मंत्रालयात
सादर निवेदनांवरील सामासिक निर्देशांबाबत कार्यवाही
अनेक सर्वसामान्य नागरिक तसेच लोकप्रतिनिधी
आणि इतर मान्यवर त्यांच्या तक्रारी/निवेदने घेऊन मंत्रालयात मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री किंवा मा. मंत्री
महोदय यांना भेटत असतात.
सर्वसाधारणपणे, अशा निवेदनांवरील किंवा पत्रांवरील समासात किंवा स्वतंत्र पत्रान्वये
मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री किंवा मा. मंत्री
महोदय शेरे (सामासिक
निर्देश) नोंदवित असतात.
अशी निवेदने किंवा पत्रे उक्त मान्यवरांच्या शेर्यांसह संबंधित
विभागास पाठविली जातात. काही वेळेस उक्त मान्यवरांचे शेरे (सामासिक
निर्देश) असणारी निवेदने किंवा पत्रे संबंधीत व्यक्तीला देण्यात
येतात.
संबंधीत व्यक्ती, उक्त मान्यवरांचे असे शेरे (सामासिक
निर्देश) असणारी निवेदने किंवा पत्रे घेऊन शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडे
येतात आणि मान्यवरांच्या शेर्यानुसार तातडीने काम करून देण्यासाठी किंवा शेर्यानुसार
फेरफार नोंद नोंदविण्याचा किंवा आदेश निर्गमीत करण्याचा आग्रह धरतात.
काही ठिकाणी अशा निवेदन/पत्रांवरील सामासिक
शेरे/निर्देशानुसार फेरफार नोंदी नोंदविल्याची किंवा
वरिष्ठ अधिकारी स्तरावरून परस्पर आदेश निर्गमित केल्याची उदाहरणे आहेत.
मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री किंवा मा. मंत्री
महोदयांचा शेरा (सामासिक निर्देश) बघून त्यावर नक्की काय कार्यवाही करावी याबाबत शासकीय अधिकारी
किंवा कर्मचारी संभ्रमात असतात.
वरील मुद्द्यावर महाराष्ट्र
शासन, सामान्य प्रशासन विभाग यांनी दिनांक १०.९.२०१५ आणि दिनांक
३.११.२०१५ रोजीच्या परिपत्रकान्वये निर्देश दिलेले आहेत. त्यानंतर पुन्हा, शासन निर्णय
क्रमांक संकीर्ण - २०१५/प्र.क्र.१३१/१८ (र. व का.), दिनांक
१०.१.२०२३ अन्वये खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
दिनांक १०.१.२०२३ च्या शासन
निर्णयान्वये, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री किंवा मा. मंत्री
महोदय यांनी लोकप्रतिनिधी तसेच इतर मान्यवर
आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून
प्राप्त होणार्या पत्रांवर किंवा निवेदनांवर दिलेला शेरा (सामासिक निर्देश) फक्त
निवेदनातील माहितीवर आधारित असतात. अशा पत्रांमध्ये
किंवा निवेदनांमध्ये, फक्त ते पत्र किंवा निवेदन सादर करणार्याची बाजू
मांडलेली असते.
मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्री महोदय यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयांकडून
शेर्यांसह प्राप्त होणारे अर्ज, पत्र अथवा निवेदनांतील
विनंतीची संबंधित विभाग / कार्यालयाने खालीलप्रमाणे
कार्यवाही करावी:
¡ अशी पत्रे किंवा निवेदनांमधील विषयासंदर्भात
लागू
असणारे प्रचलित कायदे, नियम, अधिनियम,
शासन निर्णय आणि परिपत्रके यांत विहीत केलेल्या तरतुदींच्या आधारे सखोल आणि गुणवत्तापूर्ण
तपासणी करावी.
¡ अशा तपासणीसाठी आवश्यकतेनुसार
क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यास हरकत नाही.
¡ तपासणीअंती संबंधित विभाग/कार्यालयाने निवेदनातील विनंती मान्य करणे योग्य
होईल किंवा अमान्य करावी लागेल या निष्कर्षाप्रत
पोहचावे.
¡ ज्या पत्र/निवेदनामधील
विनंती / मागणी प्रचलित कायदे, नियम, शासन निर्णय यांच्या आधारे मान्य करणे योग्य ठरेल अशा निष्कर्षाप्रत
आल्यास, संबंधित विभाग/ कार्यालयाने सक्षम
प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने तसा निर्णय घेऊन तो संबंधित निवेदनकारास कळवावा.
¡ तसेच अशा
निवेदनावर सामासिक शेरा / निर्देश
देणाऱ्या मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री किंवा मा. मंत्री
यांना सदर निवेदनाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीवाबत अवगत करावे.
¡
ज्या निवेदनांमधील विनंती प्रचलित कायदे, नियम, शासन निर्णय यांच्या आधारे तपासल्यानंतर अशी विनंती मान्य करता येणार
नाही, असा
निष्कर्ष असल्यास, संबधित विभाग/ कार्यालयाने ही
वस्तुस्थिती प्रथमतः अशा निवेदनावर सामासिक शेरा लिहिणाऱ्या मा. मुख्यमंत्री,
मा. उपमुख्यमंत्री अथवा मा. मंत्री
महोदय यांना सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत अवगत
करावी व त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने निर्णय घेऊन असा निर्णय
संबंधित निवेदनकारास कळविण्यात यावा.
¡ ज्या निवेदन/पत्रामधील विषय/बाब
ही धोरणात्मक बदलांशी संबंधित असल्यास व असा बदल करणे संबंधित विभागाच्या मते
आवश्यक असल्यास,
अशा बाबी / विषयासंदर्भात संबंधित विभागांनी विहित मार्गाने, समर्थनासह तसा प्रस्ताव
मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री किंवा संबंधित
मंत्री महोदय यांना सादर करावा.
¡
कोणत्याही परिस्थितीत निवेदनावरील मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री किंवा मा. मंत्री महोदयांचा शेरा
हा सदर प्रकरणाविषयी अंतिम निर्णय समजण्यात येऊ नये.
hf
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मंत्रालयात सादर निवेदनांवरील सामासिक निर्देशांबाबत कार्यवाही. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link
Telegram Channel Link धन्यवाद !