आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

परत आलेली नोटीस - मा. सर्वोच्‍च न्‍यायालय

                                     परत आलेली नोटीस - मा. सर्वोच्‍च न्‍यायालय

महसूल खात्यात विविध प्रकरणांमध्ये, प्रकरणातील हितसंबंधिताला नोटीस पाठवण्याचा प्रसंग सततच निर्माण होत असतो. अनेक वेळा नोंदणीकृत डाकेने पाठवलेली अशी नोटीस संबंधित व्यक्ती स्वीकारत नाहीत आणि ती "unclaimed" किंवा 'refused'  असा शेरा नोंदवून टपाल खात्‍यामार्फत परत येते.

अशा परत आलेल्या नोटीस नंतर, प्रकरणी नेमका काय निर्णय घ्यावा याबाबत संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेला खालील निकाल आपल्याला मार्गदर्शक ठरेल.

                                                                           भारताच्‍या सर्वोच्च न्यायालयात

हस्तांतरण याचिका (दिवाणी) क्रमांक २०९०/२०१९

                                                                       प्रियांका कुमारी                   याचिकाकर्त्या

विरुद्ध

शैलेंद्र कुमार                       प्रतिवादी

दिनांक: १३.१०.२०२३

 कार्यालयाच्या अहवालानुसार एकमेव प्रतिवादीला जारी केलेली नोटीस "unclaimed" असा शेरा लिहून परत आली आहे.

 माननीय सर्वोच्च न्यायालयाने, के. भास्करन वि. शंकरन वैद्यन बालन आणि इतर, (१९९९) या प्रकरणात निरीक्षण नोंदवले आहे की, जेव्हा नोटीस "unclaimed" म्हणून परत केली जाते, तेव्हा ती त्‍या पत्त्यावर रीतसर बजावली गेली असे मानले जाईल आणि ती सुचना देण्‍याची योग्य पध्‍दत आहे. (it is a proper service of notice).

 अजित सीड्स लिमिटेड वि. के. गोपाला कृष्णय्या [(२०१४)१२ एससीसी ६८५, (२०१४)], या प्रकरणात ‘‘सर्वसाधारण वाक्खंड कायदा, १८९७’’ (General Clauses Act, 1897) कलम २७ (डाकेने बजावणी याचा अर्थ) आणि ‘‘पुरावा कायदा १८७२’’ (Evidence Act, 1872),लम ११४ (न्‍यायालयाला विक्षित तथ्‍यांचे अस्तित्‍व गृहीत धरता येईल) यांचा अर्थ लावताना माननीय न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे की,

"पुरावा कायदा, १८७२ चे कलम ११४ न्यायालयाला असे गृहीत धरण्यास सक्षम करते की, नैसर्गिक घटनांच्या सामान्य मार्गात, पोस्टाने पाठवलेले संप्रेषण पाठवलेल्‍या पत्त्यावर वितरित केले गेले असावे’’. (enables the court to presume that in the common course of natural events, the communication sent by post would have been delivered at the address of the addressee.)

‘‘पुढे, सर्वसाधारण वाक्खंड कायदा, १८९७ चे कलम २८ असे गृहीत धरते की, जेव्हा नोटीस नोंदणीकृत डाकेने अचूक पत्त्यावर पाठवली जाते तेव्हा ती प्रभावित झाली आहे’’. (Section 27 of the General Clauses Act, 1897 gives rise to a presumption that service of notice has been affected when it is sent to the correct address by registered post.)

 जोपर्यंत विरुद्ध सिद्ध होत नाही तोपर्यंत, नोटीस न बजावता परत आली तरीही ज्‍या व्‍यक्‍तीच्‍या पत्त्‍यावर नोटीस पाठवली गेली होती त्‍या व्‍यक्‍तीला नोटीसबद्‍दल माहिती मिळाली आहे असे मानले जाते.

असे आढळून आले आहे की,  जेव्‍हा टपाल नोंदणी कार्यालयाने जेथे नोटीस घेण्‍यास 'नकार' ('refusal') असा शेरा नोंदवून नोटीस परत केली जाते, तेव्हा ती पूर्ण/योग्य पध्‍दतीने बजावून म्हणून परत केली जाते. (Thus, when the notice is returned as unclaimed, it shall be deemed to be served and it is proper service.)

 'नकार' ('refusal') या शब्दाचा अर्थ "अनक्लेम्‍ड" ("unclaimed") या शब्दाच्या समानार्थी शब्द म्‍हणून घेतला जाऊ शकतो.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, जेव्हा योग्य पत्त्यावर नोटीस पाठवली जाते, तेव्हा विरुद्ध सिद्ध झाल्याशिवाय ती बजावली गेली असे मानले जाईल. अशा प्रकारे, जेव्हा नोटीस "unclaimed" म्हणून परत केली जाते, तेव्हा ती बजावली गेली आहे असे मानले जाईल.

म्हणून, एकमेव प्रतिवादीला पाठविलेली नोटीस जरी "unclaimed" शेरा नोंदवून परत आली असली तरी ती नोटीस त्‍याला बजावली गेली आहे असे मानले जाते. परंतु कोणीही हजर झालेले नाही.

hœf

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel