आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

रजा नियम (महत्‍वाच्‍या तरतुदी)


रजा नियम (महत्‍वाच्‍या तरतुदी)

महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१


शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना राज्‍य शासनाने राजपत्रातील अधिसुचनेद्‍वारा जाहीर केलेल्‍या सण व इतर सुट्‍ट्‍या वगळून प्रतीवर्ष महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्‍वये खाते प्रमुखाकडे अर्ज देऊन, तो मान्‍य झाल्‍यावर रजा उपभोगता येते.

F सुट्‍टी: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२३) अन्‍वये,
(१) परक्राम्‍य संलेख अधिनियम १८८१, कलम २५ अन्‍वये विहीत केलेली अथवा अधिसूचित केलेली सुट्‍टी.
(२) शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्‍वारा, शासकीय कार्यालय कामापुरते बंद ठेवण्‍याचा दिलेला आदेश याला सुट्‍टी असे संबोधण्‍यात येते.

F रजा: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२८) अन्‍वये, सक्षम प्राधिकार्‍याने कामावर अनुपस्‍थित राहण्‍यास दिलेली परवानगी म्‍हणजे रजा.

F रजेचा हक्‍क: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १० अन्‍वये,
(१) सक्षम प्राधिकार्‍याने कामावर अनुपस्‍थित राहण्‍यास दिलेली परवानगी म्‍हणजे रजा.
(२) हक्‍क म्‍हणून रजा मागता येत नाही.
(३) रजा मंजूर करण्‍यास सक्षम अधिकारी, लोकसेवेच्‍या निकडीमुळे, कोणत्‍याही प्रकारची रजा नाकारू शकतो किंवा रद्‍द करू शकतो. शासकीय कर्मचार्‍यास लेखी विनंती खेरीज, देय असलेल्‍या आणि मागितलेल्‍या रजेचा प्रकार बदलता येणार नाही. 
F अखंडीत रजेची कमाल मर्यादा: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १६ अन्‍वये, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सतत पाच वर्षाहून अधिक कालावधी करीता कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही. रजेच्‍या कालावधीत सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगी शिवाय दुसरी नोकरी किंवा व्‍यवसाय करता येत नाही.

F महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, नियम ४० अन्‍वये राजपत्रित अधिकार्‍यांना शासकीय वैद्‍यकीय अधिकार्‍याच्‍या वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे वैद्‍यकीय कारणास्‍तव रजा मंजूर करता येते. अराजपत्रित अधिकारी/कर्मर्‍यांना नोंदणीकृत वैद्‍यकीय व्‍यवसायीच्‍या वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे वैद्‍यकीय कारणास्‍तव रजा मंजूर करता येते. नियम ४७ अन्‍वये वैद्‍यकीय रजा संपल्‍यानंतर स्‍वास्‍थ प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.

F महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, नियम २७ व २९, परिशिष्‍ठ-१, अ.क्र. ५ अन्‍वये अराजपत्रित कर्मचार्‍यांच्‍या विशेष विकलांगता रजा आणि अध्‍ययन रजा या व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारच्‍या रजा मंजूर करण्‍याचे अधिकार नियुक्‍ती प्राधिकार्‍यांना आहेत.
उपजिल्‍हाधिकारी, उपजिल्‍हाधिकारी (निवड श्रेणी), तहसिलदार, नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्‍यांना विशेष विकलांगता रजा आणि अध्‍ययन रजा या व्‍यतिरिक्‍त, १८० दिवसांपेक्षा जास्‍त कालावधीच्‍या रजा (सतत पाच वर्षे कमाल मर्यादेस आधिन राहून) मंजूर करण्‍याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्‍तांना प्रदान करण्‍यात आले आहेत.
F विना परवाना रजेवर जाणारा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरेल तसेच रजा संपल्‍यानंतर स्‍वेच्‍छेने गैरहजर राहणारा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरेल. (नियम ४८)

F शासनाच्‍या एका सेवेचा राजीनामा देऊन दुसर्‍या शासकीय सेवेत रूजु झाल्‍यास, राजीनाम्‍याच्‍या दिवशी शिल्‍लक असलेली रजा नवीन सेवेत हिशोबात घेण्‍यात येते. (नियम २२)
F रजा वेतन: रजेवर जाण्‍याच्‍या दिवशी ज्‍या दराने वेतन मिळत होते त्‍याच दराने रजावेतन मिळते. रजा काळात वेतन वाढ मिळते परंतु त्‍याचा प्रत्‍यक्ष लाभ रजा संपवून हजर झाल्‍यावर मिळतो.   

रजेचे नाव आणि नियम
किती दिवस
शेरा
अर्जित रजा (पूर्ण पगारी)
(Earned Leave) (नियम ५०)
३०० दिवस
(एका वेळी सलग १८० दिवस)
प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी प्रत्‍येकी १५ दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्‍त्‍यात अर्जित रजा आगाऊ जमा होते. 
एकूण कामाचे दिवस गुणीले १/११= येणारे दिवस.
(३०० दिवसापर्यंत रजा खात्‍यात जमा करुन ठेवता येते.)
अर्ध वेतनी रजा (Half pay Leave)
(नियम ६०)
सेवेच्‍या पूर्ण केलेल्‍या प्रत्‍येक वर्षासाठी २० दिवस
प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी, प्रत्‍येकी १० दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्‍त्‍यात आगाऊ जमा होते. यात निलंबन काळ धरू नये. ही रजा कोणत्‍याही कारणासाठी घेता येते. याच्‍या साठवणुकीवर मर्यादा नाही.
याकाळात ५०% दराने वेतन मिळते.
परिवर्तीत रजा (Commuted Leave) (नियम ६१)
देय असलेल्‍या अर्ध वेतनी रजेच्‍या निम्‍मे दिवस
देय अर्धपगारी रजा दुप्‍पट खर्ची टाकुन परिवर्तीत रजा मिळते. कमाल ९० दिवस. (एकूण उपभोगलेली रजा ही अर्ध वेतनी रजेच्‍या दुप्‍पट दिवस खर्ची पडेल)
कर्मचारी कामावर परत न आल्‍यास या रजेचे रूपांतर अर्धवेतनी रजेत करून अतिप्रदानाची रक्‍कम वसूल करण्‍यात येते.
अनिर्जित रजा (Leave not due)
(नियम ६२)
अर्जित रजा, अर्धवेतनी रजा शिल्‍लक नसल्‍यास ही रजा मंजूर करण्‍यात येते. वैद्‍यकीय प्रमाणपत्र असल्‍यास, जेवढी अर्ध वेतनी रजा अर्जित होण्‍याची शक्‍यता असेल तितके दिवस
एकूण सेवेत कमाल ३६० दिवस.
एका वेळेस ९० दिवस. संपूर्ण सेवा काळात कमाल १८० दिवस.
अर्धवेतनी रजेतून ही रजा कपात करण्‍यास येते. ही रजा कायम कर्मचार्‍यांसाठीच अनुज्ञेय.
असाधारण रजा  
(Extraordinary Leave)
(नियम ६३)
तीन वर्ष  सतत सेवा पूर्ण –
६ महिने.
पाच वर्ष सतत सेवा पूर्ण – १२ महिने.
जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांच्‍या प्रमाणपत्रावर मानसिक आजार, कर्करोग ई. साठी – १८ महिने.
रजा खात्‍यावर कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तर किंवा विनंती वरुन. वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक.
अस्‍थाई कर्मचारी:-
वैद्‍यकीय प्रमाणपत्राशिवाय- ३ महिन्‍यापर्यंत
एक वर्षाच्‍या सेवेनंतर-वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे- ६ महिन्‍यापर्यंत
पाच वर्षाच्‍या सेवेनंतर-वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे- १२ महिन्‍यापर्यंत
परिविक्षाधीन कर्मचार्‍यास रजा (Leave on Probation)
(नियम ६४)
                 --
अनुज्ञेय रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.
त्‍यापेक्षा जास्‍त रजा घेतल्‍यास परिविक्षाधिन काळात वाढ केली जाईल.
निवृत्तीपूर्व रजा
(Leave to Preparatory to Retirement) (नियम ६६)
सलग १८० दिवस किंवा एकूण सेवा कालात कमाल २४ महिने.
नियत सेवा निवृत्तीच्‍या तारखेपलिकडे जाणार नाही ही दक्षता घेऊन १८० दिवस.
प्रसूती रजा
(Maternity Leave)
(नियम ७४)
 १८० दिवस पगारी रजा
शासकीय सेवेत असणार्‍या महिला कर्मचार्‍यास, (नव्‍याने रूजु झालेल्‍यांसह) दोनपेक्षा कमी मुले हयात असतील तर अर्जाच्‍या तारखेपासून २६ आठवडे.
किमान सेवेची अट रद्‍द करण्‍यात आली आहे.
गर्भपात रजा
(नियम ७४(५)
वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक.
सहा आठवड्‍यापेक्षा जास्‍त होणार नाही इतकी रजा.
विशेष रजा
(Special leave)

सरोगसी पध्‍दतीने जन्‍मलेल्‍या आपत्त्‍याचे संगोपन करण्‍यासाठी महिला कर्मचार्‍यास आपत्त्‍याच्‍या जन्‍म दिनांकापासून - १८० दिवस
 संपूर्ण सेवा कालात एकदाच अनुज्ञेय आहे. अशा महिला कर्मचार्‍यास आपत्‍य नसावे तसेच तिने मुल दत्तक घेतलेले नसावे.
अपघाती/विशेष विकलांगता रजा
(Special Disability leave for Accidental Injury)
(नियम ७५ व ७६)
पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अनुज्ञेय        
¨अपघाती रजा २४ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.
¨विशेष विकलांगता रजा १२० दिवसांपेक्षा अधिक नाही, इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.
रुग्‍णालयीन रजा
(Hospital Leave) (नियम ७७)
पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अनुज्ञेय        
२८ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.
क्षय रोग/कर्क रोग/कुष्‍ठ रोग/ पक्षघात/एड्‌स रजा (T.B./Cancer/Leprosy/ Paralysis/Aids Leave)
(नियम ७९)
रोजंदारी व अंशकालीय कर्मचारी वगळून
तीन वर्ष सेवेनंतर सवलती अनुज्ञेय
१२ ते २४ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही
अध्‍ययन रजा (Study Leave)
(नियम ८०)
लोकसेवेची निकड, कर्तव्‍य क्षेत्राशी संबंधीत उच्‍च-शिक्षणासाठी, पाच वर्ष सेवेनंतर अनुज्ञेय
संपूर्ण सेवा कालात १२ ते २४ महिने.
नंतर किमान तीन वर्षे सेवा बंधनकारक.
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
पिसाळलेला कुत्रा अथवा तत्‍सम जनावराने चावा घेतल्‍यास.
२१ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
स्‍वत: नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास
६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
एकदा केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास
६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास
कर्मचार्‍यास ४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीच्‍या बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास
कर्मचार्‍यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.
(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
स्‍त्री कर्मचार्‍याने बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास
स्‍त्री कर्मचार्‍यास १४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.
(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष रजा (बाल संगोपन रजा)
(Special Leave) (Child care)
महिला कर्मचारी, पत्‍नी नसलेले पुरूष कर्मचारी यांच्‍यासाठी
१८ वर्षेपेक्षा कमी वयाच्‍या ज्‍येष्‍ठ मुलाच्‍या संगोपनासाठी, कमाल १८० दिवस
(एका वर्षामध्‍ये दोन महिन्‍याच्‍या कमाल मर्यादेत)
शासकीय सेवेत एक वर्ष पूर्ण झाल्‍यावर अनुज्ञेय
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
कर्मचार्‍याने स्‍वेच्‍छेने विनामूल्‍य रक्‍तदान केल्‍यास
कर्मचार्‍यास १ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (एका वर्षात कमाल १० दिवस)
(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
राष्‍ट्रीय क्रिडा स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी
कॅलेंडर वर्षात ३० दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.
(क्रिडा अधिकार्‍याचा दाखला आवश्‍यक)
विशेष नैमित्तिक रजा
(Special Casual Leave)
कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर किंवा अन्‍य वेळी केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास
कर्मचार्‍यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.
(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
नैमित्तिक/किरकोळ रजा
(Casual Leave)
(अचानक, आपत्‍कालीन खाजगी कामासाठी रजा) किरकोळ रजा.
अत्‍यंत  निकड असतांना काढली जाते.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कॅलेंडर वर्षात ८ दिवस अनुज्ञेय.  साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त नाही. अपवादात्मक परिस्थितीतच सात दिवसा वाढविता येते.
(किरकोळ रजा शक्‍यतोवर बिनपगारी करू नये. किरकोळ रजा नामंजूर करणे, नाकारणे अथवा रद्द करणे अशी तरतुद कायद्‍यात नाही. प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा नाकारू नये.  
किरकोळ रजा ही रजा समजली जात नाही. अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजेला जोडून किरकोळ रजा घेता येत नाही. अथवा किरकोळ रजेला जोडून अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजा घेता येत नाहीत.
नैमित्तिक रजेच्‍या मागे आणि/किंवा पुढे कितीही रविवार किंवा सार्वजनिक सुट्‍टी असली तर ती जोडून रजा घेता येते.
(कमाल सात ते दहा दिवस) सेवापुस्‍तकात नोंद घेता येत नाही. स्‍वतंत्र नोंदवही ठेवावी.
मोबदला सुट्‍टी
फक्‍त निम्‍नश्रेणी (वर्ग ४) कर्मचार्‍यांना अनुज्ञेय. जादा कामाचा आर्थिक मोबदला दिल्‍यास अनुज्ञेय नाही.
सुट्‍टीत केलेल्‍या कामाचा मोबदला म्‍हणून देतात.
एक कॅलेंडर वर्षात एकावेळी तीन पेक्षा जास्‍त साठवता येत नाही. पुढीलवर्षी उपयोगात आणता येत नाही.
विपश्‍यनेसाठी रजा
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना एकावेळी १४ दिवस परिवर्तित रजा घेता येते.
तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेवा काळात सहा वेळा.
विकलांग आपत्‍य रजा
विकलांग आपत्‍य असलेल्‍या महिला कर्मचार्‍यास आणि विकलांग आपत्‍य असून पत्‍नी नसलेल्‍या पुरूष कर्मचार्‍यास, संपुर्ण सेवेत ७३० दिवस अनुज्ञेय
४०% पेक्षा जास्‍त अंधत्‍व, क्षीण दृष्‍टी, बरा न झालेला कुष्‍ठरोग, श्रवण शक्‍तीतील दोष, चलन-वलन विगलांगता, मतिमंदता, मानसिम आजार.
पहिल्‍या हयात दोन आपत्‍यांसाठी. आपत्‍याच्‍या २२ वर्षे वयापर्यंत.
 एकाहून अधिक हप्‍त्‍यात- एका आर्थिक वर्षात कमाल तीन आठवडे
गिर्यारोहण मोहिम रजा
एका आर्थिक वर्षात कमाल ३० दिवस
भारतीय गिर्यारोहण फेडरेशन मान्‍यता प्राप्‍त किंवा भारतीय युथ होस्‍टेल संस्‍थेने आयोजित केलेली गिर्यारोहण मोहिम
महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष रजा (दत्तक रजा) (Adoption Leave)

t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक महिन्‍यापेक्षा कमी असेल तर- एक वर्ष
t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय सहा महिनेपेक्षा जास्‍त परंतु सात महिन्‍यापेक्षा कमी असेल तर -सहा महिने
t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय नऊ महिनेपेक्षा जास्‍त परंतु दहा महिन्‍यापेक्षा कमी असेल तर -तीन महिने
t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक वर्षाच्‍या आत असेल तर-१८० दिवस
t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक वर्षापेक्षा जास्‍त आणि तीन वर्षापर्यंत तर-९० दिवस.
दत्तकाबाबत कायदेशीर कागदपत्रे आवश्‍यक आणि हयात आपत्‍ये  दोनपेक्षा कमी असावीत.
खाजगी शाळेतील महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष रजा (गर्भपात रजा) (Abortion Leave)
संपूर्ण सेवाकाळात एकदा
गर्भपात/गर्भस्‍त्राव/गर्भसमापन यासाठी- -४५ दिवस


 b|b


Comments

 1. रजा कधी घेऊ शकतो जोइनिंग झाल्यानंतर

  ReplyDelete
 2. पत्नि प्रसूती झाल्यावर मिळणारी रजा

  ReplyDelete
  Replies
  1. शासन निर्णय आहे का त्याचा

   Delete
  2. महानगरपालिका शिक्षिकेला संतती नियमन शस्त्र क्रिये साठी रजा किती मिळते GR पाठवा

   Delete
  3. शाळेच्या उन्हाळी सुट्टी मध्ये सुट्टी लागण्यापूर्वी शेवटची सही असेल तर शाळा सुरु झाल्यावर घरातील व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणामुळे शेवटची सही होती परन्तु पहिली सही न करता रजा घेता येते का?

   Delete
  4. हो आहे... पितृत्व रजा मिळते 15 दिवसाची

   Delete
  5. नियम क्र. किती आहे

   Delete
  6. वर्ग 3 कर्मचारी याना सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त काम केल्यास मोबदला रजा मिळेल का?

   Delete
 3. पोलिस साप्ताहिक रजा नियम काय आहे ..रजेवर कधी सोडावे व कधी परत बोलवावे

  ReplyDelete
 4. जर कोन कोनत्या हि केस मदे जेल मदेअसेल तर त्याला परोल कदि व कसा मिळतो?

  ReplyDelete
 5. अत्यावश्यक सेवेमध्ये साप्ताहिक सुट्टीला लागून मागे पुढे अर्जित रजा घेता येते का

  ReplyDelete
 6. Do bonded medical officer get maternity leave.. If yes for how many days?.... Kindly send if any GR is there

  ReplyDelete
 7. पुरुष कर्मचारीला विशेष रजा घेण्यसाठी परमनंट लेटर असणे गरजेचे आहे का ?

  ReplyDelete
 8. शासकीय कर्मचाऱ्यांने पाच वर्षे बिनपगारी रजा काढून खाजगी सेवेत किंवा व्यावसायिक पातळीवर काम करायला शासनाची अनुमती आहे.
  शासनाची आर्थिक बचत व्हावी यासाठी शासनाने ही योजना सुरु केली होती. अशी रजा काढणार्या सेवकाला पाच वर्षानंतर पुन्हा सेवेत रुजू होता येईल आणि सेवेतील त्याचे सर्व हक्क सुरक्षित असतील असे शासनाने साधारणतः १५ वर्षापुर्वी घोषित केलेले आहे.
  याबाबतचा शासकीय अध्यादेश कोठे उपलब्ध होईल/ मिळेल का?

  ReplyDelete
 9. शासकीय कर्मचाऱ्यांने पाच वर्षे बिनपगारी रजा काढून खाजगी सेवेत किंवा व्यावसायिक पातळीवर काम करायला शासनाची अनुमती आहे.
  शासनाची आर्थिक बचत व्हावी यासाठी शासनाने ही योजना सुरु केली होती. अशी रजा काढणार्या सेवकाला पाच वर्षानंतर पुन्हा सेवेत रुजू होता येईल आणि सेवेतील त्याचे सर्व हक्क सुरक्षित असतील असे शासनाने साधारणतः १५ वर्षापुर्वी घोषित केलेले आहे.
  याबाबतचा शासकीय अध्यादेश कोठे उपलब्ध होईल/ मिळेल का?

  ReplyDelete
 10. स्वेच्छा निवृत्ती रजा आहे का ? असल्यास किती ?

  ReplyDelete
 11. Sir,Special casual leave cha G.R.aahe ka?Asel tar please padhav

  ReplyDelete
 12. सर नमस्ते शनिवारी किरकोळ रजा घेतली व त्यानंतर सोमवारी ही कीरकोळे रजा घेतली तर रविवार ची रजा मोजली जाईल का?

  ReplyDelete
 13. पितृत्व रजेचा जी आर असेल तर पाठवा,

  ReplyDelete
 14. पितृत्व रजेचा जि आर पाठवा

  ReplyDelete
 15. प्रसुती रजा मंजुर कोन करतात? जिल्हा आधिकारी की प्रांत आधिकारी,, तसा कुठला आदेश आसेल तर प्लीज पाठवा मला

  ReplyDelete
  Replies
  1. प्रसुती रजा मंजूर कोण करतात ? कार्यकारी अभियंता की अधीक्षक अभियंता

   Delete
 16. कोणतीही रजा शिल्लक नसताना अँजेओप्लास्ट झालेल्या शिक्षकाला कोणती व कशाप्रकारे रजा घेता येते कृपया पाठवा

  ReplyDelete
 17. कार्यालय प्रमुखाला 180 दिवस रजा मंजूर करण्यासाठी चा GR असेल तर PLZ शेअर करा
  OR
  रजा मंजुरीचे अधिकार कोणाला किती दिवसापर्यंत आहेत त्याचा GR असेल तर Plz शेअर करा

  ReplyDelete
 18. किरकोळ रजा संदर्भातील शासन निर्णय टाका.

  ReplyDelete
 19. एक zp कडून दुसऱ्या zp कडे हजर होत असताना मध्ये जर एक दिवस सुट्टी आली तर रजा नियम काय आहे, सेवा खंड होतो की कसे?

  ReplyDelete
 20. पितृत्व रजेचा GR पाठवा plz

  ReplyDelete
 21. Sir majha accident houn 23 mahine zale mi razevar ahe ajun unfit ahe, spinal cord injury please guide me

  ReplyDelete
 22. मुख्याध्यापक पदावरून प्राथमिक पदवीधर पदावर पदावनती स्वइच्छेने खाजगी कारणासाव घेतल्यास वेतन निश्चीती मध्ये प्रमोशन घेतल्याने झालेली वेतनवाढ कमी होऊन पुर्वीच्या पदावरील वेतन निश्चीती जशास तशी मिळते का ?

  ReplyDelete
 23. सर मी वैद्यकीय रजेवर गेले होते 83 दिवसानंतर मी हजर झाली व हजर झाल्यानंतर मला मेडीकल बोर्डाला पाठवले व माझा रीपोर्ट बीमार नाही असा आला त्यामूऴे माझी ही रजा कोनती समजावी

  ReplyDelete
 24. Sir medical rajenantar shaniwar raviwar shaskiy sutti alyaste diwas rajet count hota ka

  ReplyDelete
 25. सर अर्जित रजेचा शासन निर्णय टाका

  ReplyDelete
 26. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 27. अर्जित रजा ५०० दिवस शिल्लक असतील तर किती दिवस रजेवर कर्मचारीवर्ग ला जाता येईल

  ReplyDelete
 28. कुटुंब नियोजन शस्‍त्र क्रियेचा शासन निर्णय पाठवा. तसेच शासन निर्णय दिनांक कळवावा.

  ReplyDelete
 29. रजा काळात वेतन वाढ cha gr ahe ka?

  ReplyDelete
 30. जर रजा शूक्रवारी घेतली आणि सोमवारी पण घेतली तर रवीवार चा पगार कपात होईल का

  ReplyDelete
 31. एक दिवस अर्जित रजा शनिवार व रविवार सुट्टी व नंतर दोन दिवस परावर्तीत SL रजा मंजूर होते का

  ReplyDelete
 32. 1)अर्जित रजेला जोडून कोणकोणती रजा मंजूर होते.
  2)परवर्तीत रजा SL कमीतकमी किती दिवसाची मंजूर होते.
  3)EL अर्जित रजा एका वर्षात व एका महिन्यात किती वेळा मंजूर करता येते.
  4)किरकोळ रजा एकावेळी किती मंजूर करता येते.

  ReplyDelete
  Replies
  1. मला 4री प्रश्नाचे उत्तर मिळेल का

   Delete
  2. वरील 04 qution उत्तर maheshnaik1843@gmail.com वर पाठवा

   Delete
 33. किरकोळ रजा एकावेळी किती मंजुर करता येते

  ReplyDelete
  Replies
  1. 3 किरकोळ रजा एकावेळी किती मंजुर करता येते

   Delete
 34. मला वरील प्रश्नचे उत्तर मिळेल का

  ReplyDelete
 35. महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पहिले मूल हयात असताना दुसऱ्या बाळाच्या प्रसूती वेळेस जन्माला आलेले बाळ जन्मतः मृत जन्मले असेल तर किती दिवस रजा मिळेल?ती मातृत्व रजा नियमानुसार 180 दिवस असेल का?नसेल तर किती दिवस रजा मिळू शकते?

  ReplyDelete
 36. वैद्यकीय रजेबाबत पत्र मिळेल का ?

  ReplyDelete
 37. वैध्यकिय कारणास्तव असाधारण
  ऱजा जास्तीत जास्त किती दिवस काढता येते .

  ReplyDelete
 38. अर्जित रजा व किरकोळ रजा शिल्लक असताना अर्ज देऊन ही बिनपगारी LWP केली आहे. अशी बिनपगारी रजा करता येईल काय ?

  ReplyDelete
 39. पत्नीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास किती दिवस रजा मिळते. शासन निर्णय असेल तर पाठवा. सर

  ReplyDelete
 40. पिसाळलेला कुत्रा अथवा तत्‍सम जनावराने चावा घेतल्‍यास.
  २१ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
  विशेष नैमित्तिक रजा
  (Special Casual Leave)शासन निर्णय असेल तर पाठवा.

  ReplyDelete
 41. विना परवाना गैरहजर असताना रजा शिल्लक असताणी विना वेतन करता येते का

  ReplyDelete
 42. Bharthday sutti gr aahe ka..police karita

  ReplyDelete
 43. 3 दिवस शासकीय सुट्टी व त्यानंतर 4 दिवस वैद्यकीय सुट्टी आणि पुनः तीन दिवस शासकीय सुट्टी असल्यास वैद्यकीय रजा किती दिवस मोजायची 4 दिवस की 10 दिवस mail id :veena.khandode@gmail.com यावर उत्तर पाठवा

  ReplyDelete
 44. नमस्कार,सेवा निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी कर्मचारी रजा घेऊ शकतो का? कृपया उत्तर मिळावे हि विनंती.

  ReplyDelete
Mahsul Guru

Subscribe YouTube Channel