आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

सात-बारा वरील आणेवारी

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

सात-बारा वरील आणेवारी

 प्राचीन चलन व्‍यवस्‍थेत 'कवडी' चा वापर चलन म्‍हणून केला जात होता. 'कवडी'च्‍या अस्‍तानंतर 'दमडी' चलनाच्‍या स्‍वरुपात वापरात आली, 'दमडी' नंतर 'धेला', नंतर 'आणा-पै', व शेवटी 'रुपया-पैसा'' असा चलनाचा प्रवास झाला.

 जमिनीच्या सात-बारा उतार्‍यावर 'आणेवारी' दाखल करण्‍याची पध्दत ब्रिटीश काळात अँडरसनच्या कारकिर्दीत रुढ झाली असे म्हटले जाते. प्राचीन अर्थक्षेत्रातील व्यवहारात प्रचलीत 'आणे-पै' पध्दतीचा यावर प्रभाव होता. महसूल खात्‍यावरही प्राचीन चलन व्‍यवस्‍थेचा प्रभाव असल्‍यामुळे बर्‍याच सात-बारा उतार्‍यांवर व्यक्तीच्या नावासमोर 'चार आणे क्षेत्र', 'आठ आणे क्षेत्र', 'दोन आणे चार पै' क्षेत्र इत्यादी लिहिण्‍याची पध्‍दत रुढ होती. याला महसुली भाषेत 'आणेवारी' म्हणतात.

 महत्त्वाचे कायदेशीर तत्त्व असे आहे की, सात-बारा उताऱ्यावरील सहधारकांची आणेवारी ही महसूल अधिकाऱ्यांच्या स्वेच्छाधिकाराने किंवा केवळ अंदाजाने निश्चित करता येत नाही. ती संबंधित व्यक्तींच्या कायदेशीर हक्काचा उगम, मूळ दस्तऐवज, वारसाहक्क, पूर्वीच्या अधिकार अभिलेखातील नोंदी आणि सक्षम न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे निश्चित केली पाहिजे.

तथापि, अनेक ठिकाणी याबाबतचे कायदेशीर आदेश आढळून येत नाहीत. काही ठिकाणी फक्त अर्जावरुन अशी 'आणेवारी' दाखल असल्याची नोंद आढळते.

 पूर्वीच्या सात-बारा उताऱ्यांमध्ये सहधारकांचे धारण क्षेत्र महाराष्ट्रातील जमीन महसूल अभिलेखांमध्ये सात-बारा (गाव नमुना ७/१२) उताऱ्यावर एकापेक्षा अधिक सहधारकांची नावे असल्यास, काही प्रकरणांत प्रत्येक सहधारकाच्या नावासमोर आणेवारी (Share / Fractional Share) नमूद केलेली होती. प्रत्‍येकाचे धारण क्षेत्र 'आणा-पै' स्वरूपात दर्शविले जात असे. या आणेवारीचा संबंध प्रामुख्याने संबंधित सहधारकाचा जमिनीतील अविभाजित हिस्सा किती आहे, हे दर्शविण्याशी होता.

 w कायदेशीर आधार: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १४८(क) अन्‍वये, संबंधित व्यक्तींच्या जमिनीतील हक्काचे स्वरूप आणि व्याप्ती (Nature and extent of respective interests) अभिलेखात नमूद करणे अपेक्षित आहे. म्हणूनच सहधारकांचा हिस्सा निश्चित करून अधिकार अभिलेखात दर्शविण्याची पध्‍दत रूढ झाली असावी. आणेवारी ही मालकीहक्काचे प्रमाण दर्शविणारी अभिलेखीय नोंद होती, ती स्वतःहून मालकीहक्क निर्माण करणारा दस्तऐवज नाही.आणेवारी म्हणजे प्रत्यक्ष जमिनीचे मोजमाप, स्वतंत्र ताबा किंवा हद्द निश्चिती असे समजणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही.

नंतरच्या अभिलेख व्यवस्थेतील सुलभीकरणामुळे सहधारकांचे क्षेत्र हेक्टर, आर आणि चौरस मीटर या मेट्रिक पद्धतीतही अधिक अचूकपणे दर्शविण्याची व्यवस्था विकसित झाली.

 w प्राचिन चलन पध्‍दत: पूर्वी रुपयाचे १६ आणे असे विभाजन होते. त्याच पद्धतीचा वापर जमिनीतील सहधारकांचे हिस्से दर्शविण्यासाठी केला जात असे. २५६ 'दमडी' = १९२ 'पै' = १२८ 'धेला' = ६४ 'पै' (जुना) = १६ 'आणा' = एक 'रुपया'

 उदाहरणार्थ, एखाद्या जमिनीचे एकूण क्षेत्र ४ हेक्टर आहे आणि त्यामध्ये दोन सहधारकांचे समान हक्क आहेत, तर:

सहधारक

आणेवारी

हक्काचे प्रमाण

अ  

८ आणे म्‍हणजे

१/२ हिस्‍सा

ब

८ आणे

१/२ हिस्‍सा

एकूण

१६ आणे

१

 याचा अर्थ दोन्ही सहधारकांचा जमिनीमध्ये समान अविभाजित हिस्सा आहे.

 w आणेवारीचे पारंपरिक गणित

आणेवारी

अपूर्णांक

टक्केवारी

१६ आणे

१/१

१००%

१२ आणे

३/४

७५%

८ आणे

१/२

५०%

६ आणे

३/८

३७.५०%

४ आणे

१/४

२५%

२ आणे

१/८

१२.५०%

१ आणा

१/१६

६.२५%


आणेवारीची एकूण बेरीज साधारणपणे १६ आणे असते. मात्र, प्रत्यक्ष सात-बारा उताऱ्यावर वापरलेले संकेत, पैसे किंवा इतर अपूर्णांक यांचे स्वरूप संबंधित अभिलेखानुसार तपासावे लागते.

 w आणेवारीमध्ये टक्‍केवारी कशी मोजली जाते?

आणेवारीमध्ये आण्याचे पुढे पैशांमध्येही विभाजन केलेले आढळते.

हिस्सा

रुपयातील अंश

टक्केवारी

१ आणा

१/१६

६.२५%

२ आणे

२/१६

१२.५०%

४ आणे

४/१६

२५%

६ आणे

६/१६

३७.५०%

८ आणे

८/१६

५०%

१२ आणे

१२/१६

७५%

१६ आणे

१६/१६

१००%

 w 'आणे' ‘ या चिन्हाने (एक उलटा स्‍वल्‍पपविराम) दर्शविले जातात आणि 'पै' ‘‘ या चिन्हाने (दोन उलटे स्‍वल्‍पविराम) चिन्हाने दर्शविले जात होते.

 w आणेवारीवरून प्रत्यक्ष क्षेत्र कसे काढावे?

पूर्वी व्‍यवहारात एक रुपया म्‍हणजे १६ आणे असे मानले जात होते. एक आणा म्हणजे बारा पैसे; सोळा आणे म्हणजे एक रुपया; १९२ पैसे म्हणजे १६ आणे; म्हणजेच एक रुपया.

 गाव नमुना सात-बाराचा विचार करता एक सात-बाराचे क्षेत्र म्‍हणजे १६ आणे (म्हणजे १९२ पैसे) मानले जाते. आणेवारी नुसार सात-बारा वरील खातेदाराचे क्षेत्र काढतांना खालील सूत्र वापरण्‍यात येते.

F सुत्र:

जमिनीचे एकूण क्षेत्रफळ x खातेदाराची दर्शविलेली आणेवारी (आण्‍याचे पै मध्‍ये रुपांतरण करून पै. ÷ १९२  

 उदा. पाच आणे चार पै आणेवारीचे क्षेत्र काढायचे असल्‍यास पाचला १२ (एक आणाचे पै रुपांतर) ने गुणावे म्‍हणजे पाच आण्‍याचे पै मध्‍ये रुपातर मिळेल. नंतर यात पाच आणे चार पै आणेवारीतील उर्वरीत चार पै. मिळवावेत.

५ x १२ = ६० + ४ = ६४ पै. या सुत्रानूसार येथे जमिनीचे एकूण क्षेत्रफळ x ६४ ÷ १९२  असे गणित येईल. याचे उत्तर म्‍हणजे पाच आणे चार पै क्षेत्र.

येथे एक महत्त्वाचा कायदेशीर फरक लक्षात घेतला पाहिजे. आणेवारीनुसार काढलेले क्षेत्र म्हणजे त्या सहधारकाचा अविभाजित मालकीहक्काचा प्रमाणानुसार हिस्सा होय. ते प्रत्यक्ष मोजणी करून स्वतंत्रपणे निश्चित केलेले क्षेत्र असेलच असे नाही.

आणेवारी ही सहधारकाचा जमिनीतील अविभाजित हिस्सा दर्शवू शकते. आणेवारीमुळे  प्रत्यक्ष जमिनीवर स्वतंत्र ताबा किंवा स्वतंत्र हद्द निश्चित झाली असे गृहीत धरता येत नाही.

 w दशमान पद्धती: महाराष्ट्रातील जमीन महसूल अभिलेखांच्या संदर्भात दशमान पद्धतीचे (Decimal System) रूपांतरण सन १९६४ पासून सुरू झाले. हे काम सन १९७२ पर्यंत पूर्ण करण्यात आले.

∙ पूर्वी जमिनीचे क्षेत्रफळ एकर व गुंठे या पद्धतीने नोंदविले जात होते. उदा. १ एकर = ४० गुंठे.

∙ वजन व मापे मानके अधिनियम, १९५६ (Standards of Weights and Measures Act, 1956) लागू झाल्यानंतर दशमान पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्यानुसार जमिनीचे क्षेत्रफळ हेक्टर व आर या एककांत रूपांतरित करण्यात आले.

दशमान पध्दत अंमलात आल्यानंतर जमिनीबाबत चाळीस गुंठ्याचा एक एकर आणि शंभर गुंठ्याचा एक हेक्टर असे समीकरण झाले. मेट्रीक पध्दतीत ‘गुंठा’ या ऐवजी ‘आर’ असे मोजमाप रुढ झाले.

परंतु मेट्रीक पध्दतीचे मोजमाप दशमान पध्दतीत बसवतांना गुंठ्यापेक्षा ‘आर’ चे क्षेत्र पाच चौरस फुटाने कमी येते. जमिनीच्या क्षेत्राची वाटणी दशमान पध्दतीने करणे अवघड असल्याने 'आणे-पै' पध्दत सुरु राहीली.

 ¨ आणेवारी चिन्‍हांची उदाहरणे:

 ∙ ‘ ४ - चार आणे

∙ ‘ १२ - बारा आणे

∙२‘६‘‘ - दोन आणे सहा पै

∙ ‘ ८- आठ आणे

∙ ‘ ६ - सहा आणे

∙ १‘६‘‘ एक आणा सहा पै 

b ž b

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला सात-बारा वरील आणेवारी. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.