल्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे हे त्याने विसरू नये असे निर्देश असल्‍याचे सांगितले जाते.

hžf


Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel