महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६
सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्रमांक साप्रवि/१२०२०/४/२०२५ - साप्रवि कार्या- ६,
दिनांक : १२ जुन २०२६
(ञ) "प्रथम अपिलीय प्राधिकारी" याचा अर्थ, अधिनियमाच्या
कलम १९(१) अन्वये ज्याच्याकडे अपील दाखल केले जाते तो केंद्रीय जन माहिती
अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी, असा आहे.
५. शुल्क प्रदान करण्यातून
सूट: जी व्यक्ती दारिद्रयरेषेखालील आहे अशा
कोणत्याही व्यक्तीकडून नियम ३ व नियम ४ अन्वये कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही,
परंतु, या संबंधात समुचित शासनाने दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत, अर्जासोबत सादर
केलेली असावीः
परंतु, जर दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीने मागितलेली माहिती विपुल स्वरूपाची (voluminous Nature) असेल तर, अशा माहितीची पहिली पन्नास पृष्ठे
विनामूल्य पुरविण्यात येतील, आणि उर्वरित पृष्ठांसाठी, नियम ४ मध्ये
विनिर्दिष्ट केलेल्या दराने शुल्क आकारण्यात येईल.
(१) रीतसर पावती घेऊन सार्वजनिक प्राधिकरणाकडे रोखीने (cash); किंवा
अधिनियमाच्या कलम ६ अन्वये माहितीसाठी लेखी
स्वरुपात केलेली विनंती, एकाच विषयाशी संबंधित असेल आणि ती साधारणपणे एकशे पन्नास शब्दांपेक्षा अधिक
शब्दांची असणार नाही. जर अर्जदाराची एकापेक्षा अधिक विषयावर माहिती मागवण्याची
इच्छा असेल तर, तो, त्यासाठी स्वतंत्र अर्ज करील.
परंतु, जर केलेली विनंती एकापेक्षा अधिक विषयांशी संबंधित असेल तर, जन माहिती अधिकारी, केवळ पहिल्या विषयाशी संबंधित असणाऱ्या विनंतीला प्रतिसाद देईल आणि इतर
प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला अर्जदारास देऊ शकेल.
(क) कलम ६ च्या पोट-कलम (१) अन्वये अभिलेखाच्या निरीक्षणाच्या
मागणीसाठी अर्जदाराने दाखल केलेल्या अर्ज विचारात घेतल्यानंतर, जन माहिती अधिकाऱ्यास तसे योग्य असल्याचे आढळून आले असेल तर, अर्जदारास अभिलेखाचे निरीक्षण करण्याची परवानगी देऊ शकेल
आणि जर अशी परवानगी दिली असेल तर, जन माहिती
अधिकारी, विभागाच्या संबंधित कक्षाकडून अर्जदारास हवा
असलेला अभिलेख त्याला पाहण्यासाठी मागवील आणि कार्यालयीन वेळेत, त्याच्या उपस्थितीत किंवा त्याच्या प्राधिकृत प्रतिनिधीच्या
उपस्थितीत तो अभिलेख निरीक्षणासाठी देईल.
प्रत्येक अर्जदाराने, अधिनियमाच्या कलम ६(१) अन्वये केलेल्या अर्जासोबत
छायाचित्र असलेल्या ओळखपुराव्याची स्वयं-साक्षांकित केलेली प्रत जोडणे आवश्यक
असेल. जर ओळख पुरावा नसलेला अर्ज प्राप्त झालेला असेल तर, जन माहिती अधिकारी, आवश्यक पालन करण्यासाठी असा अर्ज अर्जदारास परत करू शकेल.
जेव्हा अर्जदाराने मागितलेली माहिती, अधिनियमाच्या तरतुदींन्वये त्याच अर्जदाराला यापूर्वी
अगोदरच पुरविण्यात आलेली असेल त्याबाबतीत, जन माहिती अधिकारी या पूर्वीच्या पत्रव्यवहाराचा आणि अगोदरच पुरविलेल्या
माहितीचा संदर्भ देऊन, असा पुन्हा केलेला विनंती अर्ज निकालात काढू शकेल.
(क) स्वतः होऊन माहिती उघड करण्याशी संबंधित असणाऱ्या, या अधिनियमाच्या
कलम ४(१) खंड (क) व खंड (ख) मधील तरतुदींचे
अनुपालन केल्याची सुनिश्चिती करण्याची जवाबदारी, संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यालय प्रमुखाकडे निहित असेल.
जेव्हा अर्जदाराने मागितलेली माहिती, शासनाच्या किंवा संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिकृत
संकेतस्थळावर आधीच उपलब्ध असेल त्या बाबतीत, जन माहिती अधिकारी, अशी माहिती थेट संकेतस्थळावरून मिळविण्यासाठी अर्जदारास
कळवील.
जन माहिती अधिकाऱ्यास
ऑनलाईन उपलब्ध असलेल्या अशा माहितीचे साक्षांकन करण्यास नकार देण्याचा (decline attestation of such information
available online) प्राधिकार देखील असेल.
जेव्हा माहिती कोणत्याही सार्वजनिक
कामकाजाशी किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित नसेल तेव्हा, अथवा जेव्हा अशी माहिती उघड केल्यामुळे संबंधित व्यक्तीच्या
खाजगी गोष्टींमध्ये विनाकारण हस्तक्षेप होईल तेव्हा या नियमांन्वये व्याख्या केलेली अशी वैयक्तिक स्वरुपाची माहिती या
अधिनियमाच्या कलम ८(१) खंड (ञ) अनुसार, उघड करण्यातून सुट असेल. (where such information
has no relationship to any public activity or public interest, or where the
disclosure of such information would cause an unwarranted
invasion of the privacy of the individual concerned)
परंतु, जर व्यापक सार्वजनिक हितामुळे, अशी माहिती उघड करणे समर्थनीय आहे अशी सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटली असेल
तर अशी वैयक्तिक माहिती उघड करता येईल आणि अशा खात्रीची कारणे लेखी स्वरूपात
नोंदविण्यात येतील.
जन माहिती अधिकाऱ्याने ई-मेलद्वारे
किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे केलेला कोणताही पत्रव्यवहार
किंवा पुरविलेली माहिती ही, या अधिनियमाअन्वये वैध पत्रव्यवहार किंवा माहितीचे वैध वितरण असल्याचे
मानण्यात येईल.
(१) राज्य जन माहिती अधिकाऱ्याने संमत केलेल्या आदेशामुळे
किंवा राज्य जन माहिती अधिकाऱ्याने तिचा अर्ज निकालात न काढल्यामुळे व्यथित झालेली
कोणतीही व्यक्ती, जोडपत्र "ख" मध्ये दिलेल्या नमुन्यात, साध्या कागदावर कलम
१९(१) अन्वये प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याकडे अपील दाखल करू शकेल आणि त्यासोबत नियम
६ मध्ये विहित केलेल्या रीतीने पन्नास रुपये इतके अपील शुल्क प्रदान करील.
(एक) राज्य जन माहिती अधिकाऱ्याकडे सादर केलेल्या अर्जाची प्रत;
(१) राज्य माहिती आयोगाकडे कलम १९(३) अन्वये केलेले अपील, जोडपत्र "ग" मध्ये दिलेल्या नमुन्यात, साध्या कागदावर दाखल करण्यात येईल आणि त्यासोबत,
नियम ६ मध्ये विहित केलेल्या रीतीने शंभर रुपये इतके अपील शुल्क
प्रदान करण्यात येईल.
जर नियम १५(२) आणि नियम १६(२) किंवा १६(३)
यांमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे अपिलासोबत दस्तऐवज जोडलेले नसतील अथवा
आयोगाच्या अधिकाऱ्याला अन्य कोणतीही त्रुटी आढळून आली असेल तर, अपीलकर्त्यास त्रुटी दूर करण्यासाठी असे अपील, परत करता येईल आणि त्यास त्रुटी दूर करण्याची विनंती करणारे पत्र
मिळाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत सर्वदृष्टीने परिपूर्ण
असलेले अपील दाखल करण्यास कळविण्यात येईलः
परंतु, जेव्हा अधिनियमात विहित केलेल्या कालावधीत, राज्य जन
माहिती अधिकाऱ्याचे उत्तर किंवा प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याचा आदेश प्राप्त न
झाल्यास, या नियमान्वये त्या कारणास्तव अपील परत केले जाणार
नाही.
(१) जर अपील हे, या अधिनियमाच्या, नियमांच्या व विनियमांच्या
तरतुदींनुसार आहे, असे आयोगाच्या अधिकाऱ्यास असे दिसून आले
तर, त्या अपिलास क्रमांक देण्यात येईल आणि त्या
प्रयोजनाकरिता ठेवलेल्या नोंदवहीत त्याची नोंद करण्यात येईल आणि, अपिलाच्या संदर्भासह त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व दस्तऐवजांच्या
प्रतींसह लेखी निवेदन किंवा अहवाल, निर्देश देणारे पत्र
मिळाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत सादर करण्यासाठी जन माहिती
अधिकाऱ्यास व प्रथम अपिलीय प्राधिकरणास निर्देश देईल. अहवाल प्राप्त झाल्यावर
किंवा उपरोक्त कालावधीत अहवाल प्राप्त न झाल्यास, अपिलाच्या
सुनावणीची तारीख निश्चित केली जाऊ शकेल.
(क) जर एखाद्या व्यक्तीने प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याकडे अपील
दाखल केले असेल आणि प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याने त्यावर अंतिम आदेश दिलेला असेल तर
किंवा
(१) आयोग, संबंधित
व्यक्तींना अपिलाची किंवा तक्रारीची नोटीस, खालीलपैकी
कोणत्याही मार्गाने बजावू शकेलः-
(क) हातवटवड्याने (by hand
delivery);
(ख) नोंदणीकृत डाकेने, शीघ्र डाकेने, डाक प्रमाणपत्र घेऊन, कुरियरद्वारे किंवा तत्सम इतर साधनांद्वारे (by Registered Post,
Speed Post, Under Postal Certificate, Courier or such similar other
means);
(१) अपीलकर्त्यास किंवा, यथास्थिति, तक्रारदारास प्रत्येक प्रकरणात, सुनावणीच्या तारखेपूर्वी किमान सात स्पष्ट दिवस अगोदर सुनावणीच्या
तारखेची नोटीस देण्यात येईल.
परंतु, अपीलकर्त्यास किंवा तक्रारदारास किंवा प्रतिवादीस जर सुनावणीच्या
तारखेपूर्वी दोन दिवस अगोदर त्याचे सर्व संबंधित दस्तऐवज सादर केलेले असतील आणि
सुनावणीच्या वेळी आयोगाकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध असेल तर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे प्रकरण सादर
करता येईल.
(१) आयोग, अपील
निकालात काढताना: -
परंतु, जेव्हा या पोट-नियमान्वये अपील किंवा तक्रार, खटला न
चालविल्यामुळे फेटाळण्यात आली असेल, त्याबाबतीत अपीलकर्ता
किंवा तक्रारदार, फेटाळण्याचा आदेश मिळाल्याच्या
तारखेपासून तीस दिवसांच्या आत, फेटाळण्याचा
निर्णय रद्द करण्यासाठी अर्ज करू शकेल, आणि अपीलकर्त्याने
किंवा तक्रारदाराने, त्याच्या अनुपस्थितीसाठी पुरेसे कारण
होते याबाबत आयोगाची खात्री पटवून दिली असेल तर, आयोग, अपील फेटाळण्याचा निर्णय रद्द करण्याचा आदेश
देऊ शकेल आणि अपील किंव तक्रार पुढे चालविण्यासाठी दिवस नियत करू शकेलः
परंतु आणखी असे की, विरोधी पक्षाला त्याची नोटीस बजावल्याशिवाय, उपरोक्तप्रमाणे अशा कोणत्याही अर्जावरून निर्णय रद्द करण्याचा आदेश
देण्यात येणार नाही.
(१) या अधिनियमाद्वारे किंवा त्या अन्वये अन्यथा तरतूद केली
असेल ते खेरीज करून, आयोगासमोरील अपिलाच्या किंवा
तक्रारीच्या बाबतीत, पुराव्याचा भार, तथ्य ठामपणे प्रतिपादन करणाऱ्या पक्षावर असेल (the
burden of proof shall lie upon the party asserting a fact).
(क) तक्रारदार किंवा अपीलकर्ता, माहिती नाकारणे, विलंब करणे, किंवा
चुकीची माहिती देणे अथवा त्यात नमूद केलेले अन्य कोणतेही कारण शाबित व सिद्ध करील;
(१) राज्य माहिती आयोग, अपिलकर्त्याने केलेल्या लेखी विनंतीवरून
अपील मागे घेण्यास परवानगी देऊ शकेल;
परंतु, जेव्हा सुनावणीची नोटीस जारी केल्यानंतर, अपीलकर्त्याने
केलेली लेखी विनंती आयोगाला मिळाली असेल, त्या बाबतीत,
आयोग, आयोगाची संसाधने व खर्च वाया
घालविल्याबद्दल अपीलकर्त्याने प्रदान करावयाचा वाजवी खर्च लादू शकेल आणि जमीन
महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे त्याची वसुली करू शकेल.
राज्य माहिती आयोगाचा आदेश, लेखी स्वरूपात असेल आणि आयोगाने या प्रयोजनार्थ प्राधिकृत
केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने रीतसर अधिप्रमाणित केलेल्या (duly
authenticated) आयोगाच्या शिक्क्यानिशी देण्यात येईल.
वरील नियम १७ ते २४ च्या तरतुदी, कलम १८ अन्वये आयोगासमोर दाखल केलेल्या तक्रारींच्या बाबतीत,
योग्य त्या फेरफारांसह, लागू होतील.
(१) या नियमांमधील कोणत्याही गोष्टीमुळे, आयोग, या अधिनियमाच्या कलम १८ अन्वये
चौकशी करत असताना किंवा कलम १९(३) अन्वये द्वितीय अपील निकालात काढत असताना,
सर्व पक्षकारांना सुनावणीची वाजवी संधी दिल्यानंतर, न्यायाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा आयोगाच्या प्रक्रियेचा गैरवापर
रोखण्यासाठी आवश्यक असतील असे, या अधिनियमाच्या तरतुदींशी
सुसंगत असलेले आनुषंगिक किंवा सहायक प्रक्रियात्मक आदेश पारित करण्याच्या राज्य
माहिती आयोगाच्या अधिकारांवर मर्यादा आल्याचे मानण्यात येणार नाही.
(२) आयोग, कोणत्याही
वेळी, एकतर स्वतःहून किंवा कोणत्याही पक्षकाराच्या अर्जावरून,
कलम १८ खालील तक्रारीशी किंवा कलम १९(३) खालील द्वितीय अपिलाशी
संबंधित असणाऱ्या कोणत्याही आदेशात किंवा अभिलेखात चुकीने किंवा अपघाताने झालेली
कोणतीही लिपिकीय किंवा अंकगणितीय चूक अथवा त्रुटी दुरुस्त करू शकेल.
(३) जेव्हा पोट-नियम (२) अन्वये कोणतीही दुरुस्ती केली जाते
त्या बाबतीत, दुरुस्त आदेशाची प्रत, संबंधित पक्षकारांना कळविण्यात येईल आणि आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात
(अपलोड) करण्यात येईल.
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळविण्याच्या अर्जाचा नमुना
जोडपत्र "क"
(नियम ३ पहा)
प्रति,
राज्य जन माहिती अधिकारी,
(कार्यालयाचे नाव व पत्ता)
|
१. |
अर्जदाराचे पूर्ण नाव: |
|
|
२. |
अर्जदाराचा पत्ता: |
|
|
३. |
भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी: |
|
|
४. |
आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील: |
|
|
५. |
माहिती मागण्याचे प्रयोजन: |
|
|
६. |
माहितीचा विषय (केवळ १५० शब्दांचा वापर करावा
) |
|
|
७. |
माहिती ज्या कालावधीशी संबंधित आहे तो
कालावधी: |
|
|
८. |
आवश्यक माहिती मिळण्याचा मार्ग (व्यक्तिशः /
नोंदणीकृत डाकेने / ई-मेलने / वैयक्तिक पेनड्राईव्हमध्ये / ऑनलाईन आरटीआयच्या
बाबतीत ऑनलाईन पोर्टलद्वारे) |
|
|
९. |
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे किंवा कसे? (असल्यास, पुराव्याची छायाप्रत जोडा) |
|
|
१०. |
ओळख पुरावा (नागरिकत्व सिद्ध करणारा) |
|
दिनांक :-
ठिकाण :- अर्जदाराची
स्वाक्षरी.
...... ००० ......
जोडपत्र "ख"
(नियम १५ पहा)
प्रति,
(अपिलीय प्राधिकाऱ्याचे नाव /
पदनाम / पत्ता)
|
१. |
अपीलकर्त्यांचे पूर्ण नाव: |
|
|
२. |
अपीलकर्त्यांचा पत्ता: |
|
|
३. |
भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी: |
|
|
४. |
अर्जावर उत्तर दिलेल्या राज्य जन माहिती
अधिकाऱ्याचे नाव व पत्ता: |
|
|
५. |
अर्जाचा तपशील: |
|
|
६. |
ज्या आदेशाविरुद्ध अपील करावयाचे आहे त्या आदेशांचा तपशील, कोणतेही असल्यास, क्रमांकासह: |
|
|
७. |
प्रार्थना किंवा मागितलेला दिलासा: |
|
|
८. |
प्रार्थनेची किंवा दिलाशाची कारणे: |
|
|
९. |
अपिलाशी संबंधित असणारी कोणतीही अन्य माहिती: |
|
|
१०. |
ओळख पुरावा (नागरिकत्व सिद्ध करणारा) |
|
दिनांक :-
ठिकाण :- अपीलकर्त्यांची
स्वाक्षरी.
