आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

जिल्हाधिकार्‍यांनी तहसिलदारला प्रदान केलेले अधिकार

 

जिल्हाधिकार्‍यांनी तहसिलदारला प्रदान केलेले अधिकार

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १३ अन्वये महसूल अधिकारी : त्यांचे अधिकार व कर्तव्ये विषद करण्‍यात आली आहेत. त्‍यानुसार महाराष्ट्र शासनाने खालील अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या शक्ती, अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत जिल्हाधिकारी तहसिलदाराला प्रदान करू शकेल असा निर्देश दिला आहे.

अनुसूची 

अनुक्रमांक

...., १९६६ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या शक्ती

तहसिलदारांना प्रदान करावयाचे अधिकार

 

अधिकार वापराची मर्यादा

कलम ७ (४)

कोतवाल किंवा इतर ग्रामसेवक यांची नियुक्ती करणे

कोतवाल किंवा इतर ग्रामसेवक पुरते मर्यादीत

कलम १७ (१)

सरकारी पैसा, कागदपत्रे बाबत मागण्‍या संबंधिताला लेखी कळविणे

अटक करण्याच्या शक्तीखेरीज

कलम १८

सरकारी पैसा सरकारी पैसा महसूल थकबाकीप्रमाणे वसूल करणे, त्‍यासाठी झडती अधिपत्र काढण्‍याचे अधिकार

अटक करण्याच्या शक्तीखेरीज

कलम २५ (२)

धारण जमिनीतील झाडांचा हक्‍क खरेदी करण्‍याची शक्‍ती

झाडांचा हक्‍क खरेदी करण्‍याची शक्‍ती

कलम ३५ (२)

 

सोडून दिलेल्‍या/जप्‍त केलेल्‍या पोट विभागाचा विनियोग

एकाच भू-मापन क्रमांकाच्या इतर उपविभागातील भोगवटादारांना दिलेल्या उपविभागाची विल्हेवाट लावण्याची शक्ती

कलम ३५ (३)

 

सोडून दिलेल्‍या/जप्‍त केलेल्‍या पोट विभागाचा विनियोग

जमीन महसूल देण्‍यास कसूर केल्‍याबद्‍दल भूमापन क्रमांकाच्‍या इतर पोटविभाग जप्‍त करणे आणि एकसाली लावणीने देणे.

कलम ३५ ()

 

सोडून दिलेल्‍या/जप्‍त केलेल्‍या पोट विभागाचा विनियोग

जप्‍त केलेला उक्‍त पोटविभाग, तीन वर्षाच्‍या आत कसूरदाराकडून अर्ज आल्‍यास विहित रक्‍कम वसूल करून परत देणे.

कलम ४८ (८)

खाणी व खनिजे यावरील शासनाचा हक्‍क

शासकीय जमिनीतून अवैध गौणखनिज उत्‍खननास प्रतिबंध करणेबाबत सर्व शक्ती

कलम ५०

 

शासनाकडे निहित असलेल्‍या जमिनींवरील अतिक्रमण दूर करणे

सर्व शक्ती, परंतु कलम २०(२) अन्वये कोणत्याही हक्काच्या निर्णयासाठी कोणतीही चौकशी करणे आवश्यक नाही.

१०

कलम ५

 

अतिक्रमित जमिनीची किंमत आणि जमीन महसूल मोजणे

वरील प्रमाणे

११

कलम ५३ (पोट-कलम १ (अ) यासह

शासनाकडे निहित असलेल्‍या जमिनीचा अनधिकृत भोगवटा करणार्‍यास संक्षिप्‍त चौकशी करून  निष्‍कासित करणे

वरील प्रमाणे

१२

कलम ५४

 

निष्‍कासित केलेल्‍या उक्‍त अनधिकृत भोगवटादाराची उरलेली मालमत्ता जप्‍त करणे आणि काढून टाकणे.

वरील प्रमाणे

१३

कलम ५९

 

अनधिकृतपणे जमिनीचा भोगवटा करणार्‍यास संक्षिप्‍त चौकशी करून  काढून टाकणे

फक्त शेतीच्या प्रयोजनाकरिता जमिनीच्या अनधिकृत भोगवट्याच्या संबंधातील सर्व शक्ती परंतु कलम २० (२) अन्वये कोणतीही चौकशी करणे आवश्यक नाही.

१४

कलम ६१ ()

 

वहिवाट दिवाणी न्‍यायालयाच्‍या आदेशास केव्‍हा पात्र नसेल

हस्‍तांतरणास प्रतिबंध किंवा हस्‍तांतरणास परवानगी आवश्‍यक असलेल्‍या जमिनीचे हस्‍तांतरण न्‍यायालयाच्‍या आदेशानेही उक्‍त परवानगीशिवाय होणार नाही.   

१५

कलम ७४

 

भोगवटा जप्‍त होऊ नये म्‍हणून भोगवटादाराखेरीज इतर व्‍यक्‍तीने जमीन महसूल अदा करणे

सर्व शक्ती

 

१६

कलम ७७

 

पावत्‍या देण्‍यास कसूर केल्‍याबद्‍दल शास्‍ती

सर्व शक्ती

 

१७

कलम ८५

धारण जमिनीचे वाटप

सर्व शक्ती

 

१८

कलम १३६

भूमापन क्रमांक किंवा त्‍याच्‍या पोटविभागाच्‍या हद्‍दींची आखणी

सर्व शक्ती

 

१९

कलम १३९

हद्‍दींच्‍या निशाण्‍या लावणे/दुरूस्‍त करणे

सर्व शक्ती

२०

कलम १४१

भूमापनानंतर सर्व हद्‍दींच्‍या निशाण्‍या जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या स्‍वाधीन असणे

सर्व शक्ती

२१

कलम १५० (१)

 

हक्कांचे संपादन किंवा हस्तांतरण यासंबंधीची माहीती नोंदविण्याची शक्ती.

 

सर्व शक्ती

२२

कलम १५२

माहिती देण्‍यास हयगय केल्‍यास दंड

सर्व शक्ती

२३

कलम १५५

लेखन प्रमादांची दुरूस्‍ती

सर्व शक्ती

२४

कलम १७४

 

जमीन महसूल अदा करण्‍यास कसूर केल्‍याबद्‍दल शास्‍ती

सर्व शक्ती

२५

कलम १७६

थकबाकी वसुलीची कार्यपध्‍दती

कलमाच्‍या खंड एक पुरती मर्यादीत

 

अधिसूचना क्र. पी. डब्ल्यूआर/४२६३/४१३२६-सी. दि. २६..१९७० महा. शासन राजपत्र भाग ४ ब पान ९२० -महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम ९ अन्‍वये दिलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांतील विक्री कराच्या थकबाकीच्या वसुलीकरिता असलेल्या तहसिलदारांना संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रांतील विक्री कर थकबाकीची जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुली करण्याच्या प्रयोजनासाठी खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या शक्ती व कर्तव्ये प्रदान केली आहे.

 

अ.क्र.

कलम

अधिकार वापराची मर्यादा

कलम १७६

कोणती मालमत्ता अटकावून ठेवणे आणि जप्‍तीपासून  सूट देणे.

बी

कलम १७८

नोटिसा देणे

सी

कलम ९२

जंगम मालमत्ता विक्रीबाबत उद्‍घोषणा करणे

डी

कलम १९३

विक्रीच्या नोटिसांना प्रसिद्धी देण्याच्या इतर पद्धती निश्चित करणे

कलम २१२

विक्री कायम करण्‍यात आल्‍यावर खरेदीदाराला मालमत्तेचा ताबा देणे व खरेदीचे प्रमाणपत्र देणे

एफ

कलम २१८

दाव्‍यांचा निकाल देणे

 

२६

कलम १७९

 

थकबाकीदाराची जमीन जप्‍त करणे

कलम १७९ खंड (अ) अन्वये उद्घोषणा आणि लेखी नोटीस काढणे.

२७

कलम १८०

 

कसुरदाराची जंगम मालमत्ता अटकविणे आणि तिची विक्री करणे

सर्व शक्ती

 

२८

कलम १८१

 

कसुरदाराची स्‍थावर मालमत्तेची  विक्री करणे

प्‍तीच्या अधिपत्रावर सही करणे व त्याची

अंमलबजावणी करणे व विक्री करणे.

२९

कलम १८२

 

कसुरदाराची स्‍थावर मालमत्ता जप्‍त करणे आणि ती व्‍यवस्‍थापनाखाली आणणे

प्‍तीच्या अधिपत्रावर सही करणे व त्याची

अंमलबजावणी करणे

३०

कलम १९२

विक्रीची कार्यपध्‍दती

सर्व शक्ती

३१

कलम १९३

विक्रीची अधिसूचना

सर्व शक्ती

३२

कलम २०४

 

फेरविक्रीमुळे झालेल्‍या नुकसानीबद्‍दल खरेदीदाराची जबाबदारी

सर्व शक्ती

३३

कलम २१२

 

विक्री कायम करण्‍यात आल्‍यानंतर खरेदीदारास ताबा देणे

सर्व शक्ती

३४

कलम २१८ (१)

 

जप्‍त केलेल्‍या मालमत्तेवर केलेले दावे निकाली काढणे

पोटकलम (१) अन्‍वये, जप्‍त केलेल्‍या फक्‍त जंगम मालमत्तेवर अन्‍य व्‍यक्‍तीने दावा केल्‍यास संबंधिताला सुनावणीची संधी देऊन, रीतसर चौकशीनंतर तो दावा मान्‍य करणे अगर फेटाळणे.

३५

कलम २४२

 

बेकायदेशीररित्‍या जमीन कब्‍जात ठेवणार्‍या व्‍यक्‍तीस निष्‍कासित करणे

फक्‍त खंड (अ) अन्‍वये जमीन सोडण्‍यासाठी नोटीस बजावणे आणि खंड () अन्‍वये, नोटीसीचे पालन केले गेले नाहही तर सदर व्‍यक्‍तीस अशा जमिनीतून काढून टाकणे.

टिप-१: वरिष्‍ठ अधिकार्‍याने अधिनस्‍त अधिकार्‍याला प्रदान केलेले त्‍याचे अधिकार, त्‍या अधिनस्‍त अधिकार्‍याला परस्‍पर त्‍याच्‍या अधिनस्‍त अधिकार्‍यांना प्रदान करता येत नाहीत.  

delegator potestas non potest delegar ; delegate’s protest non delegare

Powers which have been delegated, cannot delegated [further]

टिप-२: वरिष्‍ठ अधिकार्‍याने अधिनस्‍त अधिकार्‍याला प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये कोणताही आदेश पारित करतांना, आदेशाच्‍या सुरूवातीला प्रथम ‘वाचा:’ असे लिहून, अधिकार प्रदान केलेल्‍या आदेशाचा क्रमांक व दिनांक नमूद करावा.

 

hœf

 

 

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel