आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

महसूल शब्दावली - 10

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

५२६. नोंदणी करणे अनिवार्य असलेले दस्तऐवज: नोंदणी अधिनियम, १९०८, कलम १७ मध्‍ये नमूद असलेल्‍या सर्व दस्‍तऐवजांची नोंदणी अनिवार्य आहे.

 ५२७. नोंदणी करणे वैकल्पिक असलेले दस्तऐवज: नोंदणी अधिनियम, १९०८, कलम १८ मध्‍ये नमूद असलेल्‍या सर्व दस्‍तऐवजांची नोंदणी अनिवार्य आहे.

 ५२८. तोंडी पुरावा (Oral evidence): जो पुरावा साक्षीदारामार्फत वैयक्‍तिकरित्‍या बघितला किंवा ऐकला गेला असेल आणि जो पुरावा इतरांमार्फत साक्षीदाराला सांगितला गेला नसेल असा पुरावा म्‍हणजे तोंडी पुरावा. तोंडी पुरावा हा नेहमी प्रत्‍यक्ष असावा.

     (भारतीय साक्ष अधिनियम २०२३, कलम ५४, ५५/भारतीय पुरावा कायदा १८७२, कलम ५९, ६०)

 ५२९. कागदोपत्री पुरावा (Documentary evidence): एखाद्‍या प्रकरणात जी कागदपत्रे न्‍यायालयात तपासणीकामी सादर केली जातात त्‍यांना कागदोपत्री पुरावा म्‍हणतात.

             (भारतीय साक्ष अधिनियम २०२३, कलम ५६/भारतीय पुरावा कायदा १८७२, कलम ६१)

 ५३०. दुय्‍यम पुरावा (Secondary Evidence): मूळ दस्तऐवजातून पुनरुत्पादित केला गेलेला पुरावा. उदाहरणार्थ, दस्तऐवज किंवा छायाचित्राची छायाप्रत दुय्यम पुरावा मानली जाईल. मूलभूत पुरावा उपलब्‍ध नसल्‍यास न्‍यायालय दुय्‍यम पुराव्‍याचा विचार करते

              .( भारतीय साक्ष अधिनियम २०२३, कलम ५८/भारतीय पुरावा कायदा १८७२, कलम ६३)

 ५३१. ऐकीव पुरावा (hearsay evidence): साक्षीदाराने प्रत्‍यक्ष न बघितलेला किंवा प्रत्‍यक्ष न ऐकलेला किंवा त्‍याला त्‍याच्‍या इंद्रियांनी आकलन न झालेला परंतु त्‍याबाबत इतरांकडून माहिती मिळालेला पुरावा म्‍हणजे ऐकीव पुरावा. असा पुरावा सर्वात कमकुवत पुरावा मानला जातो.

 ५३२. 'संबंधित कुवहिवाट कायदा' (Relevant tenancy Law):  

) महाराष्ट्र राज्याच्या मुंबई  क्षेत्राच्‍या  संबंधात-  महाराष्‍ट्र  ( मुंबई)  कुवहिवाट शेतजमीन अधिनियम, १९४८;

) महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा क्षेत्राच्या संबंधात, हैदराबाद कुवहिवाट शेतजमीन अधिनियम, १९५०; आणि ) महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशाच्या संबंधात, महाराष्‍ट्र  (मुंबई)  कुवहिवाट शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८.                                                                       [म.ज.म.अ. कलम २(३०)]

 ५३३. 'अनुसूचित जमाती' (Scheduled Tribes- ST): भारतीय संविधानाच्‍या अनुच्‍छेद ४३२ अन्‍वये महाराष्‍ट्र राज्‍यसंबंधात अनुसूचित जमाती म्‍हणून समजण्‍यात येणार्‍या आणि संरक्षणाची गरज असणार्‍या जमाती आणि वन्‍य जमाती किंवा अशा जमातीचे किंवा जनजाती समूहाचे भाग किंवा त्यातील गट. [म.ज.म.अ. कलम ३६-अ; महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१, नियम २()]

अनुसूचित जमातींना पूर्वी प्राचीन जमात, जंगल-जमात, पहाडी-जमात म्हणत. नागरीकरणापासून दूर वस्त्या, प्राचीन जीवन-पद्धती, भौगोलिकदृष्ट्या एकाकी, इतर मोठ्या समाजाशी संबंध फार कमी, वेगळी संस्कृती इत्यादी त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. अनुसूचित जमातींना अनुसूचित जातींसारखा उच्च जातीच्या अस्पृश्यतेचा, शोषणाचा आणि भेदभावाचा सामना करावा लागला नाही. अनुसूचित जातींस दलित म्हटले जाते तर अनुसूचित जमातीस आदिवासी म्हटले जाते.

'अनुसूचीत जमाती' म्हणजे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३४२ अन्वये महाराष्ट्र राज्याच्या संबंधात अनुसूचित जमाती म्हणून समजण्यात येतात अशा जमाती किंवा वन्य जमाती किंवा अशा जमातींचे किंवा वन्य जमातींचे भाग, किंवा त्यामधील गट आणि जमातीची किंवा वन्य जमातीची किंवा उक्त अनुच्छेद ३४२ अन्‍वये केलेल्‍या आदेशाच्या अनुसूचीच्या भाग सात- मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जमातीच्या किंवा वन्य जमातीच्या भागाची किंवा त्यामधील गटाची परंतु, त्या आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या वस्त्यांमध्ये राहणारी, तरीही या कलमाच्या आणि कलम ३६- च्या संरक्षणाची जिला गरज आहे. आदिवासी हे  ऐतिहासिकदृष्ट्याभारतातील वंचित देशी लोकांचा गट आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जमातींच्या लोकांचे प्रमाण ८.६% आहे.  संविधान (अनुसूचित जाती) आदेश (सुधारणा) कायदा, १९९० नुसार, अनुसूचित जमातींना कोणताही विशिष्ट धर्म नाही. आदिवासींनी आम्ही हिंदू नसल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले की आदिवासी (अनुसूचित जमाती) हे हिंदू धर्मीय नाहीत.

 आदिवासी जमिनीचे बिगर आदिवासीच्‍या लाभात हस्‍तांतरण, अदलाबदल, गहाण, बक्षीसपत्र यांना शासनाची परवानगी आवश्‍यक आहे.

 ५३४. महसुली लेखांकन पध्‍दत: महसुली लेखांकनांचे एकत्रीकरण, महसूल कार्यालयातील कार्यपध्‍दती व नियम तयार करण्‍यासाठी शासनाने सन १९६८ मध्‍ये एक समिती नेमण्‍यात आली  होती. या समितीने ठरविलेल्‍या कार्यपध्‍दती व नियमांना ‘महाराष्‍ट्र जमीन नियम पुस्तिका’असे म्‍हणतात. सदर नियम पुस्तिकांचे पाच भाग असून त्‍यांना ‘खंड असे म्‍हणतात. या खंडांचे १ ते ५ असे ५ भाग आहेत.

खंड – १ मध्‍ये महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम विषद केला आहे.

खंड – २ मध्‍ये जमीन महसूलाच्‍या विषयांवरील महसुली परिपत्रके, प्रशासनिक आदेश व शासन निर्णय यांचा समावेश आहे.

खंड – ३ मध्‍ये तहसिल, उपविभागीय व जिल्‍हाधिकारी कार्यालयातील कार्यपध्‍दती विषद करण्‍यात आलेली आहे.

खंड – ४ मध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यातील तलाठी, मंडल अधिकारी/मंडल निरीक्षक यांची कार्यपध्‍दती व कर्तव्‍ये तसेच गाव दप्‍तरातील विहित नमुने व त्‍यांबाबतची माहिती विषद करण्‍यात आलेली आहे.

खंड – ५ मध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यातील तालुका व जिल्‍हा पातळीवरील महसुली लेखांकन पध्‍दती, त्‍यांचे विहित नमुने व त्‍यांबाबतची माहिती विषद करण्‍यात आलेली आहे.

 

 ५३८. कायदेशीर संज्ञा (Legal Maxims): इंग्लंड (आणि त्याच्या पूर्वीच्या बहुतेक वसाहती) आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे "कॉमन लॉ" नावाचा जुना रोमन कायदा वापरला जातो म्हणूनच तेथील वकिलांना आजही लॅटिन वाक्ये आवडतात. इंग्रजी कायदेशीर संज्ञा आणि वाक्यांशांमध्‍ये मोठ्‍या प्रमाणात लॅटिन शब्द वापरले जातात. यापैकी अनेक संज्ञा सामान्यपणे वापरल्‍या जातात.

लॅटिन संज्ञा आणि वाक्यांश

शाब्दिक अनुवाद

थोडक्‍यात अर्थ

a posteriori

from later

मागील घटनेपासून.

ab initio

from the beginning

सुरूवाती पासूनच

ad interim

Temporarily

तात्‍पुरता

ad hoc

for this

विशिष्‍ठ कार्यापुरते

ad infinitum

to infinity

मर्यादेशिवाय, कायमचे सुरू ठेवण्यासाठी

affidavit

he has sworn

वस्तुस्थितीचे औपचारिक विधान

audi alteram partem

hear the other side

विरुद्ध पक्षकाराची सुनावणी झाल्याशिवाय एखादा न्यायनिवाडा होऊ शकत नाही.

alibi

Elsewhere

अन्‍यत्र

alias

otherwise called 

 उर्फ;  एखाद्या व्यक्तीचे अतिरिक्त नाव

bona fide

in good faith.

परिणामाची पर्वा न करता प्रामाणिक चांगला हेतू

Caveat

May he beware

सावधान पत्र.

cogitationis poenam nemo patitur

Nobody suffers punishment for mere intent

फक्‍त  हेतू असल्‍यामुळे ने कोणाला शिक्षा होत नाही.

contra

Against

 

contra legem

Against the law

कायद्‍या विरूध्‍द

coram non judice

Before one who is not a judge

योग्य अधिकार क्षेत्र नसलेल्या न्यायाधीशासमोर.

de facto

In fact

खरे तर

delegator potestas non potest delegari,

delegate’s protest non delegare

Powers that which has been delegated, cannot delegated [further]

प्रदान केलेले अधिकार पुढे प्रदान करता येत नाहीत.

ei incumbit probatio qui dicit

Proof lies on him who asserts.

जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष

Ex audita

From hearsay

ऐकीव पुरावा

ex officio

From the office, by virtue of office

पदीय अधिकारांमुळे

ex parte

From [for] one party

एकतर्फी

exempli gratia

For the sake of example

"e.g." चा अर्थ

forum

A court

न्‍यायालय

i.e.

That is

उदाहरणार्थ

ignorantia juris non excusat

Ignorance of the law does not excuse

कायद्‍याचे अज्ञान माफ करता येत नाही

in rem

An act is done with reference to no specific person

कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भात न केलेली कृती.

in toto

In total

पूर्णत:

intra

Within the law

कायद्‍याच्‍या कक्षेत

lacunae

Void, gap

कायद्‍याच्‍या तरतुदी विरूध्‍द

lex posterior auditor priority

Later law removes the earlier

अगदी अलीकडचा कायदा त्याच प्रकारचा जुना कायदा रद्द करतो.

lis alibi pendens

Law-suit elsewhere pending

त्‍याच विषयाचा दावा अन्‍य न्‍यायालयात दाखल असणे.

lis pendens

Suit pending

न्‍यायालयात प्रलंबित प्रकरण

locus standi

Place of standing

न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचा पक्षकाराचा अधिकार.

mala fide

(In) bad faith

फसवण्‍याच्‍या उद्‍देशाने

mens rea

Guilty mind

अपराधी मन

modus operandi

Manner of operation

गुन्‍हा करण्‍याची पध्‍दत

nemo judex in sua causa

no one shall be a judge in his own case

कोणीही स्वत:च्या प्रकरणात न्यायाधीश होऊ शकत नाही

non compos mentis

not in possession of [one’s] mind

काही कायदेशीर कृती करण्याची मानसिक क्षमता नसलेला.

nulla poena sine lege

no penalty without a law

कायद्याने मनाई नसलेली एखादी गोष्ट केल्याबद्दल एखाद्यावर खटला भरला जाऊ शकत नाही.

null and void

 

वैध, बेकायदेशीर किंवा अंमलबजावणी करण्यायोग्य नाही.

onus

The burden, load

भार, बोजा

prima facie

at first face

प्रथम दर्शनी

post mortem

after death

मृत्‍यू नंतर

prius quam exaudias ne iudices

do not judge, before you hear

बाजू ऐकण्यापूर्वी न्याय करू नका

qua

which; as

च्या क्षमतेमध्ये

quasi

as if

प्रत्यक्षात नसतांना एखाद्या गोष्टीसारखे असणे किंवा त्यासारखे असणे.

quasi-judicial

 

काही अर्थाने न्यायिक पण प्रत्येक अर्थाने नाही

quorum

 

गणपूर्ती

ratio decidendi

 

निर्णयाची कारणे

res

thing, matter, issue, affair

गोष्ट, बाब, मुद्दा, प्रकरण

res judicata

a matter already judged

प्रकरणात अंतिम निर्णय झाला आहे.

sine die

without day

जेव्हा न्‍यायालय पुढील सुनावणीची तारीख निर्दिष्ट न करता कार्यवाही स्थगित करत असेल तेव्हा वापरले जाते. याला sine die असे देखील म्हणतात.

status quo

the state in which

"ज्या स्थितीत पूर्वी होते तसे" किंवा "पूर्वी अस्तित्वात असलेली स्थिती."

sub judice

under the judge

न्‍याय प्रविष्‍ठ

suo motu

of its own motion

स्‍वत:हून

ultra vires

beyond the powers

अधिकार बाह्‍य

versus

against

विरूध्‍द

vice versa

the other way around

उलट परिस्थिती

‘res judicata pro veritate occipitur’

judicial decision must be accepted as correct

न्यायालयीन निर्णय योग्य म्हणून स्वीकारला पाहिजे

‘nemo

debet bis vexari pro una et eadem causa’,

no man

should be vexed twice for the same cause

एकाच कारणासाठी दोनदा शिक्षा होणार नाही.

sine qua non

necessary or indispensable requirement

आवश्यक किंवा अपरिहार्य आवश्यकता

 

 ५३९. ‘फिफो’ (FIFO) - First In First Out. ग्रामख़हसूलधिकारी,मंडळ अधिकारी आणि तहसिलदार स्‍तरावर प्रथम नोंदणी झालेल्या दस्तऐवज क्रमांकाचा फेरफार नोंद प्रथम (अनुक्रमे) तयार केल्याशिवाय अन्य दस्तऐवजांची फेरफार नोंद तयार करुन पुढील कार्यवाही करता येणार नाही. अर्थात यासाठी काही अपवादात्‍मक नोंदी तहसिलदार स्‍तरावरून वगळण्‍याची (skip) सुविधा उपलब्‍ध आहे.

आता सर्व नागरीक सुविधा केंद्रांनाही ‘फिफो’ लागू करण्‍यात आले आहे. प्रथम (अनुक्रमे) प्राप्‍त झालेल्‍या अर्जावर उचित कार्यवाही केल्याशिवाय पुढील अर्जावर पुढील कार्यवाही करता येणार नाही.   

 ५४०. 'डिजीटल सिग्नेचर' (Digital Signature): एखाद्या व्यक्तीच्या हस्तलिखित स्वाक्षरीचे इलेक्ट्रॉनिक रूपांतर म्‍हणजे डिजिटल सिग्नेचर. याला इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सुध्‍दा म्हणतात. कागदपत्रांना प्रामाणित करण्यासाठी स्वाक्षरीचा उपयोग केला जाऊ शकतो. प्रमाणन प्राधिकरणाचे नियंत्रक याच्या मार्फत प्रमाणन अधिकृतता मंजुरी दिली जाते. 'डिजीटल सिग्नेचर' असणारा दस्तऐवज कायदेशीररित्या वैध मानला जातो.                                   [माहिती व तंत्रज्ञान अधिनियम-२०००, कलम 2 (d)(p)(q) तसेच कलम ३५(४)]

 ५४१. युआरएल (URL) : URL म्‍हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. (Uniform Resource Locator) वेबवर दिलेला अद्वितीय संसाधनाच्या पत्ता. (unique resource)

 ५४२. आयपी ऍड्रेस (IP address): इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता (Internet Protocol address) हा इंटरनेटशी जोडल्‍या जाणार्‍या प्रत्येक उपकरणाला (device) नियुक्त केलेला अद्वितीय ओळख क्रमांक असतो. इंटरनेट वापरणाऱ्या उपकरणाला नियुक्त केलेले अंकीय लेबल.

 ५४३. इलेक्ट्रॉनिक/डिजिटल पुरावा (Electronic/Digital Evidence): कॉम्प्युटर आऊटपुट म्हणजे कागदावर प्रिंट केलेली माहिती, सीडी, डीव्हीडी, फ्‍लॉपी किंवा पेन ड्राईव्हमध्ये लोड केलेली संगणकातील माहिती. संगणक, सेल फोन, सीसीटीव्ही कॅमेरे अशा व या प्रकारच्‍या व तत्‍सम बाबींना इलेक्ट्रॉनिक पुरावा ओळखले जाते.  (भारतीय साक्ष अधिनियम २०२३, क़लम ६२,६३/भारतीय पुरावा कायदा १८७२, कलम ‍६५-अ आणि ६५-ब)

५४४. DDM- Document Distribution Module - दस्तऐवज (अभिलेख) वितरण प्रणाली

 ५४५. MIS – Management Information System - व्यवस्थापन माहिती प्रणाली

 ५४६. ODC – Online Data Correction - ऑनलाइन डेटा सुधारणा

 

५४७. CRF – Change Request Form - बदल विनंती फॉर्म

 ५४८. UAT – User Acceptance Test - वापरकर्ता स्वीकृती चाचणी

 ५४९. SRO – Sub Registrar Officeदुय्‍यम निबंधक कार्यालय

 ५५०. DSC – Digital Signature Certificate - डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र

 ५५१. SKN – Seller Khata Numberविक्रेत्‍याचा खाता क्रमांक

 ५५२. TKN - Temporary Khata Numberतात्‍पुरता खाता क्रमांक

 ५५३. DBA – Data Base Admin नायब तहसिलदार दर्जाचा अधिकारी

 ५५४. DDE – District Domain Expertउपजिल्‍हाधिकारी दर्जाचा अधिकारी

 ५५५. DDC – Divisional Domain Coordinator - विभागीय डोमेन समन्वयक

 ५५६. DDMHO – Document Distribution Management (Higher Officers)

वरिष्‍ठ अधिकार्‍यांसाठी डाटा बघण्‍याची सुविधा

 ५५७. DCO – Divisional Coordinator - विभागीय समन्वयक

 ५५८. ULPIN - Unique Land Parcel Identification Number - अद्वितीय जमीन भूखंड   

ओळख क्रमांक

 ५५९. LGD Code - Local Government Dictionary Code - स्थानिक शासकीय शब्दकोश     सांकेतांक

 ५६०. NIC - National Information Centreराष्‍ट्रीय सूचना विज्ञान केंद्र

 ५६१. UPMU - United Project Management Unitसंयुक्‍त प्रकल्‍प व्‍यवस्‍थापन केंद्र

 ५६२.  API - Application Programming Interface

 ५६३. VAN - Vertical Account Number

 ५७१. GRASS - Government Receipt Accounting System शासकीय जमा लेखा प्रणाली

 ५७२. PRN - Personal Reference Number - वैयक्तिक संदर्भ क्रमांक

 ५७३. DDO - Drawing and Distributing Officer - आहरण व वितरण अधिकारी

 ५७४. IGR - Inspector General of Registration - नोंदणी महानिरीक्षक -

नोंदणी महानिरीक्षक हे राज्यातील दस्त नोंदणी यंत्रणेचे प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे मुद्रांक अधिनियमान्वये मुख्य नियंत्रक महसूल प्रधिकारी (Chief Controlling Revenue Authority) आहेत.

त्‍यांच्‍या कार्यालयाकडून राज्यातील दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक, मुद्रांक जिल्हाधिकारी व नोंदणी उपमहानिरीक्षक व नगररचना (मूल्यांकन) कार्यालयांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवले जाते.  

मुद्रांक शुल्क व नोंदणी फी च्या स्वरुपात महसूल संकलनावर नियंत्रण करणे, मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी दस्तऐवजाचे मुद्रांक शुल्कासदंर्भात दिलेल्या निर्णयाविरुध्दची अपीले व रिव्हीजन केसेस चालविणे इत्‍यादी कामे त्‍याच्‍या कार्यालयामार्फत केली जातात.

 ५७५. GIS: Geographic Information System - भौगोलिक माहिती प्रणाली - ही भौगोलिक माहिती मिळवणारी, साठवणारी आणि त्याचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आहे. भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) एक अशी प्रणाली आहे जी स्थानिक किंवा भौगोलिक माहिती संकलन, साठवणूक, विश्लेषण, व्यवस्थापन, आदान-प्रदान आणि प्रदर्शित करते.

 ५७६. CLOUD - Communities and Libraries Online Union Database - हा सर्व्हरच्या जागतिक नेटवर्कचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे, क्लाउड हे भौतिक अस्तित्व नाही, परंतु त्याऐवजी जगभरातील रिमोट सर्व्हरचे एक विशाल नेटवर्क आहे जे एकत्र जोडलेले आहेत आणि एकल इकोसिस्टम म्हणून कार्य करण्यासाठी आहेत.

५७७. I Sarita - Stamp and Registration Information Technology Based Administration. - तालुका-जिल्हा-विभागीय-राज्य स्तरावरील सर्व संबंधित कार्यालये आय-सरिता या प्रणालीत एकमेकांशी इंटरनेटच्या मदतीने एकत्र जोडले गेल्यामुळे राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी होणार्‍या सर्व दस्तावेजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी होते. या प्रणालीमध्ये सर्व आवश्यक दस्तावेजांची स्कॅनीग केली जाते आणि वेब कॅमेराच्या मदतीने खरेदी-विक्री करणार्‍यांचे छायाचित्र काढले जाते. मूळ कागद्पत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर दुय्यम निबंधकाचे बायोमॅट्रिक डिव्हाईस द्वारे लॉगीन प्रमाणीकरण केल्या नंतरच नोंदणी प्रक्रिया पुर्ण होते. 

 ५७८. 'भूमापन क्रमांक' : म.ज.म.अ. कलम ८२ अन्वये निश्चित केलेल्या किमान क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र नसलेल्या प्रत्येक धारण जमिनीचे भूमि अभिलेखातील भू-मापन क्रमांक म्हणून स्वतंत्रपणे मोजमाप घेऊन त्‍यांचे वर्गीकरण करण्यात येते आणि त्‍यांची सीमा चिन्हांद्वारे निश्चित करण्यात येते आणि त्‍यांना क्रमांक दिला जातो. असा क्रमांक म्‍हणजे भूमापन क्रमांक.

[महाराष्ट्र जमीन महसूल भू-मापन नियम, १९६९ (महसुली भू-मापन भू-मापन क्रमांकाचे उपविभाग) नियम, १९६९, नियम ३(१); म.ज.म.अ. कलम २(३७)]

 ५७९. 'उपविभाग क्रमांक': म.ज.म.अ. कलम ८२ अन्वये निश्चित केलेल्या किमान क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या प्रत्येक धारण जमिनीचे, ती ज्या भू-मापन क्रमांकामध्ये समाविष्ट करण्यासंबंधी निर्देश देण्यात आला असेल त्या भू-मापन क्रमांकाचा उपविभाग म्हणून भूमि अभिलेखामध्ये स्वतंत्रपणे मोजमाप घेण्यात येऊन वर्गीकरण करण्यात येते. भूमि अभिलेख संचालकांनी निर्देश दिल्यास ती धारण जमीन स्वतंत्रपणे सीमांकित करता येते व तिची क्रमांक देऊन नोंद घेण्यात येते. असा क्रमांक म्‍हणजे उपविभाग क्रमांक.

[महाराष्ट्र जमीन महसूल भू-मापन नियम, १९६९ (महसुली भू-मापन भू-मापन क्रमांकाचे उपविभाग) नियम, १९६९, नियम ३(२)]

 

५८०. मानीव खरेदी खत (Deemed Conveyance Deed): ज्या प्रकरणात खाजगी जमिनीच्या भूखंडावर आवश्यक त्या सर्व पूर्व परवानग्या घेऊन एकमजली अथवा बहुमजली सदनिकांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्यांची विक्री करण्यात आलेली आहे, तथापि अशा भूखंडांच्या अधिकार अभिलेखात संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची नावे दाखल केली जाण्याऐवजी अशा भूखंडांचे मूळ जमीन मालक अथवा यथास्थिती विकासक यांचीच नावे अधिकार अभिलेखात दाखल करण्यात आलेली आहेत, अशा प्रकरणात महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका ( बांधण्यास प्रोत्साहन देणे, विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण) अधिनियम १९६३, कलम ११(३) मध्ये सुधारणा करुन मानीव खरेदी खत करुन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांना संबंधिताना सुनावणी

देऊन आदेश पारीत करण्यास प्राधिकृत केले आहे.

मानीव खरेदी खताबाबत,  महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१, नियम ३६ च्‍या तरतुदीनुसार ज्यावेळी संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्था त्या नोंदणीकृत दस्ताआधारे अधिकार अभिलेखात (गाव नमुना सात-बारा/ मिळकत पत्रिका) नोंदी करण्यासाठी तलाठी अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे अर्ज करतात त्यावेळी महसूल विभागातून फेरफार नोंद करण्यापूर्वी अशा मिळकतीमधील हितसंबंधितांना पुनश्च नोटीस देण्याची आवश्यक नाही.

                                 (शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१२/प्र. क्र. ४४२/ल-१, दि. २३.११.२०१२)

 ५८१. विक्री प्रमाणपत्र (Sale Certificate): जेव्हा एखादी मालमत्ता सक्षम अधिकारी किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक लिलावाद्वारे विकली जाते आणि सर्वोच्‍च बोली बोलणार्‍याची बोली स्वीकारली जाते आणि खरेदीदाराच्या बाजूने विक्रीची पुष्टी केली जाते तेव्हा खरेदीदाराला विक्री प्रमाणपत्र जारी केले जाते. विक्री प्रमाणपत्राने लिलाव खरेदीदाराच्‍या नावे विक्रीच्या पुष्टीकरण होऊन शीर्षक (title) प्राप्त होते. जेव्हा अशा विक्री आणि शीर्षकाचा पुरावा देणारे विक्री प्रमाणपत्र (evidence of such title) जारी केले जाते, तेव्‍हा हस्तांतरणाबाबतच्‍या अन्‍य कोणत्‍याही दस्‍तऐवजांची आवश्यक नसते.

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002) तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम, २०२१, नियम () अन्‍वये, विहित नमुन्यात विक्रीचे प्रमाणपत्र जारी करणे हे सक्षम अधिकार्‍याचे वैधानिक कर्तव्य आहे. नोंदणी कायदा १९०८, कलम 17(2)(xii) अन्वये, दिवाणी किंवा महसूल अधिकाऱ्याद्वारे सार्वजनिक लिलावाद्वारे विकल्या गेलेल्या कोणत्याही मालमत्तेच्या खरेदीदारास प्रदान केलेल्या विक्री प्रमाणपत्रास नोंदणीपासून सूट आहे.

सर्वोच्च बोली लावणाऱ्याने लिलावाच्या अटी व शर्ती पूर्ण न केल्यास, विक्री प्रमाणपत्र रद्द केले जाऊ शकते.

 ५८२. मालमत्ता पत्रक/ मिळकत पत्रिका (Property Card): मोठी गावे, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्र, नगर भूमापन योजना लागू झालेले गावठाण क्षेत्र या ठिकाणी सात-बारा उतारा नसतो. नगर भूमापन कार्यालय अशा प्रत्येक मिळकतीचे स्वतंत्र पत्रक तयार करते त्याला 'नगर भूमापन उतारा' किंवा 'मिळकत पत्रिकेचा उतारा पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक म्हणतात.

जसे शेत-जमिनीच्या मालकी अधिकाराविषयीच्या नोंदी सातबारा उताऱ्यात नमूद असतात त्याचप्रमाणे बिगर शेत-जमिनीवरील मालमत्तेची नोंदणी, त्यावरील अधिकाराचे तपशील सांगणारे पत्रक म्हणजे 'मालमत्ता पत्रक' होय. या उतार्‍यावर खालील माहिती असते.

नगर भूमापन(सिटी सर्वे क्रमांक, फायनल प्लॉट क्रमांक, सार्‍याची रक्कम.

 मिळकतीचे चौरस मीटर मध्ये क्षेत्रफळ.

 वहिवाटीचे हक्क.

 धारण करणार्‍याचे नाव व त्यास हक्क कसा प्राप्त झाला.

पट्टेदाराचे नाव (असल्यास).      

 मिळकतीवरील बोजे (असल्यास).

 वेळोवेळी मिळकतीच्या मालकी हक्कात झालेल्या बदलांची माहिती.

 मिळकतीच्या मालकी हक्कात (Ownership) बदल झाल्यास इंग्रजीत H' (Holder) असे अक्षर तर मराठीत ‘धा’ (धारकअसे अक्षर लिहितात.

पट्टेदाराच्या हक्कात (Lease Holder) बदल झाल्यास इंग्रजीत L' (Lease Holder) असे अक्षर तर मराठीत ‘’ (पट्टेदारअसे अक्षर लिहितात.

इतर हक्कात (Other rights) बदल झाल्यास इंग्रजीत O' (Other rights ) असे अक्षर तर मराठीत ‘’ (इतर हक्कअसे अक्षर लिहितात.

मिळकतीच्या मालकी हक्कात हस्तांतरणवारस हक्कन्यायालयीन आदेश यांमुळे बदल झाल्यास नगर भूमापन कार्यालयास मिळकत पत्रात बदल करण्यासाठी अर्ज सादर करता येतो.

 ५८३. बिन नंबरी जमीन: म.ज.म.अ. कलम २(३७) अन्‍वये ज्‍या जमिनींना भूमापन क्रमांक देण्‍यात आलेला नाही अशा सरकारी जमिनी.

