आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे

 संदर्भ: महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक २११, दिनांक ३० एप्रिल २०२६

अधिसूचना क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र. २९ / जमीन- १.

 महाराष्ट्र जमीन महसूल ( भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे) नियम, २०२५ या मुख्य नियमात" सुधारणा करण्‍यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण

केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे) नियम, २०२६ या नियमाचा मसुदा सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी यापूर्वी दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून दिनांक १२ मार्च, २०२६ पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.

 उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या हरकती व सूचना शासनाने विचारात घेऊन, प्रारूप नियमामध्ये सुधारणा करून आता, यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या नियमांचा मसूदा विचारात घेऊन, खालील नियम तयार करण्यात आले आहेत.

 १. या नियमांना, "महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे) नियम, २०२६ " असे म्हणावे.

 २. महाराष्ट्र जमीन महसूल ( भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे) नियम, २०२५ यातील नियम ३, पोट-नियम (४) मधील तक्‍ता: 

अ.क्र.

जमीन ज्‍या क्षेत्रात समाविष्‍ट आहे ते क्षेत्र आणि दिनांक ३१ डिसेंबर, २०२५

जमिनीचा वापर.

दिनांक ३१ डिसेंबर, २०२६ पर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जांवर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम

दिनांक ३१ डिसेंबर, २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांवर आकारावयाची अधिमूल्‍य रक्‍कम

नगरपंचायत/नगरपरिषद/ म. न. पा./ विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीबाहेरील कृषि प्रयोजनासाठी धारण केलेल्या-

(अ) ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात

शेती / ना विकास वापर विभागात स्थित आहेत.

अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील शेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या २५% एवढी रक्कम.

 

अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील संभाव्य विनशेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या ७५% एवढी रक्कम.

(ब) ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात अकृषिक (बिनशेती) वापर विभागात स्थित आहेत.

 

अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील संभाव्य बिनशेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या ५० % एवढी रक्कम.

अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील संभाव्य बिनशेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या ५ % एवढी रक्कम.

कृषी प्रयोजनासाठी धारण केलेल्या व सद्यःस्थितीमध्ये नगरपंचायत/नगरपरिषद/ महानगरपालिका / विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये स्थित असलेल्या जमिनी

अ) ज्यांचा विकास आराखड्याप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय नाही अशा जमिनी

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)  दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या २५%

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ७५%

 

(ब) ज्यांचा विकास आराखड्याप्रमाणे बिनशेती वापर

अनुज्ञेय आहे अशा जमिनी.

 

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील विनशेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या ५०% एवढी रक्कम.

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील संभाव्‍य विनशेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या ५% एवढी रक्कम.

(ब) निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकारावर किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर असा वापर अनुज्ञेय करण्यात आलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरण करण्याकरिता देय रुपांतरण अधिमूल्य:

 

वाणिज्यिक अथवा औद्योगिक अशा जमिनीच्या प्रयोजनासाठी कब्जेहक्काने किंवा

भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या १५%

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ६०%

रहिवासी प्रयोजनासाठी कब्जेहक्काने  वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनी

 

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ५०%

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे   येणार्‍या किंमतीच्‍या 

६० %

रहिवास प्रयोजनासाठी भाडेपट्टयाने धारण केलेल्‍या जमिनी

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या २५%

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे   येणार्‍या किंमतीच्‍या  ७५%

कब्जेहक्काने/ भाडेपट्‍ट्‍याने भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी धारण करणाऱ्या व स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या ५%

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे   येणार्‍या किंमतीच्‍या  ७५%

 

 

४-अ

सहकारी गृहनिर्माण संस्था ज्यांना जमीन सामाजिकदृष्ट्या आर्थिक दुर्बल प्रवर्गासाठी कब्जेहक्काने प्रदान किंवा भाडेपट्ट्याने देण्यात आलेली आहे, आणि ज्यांचा चटई क्षेत्रफळ ३५० चौ.फू. पेक्षा जास्त नाही.

अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या किंमतीच्या ५ % एवढी रक्कम

 

अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या किंमतीच्या ७५ % एवढी रक्कम

 

कब्जेहक्काने भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी धारण करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था

(वरील अनु. क्र. ४ मधील सहकारी संस्‍था वगळून)

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या १०%

प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे  येणार्‍या किंमतीच्‍या  ६०%

 

(इ) महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे) नियम, २०२५ मधील 'अटी' या शीर्षकाखालील अट (१) वगळण्यात येईल.

४. (१) जेथे भोगवटादार वर्ग - २ किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेली जमीन ही न्यायालयीन प्रकरण, नियोजन प्राधिकरणाने विकास योजनेत ( Development Plan) केलेला बदल किंवा भोगवटादाराच्या नियंत्रणाबाहेरील इतर कोणत्याही कारणामुळे, ज्या प्रयोजनासाठी ती मंजूर करण्यात आली होती त्या प्रयोजनासाठी वापरली गेली नसेल, तर अशा जमिनीचा भोगवटादार, अशा जमीन प्रदानाच्या दिनांकापासून १० वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूर प्रयोजनासाठीच वापरली जाईल असे हमीपत्र देऊन, अशा भोगवटादार वर्ग-२ किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्ज करू शकेल.

परंतु असे की, असा अर्ज करतेवेळी, अर्जदाराकडे संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.

 (२) जिल्हाधिकारी रुपांतरणासाठीचा असा अर्ज राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीसाठी पाठवतील. राज्य शासन त्याचे समाधान झाल्यास आणि लेखी कारणे नोंदवून अशा रूपांतरासाठी पूर्वपरवानगी देऊ शकतील किंवा नाकारू शकतील.

 (३) राज्य शासनाची अशी परवानगी प्राप्त झाल्यानंतर, जिल्हाधिकारी पोट-नियम (१) मध्ये नमूद केलेल्या भोगवटादार वर्ग-२ किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर करतील आणि नियम ३ मधील तक्त्यामध्ये नमूद केलेले रूपांतरण अधिमूल्य आणि अटी अशा रूपांतरासाठी लागू असतील.

 

...... ००० ......

                                                     अर्ज-नमुना

प्रती,

तहसिलदार, तालुका ............, जिल्‍हा ........

 विषय: महाराष्‍ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटदार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणे) नियम, २०२६ अन्‍वये अर्ज

 मा. महोदय,

 मी, अर्जदार नामे .........................................................................................

राहणार ......................................................संपर्क क्र. .............................................

महाराष्‍ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटदार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणे) नियम, २०२६ अन्‍वये खालीलप्रमाणे अर्ज सादर करीत आहे.

 १. जमीन धारकाचे नाव:

 २. जमीन धारकाचा संपूर्ण पत्ता:

३. जमीन धारकाचा संपर्क क्रमांक:

 ४. जमीन धारकाला जमीन प्रदान करण्‍यात आलेल्‍या

आदेशाचा क्रमांक व दिनांक:

 ५. जमीन धारकाला प्रदान करण्‍यात आलेली जमीन

कब्‍जेहक्‍काने प्रदान करण्‍यात आली आहे की भाडेपट्टयाने?

 ६. जमिनीचा तपशील

गावाचे नाव:                            तालुका:                                           जिल्‍हा:

अ.क्र.

भूमापन क्रमांक/उपविभाग क्र.

क्षेत्र

 

हे.

 आर

चौ.मी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 उपरोक्‍त जमिनीचे, महाराष्‍ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटदार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणे) नियम, २०२६ अन्‍वये भोगवटदार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणेकामी सर्व आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज सादर करीत आहे.

 सदर रूपातरणासाठी नियमानुसार अनुज्ञेय होणारे अधिमूल्‍य शासनास अदा करण्‍यास मी तयार आहे. कृपया माझी उपरोक्‍त जमीन वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करून मिळावी.

 वरील माहिती माझ्‍या माहितीप्रमाणे खरी व बरोबर आहे.

 

 

अर्जदाराची सही

ठिकाण:

दिनांक:

 

सूचना: अर्जासोबत (१) संबंधित जमिनीचे चालू सात-बारा, (२) संबंधित फेरफार नोंदी,

(३) संबंधित जमीन प्रदानाची सनद किंवा प्रदान आदेश यांच्‍या स्‍वसांक्षांकीत प्रती सादर केल्‍या आहेत.

 

...... ००० ......

  

छाननी तक्‍ता-नमुना

 विषय: महाराष्‍ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटदार वर्ग – १ मध्‍ये रूपांतरीत करणे) नियम, २०२६

 १. अर्जदाराचे नाव:

 २. जमीन धारकाचे नाव:

 ३. जमीन धारकाचा पत्ता:

 ४. जमीन धारकाला जमीन प्रदान करण्‍यात आलेल्‍या

आदेशाचा क्रमांक व दिनांक:

 ५. जमीन धारकाला प्रदान करण्‍यात आलेली जमीन

कब्‍जेहक्‍काने प्रदान करण्‍यात आली आहे की भाडेपट्टयाने?

 ५-अ. जमीन धारकाला सदर जमीन कोणत्‍या

प्रयोजनासाठी प्रदान करण्‍यात आली होती?

 ६. जमिनीचा तपशील-

गावाचे नाव:                       तालुका:                                                   जिल्‍हा:

अ.क्र.

भूमापन क्रमांक

क्षेत्र

 

हेक्‍टर

    आर

चौ.मी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

७. संबंधित जमिनीचे चालू सात-बारा अर्जासोबत जोडले आहेत काय?

 ८. संबंधित जमीन प्रदान केल्‍याचा फेरफार जोडला आहे काय?

 ८-अ. असल्‍यास फेरफार क्रमांक:

 ९. ज्‍या व्‍यक्‍तीला जमीन प्रदान करण्‍यात आली होती

ती व्‍यक्‍तीच अर्जदार आहे काय?

 ९-अ. नसल्‍यास, अर्जदार आणि जमीन धारकाचे नाते:

 १०. सदर प्रदान जमिनीवर वारस नोंद झाली आहे काय?

 १०-अ. असल्‍यास, फेरफार क्रमांक आणि वारसदारांची नावे:

(जरूर तर स्‍वतंत्र कागद जोडावा)

 ११. सदर प्रदान जमिनीबाबत शर्तभंग झाला आहे/होता काय?

(स्‍थळ पाहणी अहवाल जोडावा)

 ११-अ. असल्‍यास असा शर्तभंग सक्षम अधिकार्‍याकडून

नियमानुकुल करण्‍यात आला आहे काय?

 ११-ब. शर्तभंग नियमानुकुल करण्‍यात आला असल्‍यास,

सक्षम अधिकार्‍याचे पदनाम:

आदेश क्रमांक व दिनांक:

 ११-क. जमीन ज्‍या प्रयोजनासाठी प्रदान केली आहे त्‍याच प्रयोजनासाठी तिचा वापर होत आहे काय?

 १२. सदर जमीन, नगर पंचायत/ नगर परिषद/ म.न.पा./ विशेष नियेाजन प्राधिकरणाच्‍या हद्दी बाहेरील शेतीच्‍या कारणासाठी प्रदान करण्‍यात आली आहे काय?

 १२-अ. असल्‍यास, ती जमीन प्रादेशिक विकास आराखडयात

शेती व नाविकास विभागात स्थित आहे काय?

 १३. सदर जमीन, नगर पंचायत/ नगर परिषद/ म.न.पा./ विशेष नियेाजन प्राधिकरणाच्‍या हद्दी बाहेरील बिन-शेतीच्‍या कारणासाठी प्रदान करण्‍यात आली आहे काय?

 १३-अ. असल्‍यास, ती जमीन प्रादेशिक विकास आराखडयात

बिन-शेती विभागात स्थित आहे काय?

 १४. सदर जमीन शेतीसाठी प्रदान करण्‍यात आली आहे काय?

 १४-अ. असल्‍यास, सदयःस्थितीमध्‍ये सदर जमीन नगर पंचायत / नगर परिषद/ म.न.पा. / विशेष नियोजन प्राधिकरणापैकी कोणत्‍या हद्दीमध्‍ये आहे?

 १४-ब. विकास आराखडयाप्रमाणे सदर जमिनीचा बिनशेती वापर अनुज्ञेय आहे किंवा नाही?

१५. सदर जमीन वाणिज्‍यिक अथवा औदयोगिक

वापरासाठी प्रदान करण्‍यात आली होती काय?

 १५-अ. असल्‍यास, कब्‍जेहक्‍काने की भाडेपट्टयाने?

 १६. सदर जमीन रहिवास प्रयोजनासाठी प्रदान करण्‍यात आली होती काय?

 १६-अ. असल्‍यास, कब्‍जेहक्‍काने प्रदान करण्‍यात आली होती की भाडेपट्टयाने?

 १७. सदर जमीन सहकारी गृहनिर्माण संस्‍थेला

प्रदान करण्‍यात आली होती काय?

 १७-अ. असल्‍यास, कब्‍जेहक्‍काने की भाडेपट्टयाने?

 १७-ब. सदर जमीन आजही सहकारी गृहनिर्माण संस्‍थेच्‍या

भोगवटयात आहे काय?

 १८. कब्‍जेहक्‍काच्‍या रक्‍कमेमध्‍ये, चालू रेडीरेकनरमधील दराप्रमाणे येणार्‍या किंमतीम्रमाणे  अधिमूल्‍य रक्‍कम अदा करण्‍यास अर्जदार तयार आहे काय?

 १९. उपरोक्‍त जमिनीची चालू रेडीरेकनर अन्‍वये काय किंमत दर्शविली आहे?

 २०. सुधारीत नियम, २०२६ अन्‍वये अर्जदाराने किती टक्‍के रूपांतरण अधिमूल्‍य अदा करणे अपेक्षीत आहे?

 २१. उपरोक्‍त टक्‍केवारीप्रमाणे रूपांतरण अधिमूल्‍याची किती रक्‍कम अदा करणे आवश्‍यक आहे?

 महसूल सहायक:

 सहायक महसूल अधिकार्‍याचा अभिप्राय आणि सही

 नायब तहसीलदारचा अभिप्राय आणि सही

 तहसिलदारचा अभिप्राय आणि सही

 उपजिल्‍हाधिकारी यांचा अभिप्राय आणि सही

  

जिल्‍हाधिकारी

 

bžb

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करणे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.