सात-बारा वरील आणेवारी
तथापि, अनेक ठिकाणी याबाबतचे कायदेशीर आदेश आढळून येत नाहीत. काही ठिकाणी फक्त अर्जावरुन अशी 'आणेवारी' दाखल असल्याची नोंद आढळते.
नंतरच्या अभिलेख व्यवस्थेतील सुलभीकरणामुळे सहधारकांचे क्षेत्र
हेक्टर,
आर आणि चौरस मीटर या मेट्रिक पद्धतीतही अधिक अचूकपणे दर्शविण्याची
व्यवस्था विकसित झाली.
|
सहधारक |
आणेवारी |
हक्काचे प्रमाण |
|
अ |
८ आणे म्हणजे |
१/२ हिस्सा |
|
ब |
८ आणे |
१/२ हिस्सा |
|
एकूण |
१६ आणे |
१ |
|
आणेवारी |
अपूर्णांक |
टक्केवारी |
|
१६ आणे |
१/१ |
१००% |
|
१२ आणे |
३/४ |
७५% |
|
८ आणे |
१/२ |
५०% |
|
६ आणे |
३/८ |
३७.५०% |
|
४ आणे |
१/४ |
२५% |
|
२ आणे |
१/८ |
१२.५०% |
|
१ आणा |
१/१६ |
६.२५% |
|
|
||
आणेवारीची एकूण बेरीज साधारणपणे १६ आणे असते. मात्र, प्रत्यक्ष सात-बारा उताऱ्यावर
वापरलेले संकेत, पैसे
किंवा इतर अपूर्णांक यांचे स्वरूप संबंधित अभिलेखानुसार तपासावे लागते.
आणेवारीमध्ये आण्याचे पुढे पैशांमध्येही विभाजन केलेले आढळते.
|
हिस्सा |
रुपयातील अंश |
टक्केवारी |
|
१ आणा |
१/१६ |
६.२५% |
|
२ आणे |
२/१६ |
१२.५०% |
|
४ आणे |
४/१६ |
२५% |
|
६ आणे |
६/१६ |
३७.५०% |
|
८ आणे |
८/१६ |
५०% |
|
१२ आणे |
१२/१६ |
७५% |
|
१६ आणे |
१६/१६ |
१००% |
पूर्वी व्यवहारात एक रुपया म्हणजे १६ आणे असे मानले जात
होते. एक आणा म्हणजे बारा पैसे; सोळा आणे म्हणजे एक रुपया; १९२ पैसे म्हणजे १६
आणे; म्हणजेच एक रुपया.
F सुत्र:
जमिनीचे एकूण
क्षेत्रफळ x खातेदाराची
दर्शविलेली आणेवारी (आण्याचे पै मध्ये रुपांतरण करून पै. ÷ १९२
५ x १२ = ६० + ४ =
६४ पै. या सुत्रानूसार येथे जमिनीचे एकूण
क्षेत्रफळ x ६४ ÷ १९२ असे
गणित येईल. याचे उत्तर म्हणजे पाच आणे चार पै क्षेत्र.
येथे एक महत्त्वाचा कायदेशीर फरक लक्षात घेतला पाहिजे. आणेवारीनुसार
काढलेले क्षेत्र म्हणजे त्या सहधारकाचा अविभाजित मालकीहक्काचा प्रमाणानुसार हिस्सा
होय. ते प्रत्यक्ष मोजणी करून स्वतंत्रपणे निश्चित केलेले क्षेत्र असेलच असे नाही.
आणेवारी ही सहधारकाचा जमिनीतील
अविभाजित हिस्सा दर्शवू शकते. आणेवारीमुळे प्रत्यक्ष जमिनीवर स्वतंत्र ताबा किंवा स्वतंत्र
हद्द निश्चित झाली असे गृहीत धरता येत नाही.
∙ पूर्वी जमिनीचे क्षेत्रफळ एकर व गुंठे या पद्धतीने
नोंदविले जात होते. उदा. १ एकर = ४० गुंठे.
∙ वजन व मापे मानके अधिनियम, १९५६ (Standards of Weights and Measures Act, 1956) लागू झाल्यानंतर दशमान पद्धतीचा
स्वीकार करण्यात आला. त्यानुसार जमिनीचे क्षेत्रफळ हेक्टर व आर या एककांत रूपांतरित करण्यात आले.
दशमान पध्दत अंमलात आल्यानंतर जमिनीबाबत चाळीस गुंठ्याचा एक
एकर आणि शंभर गुंठ्याचा एक हेक्टर असे समीकरण झाले.
मेट्रीक पध्दतीत ‘गुंठा’ या ऐवजी ‘आर’ असे
मोजमाप रुढ झाले.
परंतु मेट्रीक पध्दतीचे मोजमाप दशमान पध्दतीत बसवतांना गुंठ्यापेक्षा ‘आर’ चे
क्षेत्र पाच चौरस फुटाने कमी येते. जमिनीच्या क्षेत्राची वाटणी दशमान पध्दतीने करणे
अवघड असल्याने 'आणे-पै' पध्दत सुरु राहीली.
∙ ‘ १२
- बारा आणे
∙२‘६‘‘
- दोन आणे सहा पै
∙ ‘ ८-
आठ आणे
∙ ‘ ६
- सहा आणे
∙ १‘६‘‘ एक आणा सहा पै
b b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सात-बारा वरील आणेवारी. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !