आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

कुळ वहिवाट कायदा १९४८, कलम ४३-१-अ मधील सुधारणा

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

कुळ वहिवाट कायदा १९४८, कलम ४३-१-अ मधील सुधारणा

 n मूळ कलम ४३:  (१) कुळाने कलमे ३२, ३२फ, ३२-झ, ३२-ण, ३३-ग किंवा ४३-एक-च अन्वये खरेदी केलेली अथवा कलम ३२-प किंवा कलम ६४ अन्वये कोणत्याही व्यक्तीस विकलेली कोणतीही जमीन, जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वमंजुरीवाचून तिची विक्री करून, देणगी देऊन, अदलाबदल करून, गहाण देऊन, पट्ट्याने देऊन किंवा अभिहस्तांकन करून हस्तांतरित करता कामा नये.  अशी मंजुरी जिल्हाधिकारी, राज्य शासन विहित करील त्या परिस्थितीत आणि त्या शर्तीच्या अधीनतेने देतील.

 n महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ७ फेब्रुवारी, २०१४  अन्‍वये,

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश ) (सुधारणा) अधिनियम, २०१२ अन्‍वये,

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ मधील आणि हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५० च्या कलम ५०-ब मधील तसेच महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन ( विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८ च्या कलम ५७ मधील,

पोट-कलम (१) मध्ये, विद्यमान परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात आले:-

 ‘‘परंतु आणखी असे की, उक्‍त कलमांन्वये ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून दहा वर्षांचा काळ लोटला असेल अशा जमिनीच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरिता, ती देणगी देण्याकरिता, तिची अदलाबदल करण्याकरिता, ती गहाण ठेवण्याकरिता, ती पट्ट्याने देण्याकरिता किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता पुढील शर्तीस अधीन राहून, अशा कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता असणार नाही:

 (क) शेतजमिनीची विक्री करण्यापूर्वी, विक्रेता जमीन महसूल आकारणीच्या चाळीस पट इतकी नजराणा रक्कम शासनाला देईल;

 (ख) खरेदीदार हा शेतकरी असेल;

 (ग) खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही; आणि

 (घ) मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ याच्या तरतुदींचे उल्लंघन केले जाणार नाही."

 n आता, महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १५ एप्रिल २०२६ अन्‍वये,  

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ नुसार,

w महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, अधिनियम क्रमांक ६७

w हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५०, अधिनियम क्रमांक २१

 w महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन ( विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८, अधिनियम क्रमांक ९९ अन्‍वये सुधारणा करून,

  महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ४३ मधील पोट-कलम (१)

 हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५०, कलम ५०-ब मधील पोट-कलम (१)

 महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन ( विदर्भ प्रदेश) अधिनियम १९५८, कलम ५७ मधील पोट-कलम (१) वगळण्यात आले आहे.

 w त्‍यामुळे, आता उक्‍त कलमांन्वये ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून दहा वर्षांचा काळ लोटला असेल अशा जमिनीच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरिता, ती देणगी देण्याकरिता, तिची अदलाबदल करण्याकरिता, ती गहाण ठेवण्याकरिता, ती पट्ट्याने देण्याकरिता किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता पुढील शर्तीस अधीन राहून, अशा कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता असणार नाही:

 w (क) शेतजमिनीची विक्री करण्यापूर्वी, विक्रेत्‍याला जमीन महसूल आकारणीच्या चाळीस पट इतकी नजराणा रक्कम शासनाला देण्‍याची आवश्‍यकता असणार नाही.

 तथापि,

 (ख) खरेदीदार हा शेतकरी असेल;

 (ग) खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही; आणि

 (घ) मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ याच्या तरतुदींचे उल्लंघन केले जाणार नाही.

या अटी लागू राहतील.

 परंतु,

ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून दहा वर्षांचा काळ लोटला नसेल अशा जमिनीच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरिता, ती देणगी देण्याकरिता, तिची अदलाबदल करण्याकरिता, ती गहाण ठेवण्याकरिता, ती पट्ट्याने देण्याकरिता किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता उक्‍त सर्व तरतुदी लागू असतील.

nœ

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कुळ वहिवाट कायदा १९४८, कलम ४३-१-अ मधील सुधारणा. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.