 ५८४. मालमत्तेचे हस्तांतरण (Transfer of Property): एक हयात व्यक्ती ज्या कृतीद्वारे एका किंवा अधिक अन्य हयात व्यक्तींना तिच्‍या मालमत्तेचे वर्तमान किंवा भावी अभिहस्तांतरण करते ती कृती.हयात व्यक्ती" यात एखादी कंपनी किंवा अधिसंघ किंवा व्यक्तींचा निकाय- मग तो निगमित असो वा नसो, - यांचा समावेश आहे, पण यात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट कंपन्या, अधिसंघ किंवा व्यक्तींचे निकाय यांच्याकडे किंवा त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या मालमत्ता हस्तांतरणासंबंधी त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यावर परिणाम करणार नाही.

असे हस्तांतरण हयात किंवा सजीव व्यक्तीच करू शकतात (living Persons) तथापि,  त्यांत मानवनिर्मिती व्यक्ती (Artificial Persons) म्हणजे कायद्याने निर्माण केलेल्या कंपन्या, कार्पोरेशन, सहकारी संस्था, बँका ह्यांचा सुद्धा समावेश होतो.                          (मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२, कलम ५)

 ("living person" includes a company or association or body of individuals, whether incorporated or not, but nothing herein contained shall affect any law for the time being in force relating to transfer of property to or by companies, associations or bodies of Individuals.)    

 ५८५. भाडेपट्टा (Lease Deed): सर्वसाधारणपणे,भाडेपट्टा म्हणजे स्थावर किंवा जंगम मालमत्तेचा किंवा दोन्हीचा भाडेपट्टा. यामध्ये कबुलायत किंवा मालमत्तेची मशागत करण्‍याविषयी, तिचा भोगवटा करण्‍याविषयी किंवा तिचे भाडे देणेविषयी किंवा ते सुपूर्द करण्‍याविषयी लेखी हमी यांचा समावेश होतो.

 ५८६. गहाणखत (Mortgage deed) : सर्वसाधारणपणे ज्या दस्तऐवजांद्वारे कर्ज म्हणून दिलेला किंवा द्‍यावयाचा पैसा किंवा भावी ऋण किंवा एखाद्‌या गोष्टीचे पालन प्रतिभूत करण्यासाठी (to secure) एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीच्या लाभात विशिष्ट संपत्तीवरील किंवा तिच्या संबंधातील अधिकार निर्माण करते अगर अधिकार हस्तांतरीत करते असा दस्तऐवज.

 ५८७. मुखत्यारनामा (Power of Attorney): मुखत्यारपत्र किंवा वटमुखत्यारपत्र म्‍हणजे एखाद्‍या सज्ञान व्यक्तीने, स्‍वत:च्‍या वतीने ठराविक गोष्टी करण्यासाठी दुसऱ्या सज्ञान व्यक्तीस दिलेले अधिकार पत्र. हा एक प्रकारचा सरकारी कामांसाठी केलेला दस्त आहे. जी व्यक्ती कुलमुखत्यारपत्र देते त्या व्यक्तीस "प्रिन्सिपल" तर जी व्यक्ती कुलमुखत्यारपत्र लिहून घेते त्या व्यक्तीस "एजंट" म्हटले जाते.  मात्र, यामध्ये वकीलास कामकाज चालविण्यासाठी दिलेल्या वकीलपत्राचा (Vakalatnama) समावेश होत नाही. मुखत्यारपत्राद्वारे अधिकार देणारा इसम व अधिकार स्वीकारणारा इसम दोघेही कायदेशीररीत्या म्हणजेच भारतीय करार कायदा १८७२ मधील तरतुदीनुसार सज्ञान असावेत. त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक लक्षात येण्‍याची बुध्‍दी, सारासार विवेक बुद्धी असावी. ते मानसिक आणि कायदेशीररीत्या सक्षम असावेत. 

अज्ञान व्यक्ती व तिचे पालक यांच्यामध्ये मालक व त्याचा प्रतिनिधी असे संबंध कधीच नसतात. कारण अज्ञानाचे पालकत्व एक तर नैसर्गिक असते किंवा न्यायालयाने ठरविलेले असते. याचाच अर्थ कायदेशीर मार्गाने एखादी व्यक्ती अज्ञानाचे वतीने त्याचे फायद्यास अनुलक्षून काम करत राहते; मात्र कुलमुखत्यारपत्रधारकास दस्तातील मिळालेल्या अधिकारांचे चौकटीत राहूनच कामकाज पार पाडावे लागते. सर्वसाधारणपणे मुखत्यारपत्रधारकावर सोपवलेले काम पूर्ण झाल्‍यावर मुखत्यारपत्र आपोआप रद्‍द ठरते. तथापि, प्रत्‍येक मुखत्यारपत्रात ते कधी रद्‍द/प्रभावहिन ठरेल याचा उल्‍लेख जरूर असावा. मुखत्यारपत्र देणार्‍या व्‍यक्‍तीस ते कधीही रद्‍द करण्‍याचा अधिकार आहे. अशा रद्‍दतेबाबत त्‍याने मुखत्यारपत्रधारकास कळविणे अपेक्षित आहे.

मुखत्‍यारपत्र देणारी व्‍यक्‍ती किंवा मुखत्‍यारपत्रधारक मरण पावल्‍यास मुखत्‍यारपत्र आपोआप रद्‍द ठरते. परंतु स्‍थावर मालमत्तेत मुखत्‍यारपत्रधारकाचा हक्‍क/अधिकार निर्माण करणारी मुख्‍त्‍यारपत्रे, मुखत्‍यारपत्र देणारी व्‍यक्‍ती मरण पावली तरी काम पूर्ण झाल्‍याशिवाय रद्‍द ठरत नाहीत.

'रद्द न करता येणारे मुखत्यारपत्र'  अशी संकल्पना मुखत्यारपत्राच्या कायद्यात नमूद नाही. जसे मुखत्यारपत्र देता येते, तसे ते रद्दही करता येते. तसेच मुखत्यारपत्रधारकाला दिलेले अधिकार मागे घेता येतात. मुखत्यारपत्राची मूळ संकल्पना ही भारतीय करार कायद्यातून आलेली आहे. करार कायद्यानुसार जसे करार वैध अगर अवैध ठरविता येतात, तसेच नियम व कायदे मुखत्यारपत्रास लागू पडतात. मुखत्यारपत्र जर रुपये शंभरपेक्षा जास्‍त किंमतीच्‍या स्‍थावर मालमत्तेविषयी केलेले असेल तर ते मुद्रांक शुल्‍कासह निबंधक कार्यालयातून नोंदणीकृत केलेले असणे आवश्‍यक आहे. अन्‍य प्रकारचे ८२ ते २३८)

मिळकत विक्रीसाठी साधारण कुलमुखत्यारपत्र पुरेसे नाही. (सर्वोच्‍च न्‍यायालय- सुरज लँप आणि प्रा. लि. विरुध्‍द हरियाना राज्‍य व इतर)

५८८. बंधपत्र (Bond): सर्वसाधारणपणे, ज्या दस्तऐवजान्वये एक व्यक्ती, एखादी कृती (दस्तऐवजात कबूल केल्याप्रमाणे) केल्यास / झाल्यास किंवा न केल्यास/ न झाल्यास, दुसर्‍या व्यक्तीला पैसे/दंड देण्याचे बंधन स्वतःवर घालून घेते असा दस्तऐवज.

 ५८९. अभिहस्तांतरणपत्र (Conveyance):  सर्वसाधारणपणे, ज्या दस्तऐवजाद्वारे स्थावर अगर जंगम मालमत्ता किंवा कोणतीही संपदा (Estate) / मालमत्ता (Property) किंवा कोणत्याही मालमत्तेतील हितसंबंध (interest) दोन हयात व्यक्तींच्या दरम्यान हस्तांतरीत करण्यात येतात किंवा निहीत (vest) करण्यात येतात आणि ज्याबाबत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनुसूची- (Schedule-1) मध्ये कोणतीही वेगळी तरतूद नसेल असा दस्तऐवज. या प्रकारात पुढील प्रकारच्या दस्तांचा समावेश होतो.

. विक्री नंतरचे अभिहस्तांतरण (Conveyance on Sale);

. प्रत्येक संलेख (Every instrument);

. कोणत्याही दिवाणी न्यायालयाचा प्रत्येक हुकूमनामा किंवा अंतिम आदेश (Every Decree or Order of Civil Court)

. कंपनी कायदा, १९५६, कलम ३९४ अन्वये मा. उच्च न्यायालयाने कंपन्यांचे एकत्रिकरण

(Amalgamation) व पुनर्रचना (Reconstruction) बाबत दिलेला आदेश किंवा रिझर्व्ह बँकेने, रिझव्ह बँक कायदा, १९३४, कलम ४४-क अन्वये बँकांचे एकत्रिकरण व पुनर्रचना बाबत दिलेला आदेश.

 ५९०. वाटणीपत्र (Partition Deed): ज्या दस्तऐवजाद्वारे किंवा आदेशान्‍वये मालमत्तेचे सहधारक त्या मालमत्तेचे सरस-निरस मानाने तुकडे पाडून आणि सीमांकनानुसार (by metes and bounds) करतात अथवा मालमत्तेच्या विभाजनाचा करार करतात असा दस्तऐवज. वडील/पुरुषाने स्वतःहून स्वतःमध्ये आणि मुलांमध्ये केलेले वाटप, दुय्‍यम निबंधकासमोर लेखी दस्‍त नोंदवून केलेले वाटप,

हिश्‍शासंबंधी वाद असल्यामुळे दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८, कलम ५४ अन्‍वये दिवाणी न्‍यायालयाकडून करण्‍यात आलेले वाटप किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अन्‍वये तहसिलदारसमोर झालेले वाटप.

 ५९१. प्रतिज्ञापत्र अथवा शपथपत्र: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम ३३३ (फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३, कलम २९७() अन्वये कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तहसिलदार यांना शपथ देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या समोर शपथपत्र करता येते. शपथपत्रात शपथ घेतल्याविषयीचा उल्लेख नसेल तर असे शपथपत्र कायदेशीर ठरत नाही. महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक १..२०११ तसेच शासन परिपत्रक दिनांक २१..२००९ अन्‍वये नायब तहसिलदार आणि अव्‍वल कारकून यांना शपथपत्राबाबत शपथ देण्याचे अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत.    

शपथ कायद्यातील कलम ६ अन्वये विहित, फॉर्म ४ मध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये कशी शपथ घ्यावी हे नमूद केले आहे. प्रतिज्ञापत्र करणार्‍याने, ‘मी देवाशपथ खरं सांगतो की, ----- किंवा प्रतिज्ञापूर्वक सांगतो की,’ अशी सुरुवात करून स्वत:चे नाव, वय, व्‍यवसाय, राहण्याचा पत्ता व नंतर मजकूर नमूद करावा. प्रतिज्ञापत्राच्या शेवटी, ‘या प्रतिज्ञापत्रातील मजकूर माझ्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहे असे नमूद करावे. खोटे प्रतिज्ञापत्र करणे हा भारतीय न्‍याय संहिता २०२३, कलम २२७ (भारतीय दंड संहिता कलम १९१)  अन्वये गंभीर गुन्हा असून असे कृत्य भारतीय न्‍याय संहिता २०२३, कलम २२९ व २३६ (भारतीय दंड संहिता कलम १९३, व १९९) अन्वये शिक्षेस पात्र आहे. या तरतुदीबाबत प्रतिज्ञापत्र करणार्‍याला जाणिव आहे याबाबतचा उल्लेखही प्रतिज्ञापत्रात शेवटी करावा. प्रतिज्ञापत्राचे खाली प्रतिज्ञापत्र करणार्‍याला ओळखणार्‍या व्यक्तीने सही केली पाहिजे.

 ५९२. 'भाडेपट्टा' (Lease): स्थावर मालमत्तेचा भाडेपट्टा म्हणजे पट्टेदाराने (Lessee) पट्टाकाराला (Lessor) दिलेली किंवा देण्याचे वचन दिलेली किंमत अथवा नियतकालांतरागणिक किंवा विनिर्दिष्ट प्रसंगी द्यावयाचे पैसे, पिकाचा वाटा, सेवा किंवा अन्य कोणतीही मूल्यवान वस्तू याच्या प्रतिफलार्थं निश्चित काळाकरिता किंवा शाश्वत काळाकरिता काही अटींवर मालमतेचा उपभोग घेण्याच्या अधिकाराचे हस्तांतरण.  [मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२, कलम १०५; नोंदणी अधिनियम, १९०८, कलम २(७)])

 ५९३. नजर गहाण (Simple mortgage):

अ) यात गहाण देणारा रक्कम परतफेडीची जबाबदारी स्वतःवर घेतो. ब) गहाण मिळकतीचा ताबा केव्हाही दिलेला नसतो.

ब) गहाण मिळकतीसंबंधीचा गहाण सोडविण्याचा हक्क यात नष्ट होत नाही.

क) कराराप्रमाणे पैसा परत न आल्यास गहाण घेणाऱ्यास गहाण मिळकतीची विक्री करुन, गहाणाची रक्कम वसूल करुन घेता येते.

ड) जरी गहाणाची रक्कम १०० रु. पेक्षा कमी असली तरीसुध्दा गहाणखत हे नोंदविले पाहिजे.

                                                                      (मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, कलम ५८-बी)

 ५९४. सशर्त विक्रीची अट असलेले गहाण (mortgage by conditional sale): यात,

अ) मुदतीच्या आत पैशाची परतफेड झाली तर, विक्री निरर्थक होऊन मिळकत पुन्हा गहाणदारास परत मिळते.

ब) गहाण घेणाऱ्यास गहाण देणाऱ्याचा गहाण मिळकतीचा हक्क नष्ट करुन घेणे हा उपाय आहे. विक्रीचा उपाय नाही.

क) सदर गहाणखताचा जर मोबदला १०० रु. च्या वर असेल तर गहाणखत रजिस्टर केले पाहिजे. जर मोबदला रक्कम १०० रु. च्या आतील असेल तर नोंदविणे बंधनकारक नाही, परंतु मिळकतीचा ताबा घेणे आवश्यक आहे.

ड) सदरचा करार एकाच दस्तात समाविष्ट असावा. (मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, कलम ५८-सी)

 ५९५. कब्जे गहाण किंवा ताबे गहाण/ भोगवटयाचे गहाण (usufructuary mortgage): यात,

अ) गहाण मिळकतीचा ताबा गहाण घेणाऱ्यास दिला जातो.

ब) रकमेची परतफेड होईपर्यंत मिळकत गहाण घेणाऱ्याच्या ताब्यातच राहते.

क) गहाण घेणारा, गहाण मिळकतीचे उत्पन्न दिलेल्या रक्कमेच्या मोबदल्यात जमा करुन घेतो.

ड) जेव्हा गहाण रक्कम परत केली जाते किंवा ती रक्कम गहाण मिळकतीचे येणाऱ्या भाड्यातून अगर उत्पन्नातून वसूल होते, त्यावेळी गहाण मिळकत परत केली जाते.

(मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, कलम ५८-डी)

 ५९६. विक्री (Sale): मालमत्तेची पूर्ण किंमत देऊन किंवा पूर्ण किंमत देण्याचे वचन देऊन, किंवा काही किंमत रोख देऊन व काही किंमत पुढे देण्याचे वचन देऊन एकाने आपल्या मालकी हक्कांचे दुसऱ्यास हस्तांतरण करण्यास विक्री म्हणतात. स्थावर मालमत्ता रु. १०० पेक्षा अधिक असेल अशा प्रसंगी त्यासंबंधीचा दस्त नोंदविणे आवश्यक आहे. केवळ त्या संबंधीचा करारनामा करुन चालणार नाही. तो करारनामा दुय्‍यम निबंधकाकडे नोंदविला जाणे आवश्यक आहे. विक्रीबाबतची आवश्यक मूलतत्त्वे :

१) विक्रीसाठी पक्ष - हे दोन पक्ष म्हणजे विक्रेता व खरेदीदार.

अ) विक्रेता - हस्तांतरण करण्याकरिता परिपूर्णता पाहिजे. म्हणजेच त्याला मिळकतीचा पूर्ण हक्क पाहिजे अगर स्वतःची मिळकत नसेल तर दुसऱ्याला मिळकतीची विक्री करण्याचे अधिकारपत्र पाहिजे. शिवाय तो करार करण्यास लायक पाहिजे.

ब) खरेदीदार- हा कोणीही असू शकेल. मात्र त्यास ती खरेदीची मिळकत घेण्यास कायद्याने बंधन नसले पाहिजे व तो खरेदीचा व्यवहार सार्वजनिक हिताचे विरुध्द नसला पाहिजे.

२) विक्रीची मिळकत- ही मिळकत स्थावर असून तबदील करण्यास योग्य अशी पाहिजे.

३) तबदील - विक्रीमुळे त्या मिळकतीवरील मालकी हक्काचे व ताब्याचे हस्तांतरण झाले पाहिजे.

इ) यात गहाणाराचा हक्क नष्ट करण्याचा अगर गहाण मिळकतीची विक्री करण्याचा उपाय अथवा मार्ग नाही.                                                                    (मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, कलम ५४)

५९७. इंग्लिश गहाण (English mortgage): यात,

अ) गहाण मिळकतीचा ताबा गहाणदाराकडून गहाण घेणाऱ्याकडे जाते.

ब) रक्कमेची परतफेड कायद्याप्रमाणे झाली तर गहाण मिळकतीचे परत हस्तांतरण पूर्णपणे केले जाते.

क) यात कराराप्रमाणे रकमेची परतफेड करणाऱ्याची गहाण देणाऱ्यांची स्वत:ची जबाबदारी असते

ड) गहाण घेणाऱ्याचा यातील उपाय विक्री हाच असतो. गहाण देणाऱ्याचा हक्क नष्ट करता येत नाही.                                                                    (मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, कलम ५८-इ)

 ५९८. हक्‍क लेख निक्षेपेव्‍दारे कलेले गहाण (Equitable mortgage):

'डिपॉझिट ऑफ टायटल डीड' पध्दतीने कर्जव्यवहार करण्याच्या पध्‍दतीला इक्विटेबल मॉर्गेज म्हणतात. यानुसार कर्ज घेणार व्यक्ती संबंधित मिळकतीचे हक्कलेख (Title Deeds), कर्ज देणार्‍याकडे जमा करुन (By way of Depositing of Title Deeds) कर्जाची रक्कम प्रतिभूतीत (Secure) करु शकते.

यात मिळकतीचा ताबा दिला जात नाही. इक्विटेबल मॉर्गेज केवळ राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे घोषीत केलेल्‍या शहरांमध्येच करता येते.

इक्विटेबल मार्गेजमध्‍ये कर्ज घेणार्‍याने त्याच्‍याकडील हक्कलेख बँकेच्या ताब्यात देणे व बँकेने किंवा कर्जदाराने त्याबाबतचे टिपण तयार करणे पुरेसे असते. यासाठी बँक किंवा कर्ज घेणार्‍याने मिळून करारनामा तयार करुन त्यावर सही करणे बंधनकारक नसते. तरी देखील काही प्रकरणांमध्ये बँक आणि कर्ज घेणारा यांच्‍यात 'लोन अग्रीमेंट' किंवा तत्सम करार निष्पादित केला जात होता, अशा कराराची नोंदणी करण्याची पूर्वी पध्द्त नव्हती.

तथापि, अशा कर्जव्यवहारांची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अभिलेखावर यावी आणि त्याद्वारे संबंधित पक्षकारांच्‍या हिताचे संरक्षण व्हावे तसेच त्या मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीसंदर्भात झालेल्या कर्जव्यवहारांची माहिती इतरांनाही व्हावी ह्‍या उद्‍देशाने या उददेशाने नोंदणी अधिनियम १९०८, कलम १७ मध्ये दिनांक १.४.२०१३ रोजी सुधारणा करून 'डिपॉझिट ऑफ टायटल डीड' पध्दतीने होणार्‍या कर्जव्यवहारांसाठी बँक / वित्तीय संस्था आणि कर्ज घेणारा यांच्‍यामध्‍ये 'लोन अग्रीमेंट' किंवा तत्सम करारनामा निष्पादित करण्यात आला असेल तर तो करार दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.                                                            (मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, कलम ५८-एफ)

 ५९९. साठेखत (agreement for sale): साठेखत हा एक करार असून या माध्यमातून खरेदीदाराला संबंधित जमिनीचा किंवा मालमत्तेचा कुठलाही प्रकारचा हक्क, हितसंबंध किंवा बोजा तयार होत नाही किंवा निर्माण होत नाही. साठेखत व्यवहारांमध्ये एखादी मिळकत ही भविष्यामध्ये संबंधित व्यक्ती मूळ मालकाला हस्तांतरित करण्याचे वचन देत असतो.

जेव्हा साठेखत केले जाते तेव्हा हस्तांतरणासाठी काही अटी व शर्ती नमूद केल्या जातात  व त्या अटी व शर्तींची पूर्तता होणे खूप गरजेचे असते. दिलेल्या मुदतीत साठे खतात ज्या काही अटींची नोंद केलेली असते तिची पूर्तता संबंधित व्यक्तीनेन  केल्यास साठे खत रद्‍द होऊ शकते.

व्यवहारातील व्यक्तींनी संबंधित अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर संबंधित मालमत्तेचे खरेदीखत केले जाते व खरेदीदाराला त्या मिळकतीचा संपूर्णपणे ताबा कायदेशीररित्या मिळतो.

परंतु अटींची पूर्तता केल्यानंतर देखील विकणाऱ्यांनी मिळकतीचा ताबा दिला नाही तर खरेदीदाराला विशिष्ट दिलासा कायदा १९६३ (specific relief act 1963) नुसार दिवाणी न्‍यायालयात विक्री व्यवहार पूर्ण करण्याचा आदेश मागण्याचा म्हणजेच खरेदीखताचा अधिकार मिळू शकतो.  

 ६००. बेनामी व्‍यवहार (Benami Transactions): बेनामी व्‍यवहार म्हणजे मालमत्ता खरेदीचे पैसे एक जण भरतो परंतु असा व्‍यवहार दुसऱ्या व्‍यक्‍तीच्‍या नावे केला जातो. ज्या व्यक्तीच्या नावे अशी मालमत्ता खरेदी केली जाते त्याला 'बेनामदार' म्हणतात आणि त्या मालमत्तेला 'बेनामी मालमत्ता' म्हणतात. ज्या व्यक्तीने ती मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे खर्च केलेले असतात तो खरा या मालमत्तेचा मालक असतो आणि ज्याच्या नावे संपत्ती असते तो नामधारी मालक असतो. जो खरा मालक असतो तोच अशा संपत्तीचा वापर करत असतो.

सुधारीत बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा, २०१६ अन्‍वये बेनामी व्यवहारांवर पूर्ण बंदी घालण्यात आली असून या कायद्याचा भंग करणाऱ्यांना सात वर्ष तुरुंगवास व मालमत्तेच्या एक चतुर्थांश किमती इतका दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. बेनामीदाराच्या ताब्यात असलेली मालमत्ता तिच्या मूळ किंवा खऱ्या मालकाच्या ताब्यात जाण्यासही या कायद्याने प्रतिबंध केला आहे. बेनामी मालमत्ता या थेट जप्त करणे आणि त्यापोटी कोणतीही भरपाई या नव्या सुधारित कायद्यात नाकारण्यात आलेली आहे.

 ६०१. झोन (Zones): शासनाने, शहराच्‍या कोणत्‍या भागात कोणत्‍या प्रकारचे बांधकाम/वापर अनुज्ञेय आहे याबाबत केलेली तरतूद म्‍हणजे झोन. प्रत्‍येक झोनला एक विशिष्‍ठ रंग दिला गेला आहे. झोनमध्‍ये अनुज्ञेय नसलेले बांधकाम/वापर बेकायदेशीर ठरते. झोनिंगचा उद्देश अधिकार्यांना जमिनीच्या वापरावर नियंत्रण आणि नियमन करण्यास सक्षम करणे आहे.

झोनचे रंग: (१) गडद निळा (Dark blue) -किरकोळ कारणांसाठी. उदा. भोजनालय, हॉटेल्स, मॉल्स, सिनेमा हॉल (२) गडद पिवळा (Dark yellow) - मिश्र वापरासह निवासी मालमत्ता. उदा. किराणा दुकान आणि हेल्थ केअर क्लिनिक इ. या भागात, सुमारे ३३% व्यावसायिक उद्‍योगांना  परवानगी आहे. (४) राखाडी (Gray) - जड उद्योगांसाठी, (५) हिरवा (green) - हिरवळ आणि कृषी मालमत्तेच्या संवर्धनासाठी. उदा. जंगले, तलाव, दऱ्या, तलाव, बागा आणि स्मशानभूमी या सर्व हिरव्या रंगाच्या विविध छटा दाखवल्या जाऊ शकतात. (६) फिक्का निळा (pale blue) -व्यावसायिक हेतूंसाठी, उदा. केंद्रीय व्यवसाय जिल्हा, कार्यालये इ. (७) फिकट पिवळा (Pale yellow) - प्राथमिक/मिश्र निवासी वापराची जमीन. (८) गडद जांभळा (Dark purple) - उच्च तंत्रज्ञान उद्योगांसाठी, (८) फिकट जांभळा (pale purple) - औद्योगिक उद्देश आणि स्थापनेसाठी (९) लाल (Red) - सार्वजनिक आणि अर्ध-सार्वजनिक वापर क्षेत्र, उदा. मंदिरे, शैक्षणिक संस्था.

 ६०२. साक्षांकन (attestation): साक्षांकन करतांना दस्तऐवज करून देणाऱ्याने सही किंवा अंगठा करताना साक्षीदाराने प्रत्यक्ष पाहिले पाहिजे. त्यांनी ती सही किंवा अंगठा त्याचाच आहे असे मान्य केल्यावर साक्षीदाराने सही करायची असते. निष्पादकाने (Executant) ने सही करायच्‍या आधीच साक्षीदाराने दस्तऐवजावर सही केली असेल तर त्यास साक्षांकन म्हणता येणार नाही.

 (ए. आय. आर. १९५१ एस. सी. ४७७ संतलाल म्हातोन वि. कमला प्रसाद.

ए. आय. आर. २००९ एस. सी. १३८९ ललिताबेन जयंतीलाल पोपट वि. प्रज्ञाबेन जमनादास कटारिया)

 ६०३. प्रतिज्ञापत्र अथवा शपथपत्र (Affidavit): प्रतिज्ञापत्र म्हणजे, एखाद्‍या व्‍यक्‍तीने, त्‍याला एखाद्‍या वस्तुस्थितीचे (fact) भान (aware of ) असल्याचे लिखित स्वरुपात दिलेले निवेदन/घोषणा (statement/ declaration), ज्यावर त्याने स्वाक्षरी केली आहे आणि शपथ घेऊन त्याची पुष्टी (by swearing and affirming) केली आहे.

अशी प्रतिज्ञा किंवा घोषणा रु. १००/-च्या स्टॅम्प पेपरवर असणे आवश्यक आहे अशी पूर्वी तरतूद होती परंतु राज्य शासनाने दिनांक १.७.२००४ च्‍या अधिसूचनेनुसार, जातीचे प्रमाणपत्र/उत्पन्न प्रमाणपत्र/निवासी प्रमाणपत्र/राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा कोणत्याही शासकीय अधिकार्‍यासमोर दाखल करण्याच्या किंवा वापरण्याच्या इतर कोणत्याही हेतूसाठी किंवा कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही न्यायालयाच्या अधिकाऱ्यासमोर सादर करण्‍यात येणार्‍या प्रतिज्ञापत्राच्या दस्‍तऐवजावर शुल्क आकारले जाणारे मुद्रांक शुल्क माफ केले आहे.  (महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८, कलम ४ आणि कलम ९)

 कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तहसिलदार यांना शपथ देण्याचा अधिकार आहेत.

[भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम  ३३३/[फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३, कलम २९७()]

शपथपत्रात शपथ घेतल्याविषयीचा उल्लेख नसेल तर असे शपथपत्र कायदेशीर ठरत नाही.

नायब तहसिलदार आणि सहायक महसूल अधिकारी (अव्‍वल कारकून) यांना शपथपत्राबाबत शपथ देण्याचे अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत.

         (महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक १.२.२०११ तसेच शासन परिपत्रक दिनांक २१.९/२००९)

प्रतिज्ञापत्र करणार्‍याने, ‘मी देवाशपथ खरं सांगतो की, ----- किंवा प्रतिज्ञापूर्वक सांगतो की,’

अशी सुरुवात करून स्वत:चे नाव, वय, व्‍यवसाय, राहण्याचा पत्ता व नंतर मजकूर नमूद करावा.

प्रतिज्ञापत्राच्या शेवटी, ‘या प्रतिज्ञापत्रातील मजकूर माझ्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहेअसे नमूद करावे. प्रतिज्ञापत्राच्‍या शेवटी प्रतिज्ञापत्र करणार्‍याला ओळखणार्‍या व्यक्तीने सही केली पाहिजे. खोटे प्रतिज्ञापत्र करणे हा गंभीर गुन्हा असून असे कृत्य भारतीय न्‍याय संहिता, २०२३ अन्‍वये शिक्षेस पात्र आहे. या तरतुदीबाबत प्रतिज्ञापत्र करणार्‍याला जाणिव आहे याबाबतचा उल्लेखही प्रतिज्ञापत्रात शेवटी करावा.               

(भारतीय न्‍याय संहिता, २०२३, कलम २२८, २३६, २३७/भारतीय दंड संहिता कलम १९२, १९९,२००)

 

६०४. नुकसानभरपाई बंधपत्र (Indemnity bond): दोन व्यक्ती किंवा पक्षांमधील करार, जिथे एक व्यक्ती तिच्या/तिच्या वागणुकीमुळे किंवा दुसऱ्या पक्षाद्वारे दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान आणि नुकसान भरपाई देण्याचे वचन देते.  (भारतीय करार कायदा १८७२, कलम १२४)

 ६०५. 'पंचनामा': या शब्‍दाची स्‍पष्‍ट व्‍याख्‍या कायद्‍यात नमूद नाही. तथापि, 'पंचनामा' ला न्‍यायालयीन कामकाजात फार महत्‍व दिले जाते. बहूतांश सर्वच न्‍यायालये 'पंचनामा' वर अवलंबून असतात व त्‍या आधारे निकाल देतात. फौजदारी न्‍यायालयांत 'पंचनामा' चा उपयोग स्वतंत्र पुराव्‍याला आधार आणि समर्थनार्थ केला जातो तर दिवाणी न्‍यायालयांत 'पंचनामा' चा उपयोग अधिकार्‍यांनी केलेल्‍या कारवाईची सत्यता पडताळून पाहण्‍यासाठी तसेच आदेशाच्‍या अंमलबजावणीचा पुरावा म्‍हणून केला जातो.

'पंचनामा' हा शब्‍द 'पंच' आणि 'नामा' या दोन शब्‍दांनी तयार झाला आहे. संस्‍कृत भाषेत 'पंच' म्‍हणजे प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍ती असा आहे. 'नामा' म्‍हणजे लिखित दस्‍त. थोडक्‍यात पाच प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍तींच्‍या समक्ष घटनेबाबत केलेला लिखित दस्‍त म्‍हणजे 'पंचनामा' किंवा घडलेल्‍या घटनेचे 'घटना चित्र' म्‍हणजे पंचनामा.

 ६०६. ऐपत दाखला (Solvency certificate): याला पत प्रमाणपत्र, हैसियत दाखला इत्‍यादी नावाने संबोधण्‍यात येते. सर्वसाधारणपणे ऐपत दाखला हा मिळकतीच्‍या बाजारमूल्‍याच्‍या आधारावर देण्‍यात येतो. न्‍यायालयात जामीन देणेसाठी, बँकेतून कर्ज घेतांना अशा विविध कारणांसाठी ऐपत दाखल्‍याची आवश्‍यकता असते. महसूल विभागात नायब तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्‍हाधिकारी यांना विविध रकमेचे ऐपत प्रमाणपत्र देण्‍याचा अधिकार आहे.

अर्जदार सामान्‍यपणे ज्‍या भागात वास्‍तव्‍य करतो किंवा ज्‍या भागात त्‍याची मिळकत आहे, त्‍या भागातील सक्षम अधिकार्‍याकडे ऐपत दाखल्‍यासाठी अर्ज करता येतो.  

 ६०७. कौटुंबिक विभाजन (Family Partition);कौटुंबिक समझोता (Family Settlement): हा मृत्‍युपत्राला पर्वाय मानला जातो. याचा मसुदा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या संमतीने तयार केला जातो आणि त्यांच्यामध्ये मालमत्ता आणि मालमत्ता कशी विभागली जातील हे निर्धारित केले जाते. हा कौटुंबिक सदस्यांमधील न्यायालयाबाहेर समझोता मानला जातो. याला मालमतेचे हस्तांतरण समजता येणार नाही.

१) ए. आय. आर. १९६६ एस. सी. २९२ टेका बहादूर भूजील वि. देवी सिंग भूजील

२) ए. आय. आर. १९६६ एस. सी. ३२३ रामचरन दास वि. गिरजानंदिनी देवी]

 ६०८. ‘दान’ (Gift, Donation): ‘दाता’ (Donor) म्हणून संबोधल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने वर्तमान विवक्षित जंगम किंवा स्थावर मालमत्तेचे स्वेच्छेने व प्रतिफलाविना (without consideration) ‘आदाता’ (Donee) म्हणून संबोधल्या जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीस केलेले आणि आदात्याने किंवा त्याच्या वतीने स्वीकारलेले हस्तांतरण होय. असा स्वीकार दात्याच्या हयातीत व तो दान करण्यास समर्थ असेतोवर करण्यात आले पाहिजे.

दानाचा अदात्याने स्वीकार करावा लागतो. दानानंतर 'अदाता' हा मालमत्तेचा मालक होतो.

अदात्याने त्याचे हयातीतच (Life time) दानाचा स्वीकार करायचा असतो. जर आदाता दानाचा स्वीकार करण्यापूर्वी मरण पावला तर, दान शून्य होते. स्थावर किंवा जंगम मालमत्तेचे दान हे दोन साक्षीदारांनी साक्षांकित केलेल्या नोंदणीकृत दस्‍ताने झाले पाहिजे.

(मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२,कलम १२२ ; ए. आय. आर. २००४ एससी. २६६५

एफ. एम. देवरू गणपती भट वि. प्रभाकर गणपती भट)

 

६०९. सही निशाणी अंगठा (Thumb Impression): व्याकरणातील भिन्नता आणि एकत्रित अभिव्यक्तीसह “चिन्ह” या शब्दामध्ये, आपले नाव लिहिण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तीच्या संदर्भात, व्याकरणाच्या भिन्नतेसह आणि एकत्रित अभिव्यक्तीसह “चिन्ह” समाविष्ट असेल या तरतुदीनुसार ‘सही/स्‍वाक्षरी’ या संज्ञेमध्ये, व्यक्ती निरक्षर असल्यास, अंगठ्याचा ठसा असाही अर्थ अंतर्भूत आहे. (General Clauses Act, section 3) अंगठ्याचा ठसा स्पष्ट असावा व अंगठा घेताना अंगठ्याच्या ठशापुढे, अंगठ्याचा ठसा घेणाऱ्या प्राधिकाऱ्याने ‘सही निशाणी अंगठा xxxxx (अंगठा उमटवणार्‍या व्‍यक्‍तीचे नाव) यांचा असे’ किंवा ‘सही निशाणी अंगठा xxxxx (अंगठा उमटवणार्‍या व्‍यक्‍तीचे नाव) यांच्‍या अंगठ्याचा ठसा’ असे लिहावे. अंगठ्याचा ठसा घेणाऱ्या प्राधिकाऱ्याने निरक्षर व्यक्तींच्या अंगठ्यांच्‍या ठशावर वरील प्रमाणे अनुप्रमाणन करणे आवश्यक आहे. [महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड चार), ‘तलाठी, मंडल निरीक्षक आणि मंडल अधिकारी यांच्याकरिता कार्यपद्धती’ क्रमांक २७.]

प्रथेप्रमाणे डाव्या अंगठ्याचा ठसा (LTI) घेण्‍यात येतो तथापि, याबाबत कोणत्‍याही कायद्‍यात स्‍पष्‍ट उल्‍लेख नाही.

 ६१०. स्टॅम्प पेपर (Stamp paper): महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, कलम २(के) अन्‍वये ‘उमट मुद्रांक’ मध्ये विनिर्दिष्ट केलेले मुद्रांक. यामध्ये योग्य अधिकार्‍याने लावलेल्या व उमटवलेल्या खूणचिठ्ठया मुद्रांकित कागदावर उमटरेखन केलेले किंवा कोरलेले मुद्रांक, फ्रँकिग यंत्राने उमटवलेला ठसा, राज्य शासनाने अधिसूचनेव्दारे विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही यंत्राने उमटवलेला ठसा, इ-प्रदानाची पावती, इ-एसबीटीआर तसेच, ग्रास प्रणालीव्दारे मुद्रांक शुल्क भरल्याची पावती यांचा समावेश होतो.

 

६११. 'नागरी क्षेत्र': त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये घटित करण्यात आलेल्या कोणत्याही महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेले क्षेत्र. [म.ज.म.अ. कलम २(४२)]

शहरात वा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याची प्रक्रिया म्‍हणजे नागरीकरण. २०,००० अथवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या वस्तीस 'नागरी' (अर्बन) म्हणावे, अशी संयुक्त राष्ट्रांची सर्व राष्ट्रांना शिफारस आहे. आणि 'नगरेतर क्षेत्र' या शब्दप्रयोगाचा अर्थ त्यानुसार लावला जाईल. 

 ६१२. 'एकात्‍मीकृत नगर वसाहत प्रकल्प': महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम, १९६६च्या तरतुदींखाली शासनाने एकात्‍मीकृत नगर वसाहत प्रकल्‍पासाठी तयार केलेल्या विनियमांखालील एक किंवा अनेक एकात्‍मीकृत नगर वसाहत प्रकल्प.                             [म.ज.म.अ. कलम ४४(अ)]

 ६१३. 'अ' वर्ग किंवा 'ब' वर्ग नगरपालिका क्षेत्र': महाराष्‍ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ अन्‍वये 'अ' वर्ग किंवा 'ब' वर्ग असे वर्गीकरण करण्‍यात आलेले कोणतेही नगरपालिका क्षेत्र.         

                                                                                                   [म.ज.म.अ. कलम ४७(अ)]

 ६१४. नियोजन प्राधिकरण (Planning Authority): महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन अधिनियम, १९६६ मध्‍ये व्याख्या केल्याप्रमाणे असलेले नियोजन प्राधिकरण.

[महाराष्ट्र जमीन महसूल शेतातील इमारत (उभारणे, नूतनीकरण करणे, पुनर्बांधणी करणे, फेरबदल करणे किंवा भर घालणे इत्यादी) नियम, १९८९, नियम २(क)]

 

६१५. प्रादेशिक योजना (Regional Plan):  राज्यातील जिल्ह्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी, महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्राबाहेर होणाऱ्या अनियंत्रित व अनिर्बंधित वाढीचे सुनियोजन तसेच नागरी व ग्रामीण क्षेत्राचे संतुलन राखण्यासाठी आणि ग्रामीण क्षेत्राच्या उन्नतीकरिता प्रस्तावित जमीन वापर व सार्वजनिक सुविधा दर्शविणाऱ्या योजना.

                                       (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६, कलम ३ ते २०)

 ६१६. विकास योजना (Development Plan): नागरी क्षेत्रासाठी म्हणजेच महानगरपालिका /नगरपरिषदा/नगर पंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये अंतर्भूत क्षेत्राच्‍या विकास योजना, आगामी २० वर्षाच्या कालावधी लक्षात घेऊन, भविष्यकालीन लोकसंख्येनुसार, प्रस्तवित जमिन वापर आणि सार्वजनिक सुविधांची आरक्षणे दर्शविणारा नकाशा आणि प्रारुप विकास आराखडा. या योजनेला शासनाच्या नगर विकास विभागाकडून मान्यता देण्यात येते.

                                   (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६, कलम २१ ते ३१)

 ६१७. नगर रचना योजना (Town Planning Scheme): नागरी क्षेत्रासाठी म्हणजेच महानगरपालिका /नगरपरिषदा /नगरपंचायती इ. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट क्षेत्रासाठी मंजूर अंतिम विकास योजना क्षेत्रामध्ये, विकास योजना अंमल बाजवणीसाठी सविस्तर सुक्ष्मनियोजन (Micro-Planning) म्हणजे Land Pooling & Redistribution या पध्दतीने योजना तयार करण्याची तरतुद असून या योजनेला शासनाच्या नगर विकास विभागा कडून मान्यता देण्यात येते.

                                      (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६, कलम ५९ ते ११०)

 ६१८. विशेष नगर वसाहत (special township): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या गृहनिर्माण धोरणाला अनुसरुन नागरीकांना परवडणार्‍या किमतीमध्ये जास्तीत जास्त घरकुले उपलब्ध व्हावी या उद्देशाने विशेष नगर वसाहत योजना महाराष्ट्र राज्यात सर्वत्र लागू केली आहे. या योजने मार्फत खाजगी जमिन धारक/विकासक ज्याच्याकडे ४० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमिन एक संघ आणि किमान १८ मीटर रुंद प्रवेश रस्त्यासह उपलब्ध असेल अशा ठिकाणी शासनाच्या विविध नियमांमध्ये सूट देऊन घरकूल योजना राबविण्यासाठी परवानगी देण्यात येते.

 ६१९. हद्द कायम मोजणी: एखादया भूमापन क्रमांकाच्या हितसंबंधित धारकाच्‍या भूमापन क्रमांकच्या हद्‍दी कायम करण्‍यासाठी भूमि अभिलेख विभागातर्फे केली जाणारी जमिनीची मोजणी.                                                               (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १३६)

 

६२०. निमताना मोजणी: हद्‍द कायम मोजणी मान्य नसेल तर मूळ मोजणीच्या विरोधात अपील करण्याची तरतूद आहे. त्यानुसार थेट तालुका निरीक्षक, भूमि अभिलेख यांचेकडे निमताना मोजणीसाठी अर्ज केला जातो. अशा अर्जावरुन स्वत: तालुका निरीक्षक हे, पुन्हा केलेल्या मोजणीची परत खात्री करुन स्वतंत्र मोजणी करुन जमीनीची हद्द दाखवतात.

 

६२१. पोटहिस्सा मोजणी:  वारस हक्काने, वाटपाने, खरेदीने, अकृषीक वापराने, जमिनीचे जे नविन पोटहिस्से तयार होतात अशा नविन पोटहिस्साची यादी महसूल विभागकडुन आवश्यकत्या कागदपत्रसह (उदा. सात-बारा उतारा, गावनमुना ६-ड चे संपुर्ण पोटहिस्सा उतारे, पोटहिस्साचा कच्चा नकाशा इत्यादी) प्राप्त झाल्‍यानंतर अथवा संबंधित धारकाने पोटहिस्सा जमिनीच्या/मिळतीची पोटहिस्सा मोजणीसाठी अर्ज केल्‍यानंतर प्रचलित दराने मोजणी फी आकारून संबंधित मोजणी रजिस्टरला नोंदी घेऊन सदरचे प्रकरण मोजणीसाठी भूकर-मापकाकडे देण्‍यात येते. भूकर-मापक, जमिनीतील प्रत्येक पोटविभागाची दाखविलेल्या वहिवाटी नुसार मोजणी करुन गुणाकार बूक (हिस्सा फॉर्म नं. ४) तयार करतात. भरले जाते. पोटहिस्सा प्रकरणी आकारफोड पत्रक (नमुना नंबर ११) व फाळणीबारा (नमुना नंबर १२) तयार करण्‍यात येतात.  

                                                 (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८६ व ८७)

 

६२२. फाळणी बारा: फाळणी बारा हा जमीन मोजणीशी संबंधित एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे विभाग किंवा उप-विभाग पाडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. “फाळणी” या शब्दाचा अर्थ विभाजन किंवा वेगळे करणे असा होतो, तर “बारा” हा शब्द जमिनीच्या क्षेत्रफलाची एक विशिष्ट मोजण्याची एकक आहे.फाळणी बाराचा वापर खालील परिस्थितींमध्ये केला जातो:

जमिनीचे विभाजन: जेव्हा एखादी जमीन विविध मालकांना विभाजित करायची असते तेव्हा फाळणी बारा वापरली जाते. हे प्रत्येक मालकाला त्याच्या हिस्स्याचे योग्य क्षेत्रफळ सुनिश्चित करते.

जेव्हा एका जमिनीचा हिस्सा पुन्हा विभाजित करायचा असतो तेव्हा फाळणी बारा वापरली जाते. हे प्रत्येक उप-हिस्स्याचे योग्य क्षेत्रफळ सुनिश्चित करते.

जेव्हा जमिनीच्या मालकी हक्कावर वाद असतो तेव्हा फाळणी बाराचा वापर वाद मिटविण्यासाठी केला जाऊ शकतो. फाळणी बारा तयार करण्यासाठी, एक सर्वेक्षणकर्ता जमीन मोजतो आणि नकाशा तयार करतो. नकाशावर, जमिनीचे विविध हिस्से आणि त्यांचे क्षेत्रफळ दाखवले जाते. फाळणी बारा हा एक कायदेशीर दस्तावेज आहे आणि न्यायालयात पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.

 

६२३. भूसंपादन संयुक्त मोजणी [Joint Measurement Survey (J.M.S.)]: सार्वजनिक प्रयोजनासाठी ज्या ज्या वेळी खाजगी जमिनीची आवश्यकता भासते त्या-त्यावेळी शासनामार्फत जमीन भूसंपादन अधिनियमाच्‍या तरतुदीनुसार जमीन संपादन करणेत येते. जिल्हाधिकार्‍यांकडुन प्रकरणांची सर्व पूर्तता झाल्‍याची खात्री झाल्‍या असे प्रकरण मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे पाठवले जाते. प्रस्तावासोबतच्‍या कागदपत्रांची पडताळणी व भूसंपादन मोजणी नोंदवहीत  नोंदवून हे प्रकरण मोजणीसाठी भूकर-मापक यांचेकडे वर्ग केले जाते. भूकर-मापक हे मोजणीकामी आवश्यक असणार्‍या सर्व अभिलेखांसह  संबंधित संपादन मंडळ, संबंधित भूसंपादन अधिकारी, तलाठी आणि ज्‍यांच्या जमिनी संपादीत होणार आहेत त्यांना आगाऊ नोटीशीने कळवुन, मोजणी तारखेला भूसंपादन मंडळाकडील रेखाकिंत नकाशा आधारे व सीमांकना आधारे मोजणी करतात. सदर मोजणी नकाशावर संपादन मंडळाच्या हजर असणार्‍या अधिकारी व संबंधित भूधारक यांच्या स्वाक्षरी घेऊन कामाची पुर्तता करतात. सदर संयुक्त मोजणी नकाशाच्या व संयुक्त विवरण पत्राच्या पाच (अ,,,,ई) प्रती तयार करतात.

जागेवर आढळून आलेल्या विहीरी, इमारती, मोठी झाडे, टेलिफोन खांब, विज खांब, फळझाडे, इत्यादींच्‍या नोंदी  मोजणी आलेखात व संयुक्त मोजणी विवरण पत्रात घेण्यात येतात. सदर मोजणीचे काम पुर्ण झालेनंतर संयुक्त विवरण पत्राच्या व मोजणी आलेखाच्या तीन प्रती (क,,ई) सविस्तर अहवालासह भूसंपादन अधिकारी यांचेकडे पाठविला जातो. भूसंपादन मोजणीमध्ये तयार केलेला अभिलेख हा कायम स्वरुपी जतन केला जातो. भूसंपादनाच्या मंजूर निवाडयानंतर तो नक्कल देणेस पात्र ठरतो.

 

६२४. ई-मोजणी प्रणाली: मोजणी प्रक्रियेशी निगडीत मोजणी शुल्क ठरविणे, प्रत्येक मोजणी अर्जाला संगणकीकृत मोजणी क्रमांक देऊन मोजणी रजिस्टर तयार करणे, मोजणीच्या कामाची संगणकीकृत विभागणी, चलान, नोटीस आणि कार्यारंभ आदेशाची प्रिंटींग तसेच भूकर-मापकाचा दौरा कार्यक्रम ईत्यादी कामे ई-मोजणी प्रणाली मार्फत केली जातात. या प्रणालीत मोजणीसाठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरता येतो. मोजणीची नोंद झाल्यानंतर मोजणीच्या प्रकारानूसार आणि जमिनीच्या क्षेत्रानुसार मोजणीचे शुल्क ठरविले जाते. मोजणीचे शुल्क चलनद्वारे बॅंकेत भरावयाचे असते, या प्रणालीतून शासकीय चलनाची प्रत प्रिंट करण्यात येते. अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जदाराच्या जमिनीच्या मोजणीचे काम कोणत्या भूकर-मापकाकडे द्यायचे हे भूकर-मापकांच्या संख्येनूसार या प्रणालीद्वारे केले जाते. 

 

६२५. धुरा: बेरार जमिनीचे सर्वेक्षण आणि जमाबंदी पध्दतीमध्ये, दोन शेतजमिनींमधील अंतर दर्शविण्यासाठी शेतजमिनी एकमेकांपासून धुरामार्फत चिन्हांकित केल्या जातात. धुरा म्हणजे ४ फूट रुंदीची जमिनीची पट्टी जी लागवड न करता दोन जमिनींच्यामध्ये  ठेवलेली असते. सर्वसामान्यपणे धुरा माती किंवा दगडांची बनलेली असते, ती १० फूट लांब, ४ ते ५ फूट रुंद आणि ३ फूट उंच असते आणि विशिष्ट कोनात २ किंवा ३ फूट जमिनीत गाडलेली असते.

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महसूल शब्दावली - 10. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.