देवस्थान
जमिनी (इनाम वर्ग
३)
ब्रिटीश अंमल सुरु झाल्यानंतर चलनी नाणी
अस्तीत्वात आली. त्यावेळी राज्य चालवण्यासाठी पैसे आवश्यक असल्यामुळे जमिनीवरील महसूल
(शेतसारा) हा रोख पैशाच्या स्वरुपात वसूल करावा या दृष्टीने जमीनींवर पैशाच्या
रुपाने शेतसारा ठरवण्याची प्रक्रिया सुरु केली गेली व जमिनीची प्रतवारी पाहून
त्या जमिनीवरील शेतसारा पैशांच्या रुपाने निश्चित केला गेला.
अशा जमिनींची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी स्वतंत्र
अधिकारी नेमणे आवश्यक असलेमुळे व त्यासाठी The Rent Free
Estate Act 1852 हा स्वतंत्र कायदा केला गेला व या
कायद्याप्रमाणे इनाम कमिशनर आणि असिस्टंट इनाम कमिशनर यांची नियुक्ती केली गेली.
१] सरंजाम इनाम
[अ] तह सरंजाम (Treaty Saranjams)
[ब] तह नसलेले सरंजाम
(Non-Treaty Saranjams)
[क] इतर राजकीय धारणा
(Other Political Tenure)
२] वैयक्तिक
इनाम (Personal Inam)
३] देवस्थान इनाम (Devasthan
Inam)
४] भरूच, खेडा, पंचमहाल आणि सुरत जिल्ह्यातील जिल्हा आणि ग्राम
अधिकाऱ्यांच्या बिन-सेवा वतने
Non-Service watans of
District and Village Officers in Broach, Kaira, Panch-Mahals and Surat
५] इतर जिल्ह्यांमधील जिल्हा आणि ग्राम
अधिकाऱ्यांची बिन-सेवा वतने Non Service watans of District and Village Officer in
Other District
६] ग्राम अधिकारी आणि सेवकांची सेवा वतने Service
watans of Village Officers and Servants
[अ] शासनासाठी उपयुक्त Useful to Government
[ब] जनसमुदायासाठी उपयुक्त Useful to
Community
७] स्थानिक, नगरपालिका किंवा इतर निधीच्या खर्चाने बांधकामासाठी
महसूलमुक्त जागा. Revenue
free sites for the construction at the cost of local, municipal or other funds.
( After coming into force of
“The Bombay Public Trusts Act, 1950” (now The Maharashtra Public Trusts
Act), in case of registered trusts, the control on the right to transfer of
Devasthan lands, is as per Section 36 of the said Act. The office of the
Charity Commissioner is now competent to either permit transfer or deny
permission for transfer of Devasthan land.)
या कारणास्तव ज्या जमिनींना सारा माफी दिली
गेली त्या जमीनींवर ‘जुडी’ (Quit Rent ) आकारली गेली व ही जुडीची रक्कम British Crown ला दिली जात असे.
देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनींचे दोन प्रकार
होते.
१) ग्रँट ऑफ रेव्हेन्यू (Grant of Revenue)
ग्रँट ऑफ रेव्हेन्यू जमिनींच्या शेतसाऱ्यामध्ये
सवलत दिली असली तरी त्या जमिनींच्या शेतसाऱ्यामधील Quit Rent (King Share) हा वसूल केला
जात असे. सदर Quit Rent हे शेतसाऱ्याच्या ४ आणे (२५ टक्के) असे. म्हणजे ज्या जमिनीवरील
शेतसाऱ्यामध्ये माफी दिलेली आहे. परंतु त्या जमिनीच्या शेतसाऱ्यावर Quit Rent वसूल केला जात
होता त्या जमिनी ग्रँट ऑफ रेव्हेन्यू ग्रँट.
पूर्वीचे राजे किंवा संस्थानीकांनी ज्या जमिनी
देवस्थानला, त्या जमिनींमधील दगड, धोंडे, तृण, पाषाण, नदी, नाले, गवत, झाडे- झुडुपे यांमधील सर्व हक्कासह बहाल केलेल्या आहेत.
त्या जमिनींना ग्रँट ऑफ सॉइल किंवा सॉइल ग्रँट असे म्हणतात.
सॉइल ग्रँट जमिनीमध्ये राजाचे असलेले
सर्व हक्क देवस्थानास बहाल केलेले असलेमुळे त्या जमिनींच्या शेतसाऱ्यावर कोणतीही
रक्कम Quit Rent म्हणुन आकारणी जात नाही. काही देवस्थानास संपूर्ण गावेच सॉइल ग्रँट म्हणून
आहेत.
स्तंभ क्रमांक-१: प्रत्येक तालुक्याचे एक
स्वतंत्र रजीष्टर ठेवलेले असते व त्यामध्ये सारामाफीच्या प्रत्येक जमिनीस स्वतंत्र
अनुक्रमांक दिलेला आहे.
स्तंभ क्रमांक-२: गावाचे नाव.
स्तंभ क्रमांक-३: ज्याच्या प्रित्यर्थ शेतसार्यामध्ये
सवलत दिली ती बाब म्हणजे पाटील, कुलकर्णी, महार, जागले इत्यादी
बाबी. धार्मिक कामाप्रित्यर्थ असेल तर ती धार्मिक बाब.
स्तंभ क्रमांक-४: इनामाच्या उक्त ७ प्रकारांपैकी
कोणत्या वर्गाचे इनाम आहे.
स्तंभ क्रमांक-५: सनदेचा अनुक्रमांक. सनदेचे
विविध फॉर्मस होते, कोणत्या फॉर्ममध्ये सनद घ्यावी याची नियमावली होती.
स्तंभ क्रमांक-६: सनद दिल्याचा दिनांक
स्तंभ क्रमांक-७: सनदेवर स्वाक्षरी करणार्या
अधिकार्याचे नाव व हुद्दा.
स्तंभ क्रमांक-८: जमिनीच्या धारकाचे (Holder) नाव, जरी जमिनीचे
उत्पन्न देवस्थानासाठी वापरले असेल परंतु जमिनीचा मालक हा कोणी खाजगी व्यक्ती असेल
तर येथे धारक (Holder) म्हणुन
त्याचे नाव नमूद असते.
स्तंभ क्रमांक-९: तालुका व जिल्हा
स्तंभ क्रमांक-१०: किती नंबरच्या फॉर्ममध्ये सनद दिली आहे त्याचा फॉर्म नंबर.
स्तंभ क्रमांक-११: सारामाफीची जमीन त्या जमीन
मालकाकडे किती कालावधीसाठी ती जमीन राहावयाची आहे (Duration
of Tenure). जर वतनी जमीन असेल व वतन वंशपरंपरागत असेल
तर Hereditary under Bombay Act III of 1874 असे नमूद केलेले असते. जर धारक (Holder) कायमस्वरुपी मालकीहक्काने ती जमीन वहिवाटत असेल
तर Permanent अशी नोंदी घेतली आहे.
स्तंभ क्रमांक-१२ ते १५: त्या जमिनीचा तत्कालीन
सर्व्हे क्रमांक, क्षेत्र (एकर गुंठे), व त्यावेळच्या प्रतवारीनुसार ठरविलेला शेतसारा.
स्तंभ क्रमांक-१६ व १७: जरी जमिनीचे
शेतसाऱ्यात सवलत दिलेली असली तरी जर जमीन रेव्हेन्यू ग्रँटची असेल तर त्या जमिनीमधुन
जुडी, सलामी
व Quit Rent घेण्याचे अधिकार होते. त्यामुळे ज्या जमिनीस किती जुडी किवा सलामी ठरविली
होती.
स्तंभ क्रमांक-१८: रक्कम (आणे-पैसे)
स्तंभ क्रमांक-१९: सर्व जुड़ी Quit Rent यांची एकंदर
बेरीज (जमीन सॉइल ग्रँटची असेल तर त्यास Quit Rent आकारला जात नाही.)
स्तंभ क्रमांक-२०: स्तंभ क्र. १५ प्रमाणे जो शेतसारा
ठरविलेला आहे त्यातुन स्तंभ क्र. १९ प्रमाणे होणारी जुडी Quit Rent वगैरे यांची
रक्कम वजा जाता जो शेतसारा निव्वळ सोडुन दिलेला आहे. त्याची रक्कम. सॉइल ग्रँटमध्ये
काहीही Quit Rent आकारला जात नसल्यामुळे संपूर्ण शेतसारा हा माफ असल्याचा उल्लेख असतो.
स्तंभ क्रमांक- २१: शेरा
जर कोणत्याही पूर्वीच्या सनदी उपलब्ध नसतील तर
Land Alienation Register मधील नोंदी या Bombay
Land Revenue Code 1879, कलम ५३ अन्वये मालकी हक्काचा
पुरावा मानला जातो.
मा. राव बहादुर आर एन जोगळेकर हे तत्कालीन
मुंबई प्रांताचे सहाय्यक आयुक्त होते त्यांनी ऍलिनेशन मॅन्युअल नावाचे एक पुस्तक सर्व इनाम आणि वतन
जमिनींबाबत, सन १९२१ मध्ये लिहिलेले आहे. त्याला ʻजोगळेकर मॅन्युअलʼ म्हणूनही ओळखले जाते.
• 'इनाम'
म्हणजे जमीन महसूल वसूल करण्याचा राज्य सरकारचा हक्क, पूर्णत: किंवा अंशत: अन्य
व्यक्तीकडे स्वाधीन केलेला असणे.
(१) सरकारी देवस्थान: यांची
नोंद गाव नमुना ३ मध्ये असते.
(२) खाजगी देवस्थान: यांचा
महसूल दप्तराशी संबंध नसल्याने त्यांची नोंद गाव नमुना ३ मध्ये नसते.
¡ देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल होऊ शकते. परंतु महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ८८(१)(अ) च्या तरतुदी देवस्थान इनाम जमिनीला लागू होत नाहीत सबब अशा कुळास कुळ वहिवाट अधिनियम ३२ ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार नसतो.
=महाराष्ट्र शासन, शासन परिपत्रक क्र. डीडी -२०१०/प्र.क.९/ल-४,
दिनांक : ३० जुलै, २०१०
विषय: राज्यातील देवस्थानाच्या जमिनीची तपासणी
तसेच या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरीत झाले असल्यास पूर्ववत देवस्थानच्या नावे
करण्याबाबत.
देवस्थान जमिनीचे मालकी हक्क, फेरफार
प्रत्यक्ष परिस्थितीप्रमाणे तपासणे तसेच फेरफार आदेशांची कायदेशीर वैधता तपासणे:
देवस्थान इनाम जमिनीचे सर्व ७/१२ उतारे काढून
घ्यावे व त्यात भोगवटादार म्हणून कोणा - कोणाची नावे आहेत ते तपासावे. जर संबंधित
देवस्थान /मठ वगळता इतर व्यक्तींची नावे ७/१२ वर आली असल्यास अशी नावे कोण - कोणत्या
फेरफारानुसार येत गेली. त्या फेरफारांची यादी करावी व ते फेरफार देखील काढून
घ्यावेत. त्यानंतर त्या प्रत्येक फेरफाराचा काळजीपूर्वक अभ्यास करावा, असे फेरफार
कोणत्या आदेशानुसार झाले आहे ते सर्व आदेश प्राप्त करावे.
वरील पध्दतीने सर्व फेरफार आणि आदेश यांचे सखोल
आणि काळजीपूर्वक वाचन करावे. अनेक प्रकरणी इनाम जमीनी बेकायदेशीररित्या हस्तांतरित
झाल्याचे दिसून आले आहे.
काही फेरफार असेही असु शकतात की, ते कोणत्याही
सक्षम न्यायालयाचे आदेश नसतानाही महसूल खात्यातील कर्मचार्यांनी (तलाठी / मंडळ
अधिकारी) खाजगी व्यक्तीचे संगनमताने
बेकायदेशीररित्या नोंदवलेले आहेत. असे सर्व
फेरफार देखील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २५७ अन्वये पुनरीक्षणात घ्यावेत
आणि उप विभागीय अधिकारी यांनी संबंधित प्रकरणे विलंब क्षमापित करून हाताळावीत..
सर्व देवस्थान इनाम जमिनीची प्रत्यक्षात पहाणी
करणे :
सर्व देवस्थान इनाम जमिनींची यादी तयार
झाल्यावर वरील प्रक्रिया करीत असतांना सर्व जमिनींना संबंधित मंडळ अधिकारी आणि
तलाठी स्वतः भेटी देतील आणि ज्या अटी व शर्तीवर या इनाम जमिनी बहाल केल्या आहे त्या अटी व
शर्तीची पूर्तता होत आहे काय, सदर जमिनी इतरांच्या ताब्यात अनधिकृतपणे गेल्या आहे काय, त्यावर
अतिक्रमणे झाली आहेत काय, या सर्व बाबी तपासाव्यात व आढळून आलेल्या परिस्थितीनुसार
उचित कार्यवाही करावी. . उदा.अतिक्रमण काढून टाकणे, शर्तभंग झाला असल्यास जमीन सरकार जमा करणे
इत्यादि तात्पुरत्या स्वरुपाची अनियमितता असल्यास त्यावर उचित कार्यवाही करावी.
दिनांक :-२९/०६/२०११ अन्वये सुधारणा करून,
जेथे "शर्तभंग झाला असल्यास जमीन सरकार जमा करणे इ." या ऐवजी "शर्तभंग झाला
असल्यास जमीन पूर्ववत देवस्थानाच्या नावे करणे इ." असे वाचावे असा बदल करण्यात आला आहे.
=महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, पत्र क्र. जमीन- २०२४/प्र.क्र.५२/ज-१अ, दिनांक १२.३.२०२४ अन्वये, "ग्रँट ऑफ सॉईल" या प्रकारच्या देवस्थान ईनाम वर्ग-३ च्या जमिनींबाबत सदरहू जमिनीचा
देवस्थान इनाम वर्ग-३ हा दर्जा (status) बदलला जाणार नाही,
या अटींच्या अधीन राहून, अशा जमिनीच्या “अकृषिक वापरास " परवानगी देताना अथवा विक्रीस
शासनाच्या मान्यतेची आवश्यकता नाही असे, विधी व न्याय विभागाच्या दिनांक ०३/०३/२००३ च्या अभिप्रायात नमूद केलेले
होते.
तथापि, आता मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका
क्र.२७५९/२०११ मध्ये दिनांक २२.१.२०२० रोजी आदेश पारित करुन, "ग्रँट ऑफ सॉईल” प्रकारची सनद असलेल्या देवस्थान
इनामाच्या जमिनींना शासन परिपत्रक क्रमांक डीईव्ही-२०१०/प्र.क्र.९/ल-४, दिनांक ३०/०७/२०१० मधील तरतूदी लागू राहतील. तसेच "ग्रँट ऑफ रेव्हेन्यू” प्रकारची सनद असलेल्या
देवस्थान इनामाच्या जमिनींच्या हस्तांतरणांना सदर शासन परिपत्रकातील तरतूदी लागू
होणार नाहीत. मात्र अशा जमिनींचा हस्तांतरिती (transferee)
सदर जमिनीचा जमीन महसूल देवस्थानाकडे भरणा करण्यास जबाबदार राहील.
दिनांकः - २६ जून,२००६ अन्वये, भूसंपादन अधिनियमातील
तरतुदीनुसार देवस्थान इनामाची जमिन संपादीत झाल्यास भूसंपादन मोबदल्याचे देवस्थान
व कुळ यांच्यामध्ये विभाजन करण्याबाबतच्या प्रचलित शासन निर्णयात/धोरणात सुधारणा
करण्याबाबत.
१) भूसंपादनाच्या मोबदल्याच्या रकमेतील ५०%
एवढी रक्कम देवस्थानास व
५०% एवढी रक्कम कुळास देण्यात यावी.
२) सदर आदेश ज्या प्रकरणात भूसंपादन निवाडा
जाहीर झाला आहे, परंतु
मोबदल्याच्या रकमेचे वाटप झालेले नाही, अशा प्रकरणात तसेच येथून पुढे देवस्थान इनाम जमिनीच्या
भूसंपादन प्रकरणात लागू करण्यात यावेत असा आदेश पारीत करण्यात आला आहे.
= महसूल व वन विभाग, शासन
परिपत्रक क्रमांकः डिईव्ही-२०१५/प्र.क्र. १५१/ज-१अ
दिनांक: ६ नोव्हेंबर, २०१८ अन्वये, अंशत: व पूर्णत: सारामाफी
असणाऱ्या देवस्थान जमिनींची जी बेकायदेशीर आणि सक्षम प्राधिकाऱ्याच्या अथवा
शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणे झालेली आहेत, अशा बेकायदेशीर हस्तांतरणाबाबतची प्रकरणे
विलंबाचा कालावधी क्षमापित करून स्वतःहून पुनरिक्षणात घेऊन, गुणवत्तेवर
योग्य ते आदेश करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक ३० जुलै, २०१० अन्वये क्षेत्रिय महसूली प्राधिकारी अथवा
अधिकारी यांना दिशानिर्देश दिलेले आहेत.
२) देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण
झाल्याचे निदर्शनास आलेल्या प्रकरणांपैकी पुनरिक्षणात दाखल करून घेतलेल्या
प्रकरणांपैकी प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याबाबतचे काम प्राधान्याने
हाती घ्यावे, तसेच, ज्या
प्रकरणांमध्ये, कोणत्याही
प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही अशा प्रकरणांमध्ये, ६ महिन्यांमध्ये अर्ध-न्यायिक कार्यवाही पूर्ण
करण्यात यावी व त्याबाबतचा सविस्तर अहवाल शासनास सादर करण्यात यावा.
३) ज्या देवस्थान जमिनींची प्रकरणे शासनाने
पुनरीक्षणात दाखल करून घेतल्यानंतर ज्या प्रकरणामध्ये अशी देवस्थान जमीन ही योग्य
व्यक्तीच्या (विश्वस्त/व्यवस्थापक) यांच्या प्रत्यक्ष ताब्यामध्ये देणे आवश्यक आहे, तथापि, ज्या
प्रकरणामध्ये विश्वस्त/ व्यवस्थापक आढळून येत नाहीत, त्या प्रकरणी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम,१९५० मधील तरतुदीच्या
अनुषंगाने धर्मादाय उपायुक्त / सहायक आयुक्त यांच्याकडे संदर्भ करून पुढील प्रमाणे
चौकशी करून घ्यावी : अ) संबंधित जमिनीच्या संदर्भात विश्वस्त/व्यवस्थापक
अस्तित्वात आहेत
किंवा कसे? ब) तसेच विश्वस्त अथवा व्यवस्थापक अस्तित्वात
असल्यास, त्यांची विश्वस्त
संस्था ही सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे किंवा कसे?
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम,१९५० मधील तरतुदीच्या
अनुषंगाने केलेल्या वरील चौकशी दरम्यान विश्वस्त अथवा व्यवस्थापक आढळून आल्यास अशा
जमिनींचा प्रत्यक्ष ताबा विश्वस्त किंवा व्यवस्थापक यांना देण्यात यावा.
तसेच, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम,१९५० मधील तरतुदीच्या
अनुषंगाने वरीलप्रमाणे चौकशी पूर्ण होऊन त्यास अंतिम स्वरूप प्राप्त होईपर्यंत
जमिनीचे संरक्षण शासनातर्फे करण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशा चौकशीत विश्वस्त
अथवा व्यवस्थापक आढळून न आल्यास अशी जमीन शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी.
ज्या देवस्थान जमिनींवर कोणत्याही देवस्थानाने
अथवा कोणत्याही व्यक्तीने दावा केला नसेल तर अशा जमिनींच्या बाबतीत महाराष्ट्र
जमीन महसूल संहिता, १९६६ मधील
तरतूदींचा उपयोग करावा.
४) ज्या देवस्थान जमिनी शासनाने परिपत्रक दि.३०.०७/२०१०
मधील तरतूदीनुसार कारवाई करुन ताब्यात घेतल्या असतील अशा जमिनी जोपर्यंत संबंधित
देवस्थानाला अथवा अशा संबंधित देवस्थानाच्या प्रतिनिधीला हस्तांतरित करीत नाहीत, तोपर्यंत अशा
जमिनी शासनाच्या ताब्यात राहतील आणि राज्य शासनाने अशा मालमत्तांना संरक्षण दिले
पाहिजे. असा आदेश पारीत करण्यात आला आहे.
श्रीमती सुवर्णा आप्पासाहेब क्षीरसागर विरुद्ध
महाराष्ट्र राज्य, दिनांक १५ एप्रिल, २०२५ या प्रकरणात मा. न्यायालयाने देवस्थान जमिनींच्या
संदर्भात वहिवाटदार किंवा पुजाऱ्याची स्थिती खालीलप्रमाणे सारांशित केली आहे.
(i) वहिवाटदार केवळ व्यवस्थापक (manager) म्हणून काम
करतो, जो धार्मिक
कर्तव्ये पार पाडतो आणि देवतेच्या वतीने मंदिराची जमीन व मालमत्तेची काळजी घेतो.
(ii) वहिवाटदार
किंवा पुजाऱ्याला देवस्थान मालमत्तेवर कोणतेही वैयक्तिक मालकी हक्क मिळत नाहीत.
(iii) शासकीय जमीन अभिलेखांमध्ये (जसे की ७/१२ उतारा), जमिनीचा मालक
म्हणून केवळ देवतेचे नाव दाखल असले पाहिजे. वहिवाटदार किंवा पुजाऱ्याचे नाव केवळ
शेरा स्तंभात, ते मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहेत हे दर्शवण्यासाठी लिहिले जाऊ
शकते.
(iv) जरी वहिवाटदाराला मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार
असला तरी, हा अधिकार
केवळ देवतेच्या फायद्यासाठी आहे.
(v) देवस्थान इनाम जमिनीचा वहिवाटदार, पुजारी किंवा व्यवस्थापक
मंदिराच्या जमिनींवर कधीही वैयक्तिक मालकी हक्क सांगू शकत नाही. तसेच ते जमिनीचा
मंदिराची मालमत्ता म्हणून असलेला दर्जा काढून टाकण्याची मागणी करू शकत नाहीत.
जमीन महसूल माफी अधिनियम, १८६३, कलम
८(३) अन्वये महसुलातुन माफी देण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहेत.
सारांश: केवळ महसूल अभिलेखात बदल करून वहिवाटदार देवस्थान इनाम
वर्ग III जमिनीचा
मालक होऊ शकत नाही. योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय "देवस्थान इनाम" नोंद
हटवल्याने जमिनीचे वास्तविक स्वरूप बदलत नाही. अशा जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण
करण्यावर संपूर्ण बंदी आहे. स्वतःला मालक म्हणून घोषित करून व्यवस्थापक किंवा
वहिवाटदाराने केलेली कोणतीही विक्री रद्दबातल ठरते.
|
मौजे .... गाव.... ता. जिल्हा येथील देवस्थान इनाम जमिनीची तपासणी |
|||||||||||
|
अ.क्र. |
देवस्थानचा भूमापन
क्र. |
देवस्थानचे नाव |
क्षेत्र |
देवपुजा करणार्याचे नाव |
नियमितपणे देवपुजा केली जाते काय? |
जमीन लँड ग्रँट आहे की रेव्हेन्यू ग्रँट ? |
निर्वाहासाठी अन्य जमीन असल्यास तिचा तपशील
आणि सध्या असणारे पीक |
जमिनीत वहिवाट करणार्याचे नाव आणि वहिवाटीचा
हक्क काय? |
ट्रस्ट असल्यास त्याचा तपशील |
शर्तभंग झाला आहे काय? |
शेरा |
|
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
७ |
८ |
९ |
१० |
११ |
१२ |
|
१ |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
२ |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
३ |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
एखाद्या स्तंभाबाबत अधिक माहिती देण्यासाठी
स्वतंत्र कागद जोडावा. |
|||||||||||
|
उपरोक्त माहिती मी समक्ष स्थळ पहाणी करून
दिलेली असून ती खरी व बरोबर आहे. तसेच उपरोक्त नमुद देवस्थान इनाम जमिनींशिवाय
माझ्या साझ्यात अन्य देवस्थान इनाम जमीन नाही. साझा......, तालुका....... जिल्हा...... |
|||||||||||
b|b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला देवस्थान जमिनी (इनाम वर्ग ३). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !