आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

सीलिंग जमिनी वर्ग १ करणे

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

सीलिंग जमिनी वर्ग १ करणे

 संदर्भ: महाराष्‍ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक २१६

अधिसूचना क्रमांक: मशेम-२०२०/प्र. क्र. ५०/- ७ , दिनांक ४ मे, २०२६.

 महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (भोगवटादार वर्ग- २ भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरण करणे) नियम, २०२६

 महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ यात सुधारणाकरण्‍यासाठी शासनाने सदर सुधारणेमुळे बाधित होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी, आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी दिनांक १४ जानेवारी, २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून दिनांक ११ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.

उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या हरकती व सूचना शासनाने विचारात घेऊन, प्रारूप नियमांमध्ये सुधारणा करण्याचे शासनास उचित वाटले आहे.

आता, यापूर्वी प्रसिध्द केलेल्या नियमांचा मसूदा विचारात घेऊन, खालील नियम तयार करण्यात आले आहेत.

 १. संक्षिप्त नाव व व्याप्ती:

(१) या नियमास, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (भोगवटादार वर्ग- २ भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरण करणे) नियम, २०२६ असे म्हणावे.

 (२) हे नियम, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१, कलम २७ अन्वये भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकारावर प्रदान करण्यात आलेल्या जमिनींना, अशा जमिनी प्रदान केल्याच्या दिनांकापासून दहा वर्षे उलटल्यानंतर; आणि जेव्हा अशा जमिनी प्रदान केल्याच्या शर्तींपैकी कोणत्याही शर्तींचे उल्लंघन झालेले नसेल, त्या बाबतीत, किंवा जर अशा शर्तींपैकी कोणत्याही शर्तींचे उल्लंघन झाले असेल तर, असे उल्लंघन नियमाधीन केल्यानंतर लागू होतील.

 २. व्याख्या:

(१) या नियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,

(एक) अधिनियम याचा अर्थ, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ असा आहे.

(दोन) "वार्षिक दर विवरणपत्र " याचा अर्थ, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८, अन्वये केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक (मालमत्तेचे वास्तव बाजार मूल्य निर्धारित करणे) नियम, १९९५ याच्या तरतुदन्वये प्रसिद्ध केलेले वार्षिक दर विवरणपत्र, असा आहे. आणि जेव्हा असे वार्षिक दर विवरणपत्र तयार केलेले नसेल किंवा उपलब्ध नसेल, त्या बाबतीत त्याचा अर्थ, संबंधित जिल्ह्याच्या नगर रचना विभागाच्या सहायक संचालकाद्वारे निर्धारित केलेला अशा जमिनीचा दर, असा आहे.

 (तीन) "रुपांतरण अधिमूल्य" याचा अर्थ, या नियमांच्या नियम ३ च्या पोट-नियम (४) खालील तक्त्यामध्ये विहित केल्याप्रमाणे रूपांतरण अधिमूल्य, असा आहे.

 (२) यात यावर वापरलेले, परंतु व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना, या अधिनियमात अनुक्रमे जे अर्थ नेमून देण्यात आले असतील, तेच अर्थ असतील.

 ३. (१) महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१, कलम २७ अन्वये भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकाराने दिलेल्या जमिनीच्या कोणत्याही धारकास, अशा जमिनी प्रदान केल्याच्या दिनांकापासून दहा वर्ष उलटल्यानंतर; आणि जर जमिनी प्रदान केल्याच्या शर्तींपैकी कोणत्याही शर्तींचे उल्लंघन झालेले नसेल त्या बाबतीत, किंवा जर अशा शर्तींपैकी कोणत्याही शर्तींचे उल्लंघन झाले असेल तर, असे उल्लंघन नियमाधीन केल्यानंतर, या नियमांच्या तरतुदींनुसार त्याच्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ धारणाधिकारामध्ये रूपांतरण करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करता येईल.

 (२) वरील प्रमाणे कोणताही अर्ज प्राप्त झाल्यावर, जिल्हाधिकारी, संबंधित जमिनीच्या तपशिलांची आणि अशी जमीन दिल्याच्या कोणत्याही अटींचे किंवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन झाले आहे किंवा कसे याची ३ महिन्यांत पडताळणी करतील.

 (३) अशी पडताळणी केल्यावर, जर जमीन प्रदान केल्याच्या कोणत्याही अटींचे व शर्तींचे उल्लंघन झाले आहे व असे उल्लंघन नियमाधीन करण्यात आलेले नसेल तर, जिल्हाधिकारी, त्याची कारणे नोंदविल्यानंतर, आदेशाद्वारे, अर्ज फेटाळू शकतील.

 (४) अशी पडताळणी केल्यानंतर, जर अशी जमीन प्रदान केल्याच्या कोणत्याही अटींचे व शतींचे उल्लंघन झालेले नाही; किंवा जर कोणतेही उल्लंघन झाले असेल व सक्षम प्राधिकाऱ्याने असे उल्लंघन नियमाधीन केले असल्‍यास, जिल्हाधिकारी, खालील तक्त्यामध्ये विनिर्दिष्ट केलेले रूपांतरण अधिमूल्याचे प्रदान केल्यावर व त्याखाली नमूद केलेल्या शर्तींच्या अधीन राहून, भोगवटादार वर्ग -२ जमिनींचे भोगवटादार वर्ग -१ जमिनींमध्ये रूपांतरण करण्याबाबतचे अंतिम आदेश पडताळणीनंतर १५ दिवसांत पारित करतील.

(क) महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१, कलम २७ अन्वये भोगवटादार वर्ग- २ धारणाधिकारावर वाटप केलेल्या व वाटपानंतर ज्या जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत किंवा ज्या जमिनींच्या वापरात बदल करण्यात आलेला नाही, अशा जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरणासाठी प्रदेय असलेले रूपांतरण अधिमूल्य: 

तक्ता - १

अनु. क्र.

ज्या क्षेत्रात जमीन स्थित आहे ती क्षेत्रे

रूपांतरण अधिमूल्य

(१)

(२)

(३)

१.

महानगर प्रदेश, महानगरपालिका, किंवा नगर परिषद व त्यांची सीमावर्ती क्षेत्रे

वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्‍या मुल्‍याच्‍या तीस टक्‍के

२.

महानगर प्रदेश, महानगरपालिका, किंवा नगर परिषद व त्यांची सीमावर्ती क्षेत्रे यांमध्‍ये नसलेल्‍या इतर जमिनी

वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्‍या मुल्‍याच्‍या पंचवीस टक्‍के

 (ख) महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१, कलम २७ अन्‍वये, भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकारावर वाटप केलेल्या व वाटपानंतर ज्या जमिनी जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत किंवा ज्या जमिनींच्या वापरात बदल करण्यात आलेला आहे, अशा जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरणासाठी प्रदेय असलेले रूपांतरण अधिमूल्यः 

तक्ता - २

अनु. क्र.

ज्या क्षेत्रात जमीन स्थित आहे ती क्षेत्रे व तिचे वापरकर्ते

                    रूपांतरण अधिमूल्य

(१)

(२)

(३)

१.

महानगर प्रदेश, महानगरपालिका, किंवा नगर परिषद व त्यांची सीमावर्ती क्षेत्रे

(एक) शेतीच्या प्रयोजनांसाठी वापरलेली जमीन

वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्‍या मुल्‍याच्‍या तीस टक्‍के 

(दोन) औद्योगिक व इतर बिगरशेती प्रयोजनांसाठी वापरलेली जमीन

वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्‍या मुल्‍याच्‍या पंचवीस टक्‍के 

२.

महानगर प्रदेश, महानगरपालिका, किंवा नगर परिषद व त्यांची सीमावर्ती क्षेत्रे यांमध्‍ये नसलेल्‍या इतर जमिनी

(एक) शेतीच्या प्रयोजनांसाठी वापरलेली जमीन

वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्‍या मुल्‍याच्‍या पंचवीस टक्‍के 

(दोन) औद्योगिक व इतर बिगरशेती प्रयोजनांसाठी वापरलेली जमीन

वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्‍या मुल्‍याच्‍या वीस टक्‍के 

 n शर्ती:

(१) ज्या प्रकरणांमध्ये वार्षिक मूल्यदर विवरणपत्राप्रमाणे जमिनीच्या बाजारमूल्याची रक्कम पन्नास लाखापर्यंत असेल अशा जमिनींचे भोगवटादार वर्ग -२ मधून भोगवटादार वर्ग -१ मध्ये रूपांतरण करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील व ज्या प्रकरणांमध्ये वार्षिक मूल्यदर विवरणपत्राप्रमाणे जमिनीच्या बाजारमूल्याची रक्कम पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, अशा प्रकरणांमध्ये राज्य शासनाची पूर्व मान्यता घेतल्याशिवाय जिल्हाधिकारी भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्याचा कोणताही आदेश पारित करणार नाहीत.

 ज्या अर्जांमध्ये अशा वार्षिक मूल्यदर विवरणपत्राप्रमाणे जमिनीच्या बाजारमूल्याची रक्कम पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, अशा अर्जांची पडताळणी जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत करतील आणि ते अर्ज राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेसाठी पाठवतील.

 (२) भोगवटादार वर्ग -२ जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्याच्या अंतिम आदेशापूर्वी, अर्जदाराने रुपांतरण अधिमूल्य भरण्यासाठीच्या नोटीशीमध्ये नमूद केलेली रूपांतरण अधिमूल्याची रक्कम अशा नोटीसच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत अदा करावी.

 (३) महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१, कलम २७ अन्‍वये, जमीन वाटप केल्यानंतर, जर कोणत्याही अटींचे किंवा शर्तींचे उल्लंघन झाले असेल तर, सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे प्रथम असे उल्लंघन नियमाधीन करण्यात येईल आणि त्यानंतर, या नियमांनुसार अशा जमिनींचे भोगवटादार वर्ग -२ मधून भोगवटादार वर्ग -१ मध्ये रुपांतरण करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

w यासाठी, राजपत्र दिनांक १५.१२.२०१८ अन्‍वये पारित महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) अधिनियम, २०१८ चा वापर करावा.

 (४) जर भूधारकाने सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने जमीन हस्तांतरित केल्यास किंवा तिच्या वापरात बदल केल्यास, पूर्व परवानगीच्या वेळी भरलेली अनर्जित उत्पन्नाची किंवा अधिभाराची किंवा अधिमूल्याची रक्कम उक्त जमीनीचे भोगवटादार वर्ग -२ मधून भोगवटादार वर्ग -१ मध्ये रुपांतरण करण्याच्या वेळी आकारण्यात येणाऱ्या रुपांतरण अधिमूल्यामध्ये समायोजित करण्यात येणार नाही.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला सीलिंग जमिनी वर्ग १ करणे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.