...... ००० ......
जोडपत्र "ग"
(नियम १६ पहा)
प्रति,
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग,
.................. येथील खंडपीठ
पत्ता :.........................................
(२) पत्ताः
(३) अपीलकर्त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल पत्ता:
(४) अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे किंवा कसे (असल्यास, त्याच्या वैध पुराव्याची छायाप्रत जोडावी.):
(५) संबंधित राज्य जन माहिती अधिकाऱ्याचा तपशील व पत्ताः
(६) संबंधित प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याचा तपशील व पत्ताः
(७) जर अपीलकर्ता त्रयस्थ पक्ष असेल तर, मूळ अर्जदाराचे नाव व पत्ताः
(८) माहिती मागणाऱ्या अर्जाचा तपशील-
(क) अर्जाचा दिनांकः
(ख) माहितीचा तपशील -
(एक) माहितीचा विषयः
(दोन) माहिती ज्या कालावधीशी
संबंधित आहे तो कालावधीः
(तीन) आवश्यक असलेल्या विशिष्ट
माहितीचे वर्णनः
(ग) माहिती डाकेने किंवा
व्यक्तिशः हवी आहे किंवा कसे
(घ) डाकेने हवी असल्यास
(सर्वसाधारण / नोंदणीकृत / शीघ्र डाकेने):
(ङ) अर्ज (जोडपत्र- क) सहायक जन
माहिती अधिकाऱ्यास दिलेला आहे किंवा कसे
(च) सहायक जन माहिती अधिकाऱ्यास
अर्ज मिळाल्याचा दिनांकः
(छ) जन माहिती अधिकाऱ्यास अर्ज
मिळाल्याचा दिनांकः
(ज) जन माहिती अधिकाऱ्याच्या
उत्तराचा दिनांकः
(झ) जन माहिती अधिकाऱ्याचे उत्तर
मिळाल्याचा दिनांक: होय / नाही
(९) प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याकडे केलेल्या प्रथम अपिलाचा
तपशील
(क) प्रथम अपिलाचा दिनांकः
(ख) प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्यास
प्रथम अपील मिळाल्याचा दिनांकः
(ग) प्रथम अपील (जोडपत्र -ख)
सहायक जन माहिती अधिकाऱ्यास दिलेले आहे किंवा कसे: होय / नाही
(घ) अर्जदाराला प्रथम अपिलीय
प्राधिकाऱ्याचा आदेश मिळाल्याचा दिनांकः
(१०) अपील दाखल करण्याची शेवटची तारीख:
(११) अपिलाची कारणेः
(१२) प्रार्थना किंवा मागितलेला दिलासाः
(१३) प्रार्थनेची किंवा दिलाशाची कारणेः
(१४) (अ) सुनावणीस व्यक्तिशः उपस्थिती होय / नाही
(ब) (एक) सुनावणीस ऑनलाईन
उपस्थिती होय / नाही
(दोन) असल्यास, ऑनलाईन सुनावणीसाठी ई-मेल पत्ता किंवा भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावाः (१५)
कलम १८ अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा तपशील, कोणताही
असल्यासः
ठिकाण :
दिनांक : अपीलकर्त्याची
स्वाक्षरी.
...... ००० ......
सत्यापन
मी, ( अपीलकर्त्याचे नाव) ..........................................., राहणार (पत्ता).
............. , ............... यांचा / यांची मुलगा / मुलगी/पत्नी, याद्वारे असे घोषित करतो / करते की, वर दिलेली
माहिती माझ्या माहितीप्रमाणे सत्य आहे आणि मी, याच अर्जाच्या
संबंधात राज्य माहिती आयोगाकडे कलम १९ (३) अन्वये कोणतेही द्वितीय अपील दाखल
केलेले नाही आणि मी कोणतेही महत्त्वाचे तथ्य लपवले नाही.
ठिकाण :
दिनांक
: अपीलकर्त्याची
स्वाक्षरी
.
...... ००० ......
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !